किती रे त्रास करुन घेतोस माझ्यासाठी?
अगदी कळवळून म्हणालीस....
स्वतःच घातलेली साद विसरुन
माझ्या प्रतिसादानेच विव्हळलीस
अगं, वेडी की खुळी तू....
तेरे दुख अब मेरे, मेरे सुख अब तेरे
हे गुणगुणत तुझा हात पकडलाय ना....
तो हे ऐकायला नाही!
आनंदात एकत्र झुलायला
अन् वेदनेत विसरायला नाही!
माझ्या अश्रूंना वाट करुन देणारी तू
तुझी दु:ख झेलणारा मी
माझ्या यशात स्वतःचं सूख शोधणारी तू
तुझ्या आनंदात बेभान होणारा मी
यात मोठं कोण? आणि कोण वेगळं?
कोण श्रेष्ठ? आणि कोण आगळं?
तरीही म्हणतेस....
किती रे त्रास करुन घेतोस माझ्यासाठी?
तुझ्या माझ्यात
एकच कृत्रिम अंतर उरलय आता....
"=" या बरोबर चिन्हाचं
दोघांनी पुसायचं का.........ते ही?
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
मंद्या, स्पष्ट मत. दोघात जर =
मंद्या, स्पष्ट मत. दोघात जर = हे चिन्ह असेल तर मग अंतराचा प्रश्न येतोच कुठे ? अरे, एकरुप झाले दोघे. आता पुसणार काय गड्या ?
रोमॅन्टीक! किती रे त्रास करुन
रोमॅन्टीक! किती रे त्रास करुन घेतोस माझ्यासाठी? अस कोणी तुला बोलले हेही कमी नाही!
लय भारी मंदारभौ!
लय भारी मंदारभौ!
तरीही म्हणतेस.... किती रे
तरीही म्हणतेस....
किती रे त्रास करुन घेतोस माझ्यासाठी?
तुझ्या माझ्यात
एकच कृत्रिम अंतर उरलय आता....
"=" या बरोबर चिन्हाचं
दोघांनी पुसायचं का.........ते ही?
अगदी चपखल.
आवडली कविता.
@ कौतुक माझ्या मते जो पर्यंत
@ कौतुक
माझ्या मते जो पर्यंत "=" हे चिन्ह टाकायची गरज भासते आहे तो पर्यंत एकरूप होण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही.
म्हणून ते पुसायचं. अर्थात हे माझं लॉजिक
“माझ्या अश्रूंना ……… बेभान
“माझ्या अश्रूंना ……… बेभान होणारा मी”
…… सहजतेने उतरलेला आशय.
एकमेकाला इतकं समजून घेतल्यावर आणखी काय हवं ???
------------------------------------------------------------------------------------------------------
उमेश कोठीकर आणि कौतुक शिरोडकर यांनी व्यक्त केलेल्या मतांशी बर्याच अंशी सहमत.
काय मंदार ... !! इकडे कसा
काय मंदार ... !!
इकडे कसा फेरफटका ?
बरे आहात ना ?
छानच
छानच
आवडली! मस्त एकदम!
आवडली! मस्त एकदम!
यात मोठं कोण? आणि कोण
यात मोठं कोण? आणि कोण वेगळं?
कोण श्रेष्ठ? आणि कोण आगळं?
>>> अ प्र ति म !!!!!
तुझ्या माझ्यात एकच कृत्रिम
तुझ्या माझ्यात
एकच कृत्रिम अंतर उरलय आता....
"=" या बरोबर चिन्हाचं
दोघांनी पुसायचं का.........ते ही?
>>>>> मंदार, दोन भिन्न रुपे, व्यक्तित्व एकरुप झाली हे अगदी नेमक्या शब्दांत मांडलंस.
सुरेख! आवडलं.
सुंदरच कविता.
सुंदरच कविता.
क्या बात है...! पुसलस की
क्या बात है...!
पुसलस की नाही अजुन मग ते??? किती वर्ष झाली लग्नाला रे
जमलीये रे कविता मंदार... लहान
जमलीये रे कविता मंदार...
लहान तोंडी मोठा घास असे करून सांगावेसे वाटते विषय चांगला मांडलाय पण अजून त्यात स्पष्टपणा यायला हवा होता.
व्वा!!
व्वा!!
>>>तरीही म्हणतेस.... किती रे
>>>तरीही म्हणतेस....
किती रे त्रास करुन घेतोस माझ्यासाठी?
तुझ्या माझ्यात
एकच कृत्रिम अंतर उरलय आता....
"=" या बरोबर चिन्हाचं
दोघांनी पुसायचं का.........ते ही?>>
मस्तच..
तेरे मेरे सपने अब एक रंग
तेरे मेरे सपने अब एक रंग है..!
सुरेख.
एकच कृत्रिम अंतर उरलय
एकच कृत्रिम अंतर उरलय आता....
"=" या बरोबर चिन्हाचं
दोघांनी पुसायचं का.........ते ही?
>>
वा वा
Pages