Submitted by घुमा on 19 August, 2011 - 13:44
माझ्या तळहातावरून रेषा वेड्यावाकड्या धावी
कुठल्याश्या झाडाची मुळे जणू जमिनीत खोल रुतावी.
यांच आयुष्य जगते मी की या माझ्यामुळे जगतात?
माझ्या गतजीवनातून प्राण शोषतात की या माझ्या भविष्यावर तगतात?
गहिऱ्या या लकिरीन्शी नात आहे माझं गहिरं.
मला त्यांची सोबत असते, त्यांना तरी कोण आहे दुसरं!
गुलमोहर:
शेअर करा
ओढून ताणून केल्यासारखी वाटते.
ओढून ताणून केल्यासारखी वाटते.
छान आहे!
छान आहे!:)
हर्षदा, आभार! विभाग्रज,
हर्षदा, आभार!
विभाग्रज, प्रान्जळ मत दिल्या बद्दल अभार!
शेवट मलाही मनासारखा वाटला नाही. या कविते मागची गम्मत अशी की आम्ही एका फ़ेअर (मेळा) मधे गेलो असताना तिथे एक बाई हात पहात होती. मी माझा हात दाखवला पण मग मला प्रश्न पडला, हातावरच्या रेषा माझ वागण ठरवतात की माझ्या वागण्यानी त्या बदलतात? व त्यातुन मला ही कल्पना आली. प्रश्नाचे उत्तर मात्र मिळले नाही!