विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेचे यंदाचे १२५ वे वर्ष. यंदा ही स्पर्धा २० जून ते ३ जुलै दरम्यान रंगणार आहे.
आज जाहिर झालेल्या मानांकनानुसार पुरूष एकेरीत नदाल, जोको, फेडरर आणि मरे तर महिला एकेरीत वॉझनियाकी, किम, झ्वोनारेव्हा, ना ली ह्यांना अनुक्रमे पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे मानांकन मिळाले आहे. भारताच्या महेश भुपती आणि लिएंडर पेस ह्यांना पुरूष दुहेरीत तिसरे तर रोहन बोपण्णा आणि पाकिस्तानच्या एसान कुरेशी ह्या जोडीला चौथे मानांकन मिळाले आहे.
गतविजेती सेरेना विल्यम्स आणि माजी विजेती व्हिनस विल्यम्स ह्यांनी दुखापतीतून सावरून ह्या स्पर्धेद्वारे पुनरागमन निश्चित केलं आहे. ह्या दोघींना अनुक्रमे आठवे आणि चोविसावे मानांकन मिळाले आहे.
मानांकनानुसार खेळाडू आपापले सामने जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेर्या अश्या होतील..
पुरूष एकेरी :
राफा वि बर्डिच
मरे वि रॉडिक
फेरर वि फेडरर
सोड्या वि जोको
महिला एकेरी :
वोझजियाकी वि शारापोव्हा
ना ली वि सेरेना
स्किव्होनी वि अझारेंका
क्विटोव्हा वि झ्वोनारेव्हा (ह्या भागात व्हिनस पण आहे)
हा धागा यंदाच्या विंबल्डनविषयी चर्चा करण्यासाठी....
उदय वन गंमत करता काय ? चहा
उदय वन गंमत करता काय ? चहा घशात अडकला ना![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
नाहीतर काय. आधी पोस्ट एडिट
नाहीतर काय. आधी पोस्ट एडिट करा उदयवन
राफाच्या फेसबूकवर हे लिहिलय..
राफाच्या फेसबूकवर हे लिहिलय..
Good morning everybody. Yesterday after the match I went to take an MRI at a London hospital. During the match I thought I had something serious but as the match went through the pain got better and thankfully the tests don't show an injury. Today I will practice at 4.30 pm and I'll play tomorrow. Thanks all for the support.
डेल पोत्रो अनुभव नसल्यामुळे
डेल पोत्रो अनुभव नसल्यामुळे हरला. पहिल्या सेटला टाय ब्रेकर मधे लीड असताना.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
चौथ्या सेट मधे त्याची सर्विस ब्रेक चुकीच्या निर्णयामुळे झाली.
नादालला अगदी इक्वल फाइट दिली. नदालला नविन दुखण्याचा त्रास मॅच मधे तरी जाणवत नव्हता असे वाटले.
मॅच तुफान मस्त झाली. बर्याच दिवसांनी पॉवरबाज सर्व्ह अँड व्हाली चा गेम पहायला मिळाला. विजय सुद्धा लय खुश होता.
परागने अनेक वेळा गो म्हणल्यामुळे नदाल जवळ जवळ बाहेर गेला होता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फिश सॉलिड खेळत होता.
नविन ऑसी टॉमिच आणि महिलांमधे लुसिबी धमाल करत आहेत.
दुखापतीमुळे तो बाहेर पडलाय
दुखापतीमुळे तो बाहेर पडलाय अशी बातमी आहे. ऑफिशियली डिक्लेअर केलं का त्याने?
अरे तो खेळला तर मला आनंदच
अरे तो खेळला तर मला आनंदच होइल....पण त्याच्या ट्विटर अकाउट वरुन त्याने संभ्रम निर्माण केला आहे....दुखापत जास्त आहे...औषध घेउन एकदा खेळता येयील पण रिस्क जास्त आहे
http://www.guardian.co.uk/spo
http://www.guardian.co.uk/sport/2011/jun/28/rafael-nadal-fit-wimbledon-q...
हे वाचा... नदाल खेळणार आहे असे लिहिलेय...
डेल पोत्रो अनुभव नसल्यामुळे
डेल पोत्रो अनुभव नसल्यामुळे हरला. >>> Really ??? नक्की कसला अनुभव कमी पडला म्हणे ? तो २००६ पासून ग्रँडस्लॅम खेळतोय. ४ वेळा चौथ्या फेरीच्या पुढे गेला आहे. २ वेळा क्वार्टरफायनल एकदा सेमी फायनल आणि एकदा ग्रँडस्लॅम जिंकला आहे.. ते ही एकाच स्पर्धेत फेडरर आणि राफा दोघांना हरवून ! आणखीन काय हवय..
चौथ्या सेट मधे त्याची सर्विस ब्रेक चुकीच्या निर्णयामुळे झाली. >>> बर !
नदालला नविन दुखण्याचा त्रास मॅच मधे तरी जाणवत नव्हता असे वाटले. >>>> कसला भारी अॅक्टर आहे नै नदाल !! टाच दुखावल्याची अॅक्टींग काय सह्ही केली.. शिवाय विश्रांती मिळावी म्हणून मधे उपचारही घेतले... आणि त्रिविक्रमांना फोन करून सांगितलं की मला विषेश त्रास जाणवत नव्हता म्हणून..
नादालला अगदी इक्वल फाइट दिली. >>>>
मॅच तुफान मस्त झाली. बर्याच दिवसांनी पॉवरबाज सर्व्ह अँड व्हाली चा गेम पहायला मिळाला. >>>>> अनुमोदन.. डेल पोट्रो जिंकला असता तरी काही फार वाईट वाटलं नसतं कारण खूप टफ मॅच होती.. अर्थात राफा काकणभर का होईना पण सरस ठरला म्हणून जिंकला.. तर ते मान्य करा ना.. उगाच काय बळच (illogical) कारणं काढायची !
बर्टोली पहिला सेट हरली तिकडे..
दुसरा सेट चांगला चाललाय.
दुसरा सेट चांगला चाललाय. बार्टोली आणि पिरोंकोव्हा , काल थकल्या आहेत राक्षसांशी खेळून![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मिलिंदा... पिरोंकोव्हा कुठे
मिलिंदा... पिरोंकोव्हा कुठे थकली.. तिच्याशी खेळताना व्हिनस मात्र थकली आणि बाहेर पडली.. सरळ दोन सेट मध्ये विजय म्हणजे कुठले थकायला...
बोर्टोलीने दुसरा सेट घेतला की.. ती एकदम बकवास प्लेयर वाटते पण.. फोरहॅण्ड पण दोन्ही हातानी मारते...
हारतेय की काय बार्टोली. ब्रेक
हारतेय की काय बार्टोली. ब्रेक झाली तिसर्या सेटमध्ये.
दमली = कालच सामना खेळली आणि
दमली = कालच सामना खेळली आणि आज परत
बाकीच्या दोघी काल दमल्या नाहीत खेळून
हरली बार्टोली. तिसर्या मॅच
हरली बार्टोली. तिसर्या मॅच पॉईंट वर जिंकली लिसिकी
मिलिंदा सगळेच सामने कालच होते
मिलिंदा सगळेच सामने कालच होते की... चवथ्या फेरीचे... तशा सगळ्याच दमल्यात मग...
बार्टोली बाहेर.. आता शारापोव्हा आणि चिबुल्कोव्हा ची मॅच.. चिबुलकोव्हा जिंकायला पाहिजे.. म्हणजे फायनल जरा शांततेत पार पडेल..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असंच काही नाही, अझारेंका आहे
असंच काही नाही, अझारेंका आहे ना अजून ओरडणारी
पाऊस थांबत नाहीए , सेंटर
पाऊस थांबत नाहीए ,![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
सेंटर कोर्टवर पुढची मॅच मिक्स्ड डबल्स- बोपन्ना मिर्झा
शारापोव्हा आरामात जिंकेल असे
शारापोव्हा आरामात जिंकेल असे दिसते.
शारापोव्हा पण पोचली पुढे.
शारापोव्हा पण पोचली पुढे.
>>> म्हणजे फायनल जरा शांततेत
>>> म्हणजे फायनल जरा शांततेत पार पडेल..
टेनीस मधली शांतता हरवतच चाललीये ना .. कण्हणे, किंचाळणे, धापा टाकणे हीच नवी फॅशन, ट्रेंडसेटर कोण ते माहितच असेल आपल्याला, हो की नाही पराग? :p
क्वार्टर फयनलला कोण कोण नविन
क्वार्टर फयनलला कोण कोण नविन नविन बाया आल्यात !
>>
हो ना.. पण ही परिस्थिती काही महिला टेनिसमध्ये नवीन नाही. वर्षानुवर्षे असेच आहे. दरवर्षी नवनव्या 'इव्हा' आणि 'विच' येतात तिथे. पुरुषांमधले 'अॅडम' किमान दोन तीन वर्षे तरी टिकतात.
तिच्याविरुद्ध जिंकलेली एकदम गोड आहे (काय म्हणतोस सँटी यावर?)![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>>
अगं नको. मागे त्या इवानोविचच्या प्रेमात पडलो आणि तो प्रेमभंग अजून लक्षात आहे माझ्या
नद्दूला भरपूर पळवलेलं दिसतंय पोट्रोने. पाय दुखावला त्याचा.
तो टॉमिक्/च भारी वाटला मला. सोड्याला चांगलेच हरवले त्याने. एकदम तरूण आहे, स्टाईलपण चांगली आहे त्याची. त्याची आणि जोकोची मॅच मस्त होईल खरंच. बाकीच्या सामन्यांचा निकाल अपेक्षित लागेल असं वाटतंय.
शारापोव्हा जिंकली ! बार्टोली
शारापोव्हा जिंकली !
बार्टोली हरली !! बघा मी उगीच नाही तिला नावं ठेवत.. आधी सिडेड खेळाडूंना हरवायचं.. मग पुढच्या फेरीत स्वतः हरायचं.. उपयोग काय ?
सशल तुझ्या प्रश्नाचा अनुल्लेख..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
शारापोव्हाने किबुल्कोव्हा ला
शारापोव्हाने किबुल्कोव्हा ला किरकोळीत काढले अगदी... परवाच्या तिच्या जोरदार खेळामुळे शारापोव्हा ला ट्फ फाईट देईल असे वाटले होते...
पोट्रो म्हणे एक्मेव असा खेळाडू आहे ज्याने एकाच ग्रँड स्लॅम मध्ये नदाल आणि फेडी ला हरवायची किमया केली आहे... २००९ च्या यु.स ओपनला ... पग्या खरे आहे का हे?
नदाल ला चांगले जेरीस आणले होते त्याने...
पिरोन्कोव्हाची मॅच दुसर्या
पिरोन्कोव्हाची मॅच दुसर्या सेटपर्यंत मस्त चालली होती. पण दमली बिचारी अन हरली. तिची ऑपोनन्ट सणसणीतच आहे! (नाव?)![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बार्तोली खूप जास्त एक्साईट होत होती म्हणून चुका करकरून हरली असं नाही वाटलं? खरंतर उगाच तिसर्या सेटपर्यंत गेली ती मॅच, लिसिकीनेही अनेक चुका केल्या दुसर्या सेटमध्ये. शारापोव्हाने तर किबुल्कोव्हाला अगदीच किरकोळीत काढले. तिच्या बुलेट्स आदल्या दिवशीच संपल्या वाट्टं!
नदाऽऽल!! नदाल!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फेडी !! फेडी !! बार्तोली आधीच
फेडी !! फेडी !!
बार्तोली आधीच खूप उड्या बिड्या मारून दमते कां?
ती कवितोव्हा फेडरर !!! नादाल
ती कवितोव्हा
फेडरर !!!
नादाल आता रीअॅलिटी शो मध्ये काम करु शकेल. प्रचंड ड्रामा चालू आहे. आज दुखापत, मग खेळणार की नाही. मग स्कॅन, मग सगळं आलबेल
ए उगाच काय त्याला बोलतोस
ए उगाच काय त्याला बोलतोस मिलिंदा! तो काय दुखापतीचं नाटक करतोय का?
नदाल तसा नाही. गुणी आणि मेहनती आहे. पायाचं दुखणं जुनं आहे त्याचं. आतापर्यंतच्या मॅचेसही टफ झाल्या आहेत, दुखायला लागला असेल. गिव्ह हिम बेनेफिट ऑफ डाऊट!
आता दुखापतीमुळे तो नीट खेळू शकेल की नाही माहित नाही, पण डिझर्व्हिंग तोच आहे!
राऽऽफा!! राफा!!!
तो खोटं करतोय असं नाही
तो खोटं करतोय असं नाही म्हणालो. एकूण ड्रामा बघता त्याला पुढे मागे ते पण करता येईल असं वाटतं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तसंही रीअॅलिटी शो मध्ये डायरेक्टर काय सांगेल ते महत्वाचं असतं
विंबल्डन च्या वेबसाईट वरच्या
विंबल्डन च्या वेबसाईट वरच्या एका लेखातलं निरिक्षण :
http://www.wimbledon.com/en_GB/news/blogs/2011-06-28/2011062813092766760...
by Sarah Edworthy
Some saw the ladies' quarter finals as battles between the "ovas" and the rest (an "enka", an "oli", an "icki" and a "zek"), but truly it was more straightforward than that. It was long ponytail versus long plait, times four.
मूळ खेळ सोडून बोलल्याबद्दल sorry..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तो टॉमिच चांगला खेळतोय. जोको
तो टॉमिच चांगला खेळतोय. जोको विरूद्ध १-१ सेट झाला आहे स्कोर. आणि तिसर्या सेटमध्ये एक ब्रेकपण मिळवला आहे. २-० झाले आहे. चांगली होतीये ती मॅच बहुतेक..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तिकडे फेडरर अपेक्षेप्रमाणे जिंकेल असं सध्यातरी वाटतंय.
फेडिला ब्रेक केला
फेडिला ब्रेक केला![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
Pages