तुम्ही चहा कसा करता?????

Submitted by भुंगा on 18 April, 2011 - 06:50

चहा....... म्हणजे पृथ्वीवरचं अमृतच म्हणतात. तसं बघितलं तर अगदी सोम्यागोम्या कोणालाही अगदी बेसिक करता येण्यासारखी गोष्ट म्हणजे चहा.....

पण वर वर साधा दिसणारा हा चहा सुध्दा अतिशय वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. अगदी एकाच घरातली चार माणसे चार वेगळ्या पद्धतीने चहा करतात आणि चव बदलते. पाणी, चहा पावडर, साखर यांचं भिन्न घेतलं जाणारं प्रमाण...... पाण्याला किती वेळ उकळी दिली, उकळायच्या आधी साखर, पावडर एकत्र घातली की साखर घालून मग उकळल्यावर पावडर आणि मग पुन्हा एक उकळी. काही जण दुधातच साखर आणि चहापावडर घालून उकळवतात. असे एक ना अनेक प्रकार व्यक्तीगणिक बदलतात.

वरवर साधा वाटणारा हा चहा करता मात्र कित्येक प्रकारे करता येतो आणि प्रत्येक कृतीची चव निराळी लागते. याचमुळे कधीकधी अत्यंत रद्दड झालेला टमरेलभर चहा (टमरेल म्हणजे आकाराने मोठा कप Proud ) कसाबसा घशाखाली ओतावा लागतो.

तर अश्या निरनिराळ्या पध्दतीतून तुम्ही नेमका चहा कसा करता ते इथे जरूर लिहा....
कृपया इथे स्टेपवाईज लिहा कृती. कारण दूध आधी घालतो की नंतर चहापावडर आणि साखर एकत्र घालतो का, किती उकळवतो अश्या छोट्या छोट्या गोष्टीवर चहाची चव बदलते.

तुमच्या घरात ४ माणसं आली आहेत आणि तुमच्यासकट आता ५ जणांचा चहा तुम्हाला करायचाय.....

कसा कराल?????? गुरू होजा ओ शुरू........ Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चहाला किंचित तुरट, कडवट अशी "आयरिश" टेस हवी असेल तर, ३-४ कपांसाठी २ कढीपत्त्याची पानं चुरगळून, दूध घातल्यानंतर चहा उकळताना त्यामध्ये टाकावी.

चहा वरुन आठवले. ५ वीत असताना शिकायला मामाकडे होते. मामाकडे कायम पाहुने असायचे. एकदा मामी नसताना ४ लोक आले. मामा नको म्हणत असताना मी पाहुण्यांना चहा केला. घरात नेमके ४च कप शिल्लक होते. मग आधी पाहुण्यांना म्हणुन ४ जणांना चहा दिला. मग त्यांचे कप रिकामे झाल्यावर मामाला दिला. पहिला घोट घेण्याआधीच मामाला शंका आली.

मामा : बेटा हिंगाचा वास येतोय. चुकुन दुसरे पातेले घेतले का?
मी : नाही मामी घालते म्हणुन मी पण हिंग घातला. ( मामीने एका डब्यात वेलची कुटुन ठेवलेली.. मला वाटले ती हींग घालते Uhoh )
बिचार्‍या पाहुण्यांनि हु की चु न करता कपभर चहा संपवला होता... मामा ला नक्की धरनीमाते झाले असेल Lol

माझे वयाने ज्येष्ठ असलेले एक स्नेही आहेत. त्यांच्या आवडीचा ''मसाला चहा'' एकदा मी त्यांच्या निगराणीखाली बनवला होता.

त्यात चहा पत्ती नेहमीपेक्षा जरा कमी (जवळपास निम्मीच), सोबत लवंग - काळी मिरी - तेजपत्ता, वेलदोडा, दालचिनी हेही चहाच्या पाण्यात टाकून उकळायचे. दूध अगदी आयत्या वेळी घालायचे. दूध घातल्यावर हा चहा जास्त उकळायचा नाही. साखर आवडेल तशी घालायची. थंडी/ पावसाळ्यात असा चहा मस्त लागतो. किंवा पहाटे/ रात्रीच्या थंड वेळेत घशाला ऊब आणायला.

भुंग्या,
एकेक भन्नाट विषय सुचतात रे तुला !
पण तूला साधा चहा देखील करता येत नाही अजुन ...
लग्नाअगोदर कुणी हा प्रश्न विचारला कसा नाही ?
Lol

मी तरी असाच चहा केलाय आतापर्यंत तरी ....
५ कप पाणी + १० चमचे साखर + ५ चमचे चहा पावडर, एकदाच टाकुन उकळायचा, उकळी आले की दुध घालुन पिणे !
ही पध्तत आता चुकीची आहे हे सिद्ध झालेले आहे, कुणीही अनुकरण करु नये ..:डोमा:

अरुंधती,
तुम्ही सांगीतल्याप्रमाणे आता चहा नक्कीच करुन बघायचा आहे, एक नविन आणि खास अनुभव म्हणुन !
Happy

भुंग्या,
एकेक भन्नाट विषय सुचतात रे तुला !
पण तूला साधा चहा देखील करता येत नाही अजुन ...
लग्नाअगोदर कुणी हा प्रश्न विचारला कसा नाही ?
>>>>

अनिलभौ, सर्वात पहिली रिसिपी मीच लिहिलिये..... वाचा की वो.....

आणि चहा सोडला तर इतर सगळ्यात माझी बोंब आहे.... मी किचनमध्ये सहसा पाऊल पण ठेवत नाही.

आमच्याकडचा चहा :
सकाळचे सात वाजलेले. विविधभारतीवर भूले बिसरे गीत सुरू झालेले. तिघांच्या चहासाठी एका पातेल्यात दीड कपापेक्षा जरा जास्त पाणी गरम करत ठेवावे. दुसर्‍या शेगडीवर दूध उकळत ठेवावे. मग २ कप+ बशा मांडाव्यात. आईला स्टीलच्या पेल्यातच चहा लागतो. आईच्या पेल्यात आणि माझ्या कपात दोन्-दोन चमचे साखर.
बाबांचा चहा बिनसाखरेचा. एक गाणे होईतो पाण्याला उकळी फुटू लागेल. त्यात
पुढल्या दोनपैकी एक पूड एक चमचा एकेक दिवस आलटून पालटून टाकायची.
१) ४ भाग धणे+३ भाग बडीशेप +२ भाग जिरे +१ भाग मेथी भाजून दळलेली.
२) भाजलेली दालचिनी +सुंठ समप्रमाणात एकत्र कुटलेली.
तीन चमचे चहा पूड टाकायची.
आता प्रत्येकाच्या बशीत बिस्किटे काढून ठेवायची.
दुसरे गाणे संपेतो चहा मध्यम आचेवर उकळू द्यायचा. आता दुधालाही कढ येईल.
प्रत्येकाच्या कपात चहा गाळून ओतायचा. मग पातेल्यातले दूध मलई पडणार नाही अशा बेताने ओतायचे. साखर ढवळायची. झालं. आता एका हातात पेपर, समोर चहाचा कप आणि बिस्किटांची बशी आणि विविधभारतीवर भूले बिसरे गीत.
दिवसाची यापेक्षा चांगली सुरुवात नाही. (पेपर शेवटच्या पानापासून वाचायचा)

<< १) ४ भाग धणे+३ भाग बडीशेप +२ भाग जिरे +१ भाग मेथी भाजून दळलेली.
२) भाजलेली दालचिनी +सुंठ समप्रमाणात एकत्र कुटलेली. >>

भरत, हे कॉम्बिनेशन मी पहिल्यांदाच वाचत आहे. धन्यवाद शेअर केल्याबद्दल. जिरे व मेथीची किंचित कडसर अशी टेस्ट येते का?

मी इटीव्ही मेजवानी वर पहिले काँबिनेशन पाहिले होते. मंगला खाडिलकर यांनी केले होते आणि चहा पावडर न घालताच तो 'चहा' प्यायचा होता.
जिरे आणि मेथीचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे कडवट नाही वाटत. पण डबा उघडल्यावर येणारा आणि पुन्हा चहा पिताना येणारा वास आणि वेगळी चव (चहाची किक?) छान आहे.
दुसर्‍या काँबोमधली दालचिनी मधुमेह स्पेशल.

>>>एका हातात पेपर, समोर चहाचा कप आणि विविधभारतीवर भूले बिसरे गीत. दिवसाची यापेक्षा चांगली सुरुवात नाही....अनुमोदन.

माझ्या सासरी जवळपास नुसत्या दुधाचा चहा करतात. एक कप चहासाठी १ कप घरचं दुध अन नावापुरतं १-२ घोट पाणी, त्यात पाव चमचा चहा आणि दिड चमचा साखर. आणि हो यात काही ना काही मसाला लागतोच घालायला. थंडीच्या दिवसात मिरे, लवंग, दालचीनी, सुंठ, वेलदोडे, मोठी विलायची आणि बडीशेप इ. घालून मसाला बनवलेला असतोच.सोबत ताजं किसलेलं आलं पण लागतं. हा मसाला नसेल तर आलं, बडिशेप, वेलदोडे, ओवा, तुळशीची पानं यातलं जे काही उपलब्ध असेल ते घालतात.

अल्पना, एक कप चहासाठी १ कप घरचं दुध अन नावापुरतं १-२ घोट पाणी, त्यात पाव चमचा चहा आणि दिड कप साखर >>>>>> बापरे, साखर जास्त होत नाहि ???????

अल्पना, एक कप चहासाठी १ कप घरचं दुध अन नावापुरतं १-२ घोट पाणी, त्यात पाव चमचा चहा आणि दिड कप साखर >>>>>> बापरे, साखर जास्त होत नाहि ???????

अल्पना, एक कप चहासाठी १ कप घरचं दुध अन नावापुरतं १-२ घोट पाणी, त्यात पाव चमचा चहा आणि दिड कप साखर >>>>>> बापरे, साखर जास्त होत नाहि ???????

चहा म्हणजे चहापत्ती नसलेले दोन नमुने. दोन्ही अरब जगतातले.

अख्खे लिंबू उन्हात कडक वाळवून त्याची पुड करायची. ती पूड कपातच टाकायची (एक चमचा पूरे) मग त्यात कढत पाणी ओतायचे. दिवसाची सुरवात करायला मस्त पेय.

आंबाडीच्या (भाजीच्या) बोंडाच्या लालभडक पाकळ्या (तिथे त्या करकाटे नावाने मिळतात.) चुरडून ग्लासात टाकायच्या, त्यावर कढत पाणी टाकायचे. मस्त गडद गुलाबी रंगाचे पेय होते. उपास सोडायला उत्तम.

गावाकडे गेलो की चहा हा गोड आणी फक्त गोडच असतो ..
पुर्वीपासुन एका कपाला २-३ चमचे साखर सहज नेहमीच घातली जाते..
एक कारण हेही असेल , साखर कारखान्यांच्याकडुन सभासदांना काही ठिकानी अजुनही मिळणारी ३ रु,५ रु, १० रु किलोंनी मिळणारी (किंवा टनाला १ किलो, १/२ किलो अशी) शेअर्सची साखर..!
Happy

दोन कप दुध, दोन कप पाणी
साखर ४-ते ६ चमचे..चहा ४ चमचे.. थोडयावेळ उकळु देणे.-
आमच्या कडे तर माझ्याच हातचा चहा आवडतो.. सगळ्यांना..

.

आधी लेमन टी वगैरे फॅड वाटायचं. पण एकदा भीत भीत घेतला. आता तोच आवडतो... पण मला आयता मिळतो

माझा आवडता.. गुळाचा चहा! तो पण वातीच्या स्टोव्हवर केलेला.. काय सही लागतो.... अहाहा!

कसा करतात ते माहीत नाही ... माझी आत्या करून एत असे मला! आईलाही जमत नाही...

आपून तो बाबा, अपने दुकान के पीच्चे वाली चाय टप्प्री वाले को चिल्लाकर आर्डर देताय्.."ऐ भैय्या, दो पेशल देना फस्कीलास....!"
फीर वो गिल्लास में चाय नाम का एक जिन्दा-तिलिस्मात पेय लाता है, पिओ तो जानो !
दोस्त लोग, कब्बी आना अपनी दुकान पर, आपको भी पिलाएगा!

भैया का चाय नय पिनेका रे बाबा. वो लोटेमे चाय बनानेसे पैले क्या क्या करता है सुना नै क्या?. Happy

हाय भुंगा, मी खुप दिवसांनी माबो वर आलो, तर हा बाफ दिसला ! मजा आली! मला स्वतःच चहा करून स्वता:च प्यायला आवडत नाही! बायकोच्याच हातचा आवडतो (माझ्याच बायकोच्या Wink )! रेड्-लेबल चा हर्बल टी विशेष आवडतो!
संजय (वाइजमन), भैय्या चा 'च्च्या' घेणे टाळ्णेच श्रेयस्कर! एखादा मराठी भाऊ चहावाला भेटेलेच तुला भैय्या ऐवजी! "जिन्दा तिलीसमात" म्हणजे अनिल म्हणतोय तसाच काही प्रकार तर नाही ना???? Uhoh

१) मी प्रथाम तंगड्या पसरून पडतो
२) कोणाला तरी हाक मारतो
३) चहा ची ऑर्डर सोडतो
४) नाहीच मिळाला तर उठतो
५) शेजारच्या टपरीवर जातो
६) आणि चहा पितो.

गिरिश देशमुख, जिन्दा तिलिस्मात हे युनानी औषध / उपचार असून त्यात पार्‍याचा वापर केलेला असतो. जिन्दा तिलिस्मात मोती लहान बाळांना नुकतेच दात येऊ लागतात तेव्हा ते विनात्रासाचे व्हावे म्हणून त्यांच्या गळ्यात बांधतात.

चहाचा ब्रिटिश अवतार (माझे मामा आजोबा असाच्च चहा प्यायचे! त्यांचा खास सिल्वर टी सेट/ सर्विस त्यासाठी राखीव असायचा.... हा चहाचा बनविणे व पिणे 'कार्यक्रम' अर्धा तास तरी चालत असेल!!)

गाळण्यात ग्रीन टी ची किंवा त्यांच्या आवडत्या ब्लेंडच्या चहाची पाने घेऊन ते गाळणे किटलीवर धरायचे, त्यावर उकळते पाणी ओतायचे, लगेच किटलीचे झाकण बंद करायचे. तो चहा जरा ''मुरला'' (आता असा चहा कितीसा मुरणारे?) की तो कपांत ओतायचा. दुधाच्या किटलीतून अगोदरच गरम केलेले दूध त्यात ओतायचे. साखरेचे क्यूब्ज आवडीप्रमाणे. मग नाजूक चमच्याने तो चहा नाजूकपणे ढवळायचा, जेणेकरून साखरेचे क्यूब्ज विरघळतील. आणि सोबत एखादे पुस्तक वाचत वाचत त्या चहाचा आस्वाद घ्यायचा. (माझ्या अनुभवाप्रमाणे हा चहा चक्क कोमटच असतो, आणि बराचसा फुळकावणी.... त्यामुळे किटलीतील चहाच्या वाट्याला मी फारशी जात नाही!)

आणि हा आणखी एक चहा : http://www.maayboli.com/node/16278

अडीच कप पाणी + १० चमचे साखर + अडीच चमचे चहा पावडर......... पाण्याला मस्त लाल रंग येईपर्यंत उकळून घेणे.......

मग त्यात अडीच कप दुध टाकून पुन्हा उकळणे...........

मग माझ्या फेव मग मध्ये ओतणे आणि प्रत्येक घोट अनुभवत झालेला चहा पिणे.......... Happy

बिन पाण्याचा चहा करा.......................मस्त मलाइ मारके...............म्हणजे फक्त दुधाचा..............

साखर नंतर कप मधे टाकायची .....म्हणजे कमी लागते..........( महाग झाली ना.... Happy )

५ कप पाणी + ५ चमचे साखर उकळयची.
उकळी आली की त्यात लिप्टन ग्रीन लेबल १ टी स्पुन टकय्चं

आच बंद करुन झाकायचं.

५ मि. नंतर गाळायचा, १ थेंब लींबाचा रस पर कप.

सही लागतो...!!!

एक कप पाणी, २ चमचे साखर, २ चमचे चहापत्ती आणी बराचसा आला एका मायक्रोवेवेबल भान्ड्यात घेउन, २ मिनटा मायक्रोवेव मधे उकळत ठेवायचा, उकळला की सधारण १ कप दुध टाकुन परत २ मिनटा उकळवला की चहा तयार Happy

भैया का चाय नय पिनेका रे बाबा. वो लोटेमे चाय बनानेसे पैले क्या क्या करता है सुना नै क्या?. >>>>
अगागागा मेलो. ठार झालो. खपलो Rofl

@अनिलभै, वाइजमैन ऐस्सच्च च्चाय पिता हय. Lol

एक भा.प्र. एकदा चहा पावडर उकळल्यावर पुन्हा उकळली तर चालते का? म्हणजे एकदा चहा करुन झाल्यावर पुन्हा ४-५ तासांनी (किंवा संध्याकाळी) हवा असल्यास नविन चहा पावडर वापरावी की आधीचीच पुन्हा उकळावी? माझा नी माझ्या नवर्‍याच नेहमी यावरुन वाद होतात, तो म्हणतो की टपरीवर थोड्च प्रत्येक ऑर्डरच्या वेळी नवीन चहा पावडर घालतात, आधीचीच उकळुन देतात तरी तीच चव असते. मी मात्र नेहमी प्रत्येकवेळीस नविनच वापरते. हे चुक की बरोबर??

टपरीवरचा चहा= काढा
घरचा चहा सुद्धा असाच बनवायचा असेल व आवडत असेल तर करु शकता.
पण खूप उकळलेला चहा चांगला नाही. कारणं गूगल करून मिळतील, आता लक्षात नाही. पण एका वैदु काकाने पण सांगितलेले आठवते की चहा अति उकळू नये.

शेवटचा प्रतिसाद अगदी दीड वर्षांपूर्वीचा आहे तरीही या धाग्याला जिवंत करावेसे वाटले कारण मी केलेली न विसरता येण्याजोग्या चहाची कृती. Lol नेहमी आधी पाणी मग त्याला उकळी आल्यावर चहा पावडर आणि मग साखर असेच का प्रमाण टाकायचे म्हणून मी उलट चहा बनविला आणि नन्तर खो खो हसत बसलेले. ४ कप चहासाठी रिकाम्या भांड्यात पहिली ८ चमचे साखर टाकली आणि गेंस सुरु केला. साखर वितळायला लागली तेवढात आई आली. काय चाललाय ग? (काही नाही ग चहा बनवतेय असा म्हटल्यावर तिला चक्कर यायची बाकी होती :D) तू जा न मी देते तुला चहा म्हणून तिला पिटाळले. मग साखरेचा पाक झाला होता मग त्यात अस्मादिकांनी १ कप दुध टाकले मग दुधी पाक झाल्यावर त्यात ३ चमचे चहा पावडर टाकली आणि मग पुन्हा उकळी येऊन दिली... मग दुध थोडे आटल्यावर २ कप पाणी टाकले आणि मग पुन्हा उकळी येऊन दिली. मग पुन्हा १ कप दूध टाकले आणि दुध आणि पाण्याचे प्रमाण बालान्स केले. Proud शेवटी गार्निशिंग म्हणून त्यात थोडी वेलची पावडर टाकली आणि शेवटची उकळी देऊन अस्मादिकांनी तो चहा बनवणे संपविले. Lol

माझी चहा करण्याची पद्धत -
चहाचे भांडे स्वच्छ घासून व विसळून घ्या. त्यात थोडाही ओशटपण नको. गॅस वर ठेवा. साडेतीन कप पाणी घाला. मग गॅस लावा. अगोदर गॅस लावला आणि चर्रकन आवाज करत पाणी ओतले की चहाची चव बदलते अशी माझी भावना आहे. पाण्याला उकळी आली की चहाच्या प्रकारानुसार पावडर घाला. मी गोळी चहा वापरतो त्यामुळे 4 किंवा 5 चमचे पावडर टाकतो. डस्ट थोडी कमी लागेल. उकळी आली की लगेचच जाड झाकण ठेवून तो तीन-चार मिनिटे दबावयास ठेवा. दूध गरम करत ठेवा. साय न काढलेल्या दुधाचा चहा चांगला होतो. पण हृदयविकारात तो चालत नसल्यामुळे ज्याचे त्याने ठरवावे. दबलेला चहा पत्ती बाजूला करण्यासाठी तो पुन्हा दुसऱ्या एका भांड्यात ओता. त्यावर आपल्याला पाहिजे तसा रंग येईपर्यंत तापलेले दूध घाला. घरातील सर्वांना सारख्याच प्रमाणात साखर लागत असेल तर तशी साखर घाला. किंवा कपात ओतून ज्याच्या त्याच्या प्रमाणात साखर घाला. उकळत्या पाण्यात साखर घातली किंवा साखर घालून पाणी उकळले की एकप्रकारचा दर्प येतो असा माझा अनुभव आहे. ह्या पद्धतीत थोडी उसाभर आहे पण दूध कमीजास्त झाले किंवा साखर कमीजास्त झाली याची चिंता नाही. आणि मुख्य म्हणजे या पद्धतीत चहाचा फ्लेवर अजिबात डिस्टर्ब होत नाही असे मला वाटते. करून पाहा व अनुभव शेअर करा.

मला माझ्या बाबांनी बनवलेला चहा खूप आवडतो. त्याची कृती अशी -
५ कप चहा साठी साधारण साडेतीन-चार कप पाणी उकळत ठेवायचं. त्यात थोडं आलं किसून घालायचं. पाण्याला उकळी आली की त्यात ४-४.५ छोटे चमचे साखर घालायची आणि ५ छोटे चमचे चहा पावडर. २-३ मिनीटे हा चहा उकळला की त्यात गवती चहाची पात कापून घालायची, गॅस बंद करायचा आणि पातेल्यावर १-२ मिनीटं झाकण ठेवायचं. मग झाकण काढून चहा गाळायचा, त्यात उकळलेलं दूध घालायचं ( आमच्याकडे थोडासा उजळ चहा करतात Happy ) आणि कपांमधून घालायचा.

चहा पावडर टाटांची आहे... प्रिमीयम वाली. मला तरी खूप आवडते ती.

चहा हा खरंच इतका जिव्हाळ्याचा विषय आहे की लिहील्यावाचून रहावलंच नाही!! Happy

आसाममधील एका चहातज्ञ्याने सांगितलेली पद्धतः चहाची पावडर गाळण्यात घेऊन त्यावर गरम ( उकळते नव्हे! ) पाणी ओतणे. त्याच्या मते पाण्यात पावडर व उकळने या अत्यंत चुकीच्या प आहेत.
मी अशा प्रकारचा काळा चहाच पितो. दूध घालून आपण चहाचे antioxidant गुणधर्म नाहिसे करतो व तो अधिक acidic करतो! Tea bags वर गरम पाणी ओतलेला चहा तर मला खूपच प्रिय!

@ Kumar1
That is stranded speech by any guide in any tea factory. the more tea powder you throw away after pouring hot water on it, the more they can sell.
We Indians 'Cook' tea.
we cook it in water, and milk and add sugar n spices, and again cook it.
Nobody else in the world does that. We do it our way, and THAT is the way to do it. Let the rest of the world enjoy the way they want, I love drinking the tea the way Indians do it.
अँटीऑक्सिडंट्स च्या नावाखाली काय काय गळ्यात मारलं जातं अन आपण काय काय धकवून घेतो.. धन्य आहेत सगळे!

.

Pages