चहा....... म्हणजे पृथ्वीवरचं अमृतच म्हणतात. तसं बघितलं तर अगदी सोम्यागोम्या कोणालाही अगदी बेसिक करता येण्यासारखी गोष्ट म्हणजे चहा.....
पण वर वर साधा दिसणारा हा चहा सुध्दा अतिशय वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. अगदी एकाच घरातली चार माणसे चार वेगळ्या पद्धतीने चहा करतात आणि चव बदलते. पाणी, चहा पावडर, साखर यांचं भिन्न घेतलं जाणारं प्रमाण...... पाण्याला किती वेळ उकळी दिली, उकळायच्या आधी साखर, पावडर एकत्र घातली की साखर घालून मग उकळल्यावर पावडर आणि मग पुन्हा एक उकळी. काही जण दुधातच साखर आणि चहापावडर घालून उकळवतात. असे एक ना अनेक प्रकार व्यक्तीगणिक बदलतात.
वरवर साधा वाटणारा हा चहा करता मात्र कित्येक प्रकारे करता येतो आणि प्रत्येक कृतीची चव निराळी लागते. याचमुळे कधीकधी अत्यंत रद्दड झालेला टमरेलभर चहा (टमरेल म्हणजे आकाराने मोठा कप ) कसाबसा घशाखाली ओतावा लागतो.
तर अश्या निरनिराळ्या पध्दतीतून तुम्ही नेमका चहा कसा करता ते इथे जरूर लिहा....
कृपया इथे स्टेपवाईज लिहा कृती. कारण दूध आधी घालतो की नंतर चहापावडर आणि साखर एकत्र घालतो का, किती उकळवतो अश्या छोट्या छोट्या गोष्टीवर चहाची चव बदलते.
तुमच्या घरात ४ माणसं आली आहेत आणि तुमच्यासकट आता ५ जणांचा चहा तुम्हाला करायचाय.....
कसा कराल?????? गुरू होजा ओ शुरू........
>> तुम्ही चहा कसा करता?????
>> तुम्ही चहा कसा करता?????
कसाही करा पण चहा हवा आहे आता मला. दीड तास झालं कॉन्फरन्स मध्ये आहे.
उटी का कूर्ग चा चॉकलेट चहा
उटी का कूर्ग चा चॉकलेट चहा मस्त होता.>> +१
तिथे सँपल म्हणून घेतला जाणारा चहा जास्त चवदार लागतो. विकत आणून घरी केले की ती मजा येत नाही.. असे का होत असावे?
तिथे सँपल म्हणून घेतला जाणारा
तिथे सँपल म्हणून घेतला जाणारा चहा जास्त चवदार लागतो. विकत आणून घरी केले की ती मजा येत नाही.. असे का होत असावे?>>
Same अनुभव... करेक्ट आहे
तो ठिकाण, हवामान, निसर्ग,
ते ठिकाण, हवामान, निसर्ग, आठवणी असं एकत्र युजर एक्सपिरियन्स पॅकेज असतं.घरी आपण श्रम करून चहा करून मिळत नाही
तिथे कुणीतरी चहा करून देत
तिथे कुणीतरी चहा करून देत असेल ना, आपलं आपण करून घेतल्यावर मजा येत नसेल
Pages