वेड पत्रिकेचे

Submitted by अनन्या२२२ on 21 July, 2011 - 08:09

रवीशुक्राच्या राज्यी सान्ग मजला सान्ग रमणी
काय लिहीले मम भाळी सान्ग रमणी सान्ग ग...
गोष्टी मान्डल्या घरातील
बारा दालने बार राशि
मन्गळ शनी रवी शशी
सान्गती कहाणी हर जन्माची
नशीब बनवीती नशीब ठरवीती
कोणाने ती प्रसन्न होती....?
सान्ग मजला सान्ग रमणी........

नाद हा बरा नव्हे
ठावे मजला बरे
तरी वेडे मन माझे
या १२ दालनात जडे
वेड ह्याचे तुला ठावे
सान्ग रमणी सान्ग मजला

रहस्य बारा घरान्चे.......!!!!

जप केला गुरु हसण्यासाठी
तर रुसुन बसतो चन्द्रमा
पूजन करावे त्या शनीदेवाचे
दुरुनी गुरकावती राहु केतू
प्रसन्न करुया म्हंणले रवीराजाला
तर का रुष्ट होई कोपीष्ट मन्गळ
कशी करावी बरी त्याची चन्गळ?....
शुक्राने माझ्याशी जोडी करावी
असा काही उपाय सान्ग
सान्ग रमणी सान्ग मजला
गोष्ट ह्या बारा दालनान्ची
अपुर्व ह्या बार घरान्ची
नवलाई ह्या ग्रह्तार्‍यान्ची...
सान्ग रमणी सान्ग मजला....!!!!!!!

गुलमोहर: 
शब्दखुणा: