निरामय आनंदी आयुष्यासाठी जीवनशैलीत केलेले/करायचे असलेले बदल

Submitted by नताशा on 31 May, 2011 - 10:39

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या प्रकारचा ताण प्रत्येकाला असतोच. हा ताण कमी करायला (खरं म्हणजे निरामय,आनंदी आयुष्य जगायला) मी माझ्या जीवनशैलीत नक्की काय काय बदल करु शकेन याचा विचार करताना नेहमीप्रमाणे गुगलवर शोधले. अनेक इंग्रजी ब्लॉग्ज पुर्णपणे याच विषयाला वाहिलेले दिसले. म्हणून विचार केला मायबोलीवरही एक असा धागा सुरु करावा. (आधीच असेल तर हा उडवला तरी हरकत नाही).

या धाग्यावर सजेशन्स आणि अनुभव दोन्ही अपेक्षित आहेत. शिवाय कुणी एखादा संकल्प केला असेल तर इथे शेअर करा म्हणजे बाकीचे लोकही त्यावरुन प्रेरित (मोटिवेट) होऊ शकतात. संकल्प केलेल्या व्यक्तीला (जर ति/त्याची इच्छा असेल तर) बाकीच्यांनी अधुनमधुन त्याविषयी विचारत राहा. त्यामुळे जर त्या व्यक्तीने काही कारणाने आपला संकल्प मोडला असेल तर पुन्हा सुरु करायला प्रेरणा मिळेल.

अजुन एक महत्वाचे: इथे कुठलेही कटु शब्द/व्यर्थ वादविवाद (थोडक्यात ताण वाढवणार्‍या गोष्टी) नसतील तर बरे. कारण कुणाला काय केल्याने ताणविरहीत वाटत असेल्/असावे हे अतिशय वैयक्तीक आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ताण आल्यावर तो घालवण्यासाठी काय करायचे या पेक्षा ताण येणारच नाही यासाठी काहितरी करावे..>>>> हेच ते... Happy एकदम झक्कास....

माबोपासुन काही दिवस / महिने सन्यास घ्यावा. >> श्री, ते लिहिलय की तिने - 'गॉसिंपिंग कमी करा' म्हणून. Proud

लाजो, छान लिहिलयस गं. आवड्याच.

पाटील सर्वच जण नेहेमी निवांत राहू शकत नाहीत ना मग येतो ताण >>>> ताण येवुन / घेवुन कोणतं काम सोप्प झालंय / प्रोब्लेम सुटलाय असं झालंय का आता पर्यंत तुमच्या / कोणाच्याही बाबतीत. वर लिहल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला त्रयस्थपणे पहायला शिकले तर ताण येतच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कोण्त्याही गोष्टीची अपेक्षा ठेवणे म्हण्जे ताण तणावाला आमंत्रण देणे. आता म्हणाल सांगणे सोपे आहे, करणे अवघड.... एखद्या साध्या शुल्लक वाटणार्या 'घटनेला' या दृष्टीकोनातुन बघा... मग खरच मजा येइल.

जेन्व्हा आपण म्हणतो कि अमुक अमुक केले तर माझा ताण कमी होतो.... हेच गृहितक चुकिच आहे. ताण आला म्हणुन दुसर्या गो ष्टीत मन रमवायचा प्रयत्न करणे म्हण्जे तत्पुरते 'पलायन' असते. नंतर परत तीच अवस्था. म्हणुन लाजो म्हण्तात तसे ' ताण आल्यावर तो घालवण्यासाठी काय करायचे या पेक्षा ताण येणारच नाही यासाठी काहितरी करावे.' Happy

ताण त्णाव हे बर्याच रोगांमध्ये ' जंतुचे ' काम करतात. उदा. ब्लड प्रेशर.... मग 'जो' घेउन वट्ट फायदा नाही, तोटा मात्र नक्कि आहे 'तो' घ्या कशाला? ( डिसक्लेमर : आता दारु बरोबर तुलना नकोबरं)

मी सर्वांना देत असलेले पोस्टर: याचा प्रिंट आऊट आवडीच्या रंगात सुद्धा घेता येईल.
. I switch from Worry to Planning.
. . Planning to Action.
. . Action to Recreation.
अनेकजणांनी ह्याचे प्रिंट आऊट्स आपल्या कार्यालयांत लावलेले आहेत.

तारक मेहता या मालिके बद्दल मी पण ऐकले आहे.
टीव्ही जवळ जवळ बघतच नाही. कुठल्या च्यानल वर आणि कधी असते हि मालिका?
आणि लाजोच्या प्रतिसादात सगळेच उपाय आहेत.
त्यामुळे आता बाकीच्यांनी काय लिहायचं हे हि खरच आहे.:D

सगळ्यांचे आभार. बरेच उपाय जमा झालेत.
लाजो खरंच "ताण कमी करण्याचे १०१ उपाय" असं पुस्तक काढू शकतेस गं Happy

मी इथे लिहिल्याप्रमाणे इंटरनेटवरचा कामाव्यतिरिक्त वेळ रोज १ तास पर्यंत आणलाय. Happy जामोप्या, तुमची काय प्रगती? Wink

शिवाय म्युझिक क्लास परत सुरु केलाय (मी मागे माझ्या दिव्य संगित ज्ञानाविषयी लेख लिहिला होता, ज्यांना आठवत असेल त्यांना लक्षात येईल की मी माझा ताण कमी करण्यासाठी बिचार्‍या संगीत सरांचा ताण वाढवतेय) Proud

प्राणायाम काही नियमीत जमत नाहीये Sad

ताण असेल तर त्रास वाटतो पण तो अजिबातच नसेल तर अधिकच त्रासदायक व बोअरींग होईल, याची जाणीव हाही एक उपायच ! शिवाय, प्रत्येक व्यक्तीच्या,प्रत्येक वयाच्या इ.इ. 'ताणा'ची जातकुळीही वेगवेगळी असते व उपायही, असंही मला वाटतं. कुणाला निसर्गात एकटंच भटकणं रामबाण उपाय वाटेल तर कुणाला नेमकं त्याचंच टेंशन येईल ! तेंव्हा प्रत्येकाने आपला उपाय शोधण किंवा इथं सुचवलेल्यांतला निवडणं उत्तम. ताण येणारच नाही ,हे कठीण वाटतं पण ताण सहन करायची [कांही लोक तर तो एंजॉयही करतात] संवय लावणं बरं [ बोलायला हे सोपं, हेंही खरं !]. अर्थात, प्राणायाम, चालणं, स्वतःच्या खर्‍या आवडीचे छंद जोपासणं [ माझा फेव्हरीट उपाय], विनोद व संगीत हे सर्वसाधारण परिणामकारक उपाय कुणीही करूं शकेल . रविंद्र प्रधानांचा पोस्टरही उपयुक्त कारण बराचसा ताण नियोजन व कृतिच्या दिरंगाईमुळे निर्माण होतो [ मी तर स्वतःवर असा ताण निर्माण करण्यात एक्सपर्ट आहे ! ]

धाग्याचा विषय अत्यंत उपयुक्त !

- दु:ख सगळ्यांनाच होते पण ते किती उगाळायचं हे आपल्यालाच ठरवायचे असते. "दुनिया मे कितना गम है.. मेरा गम कितना कम है" - हे आठवायचं आणि पुढे जायचं

अप्रतिम विचार

मि तान आला तर घ्रराचि साफ सफाई करते.

<मि तान आला तर घ्रराचि साफ सफाई करते.>
प्रत्येकाचं वेगळं असतं अहो. मला घराची साफ सफाई करायची म्हटलं की ताण येतो. Proud Light 1

< "दुनिया मे कितना गम है.. मेरा गम कितना कम है" -> !!! बरोबर आहे. मस्त गाणं आहे.

ताणतणाव असला तर एखादं गमतीचं पुस्तक वाचावं. लाईट लिखाण.

माझा एक अनुभव.....

एकदा असाच तानामुळे डोक अगदी सुन्न झाले होते., मित्राकडे जान्याकरिता घराबाहेर पडलो तर शेजारी राहणरा १-२ वर्षाचा आयुष एकटाच खेळत होता, सहज म्हणून तो काय करतोय म्ह्णून त्याचयाजवळ गेला तर तो त्याच्या बालभाषेत बोलू लागला, त्याच्या निरागसतेमुळे मीही त्याचाशी बोलन्यास सुरवात केली...
थोड्याच वेळेत माझा तणाव दूर झाला होता.............:)

लहान मुलांबरोबर खेळणे वा त्यांच्याबरोबर बोलणे ,गप्पा मारणे....त्यांना बोलता येवो अगर न येवो , पण त्यांची निरागसता , पुर्वग्रहीतामुळे दोषी न झालेली नजर, देहबोली तानतणाव विसरायला लावते.....:)

खुप मस्त लिहिलय,अनि उपाय पन चान अहेत,मि नक्कि प्रयत्न करेन्, सध्य कारय्चि इछा होतनहिये,पन आता एखादा उपाय नक्कि करेन. थान्क्स

आनंदी राहण्यासाठी समाधानी, आरोग्यपूर्ण आणि उत्साही राहणे आलेच. तरी ब्रह्मविद्या शिकल्याने खूप फायदा झाला. जीवन कसे जगावे हे सांगणारे हे शास्त्र आहे. रेगुलर वर्ग असतात त्याचे बर्याच ठिकाणी. positivity पण खूप वाढली. ज्यांना इच्चा असेल त्यांनी अवश्य शिकाच.

आनंदी राहण्यासाठी समाधानी, आरोग्यपूर्ण आणि उत्साही राहणे आलेच. तरी ब्रह्मविद्या शिकल्याने खूप फायदा झाला. जीवन कसे जगावे हे सांगणारे हे शास्त्र आहे. रेगुलर वर्ग असतात त्याचे बर्याच ठिकाणी. positivity पण खूप वाढली. ज्यांना इच्चा असेल त्यांनी अवश्य शिकाच.

बरेचसे उपाय चांगले आहेत वरचे

प्रत्येक व्यक्तिच्या आवडीनुसार त्याने त्याचे उपाय करावेत माझा उपाय तुम्हाला कामी येईलच याची खात्री कोणीच देवू शकणार नाही,
मला असे ताण वगैरे सहसा येत नाही पण रोजच्या कामाचा थकवा किंवा ग्लानीतून बाहेर पडण्यासाठी जूनी डायरी वाचणे, मित्रांचे आपल्यासोबतचे फोटो अलबम, किंवा निसर्गात विहार केलेले फोटो पाहणे, मनाच्या एखाद्या कोप-यात एखाद्या व्यक्तीसाठी करुन ठेवलेली जागा तात्पुरती मोठी करुन तिच्याबद्दल विचार करणे. सायकल काढून फेरफटका मारणे अशा काही गोष्टी करत असतो अधूनमधून.

अगदीच वैज्ञानिक सांगायचे झाले तर ताण (टेंशन) घालवण्यासाठी आपण कोणत्या ना कोणत्या कॉम्प्रेशन मध्ये जावे.मग ते मित्र असो, निसर्ग असो किंवा गाणी, खेळ, छंद असो.

जवळजवळ सर्वच ऊपाय लिहीले गेले आहेत, पण रोजच्या कामापेक्षा काहीतरी वेगळे केले तरी आपण ताणमुक्त होतो.

माझ्या साठी तरी ---- गाणी ऐकणे, रेडीओ वरची पसंत करते कारण जे गाणे लागेल ते ऐकतो आपण त्यामुळे हळुहळु ताण हलका होतो, हे काम मी रोजच्या नोकरीला जाताना करायच्या प्रवासात करते. ऐकता ऐकता झोप लागु शकते पण ह्या छोट्या झोपेने ताणमुक्त होते.

सुगंधी फुलाचा वास घेते, हिरव्या झाडांकडे , फिशटॅक कडे बघते Happy

मधवि, ब्रह्मविद्येच्या प्राथमिक अभ्यासक्रमाचे वर्ग जुलैमध्ये सुरू झालेत. कदाचित अजूनही प्रवेश शक्य असेल. २२ आठवड्यांचा कोर्स असतो. आठवड्यातून एकदा दीड तासाचे वर्ग.
इथे तुम्ही तुमचा विभाग निवडून जवळच्या वर्गाची माहिती मिळवू शकाल.
http://www.brahmavidya.net/time_table/brahmavidya_course_time_table.php
पुढच्या बॅचेस जानेवारीत सुरू होतील.

Pages