"आई गं, कंटाळा आलाय घरात बसुन... बाहेर जाऊ का खेळायला??"
"अजिब्बात नाही... रणरणत्या उन्हात बाहेर जायचं नाही... जा पुस्तक वाच, नाहीतर टीव्ही बघ थोडावेळं"
वार्षीक परीक्षा संपुन उन्हाळ्याची सुट्टी लागली की घरोघरी होणारा हा आई आणि मुलांमधला कॉमन संवाद. बच्चे कंपनीला स्पेशली लहान मुलांना सुट्टीत बिझी कसे ठेवायचे हा आई-वडिलांना नेहमी पडलेला प्रश्न. सध्या माझ्याही लेकीला टर्म एंड म्हणुन २ आठवडे सुट्टी आहे. त्यामुळे तिला बिझी ठेवणे हे माझ्यापुढेही एक चॅलेंजच आहे.
यावर मला सापडलेला उपाय म्हणजे मुलांना काहितरी क्रिएटीव्ह करायला देणे, ज्यात त्यांचा भरपुर वेळही जाईल आणि काहितरी नविन करायला/शिकायला मिळेल
ह्याच कल्पनेने मी इथे एक मालिका सादर करत आहे. या मालिकेत मी दर आठवड्याला एखाद-दुसरा सोपा, लहान मुलांना करता येण्याजोगा हस्तकलेचा नमुना दाखवेन. यात तुम्हाला फक्त सामान गोळा करुन देणे, थोडीशी सुपरव्हिजन आणि लागेल तिथे थोडीशी मदत एव्हढच कराव लागेल. बाकी मुलांनाच त्यांच्या आयडियाज वापरु देत. मुलांची क्रिएटीव्ह डेव्हलपमेंट व्हावी, त्यांना एकाजागी बसायची सवय लागावी आणि सुट्टीत काहितरी नविन केल्याचा आनंदही मिळावा हेच या मालिकेचे मुख्य उद्देश. वेळ असेल तर आई-बाबांनीही मुलांच्या बरोबर बसुन या वस्तु बनवाव्यात. आपल्यालाही खुप मजा वाटते. आपल्याही थोड रिलॅक्स व्हायला मदत होते.
सगळ्या पालकांना विनंती आहे की त्यांच्या लेकरांनी केलेल्या नमुन्यांचे फोटो इथे नक्की टाकावेत. त्यावरुन इतरांनाही वेगवेगळ्या आयडीयाज मिळतिल.
कुणाला काही सुचना असतिल तर त्याही जरुर कळवा म्हणजे मला पुढच्यावेळी त्यांचा उपयोग होईल.
इथे काही टाकाऊतुन टिकाऊ वस्तु केल्या आहेत. कुणाला डिटेल्स हवे असतिल तर सांगा.
http://www.maayboli.com/node/19858 - ऑल इन वन, वन इन ऑल (प्लॅस्टिक बॉटल चे उपयोग)
http://www.maayboli.com/node/19883 - 'प्रिय सखी' - (प्लॅस्टिक पिशव्यांचे उपयोग)
http://www.maayboli.com/node/19937 - 'कार मिरर डँगलर'
चला तर मग करुयात सुरु सुट्टीतले उद्योग
----------------------------------------------------------------------
सुट्टीतला उद्योग १ - अळी मिळी गुपचिळी
वयोगट: ३ ते ८ वर्षे
लागणारा वेळ:
३० ते ४५ मिनीटे
साहित्यः
जुना रबरी ग्लोव्ह, झाकणं असलेला पुठ्ठ्याचा छोटा बॉक्स, पोस्टर / अॅक्रलिक कलर्स, सेलोटेप, कात्री, स्केचपेन इ.
कृती:
१. पुठ्ठ्याच्या बॉक्स ला तळाच्या बाजुने (बोट जाईल इतकेच) एक गोल भोक पाडा.
२. रबरी ग्लोव्हच्या ५ बोटांमधील एक बोट कापुन घ्या. या बोटाच्या बेस ला कात्रीने दोन चिरा द्या.
३. चित्रात दाखवल्याप्रमाणे ग्लोव्ह चे बोट बॉक्स च्या तळातुन बॉक्स मधे सरकवा आणि बॉक्सला तळाच्या बाजुला सेलोटेपने चिकटवा.
४. आता ग्लोव्हच्या कापलेल्या बोटाला आपल्या आवडी प्रमाणे रंग द्या - जसे वळवळणार्या किड्यासाठी हिरवा, किंवा चॉकलेटी वगैरे. काळ्या स्केचपेनने डोळे रंगवा. लाल कागदाची जीभ चिकटवा. हवे तर डोक्यावर अँटेना लावा.
५. बॉक्स च्या आतल्या बाजुला ग्लोव्हच्या बोटाच्या अवतीभवती रंगवा किंवा वाळु/गवत इ चिकटवा जेणेकरुन जास्त इफेक्टिव्ह वाटेल. हव असेल तर बॉक्स ला बाहेरुन जुना गिफ्ट पेपर चिकटवा.
हे लेकीने केलेलं
अन हे मी
६. झाले आपले सरप्राईज तयार. आता कव्हर लावुन बॉक्स च्या तळातुन बोट घालुन ठेवा आणि बॉक्स तुमच्या आजी/आजोबांना, मित्र/मैत्रिणीला गिफ्ट म्हणुन द्या पण तुमच्या हातातच उघडायला सांगा. बॉक्स चे कव्हर उघडताच बोट अळी वळवळत्येय असं फिरवा, त्यांना एक क्षणभर नक्कीच दचकायला होईल
चला, तुम्ही देखिल करा बरं आता अळी मिळी गुपचिळी
----------------------------------------------------
सुट्टीतला उद्योग: २ : कडकु मडकु : http://www.maayboli.com/node/25526
सुट्टीतला उद्योग: ३ : 'ट्विंकल ट्विंकल लिट्टील जार' http://www.maayboli.com/node/25693
एकदम झक्कासच की. दाखवतेच
एकदम झक्कासच की. दाखवतेच लेकीला. तिला तशीही क्राफ्टची खूपच आवड आहे.
लाजो, कित्ती दचकले मी....
लाजो, कित्ती दचकले मी.... भारी आहे हे !
:आता कोणा कोणावर प्रयोग करावा बरं असा विचार करणारी बाहुली:
(No subject)
मजेशीर प्रकरण आहे हे. अजुन
मजेशीर प्रकरण आहे हे. अजुन नक्की लिही.
खुप मस्त. यूटुबवर
खुप मस्त.
यूटुबवर arvindguptatoys म्ह्णुन सर्च केले तर, घरगुती तयार केलेली खेळणी/वै.प्रयोग अगदी छान आहेत.
यूटुबवर arvindguptatoys
यूटुबवर arvindguptatoys म्ह्णुन सर्च केले तर, घरगुती तयार केलेली खेळणी/वै.प्रयोग अगदी छान आहेत.>>>
हो अगदी मस्त आहेत त्यांचे प्रयोग पण. त्यांची वेबसाईट पण आहे.
chaan. CBeebies ह्या channel
chaan.
CBeebies ह्या channel वर MISTER MAKER नावाचा program लागतो.
त्यात अश्या बर्याच गोश्ति दाखवतात.
http://www.bbc.co.uk/cbeebies/shows/mnop
हि link हवे तर internet वर पन बघता येइल.
लाजो, भन्नाट!
लाजो, भन्नाट!
ग्रेटच आहेस गं तू लाजो. काय
ग्रेटच आहेस गं तू लाजो. काय एकेक जबरी सुचत असतं तुला अन करतेसही सही !
कालच आम्ही " अली मिली गुपचिली
कालच आम्ही " अली मिली गुपचिली " बनवलं होतं ! धम्माल. लेकाने खूप एन्जॉय केलं.
फोटो अपलोड होत नाहीये. नंतर पुन्हा बघते करून.
अरे सह्हीच गं रुणुझुणू नक्की
अरे सह्हीच गं रुणुझुणू
नक्की फोटो टाक.
इथे दुसरा भाग टाकलाय....
कडकु मडकु : http://www.maayboli.com/node/25526
भारी आहे
भारी आहे
खूप दिवसांनी टाकतेय फोटो. लेक
खूप दिवसांनी टाकतेय फोटो. लेक बसलाय बाजूला. त्याने सांगितलं म्हणून ह्या चित्राचं नाव.... नागोबा !
आम्हाला कागदाचं गवत बनवेपर्यंत अज्जिबात धीर नव्हता. म्हणून ' पलत-पलत ' जाऊन टेबलावरची आयती निवडून ठेवलेली पुदिन्याची पाने भस्सकन ओतली आहेत !
जबरी आहे!!!!
जबरी आहे!!!!
budhila chalna denare
budhila chalna denare
भन्नाट आहेस तू laajo... अगं
भन्नाट आहेस तू laajo... अगं मी जाम माठ आहे याबाबतीत पण कदाचित मुलगा नवर्याबरोबर बसून केलं तरी जमेल ...प्लस दोघं इत्का वेळ शांत ....can't wait to introduce this to them for a weekend...
भारीच
भारीच
खुपच छान
खुपच छान !!!
http://www.arvindguptatoys.com/ अवश्य भेट द्या .... मुलन्करता खजिना सापडेल.
Pages