आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या प्रकारचा ताण प्रत्येकाला असतोच. हा ताण कमी करायला (खरं म्हणजे निरामय,आनंदी आयुष्य जगायला) मी माझ्या जीवनशैलीत नक्की काय काय बदल करु शकेन याचा विचार करताना नेहमीप्रमाणे गुगलवर शोधले. अनेक इंग्रजी ब्लॉग्ज पुर्णपणे याच विषयाला वाहिलेले दिसले. म्हणून विचार केला मायबोलीवरही एक असा धागा सुरु करावा. (आधीच असेल तर हा उडवला तरी हरकत नाही).
या धाग्यावर सजेशन्स आणि अनुभव दोन्ही अपेक्षित आहेत. शिवाय कुणी एखादा संकल्प केला असेल तर इथे शेअर करा म्हणजे बाकीचे लोकही त्यावरुन प्रेरित (मोटिवेट) होऊ शकतात. संकल्प केलेल्या व्यक्तीला (जर ति/त्याची इच्छा असेल तर) बाकीच्यांनी अधुनमधुन त्याविषयी विचारत राहा. त्यामुळे जर त्या व्यक्तीने काही कारणाने आपला संकल्प मोडला असेल तर पुन्हा सुरु करायला प्रेरणा मिळेल.
अजुन एक महत्वाचे: इथे कुठलेही कटु शब्द/व्यर्थ वादविवाद (थोडक्यात ताण वाढवणार्या गोष्टी) नसतील तर बरे. कारण कुणाला काय केल्याने ताणविरहीत वाटत असेल्/असावे हे अतिशय वैयक्तीक आहे.
टि.व्ही वरच्या सिरियल्स बघणे
टि.व्ही वरच्या सिरियल्स बघणे बंद करणे.त्या ऐवजी पुस्तक वाचणे,गाणी ऐकणे,किंवा गप्पा मारणे.
माझी एक मैत्रिण, तिच्या
माझी एक मैत्रिण, तिच्या बॅकयार्डमध्ये जाऊन जोराजोरात ओरडते
मी रोज केर काढल्याप्रमाणे मन
मी रोज केर काढल्याप्रमाणे मन स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. अर्थात ही देखील एक सवय लावावी लागते. म्हणजे नकारार्थि विचार झटकणे, आपल्या आवडी जोपासणे आणी सकाळी निदान १० मिनीट्स स्वत:ची संवाद साधणे याची सवय लावली की मन तलख्ख राहते. तसेच थोडा व्यायाम करणे. यालाच मॅनेजमेंट्ची माणसे 'स्ट्रेस मॅनेजमेंट" म्हणतात - मी ते सोपे करून सांगितले इतकेच.
दुसरे म्हणजे आपल्याशी संबधित नसलेल्या गोष्टीविषयी विनाकारण विचार न करणे,टीव्हीवरील रतिब मालीका न पहाणे.उदा: पाकीस्तान वर ड्रोन हल्ला आणि विनाश.. ते दोघे बघून घेतील. मला काय त्याचे घेणे?
स्वतःवर फोकस करणे म्हणजे माझे ध्येय्,माझी धोरणे,माझे त्यादिशेने कार्य,प्रयत्न आणि त्यांची परिक्षण.
विचार बदलले की आचार बदलतात हा माझा स्वानुभव आहे.
मी पण खुप ताण असला की बायको
मी पण खुप ताण असला की बायको मुलांबरोबर त्यांच्या आवडीच्या विषयांवर बोलतो, ऐकतो.
तसेच मित्र आणि मैत्रिण यांच्या बरोबर साहित्य संगित या विषयांवर गप्पा मारतो.
मुलगी मी आणि टिव्ही सगळे एका जागी असेल तर मुलीबरोबर टॉम एन जेरी पहातो.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे "साक्षीभावनेने" फक्त तणावग्रस्त प्रसंगाकडेच नव्हे तर सर्व आयुष्याकडेच पहातो.
(वर वाचनाचा कोणी उल्लेख केला नाहीये बहुतेक. आवडीची पुस्तके वाचणे हा पण चांगला उपाय आहे.)
कोणतीही सबब न सांगता रोज
कोणतीही सबब न सांगता रोज पहाटे ४० ते ६० मिनिटे गावाबाहेर, नदीकाठाने फिरायला जाणे (यातही शक्यतो एकट्यानेच फिरायला जाणे फार उत्तम). या धाग्याच्या सुरूवातीला एका सदस्येने लिहिले आहे "गाणी ऐकत". एकदा मी हा प्रयोग केला होता, पण होते असे की, त्यातील एखाद्या गाण्याशी आपले भावनिक नाते जुळलेले असते, मग तेच गाणे आपल्याला भूतकाळातील कोणत्यातरी प्रिय/अप्रिय घटनेजवळ खेचून नेते आणि साहजिकच एकसूरात चालणारी पावले अडखळतात....कित्येक वेळा मूडही जातोच. त्यापेक्षा रेडिओ आणि मोबाईलशिवायही 'वॉक' केला तर मन आजुबाजूच्या हिरव्यागार वातावरणात प्रसन्नच राहते....(हिरवागार याचा अर्थ मी ज्या नदीकिनार्याजवळून भटकतो, तेथील वातावरण. असे सर्वत्रच असेल असेही नाही, पण थोड्याफार फरकाने प्रत्येक गावाबाहेर आनंददायी आणि उल्हसित वातावरण असायला हरकत नसावी.)
त्यानंतर अर्धा तास नदीतच शांतपणे जलतरण. यामुळेही मन आणि शरीर ताजेतवाने राहते.
एरव्ही कामकाजाचा व्यवहाराचा दिवस सुरू झाला की मग ते नित्याचा धाबडधिंगा सुरू होतो, त्याला नाईलाज. पण सायंकाळी वा रात्री १५-२० मिनिटे 'फिशटॅन्क' समोर मांडी घालून त्या इवल्या इवल्या रंगीबेरंगी मोहक माशांच्या चपळ हालचाली एकटक पाहात बसलो की दिवसभराचे या ना त्या निमित्ताने आलेले मळभ दूर होते.
मी टीव्हीशिवाय महिनोनमहिने राहू शकतो, पण कॉम्प्युटर रोजीरोटीशी संबंधित असल्याने तो आता शरीराचेच एक जादाचे अंग बनल्यासारखे झाला आहे. त्यालाच 'मित्र' मानत असल्याने त्याच्यापासून त्रासाचा प्रश्नच उदभवत नाही.
"हे जीवन सुंदर आहे...." या वचनावर पूर्ण विश्वास असला की, जसलमेरच्या वाळूतही शीतलता जाणवते.
>>मी टीव्हीशिवाय महिनोनमहिने
>>मी टीव्हीशिवाय महिनोनमहिने राहू शकतो, पण कॉम्प्युटर रोजीरोटीशी संबंधित असल्याने तो आता शरीराचेच एक जादाचे अंग बनल्यासारखे झाला आहे. त्यालाच 'मित्र' मानत असल्याने त्याच्यापासून त्रासाचा प्रश्नच उदभवत नाही.
फुल्ल टू अनुमोदन !
चांगली चर्चा. माझा पण अनुभव
चांगली चर्चा.
माझा पण अनुभव आहे की मस्त आवडीची गाणी ऐकली की एक्दम फ्रेश वाटते. वर म्हंटल्या प्रमाणे घरातल्या/खोलीतल्या वातावरणात बदल झाल्याने जसे फ्रेश वाटते तसेच, नवीन कपडे घातल्याने पण एक्दम ताजेतवाने वाटते. थोडक्यात काय तर त्याक्षणी काहीतरी बदल आवश्यक असतो.
एखाद्या मैत्रीणीशी त्याक्षणी सुचेल त्याविषयावर गप्पा माराव्या. एखाद्या मालीके मधे दाखवलेले हास्यास्पद प्रसंग किंवा एखादा टुकार चित्रपट असे काहीही विषय ज्यामुळे हसु येउ शकेल.
प्राणायम + मेडीटेशन आहेच. पण बरेचदा तो इंस्टंट उपाय होउ शकत नाही. पण त्याचा फायदा एकुणच ताण येउ न देण्याची ताकद वाढवण्यासाठी खुप होतो.
खुप ताण मनावर असेल तर माझे तरी पुस्तक वाचनात लक्श लागत नाही. पण स्वताचीच एखादी जुनी डायरी वाचयला घेतली की वेळ कसा आणि कुठे जातो कळतच नाही. आणि मस्त वाटते.
आणि हुकमी आणि शेवटचा उपाय म्हणजे ताण कमी करण्यास मदत करु शकेल अशा एखद्या व्यक्तीशी त्याबद्दल बोलणे
इथे कुठलेही कटु शब्द/व्यर्थ
इथे कुठलेही कटु शब्द/व्यर्थ वादविवाद (थोडक्यात ताण वाढवणार्या गोष्टी) नसतील तर बरे. कारण कुणाला काय केल्याने ताणविरहीत वाटत असेल्/असावे हे अतिशय वैयक्तीक आहे.
>>>>>>>>>> बरोबर!
मी आणि माझी पुतणी (दहावी रिझल्टची वाट पहात आहे) रात्री एफ आय आर(सब टीव्हीवरचं) पहातो आणि खूप हसतो. पर्सनली मला तरी सासू सून, घरतल्या भानगडी, अंधश्रद्धा यावरील सीरियल्स पेक्षा हे खूप आवडते.
रोज नियमित व्यायाम. पण जर एखादे दिवशी झाला नाही तर त्याचं टेन्शन नाही घ्यायचं! प्रत्येक गोष्ट थोडी थोडी फ्लेक्झिबल ठेवायची. म्हणजे ताण येत नाही. फक्त व्यायामाबाबतच नाही तर सगळ्या बाबतीत!
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व्होकल/इन्सट्रुमेंटल रोज ऐकते.
सकाळचा आसनं प्राणायाम वगैरेचा सेशन जमला नाही तर संध्या. ब्रिस्क वॉक ४५ ते ५० मि.
निसर्गाच्या सानिध्यात रमणे...
निसर्गाच्या सानिध्यात रमणे... शक्यतो महिन्यातून एक वेळ कुठेतरी बाहेर जाणे.
एफ आय आर, तारक मेहता का उलटा
एफ आय आर, तारक मेहता का उलटा चष्मा.. हे मी कधीतरी बघतो.. भारीच असतात... फालतू टुकार सिरीयल पाहण्यापेक्षा ह्या नक्कीच चांगल्या...
ताण आलाय असे
ताण आलाय असे वाटल्यास,...ताSSSSSSSSSSSSSSSSSSSSणून देणे
@ महेश : थॅन्क्स फॉर
@ महेश : थॅन्क्स फॉर पॉझिटिव्ह लूक.
@ पक्का भटक्या : तारक मेहताविषयी या स्वरात बोलणार्या अनेकाना मी पाहिले आहे. चांगले मत दिसत्ये या व्यक्तीरेखेविषयी. एकदा वेळ काढून पाहिले पाहिजे या असामीला.
डोके आणि मन शांत करून घेण्यासाठी मी 'परेश रावळ' नामक भन्नाट रसायनाला प्राधान्य देतो. केव्हाही डीव्हीडी आणावी आणि अगदी पीसीवर लावली तरी चालेल. काय जबरदस्त ईलाज आहे या अभिनेत्याकडे ! "गोलमाल", "हंगामा", "हेराफेरी", "मालामाल विकली" यापैकी कोणताही चालेल.....बाप रे ! या जगात फक्त 'बाबुराव आपटे' च विनातक्रार आपणास आनंदी करू शकतो हे १००% पटते. एकदाही असे वाटत नाही की पडद्यावर हा माणून दुसर्याने लिहिलेले संवाद म्हणत आहे.
माबोवरचे काही हुकमी बाफ काढून
माबोवरचे काही हुकमी बाफ काढून वाचा. हसून हसून पोट दुखेल आणि सगळा ताण गायब!
ताण आलाय असे
ताण आलाय असे वाटल्यास,...ताSSSSSSSSSSSSSSSSSSSSणून देणे >>>
माबोवरचे काही हुकमी बाफ काढून वाचा. हसून हसून पोट दुखेल आणि सगळा ताण गायब! >>>
हे २ उपाय जबरी हायेत
तारक मेहता बघत चला. खरंच मस्त
तारक मेहता बघत चला. खरंच मस्त सिरीयल आहे. सगळ्या व्यक्तीरेखा अगदी चपखल आहेत. सहज सुंदर अभिनय आणि निखळ विनोद.... ताण अगदी दूर पळेल.
तारक मेहता हे एवढ्यातच ऐकले,
तारक मेहता हे एवढ्यातच ऐकले, टिव्ही पहात नसल्याचा परिणाम.
पुर्वी जेव्हा पहायचो तेव्हा साराभाई मालिका खुप आवडायची, सिआयडी देखील (शिवाजी साटम)
वर उल्लेख केलेले सिनेमे तर भन्नाट आहेतच.
मला आणि बायकोला "अंगूर" प्रचंड आवडतो आम्ही दोघांनी आत्तापर्यंत २०/३० वेळा तरी पाहिला असेल. त्यातले डायलॉग्ज आम्ही एकमेकांना ऐकवत असतो कधी तरी.
माझी एक मैत्रिण, तिच्या
माझी एक मैत्रिण, तिच्या बॅकयार्डमध्ये जाऊन जोराजोरात ओरडते << म्हणूनच पूर्वी कोपभवन असायचे वाटते.
सर्वात मह्त्वाचे म्हणजे
सर्वात मह्त्वाचे म्हणजे 'साक्षीभावनेचा' अवलंब करुन तटस्थ वृत्तीने ताण देणार्या प्रसंगाकडे पाहणे.>>>>>> अनुमोदन भ्रमर! खरच खुप फायदा होतो असं करुन. मोठ्या वाटणार्या अडचणी एकदम लहान वाटायला लागतात कधी कधी.
तारक मेहता बघत चला. खरंच मस्त
तारक मेहता बघत चला. खरंच मस्त सिरीयल आहे.
>>> फक्त प्रत्येक भागाच्या शेवटी तो स्वतः येऊन जी बडबड करतो ती कधीकधी असह्य होते.. बाकी कथानक आणि पत्र एकदम भारी असतात...
मुळात टिव्ही कमीच पहातो पण
मुळात टिव्ही कमीच पहातो पण लावलाच तर Discovery , Animal Planet वगैरे वर जनावर पहात बसतो....कुठुन जरी पहायला सुरुवात केली आणि कुठेही बंद केले तरी चुकल्यासारख वाटत नाही .... आणि मुड ऐकदम चांगला होतो.....
दुसर्याने केलेल्या चुकीवर
दुसर्याने केलेल्या चुकीवर चिडण्याआधी 'आपल्या हातून हीच चूक झाली होती/होऊ शकेल का?' याचा विचार करावा..
ताण हलका करण्यासाठी एक
ताण हलका करण्यासाठी एक मायबोली 'फाईटक्लब' काढा.
प्रत्येक टाईमझोनमधले दोन तास एका बाफवर सगळ्यांनी एकेमेकांशी वाट्टेल तसा वाद घालायचा, भांडणे करायची ताणाचे निरसन होईपर्यंत. मग दोन तास झाले की आपण तर ह्या आयडीला ओळखत सुद्धा नाही बॉ म्हणत कवितांचे रसग्रहण विचारायचे.
न जाणो इथे 'मुद्दाम भांडणे ऊकरून वाद घालणे' हा वाद घालणार्याच्या वैयक्तिक स्ट्रेस मॅनेजमेंटचा भाग असेल.
अश्विनी मामींनी मागे एक
अश्विनी मामींनी मागे एक मनाच्या डिटॉक्स बद्दल लेख लिहीला होता. तो शोधून जरूर वाचा.
सर्वात मह्त्वाचे म्हणजे
सर्वात मह्त्वाचे म्हणजे 'साक्षीभावनेचा' अवलंब करुन तटस्थ वृत्तीने ताण देणार्या प्रसंगाकडे पाहणे.>>>>>> हे कसं करायचं?
ताण आल्यावर तो घालवण्यासाठी
ताण आल्यावर तो घालवण्यासाठी काय करायचे या पेक्षा ताण येणारच नाही यासाठी काहितरी करावे...जसे,
- आपण स्वतः ऑर्गनाईज्ड असावे, आपले वेळापत्रक, आपली कामं नीट आखुन घ्यवित. एखाद्या वेळेस वेळापत्रकात थोडं पुढे मागे झालं तर लगेच.. दुनिया बुडाली, आता काय करु?? असा अॅप्रोच नको;
- काही गोष्टी आपल्या हातात नसतात पण त्या गोष्टींचा आपल्या मनावर, स्वास्थावर परीणाम होऊ न देणे हे आपल्या हातात असते;
- दु:ख सगळ्यांनाच होते पण ते किती उगाळायचं हे आपल्यालाच ठरवायचे असते. "दुनिया मे कितना गम है.. मेरा गम कितना कम है" - हे आठवायचं आणि पुढे जायचं
- पेशन्स वाढवा;
- आपल्याला काही खुपत असेल तर बोलुन टाका, ते शक्य अनसेल तर लिहुन काढा... नक्कीच फायदा होतो. नंतर जेव्हा परत वाचाल तेव्हा कळते की आपण किती क्षुल्लक कारणाने त्रासलो होतो;
- खाण्या-पिण्याच्या सवयीत बदल. अति तिखट, मसालेदार खाणे, अति मद्य प्राशन, कॉफी, चहा पिणे, गोडं खाणे यामुळे शरीरावर परीणाम होतोच पण मेंदुची क्षमता ही कमी होते. यामुळे ताण येण्याची शक्यता असते,
- भरपुर पाणी प्या;
- रात्री झोपायच्या आधी २ तास टीव्ही बघु नका;
- एखादी हॉबी असुदे.. काहितरी नविन शिका...एखादी कला शिका किंवा नविन भाषा शिका.
- दुसर्याशी कंपेअर करणे, बरोबरी दाखवणे सोडुन द्या... अर्ध्याहुन अधिक ताण नाहिसा होईल.
- गॉसिपींग कमी करा
- कोणाशी कुरबुर झालीच तर त्याचा बाऊ करु नका... आपण कुढत बसण्यात काहिच पॉईंट नसतो.. कधी कधी समोरच्याला तेच हवे असते... ही त्यांची जीत ठरु शकते... तेव्हा.. चिल माडी
आणि हे सगळं करुन सुद्धा ताण आलाच तर...
ताणुन द्या...
अंघोळ करा .. जॅकुझीत बसा... पोहायला जा..
गाणी ऐका..
फिरायला जा...
बागकाम करा...
एखादा नवा पदार्थ बनवा....
आपल्या प्रियजनांशी संवाद करा...
काहितरी क्रिएटीव्ह करा...
घरच्या पाळिव प्राण्यांशी खेळा...
कामाव्यतिरीक्त ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत/करायची इच्छा आहे त्यांची लिस्ट बनवा... (बकेट लिस्ट)...
शॉपिंग ला जा... बेस्ट उपाय
वरचे ताण न येऊ देण्याचे उपाय मी प्रत्यक्षात ट्राय करत आहे आणि त्याचा फायदा होतोय असं वाटतयं
लाजो .... तुमच्या उपायातल येक
लाजो .... तुमच्या उपायातल येक जरी केल तरी बराच ताण हलका होतो....
आता लाजोच्या प्रतिसादात सगळं
आता लाजोच्या प्रतिसादात सगळं आलच! अजुन कोणी काही भर टाकेल असं वाटत नाही!!
ज्यो, ताण येउ न देण्याचे उपाय
ज्यो, ताण येउ न देण्याचे उपाय सांगितल्येस की ताण वाढवण्याचे?
लाजो छान टिप्स!!
लाजो
छान टिप्स!!
लाजो, हे काय बरोबर नाय, सगळे
लाजो, हे काय बरोबर नाय, सगळे पत्ते एकदम ओपन केल्यावर बाकीच्यांनी काय लिवायच ?
Pages