विंबल्डन - २०११

Submitted by Adm on 15 June, 2011 - 11:06

विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेचे यंदाचे १२५ वे वर्ष. यंदा ही स्पर्धा २० जून ते ३ जुलै दरम्यान रंगणार आहे.
आज जाहिर झालेल्या मानांकनानुसार पुरूष एकेरीत नदाल, जोको, फेडरर आणि मरे तर महिला एकेरीत वॉझनियाकी, किम, झ्वोनारेव्हा, ना ली ह्यांना अनुक्रमे पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे मानांकन मिळाले आहे. भारताच्या महेश भुपती आणि लिएंडर पेस ह्यांना पुरूष दुहेरीत तिसरे तर रोहन बोपण्णा आणि पाकिस्तानच्या एसान कुरेशी ह्या जोडीला चौथे मानांकन मिळाले आहे.
गतविजेती सेरेना विल्यम्स आणि माजी विजेती व्हिनस विल्यम्स ह्यांनी दुखापतीतून सावरून ह्या स्पर्धेद्वारे पुनरागमन निश्चित केलं आहे. ह्या दोघींना अनुक्रमे आठवे आणि चोविसावे मानांकन मिळाले आहे.

मानांकनानुसार खेळाडू आपापले सामने जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेर्‍या अश्या होतील..

पुरूष एकेरी :
राफा वि बर्डिच
मरे वि रॉडिक
फेरर वि फेडरर
सोड्या वि जोको

महिला एकेरी :
वोझजियाकी वि शारापोव्हा
ना ली वि सेरेना
स्किव्होनी वि अझारेंका
क्विटोव्हा वि झ्वोनारेव्हा (ह्या भागात व्हिनस पण आहे)

हा धागा यंदाच्या विंबल्डनविषयी चर्चा करण्यासाठी....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त मॅच चाललीय. दोघे एकमेकांना तोडीस तोड खेळतायत -- चुका पण तोडीस तोड!
मॅच पाचव्या सेट मध्ये जावी या आशेत..

येस!! येस! येस्स्स्स्स !!!!

जोको.. तुस्सी ग्रेट हो!! Happy

कृपया कोणीतरी माझ्यातर्फे तो डान्स करणारा आयकॉन टाका रे..

मस्त कमबॅक केला जोको ने..... सॉलीड खेचून आणली.
जोको आणि त्याच्या चाहत्यांचे हार्दिक अभिनंदन.

शारापोव्हा आणि राफा हारले वा वा मजा आ गया Proud

जोको भारी खेळला म्हणे. आमची मिस झाली मॅच Sad

विजेत्यांचे अभिनंदन !!!

जोकोचे अभिनंदन! Happy
(मला राफाच जिंकायला हवा होता, तरी हे मान्यच, की जोको चांगला खेळला. राफाच्या काही चुका म्हणजे 'हा नक्की नदालच आहे ना?' वाटाव्या अशा होत्या, असो. The most magnanimous player in defeat and the most modest player when he wins असं त्याचं वर्णन केलं कॉमेन्टेटरने Happy पुढच्या वर्षीसाठी राफाला शुभेच्छा.)

आतल्या बोर्डावर ताबडतोब जिंकलेल्या खेळाडूचे नाव लिहितात, हे सर्वात भारी वाटले!! गो विम्बल्डन!!

जोको २००० पॉइंट्सच्या आघाडीने क्रमवारीत पहिल्या स्थानी आला.
आता सध्याचे रँकिंग सीडिंग्ज मधे बदलेल तेव्हा राफा वि फेडरर असे उपंत्य फेरीचे सामने होऊ शकतील.

"दोन सेट जिंकल्यावर, जोकोविच आता विम्बल्डन जिंकल्यावर कोणाकोणाचे आभार मानायचे, बीबीसीच्या मुलाखतीत काय सांगायचे याचे बेत आखायला लागला, तेव्हढ्यात नदालने एक सेट खिशात टाकला." इति बोरिस बेकर. Happy

मस्त झाली मॅच.

दोन्ही मॅचेस पहाता आल्या नाहीत.. Sad
शारापोव्हा सेमीफायनलच कशीबशी जिंकली होती.. मयेकर म्हणाले तसं मोक्याच्या क्षणी कमी वाईट खेळली आणि जिंकली... हायलाईट्स वरून फायनल अगदीच एकतर्फी झाल्यासारखं वाटलं... क्विटोव्हा पूर्ण तयारीनिशी येऊन जिंकून गेली.. ! हिचातरी फॉर्म आता टिकावा..

राफा आणि जोकोचे जेव्हडे पॉईंट्स हायलाईट्समध्ये दाखवले त्यावरून तरी मॅच जबरी झाली असं वाटलं.. दोघांनाही अफाट क्रॉसकोर्टस आणि भारी डिफेंड केलं.. अर्थात कधी नव्हे ते राफा अगदी जेमतेमच बॉलपर्यंत पोचतोय असं वाटलं.. जोको जिंकला ते एकदम भारी वाटलं.. राफा आणि जोकोमधली चुरस येत्यावर्षांमध्ये टिकली तर पुढच्या स्पर्धा पहायला धमाल येईल.. !

१२५ व्या स्पर्धेत दोन्ही नवे विजेते.. ! गो विंबल्डन... !! Happy

दोन्ही फायनल्स पाहील्या..

शॅरापोव्हाने फारच निराशा केली. पण ती ज्या पद्धतीने खेळत होती ते पाहुन ती फायनलपर्यंत आली त्याचेच नवल वाटले.क्विटोव्हा मस्तच खेळली.

डावखुरे टेनिसपटु डावखुर्‍या क्रिकेटपटुंसारखेच एकदम स्टायलिश दिसतात हे मात्र एकदम खर..(उदा. जिमी कॉनर्स्, जॉन मॅकेन्रो,गोरान इव्होनोव्हिच् व नदाल्) टेनिसमधे त्यांच्या डावखुरेपणामुळे ते एकेक असे जबरदस्त अँगल्सचे शॉट्स मारुन प्रतिस्पर्ध्याचे काम अगदी अवघड करुन टाकतात.क्विटोव्हाने पण असे जबरी अ‍ॅंगल्सचे शॉट मारुन शॅरापोव्हाला अगदीच निष्प्रभ करुन टाकले. त्यात शॅरापोव्हाची सर्व्हिस म्हणजे अ‍ॅसेट्स ऐवजी लायबिलीटीच वाटत होती...

पुरुषांच्या अंतिम फेरीत जाकोव्हिच ज्या पद्धतीने खेळला त्यावरुन तोच जिंकला हा निकाल योग्यच होता. त्याला या वर्षी प्रथमच बघीतला खेळताना.. त्याच्या या वर्षीच्या ४७-१ रेकॉर्डमुळे (नदालविरुद्ध ४-०!) त्याच्या खेळात जबरदस्त आत्मविश्वास आलेला दिसला. गंमत म्हणजे फायनलमधल्या जवळजवळ सगळ्या लाँग रॅलीजमधे जाकोव्हिच नदालला पुरुन उरला व त्या सगळ्या रॅलीज (ज्या नेहमी नदालच जिंकतो) जाकोव्हिचच जिंकला.. त्यामुळे नदाल कधी नव्हे तो निराश झालेला उघड उघड दिसत होता.

आणी फेडरर उपांत्यपुर्व फेरीतच हरला.. तोही सोंगाकडुन.. तेही पहीले २ सेट जिंकुनही..:( ...आता या वर्षीच्या यु एस ओपनला जायलाच हवे... धिस यिअर मे बी द लास्ट टाइम वुइ कॅन सी द ग्रेट फेडरर विथ अवर ओन आइज..अ‍ॅट यु एस ओपन...:(

बाय द वे.. मृदुला.. बेकर कुठल्या चॅनलवर कॉमेंटरी करत होता?

आणी जाता जाता.... फायनली कर्टन ऑन ब्रेकफास्ट अ‍ॅट विंबल्डन.... पुढच्या वर्षीपासुन विंबल्डन एन बी सी वर नाही....:(

पराग.. आता एक नोस्टाल्जिया म्हणुन तरी माझे ब्रेकफास्ट अ‍ॅट विंबल्डन हे सदर पुरे करायलाच हवे... जस्ट टु मेनी मेमरीज फ्रॉम पास्ट ३३ यिअर्स.. बोर्ग्-मॅकेन्रो,मॅकेन्रो-कॉनर्स,बेकर्-एडबर्ग्,सँप्रास-अ‍ॅगॅसी, बेकर्-सँप्रास, सँप्रास-गोरान इव्होनोव्हिच्,सँप्रास्-राफ्टर,फेडरर-नदाल...... नवरातिलोव्हा-ख्रिस एव्हर्ट, स्टेफी ग्राफ्-नवरातिलोव्हा,स्टेफी ग्राफ्-अरांचा सँकेज, स्टेफी-गॅब्रिएला सॅबाटीनी... किती किती.. त्या मस्त आठवणी...:(

मुकुंद, "धिस यिअर मे बी द लास्ट टाइम वुइ कॅन सी द ग्रेट फेडरर विथ अवर ओन आइज..अ‍ॅट यु एस ओप"" असं का म्हणता?
हे वाचा :
http://www.indianexpress.com/news/feds-wishlist-sampras-serve-edberg-vol...
विंबल्डन सुरू होण्याआधीची मुलाखत.
Is it irritating to see that people are not talking about you as a potential champion, like in the build up to Roland Garros?

* I felt I was (in contention). I was quite surprised (how people) said ‘oh you have no pressure’. That I was such a small favourite, only later did I hear that and was quite surprised. Sometimes people are very short sighted and they look at only the last three weeks instead of looking at the last three years. That’s unfortunately how tennis is. I know I have a chance for world number one if I play well from now till the U.S. Open. The players know that but sometimes people tend to forget.

मयेकर.. फेडररने पहिल्या ६ वर्षात १५ ग्रँड स्लॅम विजेतेपद अगदी सहज खेळुन मिळवली.. पण गेल्या २ वर्षात त्याने फक्त एकच ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवले आहे याचे खुप दु:ख वाटते.. व आता गेल्या २ वर्षातला नदाल व जाकोव्हिचचा रेकॉर्ड व उंचावलेला खेळ बघुन फेडररचा खेळ (त्याच्या स्टँडर्ड नुसार!)ढेपाळला आहे हे बोचरे सत्य बघुन अजुनच जिवाला वाइट वाटते.. त्याला जर आता वयाच्या तिशीत अजुन ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवायची असतील तर लवकरच त्याच्या खेळातला गवसलेला मोजो त्याला सापडावा अशीच माझी मनोमन इच्छा आहे.. ज्या पद्धतीने जाकोव्हिच खेळत आहे ते पाहुन फेडररपुढे फारच उंच चढण आहे असे वाटते.

त्याच्यासारखे ग्रेसफुल व सहजसुंदर टेनिसचे प्रात्य्क्षिक परत आपल्याला बघायला मिळेल की नाही याची रुख्रुख मनाला लागत आहे. २०१२ पर्यंत तो असाच हरत राहीला तर मला नाही वाटत की तो २०१२ च्या यु एस ओपनपर्यंत खेळेल. त्याचे काम दिवसागणिक अजुनच कठीण होत जाणार आहे... कारण रिमेंबर वन थिंग... नो मॅटर हु यु आर... एज गेट्स यु... पण तरीही या यु एस ओपनमधे फेडरर जर जिंकला तर माझ्यासारख्या फेडरर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरणार नाही..:)

मुकुंद पण तुम्हाला आणि तुमच्यासारख्या टेनिसप्रेमींना जे वाटतंय, तसं फेडररला नाही वाटत.
हे खरंय की यंदाचं विम्बल्डन तो जिंकला असता, तर राफा, जोको आणि फेडरर तिघांचेही रँकिंग पॉइंट्स जवळपास सारखेच झाले असते.
पण गेल्या तीन वर्षांतली कामगिरी (२००८- फक्त यु एस ओपन), २००९ (फ्रेंच ओपन व राफाच्या अनुपस्थितीत विंबल्डन), २०१० (ऑस्ट्रेलियन ओपन), २०११ (सहा महिन्यात फक्त दोहा ओपन जिंकलीय) दिसत असूनही तो लोकांना शॉर्ट साइटेड म्हणतोय.
In less than two months you turn 30. Are you worried?

* No, no problem. I can only smile about it. Do I feel 30? I guess I do. I feel ripe like a grape for (a good quality) wine. Everybody who’s 20 wants to stay 20 and everybody who turns 30 wants to stay 30. That’s the feeling I get. You’ve already experienced a lot but there’s still a lot to come. It’s a wonderful age and I’m looking forward to the next 10 years

हा आत्मविश्वास कामगिरीत दिसला तर टेनिस प्रेमींसाठी पर्वणीच आहे.

पराग.. आता एक नोस्टाल्जिया म्हणुन तरी माझे ब्रेकफास्ट अ‍ॅट विंबल्डन हे सदर पुरे करायलाच हवे. >>>>> मुकुंद ब्रेकफास्ट अ‍ॅट विंबल्डनसाठी लाप्या वाजवून वाजवून दमलो आम्ही !!! पूर्ण कर आता(तरी) नक्की.. Happy

Pages