आठवतं तुला?
दोन वेगळ्या वाटांवर चालता चालता
एका वळणावर आपण अवचित भेटलो होतो
तेव्हा तू हातात हात गुंफुन
थरथरत्या ओठांनी मला म्हणालीस
एकत्र चालायचं का रे?
"अगं पण......"
पण काय? अरे वेड्या...
एक भयानक वादळ आलंय
धुंद लाटांवर जीवापोटी धडपडताना
आपलं जगणंच एक वादळ झालंय
म्हणूनच साद घालते आहे तुला
निव्वळ माझ्यासाठी नव्हे रे
तुझीही तगमग बघवत नाहीये मला
सारे "पण" विसरुन तुझा हात हातात घेतला
ती जागा आणि तो क्षण अविस्मरणीयच
पण वादळ गेलं आणि लाटा पुन्हा शांत झाल्या
आपल्या वाटा पुन्हा फिरुन वेगळ्या झाल्या
आणि....
तो क्षण निसटलाच तेव्हा
हातातून वाळूचे कण अलगद निसटावेत तसा
आजही मी पुन्हा पुन्हा जातो तिथेच, त्याच वळणावर
ती जागा तशीच आहे
आपण तिथे लावलेल्या रोपट्याचा आता पारिजातक झालाय
तू मात्र भेटत नाहीस आताशा
हरकत नाही, नियतीकडे तक्रारही नाही
कारण तिथे अक्षय जाणवणारा तो गंध
तुझाच तर आहे!!
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
सुंदर्,प्राजक्त दरवळला.
सुंदर्,प्राजक्त दरवळला.
मस्त कविता मंदार. थोडक्या
मस्त कविता मंदार. थोडक्या शब्दात खूप काही सांगून जातोस तू.
“कारण तिथे अक्षय जाणवणारा तो
“कारण तिथे अक्षय जाणवणारा तो गंध
तुझाच तर आहे!!”
.... क्या बात है !
आपण तिथे लावलेल्या रोपट्याचा
आपण तिथे लावलेल्या रोपट्याचा आता पारिजातक झालाय
तू मात्र भेटत नाहीस आताशा
हरकत नाही, नियतीकडे तक्रारही नाही
कारण तिथे अक्षय जाणवणारा तो गंध
तुझाच तर आहे!!
>>>> छानंच!!!!
वाह मंदार!! दरवळली
वाह मंदार!!
दरवळली कविता...
पारिजातकाचा उपयोग चपखल....
जियो दोस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंदारा, मुक्तछंद बहरलाय.
मंदारा, मुक्तछंद बहरलाय. लांबी कमी केलीस तर इफेक्ट जास्त जाणवेल शेवटच्या ओळीचा.
आवडली. मंदार, क्या बात आहे,
आवडली.
मंदार, क्या बात आहे, एकदम कवितांकडे ?!!
तू मात्र भेटत नाहीस आताशा
तू मात्र भेटत नाहीस आताशा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हरकत नाही, नियतीकडे तक्रारही नाही
कारण तिथे अक्षय जाणवणारा तो गंध
तुझाच तर आहे!! >>>> खुप छान....
@ कौतुक, धन्यवाद. पुढच्या
@ कौतुक,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद. पुढच्या वेळी लक्षात ठेवतो
@ दिनेशदा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काही वळलो वगैरे नाही हो. वाटलं, लिहिलं..एवढंच
खुप सुंदर!
खुप सुंदर!:)
दुसरीकडे द्यायचा एक प्रतिसाद
दुसरीकडे द्यायचा एक प्रतिसाद चुकून इथे पोस्ट केला होता.
कवितेवर आधीच प्रतिसाद दिल्यामुळे आता डिलीट केलाय.
तू मात्र भेटत नाहीस आताशा
तू मात्र भेटत नाहीस आताशा
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हरकत नाही, नियतीकडे तक्रारही नाही
कारण तिथे अक्षय जाणवणारा तो गंध
तुझाच तर आहे!!
मंदार,
अप्रतिम !
या ओळी खुप आवडल्या !
तो गंध मात्र कुणी का विसरु शकत नाही...?
वा ! मस्त! आवडली ! >>>आजही
वा ! मस्त! आवडली !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>आजही मी पुन्हा पुन्हा जातो तिथेच, त्याच वळणावर
ती जागा तशीच आहे
आपण तिथे लावलेल्या रोपट्याचा आता पारिजातक झालाय
तू मात्र भेटत नाहीस आताशा
हरकत नाही, नियतीकडे तक्रारही नाही
कारण तिथे अक्षय जाणवणारा तो गंध
तुझाच तर आहे!!<<< हे खासच !
कारण तिथे अक्षय जाणवणारा तो
कारण तिथे अक्षय जाणवणारा तो गंध
तुझाच तर आहे!!
व्वा, फार छान कविता. !!!!
सुंदर
सुंदर
सर्वांना धन्यवाद. नुकतंच
सर्वांना धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नुकतंच गांभीर्याने कविता करु लागलोय, ते ही मुक्तछंदात, तेव्हा सुधारणेला वाव आहेच.
जाणकारांनी मार्गदर्शन करत रहावं ही विनंती.
कारण तिथे अक्षय जाणवणारा तो
कारण तिथे अक्षय जाणवणारा तो गंध
तुझाच तर आहे!!
>> हो, हे मस्तच आहे... ही ओळ फारच आवडली!!!
आणि हो, वाचताना थोडी लांबल्या सारखीच वाटली.......
मन्दया काय चालावलायास काय ?.
मन्दया काय चालावलायास काय ?. एकसे बढकर एक कविता .
ही पण खूपच छान
"तू मात्र भेटत नाहीस आताशा
हरकत नाही, नियतीकडे तक्रारही नाही
कारण तिथे अक्षय जाणवणारा तो गंध
तुझाच तर आहे!! ""वा क्या बात है:)
सहज..सुंदर...प्रत्येकाला
सहज..सुंदर...प्रत्येकाला आपलाच अनुभव वाटावा इतकी सच्ची पण तेवढीच तरलही.
खुप आतवर पोहोचली कविता.
-धन्यवाद!
आवडली. एक भयानक वादळ
आवडली.
एक भयानक वादळ आलंय
धुंद लाटांवर जीवापोटी धडपडताना
आपलं जगणंच एक वादळ झालंय
अगदी यथार्थ मांडलंय!
सुंदर रे ..खूप आवडली!!!
सुंदर रे ..खूप आवडली!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कवितेचा शेवट फारच
कवितेचा शेवट फारच छान्.अप्रतिम.
छान.
छान.
छान. धुंद लाटांवर जीवापोटी
छान.
धुंद लाटांवर जीवापोटी धडपडताना
आपलं जगणंच एक वादळ झालंय>>>>>
सही!
कौतुकशी सहमत. मुक्तछंदात शेवट येतच नाही असे वाटण्याची आपली मु छ वाली सवय (स्वानुभव); त्यामुळे शेवटचा पंच तेव्हढा इंपॅक्ट देत नाही.
एकूण मस्तच.
मस्तच ! कौतुकशी सहमत
मस्तच ! कौतुकशी सहमत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा छान आहे.
वा छान आहे.
अरे ... मस्तच रे
अरे ... मस्तच रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आजही मी पुन्हा पुन्हा जातो
आजही मी पुन्हा पुन्हा जातो तिथेच, त्याच वळणावर
ती जागा तशीच आहे
आपण तिथे लावलेल्या रोपट्याचा आता पारिजातक झालाय
तू मात्र भेटत नाहीस आताशा
हरकत नाही, नियतीकडे तक्रारही नाही
कारण तिथे अक्षय जाणवणारा तो गंध
तुझाच तर आहे!!
>>>>>
वाह! ग्रेट एकदम!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंदारराव, लई भारी..
छान !
छान !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages