आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या प्रकारचा ताण प्रत्येकाला असतोच. हा ताण कमी करायला (खरं म्हणजे निरामय,आनंदी आयुष्य जगायला) मी माझ्या जीवनशैलीत नक्की काय काय बदल करु शकेन याचा विचार करताना नेहमीप्रमाणे गुगलवर शोधले. अनेक इंग्रजी ब्लॉग्ज पुर्णपणे याच विषयाला वाहिलेले दिसले. म्हणून विचार केला मायबोलीवरही एक असा धागा सुरु करावा. (आधीच असेल तर हा उडवला तरी हरकत नाही).
या धाग्यावर सजेशन्स आणि अनुभव दोन्ही अपेक्षित आहेत. शिवाय कुणी एखादा संकल्प केला असेल तर इथे शेअर करा म्हणजे बाकीचे लोकही त्यावरुन प्रेरित (मोटिवेट) होऊ शकतात. संकल्प केलेल्या व्यक्तीला (जर ति/त्याची इच्छा असेल तर) बाकीच्यांनी अधुनमधुन त्याविषयी विचारत राहा. त्यामुळे जर त्या व्यक्तीने काही कारणाने आपला संकल्प मोडला असेल तर पुन्हा सुरु करायला प्रेरणा मिळेल.
अजुन एक महत्वाचे: इथे कुठलेही कटु शब्द/व्यर्थ वादविवाद (थोडक्यात ताण वाढवणार्या गोष्टी) नसतील तर बरे. कारण कुणाला काय केल्याने ताणविरहीत वाटत असेल्/असावे हे अतिशय वैयक्तीक आहे.
एकट्यानेच वॉकला जाणे, आवडते
एकट्यानेच वॉकला जाणे, आवडते गाणे ऐकत्..मला तरी फरक पडतो असे केल्याने..
फार सुंदर धागा. मला ताणदायक
फार सुंदर धागा.
मला ताणदायक स्थिती असेल तर मी,याहून वाईट घडले तर काय? असा विचार करतो,व मनाला तितके वाईट तर नाही ना झाले असे समजावून बर्याच अंशी स्ट्रेस फ्री होतो.
किंवा आपल्याहून विपन्नावस्थेत असणार्या व्यक्तींविषयी विचार करतो,व तुलनेत आपण तितके दु:खी नाहीत म्हणून स्वःतावरचा तणाव कमी करतो/करवतो.
हा धागा आरोग्यम् धनसंपदा
हा धागा आरोग्यम् धनसंपदा मध्ये हवा.
तसेच याबद्दल नरेन्द्र गोळे यांनी सुंदर लेखमाला लिहीली आहे http://www.maayboli.com/node/24438
- मदत समिती
सुरुवात मीच करते मी बराच
सुरुवात मीच करते
मी बराच विचार करुन ताण कमी होण्यासाठी ठरवलेले दोन महत्वाचे goals आहेतः
१. रोज सकाळी ठराविक वेळेला १० मिनिटं प्राणायाम आणि २० मिनिटं ब्रिस्क वॉकिंग. (कुठलाही ऋतु, गाव असलं तरी)
२. कामाव्यतिरिक्त पीसीवर बसण्याचा वेळ कमी करत करत ३० जुनपर्यंत दररोज ३० मिनिटावर आणणे. (सध्या ३ तास तरी असेल)
तर लोकहो, मला मधुन मधुन विचारत राहा (poke करत राहा)
नताशा, अजुन किती वेळ माबो मधे
नताशा, अजुन किती वेळ माबो मधे रमणार आहात (विचारले !)
रुनी मला धागा आरोग्यम धनसंपदा
रुनी
मला धागा आरोग्यम धनसंपदा मध्ये हलवता येत नाहिये. (मी हितगुज च्या ऐवजी गुलमोहर सिलेक्ट केलेय). काय करावे लागेल?
नरेंद्र गोळेंच्या लेखाची लिंक देऊ का या धाग्यावर? का तू दिलेली आहे तर पुन्हा द्यायची गरज नाही?
अरे सुरुवात माझ्याआधीच झालेली
अरे सुरुवात माझ्याआधीच झालेली दिसते
महेश, धन्यवाद. असंच विचारत राहा (पण रोज नको हं)
चेहर्यावर सतत स्मितहास्य
चेहर्यावर सतत स्मितहास्य ठेवणे
एक सरळ आणि साधा उपाय ज्यांना
एक सरळ आणि साधा उपाय ज्यांना शक्य आहे त्यांनी टॉम अॅड जेरी बघावे.
पी सी वर बसण्याचा वेळ कमी
पी सी वर बसण्याचा वेळ कमी करणे... ३० जुन अखेर ३० मिन्/प्रतिदिन.... मीही करणार
टॉम अॅड जेरी बघावे... मी रोज
टॉम अॅड जेरी बघावे... मी रोज बघतो.
घर आवरणे... वस्तु जाग्च्या
घर आवरणे... वस्तु जाग्च्या जागी हलवणे.. ताण पळुन जातो..
>>२. कामाव्यतिरिक्त पीसीवर
>>२. कामाव्यतिरिक्त पीसीवर बसण्याचा वेळ कमी करत करत ३० जुनपर्यंत दररोज ३० मिनिटावर आणणे. (सध्या ३ तास तरी असेल)>>>>
संपूर्ण सहमती -मी २ तासावरून ६० मि वर आणलीये
या व्यतिरिक्त
मी रोज २० मि ज्ञानेश्वरी वाचतोय-खूप तणावमुक्त वाटतेय
रोज संध्याकाळी पत्नी,मुलगी व मी १ तास फिरायला जातो-खूप उत्साही व तणावमुक्त वाटते
-मुलीच्या ऑफिसच्या कामाबद्दल सम् जून घेतो-त्यात मजा येते
-आणि रोज १ तास शास्त्रिय संगीत ऐकतो
लहान मुलांबरोबर वेळ घालवणे..
लहान मुलांबरोबर वेळ घालवणे..
कामाव्यतिरिक्त इतर विषयांची
कामाव्यतिरिक्त इतर विषयांची पुस्तक वाचणे.
नेहेमी न भेटणार्या मित्रांना भेटणे.
इन्स्ट्रुमेन्टल गाणी ऐकणे. शास्त्रिय संगीताची अॅलर्जी नसेल तर ते!
पळायला जाणे. कुठलाही व्यायाम
आवडीचा चित्रपट पहाणे
फार एकटे न रहाणे.
घरातल्या/खोलीतल्या वातावरणात बदल झाला की ताण कमी होऊ शकतो.
फार एकटे न
फार एकटे न रहाणे.
घरातल्या/खोलीतल्या वातावरणात बदल झाला की ताण कमी होऊ शकतो. >> पटेश..
जर म्युझिकल ईंस्ट्रुमेंट ची आवड असेल तर रोज साधारण १५-३० मी. त्याला वेळ देऊ शकता..
भारतीय शास्त्रीय संगीत ऐकावे.. (त्यातल्या त्यात राग शिवरंजनी आणी यमन कल्याण )
बातम्या मध्ये भ्रष्टाचार , खुण, जागतीक आतंकवाद ई. ई. गोष्टी वाचु नये
असे केल्याने आपल्या सब कॉन्शीयस माईंड वर ताण येतो..
आणी जरी ताण आलाच तर खालील वाक्य १०-१०० वेळेस म्हणावे
"ताण नही लेनेका"
(टेंशन किती जास्त आहे त्यावरुन काऊंट ठरवावा)
मी रोज पुलंचे "वटवट",
मी रोज पुलंचे "वटवट", "वार्यावरची वरात" मधले काही भाग आणि लताची, तलतची काही निवडक गाणी ऐकतो.
(उदा. अभिमानची काही गाणी, जलते है जिस्के लिये वगैरे..)
मुख्य म्हणजे टीवी न पाहणे आणि काँप वर कामा व्यतिरिक्त न बसणे.
घरचे / मित्र यांच्या सोबतीची
घरचे / मित्र यांच्या सोबतीची वाट न बघता स्वतःला ज्यात आनंद मिळतो अश्या गोष्टी करण्यासाठी थोडा वेळ मुद्दाम बाजुला काढणे.... वेळ नाही हे कारण न देणे...
Merovingian: Yes, of course, who has time? Who has time? But then if we do not ever take time, how can we ever have time? ............... [The Matrix Reloaded]
मला तर एकटा राहिल्यानतर
मला तर एकटा राहिल्यानतर निम्मा ताण कमी होतो. बाकी निम्मा निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर......
अजुन एक महत्वाचे: इथे कुठलेही
अजुन एक महत्वाचे: इथे कुठलेही कटु शब्द/व्यर्थ वादविवाद (थोडक्यात ताण वाढवणार्या गोष्टी) नसतील तर बरे. कारण कुणाला काय केल्याने ताणविरहीत वाटत असेल्/असावे हे अतिशय वैयक्तीक आहे.>>>
असे लिहिल्यावर मी काय बोलणार?
पण माझे फक्त २ उपाय आहेत.
ताण आला = मायबोलीवर जाऊन फ्रस्ट्रेशन काढणे
मायबोलीवर ताण आला = आरामात नॉर्मल लाईफ जगणे!
==============================================
अवांतर - वैयक्तीक बाबी इन्व्हॉल्व्ह्ड असू शकतील याची पूर्ण कल्पना असताना निर्माण केलेला धागा!
==============================================
-'बेफिकीर'!
मस्तच उपाय जमा होतायत इथे मी
मस्तच उपाय जमा होतायत इथे
मी इथे वाचुन काल टॉम अँड जेरीचा एक एपिसोड बघितला. त्यानंतर एक साराभाई व. साराभाईचाही बघितला. मज्जा आली. शक्यतो रोज बघेन आता.
आपल्या आवडीच्या विषयातील
आपल्या आवडीच्या विषयातील एखादी नविन गोष्ट शिकणे.
हल्ली बर्याच चॅनल्सवर
हल्ली बर्याच चॅनल्सवर दक्षिणेतले सुपरहिट सिनेमे हिंदीत डब करुन दाखवतात... चिरंजीवी-नागार्जुना-रजनीकांत-विजयकांत वगैरेंचे... ते पहावेत... त्यातले डायलॅग (डायलॉग नाही!), हाणामारीचे सीन्स, गाणी वगैरे पाहून तुमच्या कल्पनाशक्तीला छान चालना मिळते. आणि ताण नाहीसा होतो. (माझातरी)
पण एकावेळी एकापेक्षा जास्त सिनेमा पाहू नये... फ्रस्ट्रेशन येतं
ताण आलाय असे वाटल्यास,
ताण आलाय असे वाटल्यास, आवडत्या व्यक्ती बरोबर १-२ तास घालवावेत.
लेकी बरोबर खेळतो, काही
लेकी बरोबर खेळतो, काही जवळच्या व्यक्तींशी संभाषण करणे, गाणी ऐकणे. सर्वात मह्त्वाचे म्हणजे 'साक्षीभावनेचा' अवलंब करुन तटस्थ वृत्तीने ताण देणार्या प्रसंगाकडे पाहणे.
भ्रमरला पूर्ण अनुमोदन.
भ्रमरला पूर्ण अनुमोदन.
लहान लेकीबरोबर बाहेर पायी
लहान लेकीबरोबर बाहेर पायी फिरून येतो.
Instrumental संगीत ऐकतो.
व्यायाम करतो.
घरच्यांबरोबर गप्पा मारतो/बैठे खेळ खेळतो.
दैनंदिन साबणं कमीत कमी बघतो.
संकल्पाबाबत असं म्हणतात की, तुम्ही तुमच्या संकल्पाबद्दल इतरांना वारंवार सांगत राहा. तो जाहीर करा. तो फक्त स्वतःपुरताच मनात ठेवू नका. मनातच ठेवला तर, काय हरकत आहे मोडला तर, असे म्हणून त्याला कधीही तडा जाऊ शकतो.
'साक्षीभावनेचा' अवलंब <<< मिलिंदा, म्हणजे काय?
घर आवरणे... वस्तु जाग्च्या जागी हलवणे.. ताण पळुन जातो..<<< याला अनुमोदन.
बोलत रहा. मनात कुढू नका.
बोलत रहा. मनात कुढू नका. भावनांवर सुरूवातीला ताबा राहत नाही, पण हळूहळू कन्ट्रोल करता येते. ताण आला, की मन सतत गुंतवत ठेवायचे कुठे ना कुठेतरी. अत्यंत आचरट सिनेमे/ मालिका- त्या आचरटच आहेत अशी दृष्टी ठेवून, त्यात न गुंतता बघणे बघणे, मित्रांबरोबर बाष्कळ बडबड करणे इत्यादी आपला ताण हलका करतात. मग परत समस्येकडे तटस्थपणे पाहता येईल इतपत मन शांत झालेलं असतं.
घर आवरणे... वस्तु जाग्च्या जागी हलवणे.. > घर पसरलंय हे पाहून अजून ताण वाढत नाही का?
साक्षीभावना म्हणजे प्रसंगाकडे
साक्षीभावना म्हणजे प्रसंगाकडे तटस्थ वृत्तीने पहाणे. नदीच्या तीरावर बसून आपण जसे प्रवाहाकडे बघतो तद्वत आयुष्यात येणार्या सुख-दु:खांकडे, त्यामुळे मनात येणार्या भाव-भावनांकडे त्रयस्थ वृत्तीने बघायला शिकायचं. हे माझ्या योगगुरुंनी शिकवलं होतं आणि त्याचा खूप फायदा होतोय.
रोज आपल्या बेस्ट फ्रेंडशी
रोज आपल्या बेस्ट फ्रेंडशी कमीत कमी २० मिनीटे बोलायचेच... कसाही वेळ काढुन आणि गप्पा कोणत्याही साध्या विषयावर ,कदाचित वायफळ का असेनात .. खुप हलकं वाटतं...
आपल्या आवडीच्या गोष्टीसाठी रोज १० मिनीटे द्यायची. मग ती गोष्ट तुम्ही स्वतः करा किंवा त्याविषयी टी वी वर बघा किंवा काही वाचा, पण आपल्या जगात ती १० मिनीटे आपण पुर्ण हरवुन जायला हवं..
Pages