Submitted by सत्यजित on 1 June, 2011 - 14:11
आत्ता पावसाळा येईल
मन पुन्हा ओलं होईल
छत्री उघडू उघडू म्हणता
चिंब चिंब होऊन जाईल
कुणी तरी पावसा कडे
डोळे लाउन पहातंय
मळभ दाटल्या डोळ्यांचं
मन मात्र गातय
पाउस कधी मुसळधार
पाउस कधी रिपरीप
पाउस कधी संततधार
पाउस कधी चिडीचीप
आभाळभर डोळे आता
शोधत आहेत पाउस
कुणालाच दिसत नाही
पापण्यांमधला पाउस
खोल आठवणीचं बीज
अंकुरून येतं मनावर
वसंतात छाटलं असलं
तरी मन नसतं भानावर !
-सत्यजित
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सुरेख कविता.
सुरेख कविता.
क्या बात है.......
क्या बात है.......
वसंतात छाटल असत तरी नसत
वसंतात छाटल असत तरी नसत भानावर >>वॉव...
सत्या,पाउस कधी संततघार इथे टायपो आहे, तेवढं नीट कर प्लिज.
कविता जबरीच आवडली..
आभाळभर डोळे आता शोधत आहेत
आभाळभर डोळे आता
शोधत आहेत पाउस
कुणालाच दिसत नाही
पापण्यांमधला पाउस
खोल आठवणीचं बीज
अंकुरून येतं मनावर
वसंतात छाटलं असलं
तरी मन नसतं भानावर
मस्त
श्यामली, बदल केला..
श्यामली, बदल केला.. आभार!!
नादखुळा, विशाल... आभार..!!!
खूप सुरेख!
खूप सुरेख!
मस्त .
मस्त .
मस्तच रे ..!
मस्तच रे ..!
(No subject)
मस्त जमलिये कविता, आवडली, आणि
मस्त जमलिये कविता, आवडली, आणि वाचताना संदीप खरे यांच्या 'सरीवर सरी............'ची आठवण झाली.
सुंदरच..!
सुंदरच..!