चहा....... म्हणजे पृथ्वीवरचं अमृतच म्हणतात. तसं बघितलं तर अगदी सोम्यागोम्या कोणालाही अगदी बेसिक करता येण्यासारखी गोष्ट म्हणजे चहा.....
पण वर वर साधा दिसणारा हा चहा सुध्दा अतिशय वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. अगदी एकाच घरातली चार माणसे चार वेगळ्या पद्धतीने चहा करतात आणि चव बदलते. पाणी, चहा पावडर, साखर यांचं भिन्न घेतलं जाणारं प्रमाण...... पाण्याला किती वेळ उकळी दिली, उकळायच्या आधी साखर, पावडर एकत्र घातली की साखर घालून मग उकळल्यावर पावडर आणि मग पुन्हा एक उकळी. काही जण दुधातच साखर आणि चहापावडर घालून उकळवतात. असे एक ना अनेक प्रकार व्यक्तीगणिक बदलतात.
वरवर साधा वाटणारा हा चहा करता मात्र कित्येक प्रकारे करता येतो आणि प्रत्येक कृतीची चव निराळी लागते. याचमुळे कधीकधी अत्यंत रद्दड झालेला टमरेलभर चहा (टमरेल म्हणजे आकाराने मोठा कप ) कसाबसा घशाखाली ओतावा लागतो.
तर अश्या निरनिराळ्या पध्दतीतून तुम्ही नेमका चहा कसा करता ते इथे जरूर लिहा....
कृपया इथे स्टेपवाईज लिहा कृती. कारण दूध आधी घालतो की नंतर चहापावडर आणि साखर एकत्र घालतो का, किती उकळवतो अश्या छोट्या छोट्या गोष्टीवर चहाची चव बदलते.
तुमच्या घरात ४ माणसं आली आहेत आणि तुमच्यासकट आता ५ जणांचा चहा तुम्हाला करायचाय.....
कसा कराल?????? गुरू होजा ओ शुरू........
शुभांगी, बेसिक क्लिअर केलेलं
शुभांगी, बेसिक क्लिअर केलेलं केव्हाही बरं असतं........ नंतर ईधर की उधर अशी गोची होत नाही.........

आणि मामी आमचा तारणहार आहे
सब दर्दों का एकही ईलाज......
"नाईलाज को क्या ईलाज"
भुंग्या.. मस्त धागा.. सकाळी
भुंग्या..
मस्त धागा..
) मिसळते.
सकाळी चहा घशात गेल्याशिवाय दिवस सुरु झालाय असं वाटतच न्हाय नै?..
चहा मी असा करते
पाच जणांसाठी पाच कप पाणी आणी ४ चमचे साखर (गोड आवडत नाही म्हणून),ठेचलेलं आलं घालून उकळ उकळते.. मग पाच चमचे टाटा गोल्ड चहा किंवा लिप्टन चा ग्रीन लेबल चहा टाकून लगेच गॅस बंद करून झाकण घालते
७ मिनिटांनंतर गाळून गरम ,उकळलेलं फ्रेश मिल्क (जे सुपर मधे मिळतं
मला लाल रंगाचा ,अतिशय कमी साखरेचा चहा आवडतो.
माणूस : डॉक्टर मला मलावरोधाचा
माणूस : डॉक्टर मला मलावरोधाचा त्रास आहे.
डॉक्टर : रोज सकाळी कोमट पाणी प्या.
माणूस : ते तर मी गेली १० वर्षे पितोय. फक्त माझी बायको त्याला "चहा" म्हणते.
>>>>>असो आमच्या घरी
>>>>>असो आमच्या घरी लहानपणापासूनच दुधाचा चहा पितात त्यामुळे मला ही तोच आवडतो, तु टाकलेली चहाची रेसिपी इंग्लिश आहे, मला अजिबात आवडत नाही. तसल्या चहापेक्षा प्रसिद्ध 'पाटणकर काढा' प्यायलेला बरा.. हेमावैम आहे. कृपया गरजूंनी (तसा चहा पिणार्यांना वरिल वक्तव्याचा राग आला असेल तर त्यांनी ) घ्यावा.
>>> गरजूंना राग आलेला आहे पण त्यांनी दिवा घेतलेला आहे.
मामी, दक्षीने दिलिये
मामी, दक्षीने दिलिये ना.......... मग दिवा नाय "दिवटी" असणार ती

भुंग्या, अरे दक्षीचा चहा
भुंग्या, अरे दक्षीचा चहा घेण्यापेक्षा दिवा / दिवटी जे काही असेल ते घेणं परवडेल मला.
भुंग्या, वेल सेड. बर मग
भुंग्या, वेल सेड. बर मग इतक्या रेसिप्यांनंतर तु कुठे मग इधर की उधर्???:डोमा:
मी ईधन नाही उधर नाही......
मी ईधन नाही उधर नाही...... सध्यातरी "बधीर" आहे शुभांगी
आम्ही घरात पातेलं, चमचा,
आम्ही घरात पातेलं, चमचा, गाळणं, शेगडी, दूध, पाणी, चहापत्ती, साखर यांच्या उपलब्धतेनुसार कसाही चहा करतो. तो चहा असल्यामुळे चांगलाच लागतो.
लहानपणी रात्री दोनाला उठ्वून कुणी, "ए पोट्टेऽ चहा पितेस का?" विचारल्यावर डोळे चोळत उठून, कपभर चहा रिचवून झोपता येत होतं. आता तसं केल्यास, वयपरत्त्वे रात्रभर टीव्ही बघत बसावं लागेल.
हल्ली मी कपात एक चमचा साखर +
हल्ली मी कपात एक चमचा साखर + २ चहाच्या पुड्या यावर उकळते पाणी (पाऊण कप) टाकते.
दुसर्या कपात पाव कप दुध घेऊन ते मावेमध्ये चांगले गरम करुन घेते. हे गरम दुध चहात टाकुन चमच्याने ढवळुन घेते आणि मगच चहाच्या पुड्या कपातुन काढुन टाकते.
पाच जणांसाठी चहा करायचा असल्यास साधारण साडेतीन कप पाण्याला उकळी आली की त्यात ८ चमचे साखर घालते. ते जरा उकळले की त्यात थोडे आले किसुन टाकते. एक मिनीट उकळले की त्यात ८ चमचे वाघबकरी चहा टाकुन उकळते. त्यानंतर त्यात दीड कप दुध मावेमध्ये चांगले गरम करुन टाकते. एक मिनीटानंतर चहा कपात ओतते.
तटी : ईथे दुध तापवुन ठेवत नसल्याने मावेमध्ये गरम करुन घेते.
अवांतर: वाघबकरी ब्रॅडचा चहा मला आवडतो. त्यात ब्रॅडच्या मसाला टी बॅग्ज पण मिळतात. त्या ठीक वाटल्या.
'चहा घ्यावा चहा घ्यावा, चहा जीवाचा विसावा' असं एक गाणं लहानपणी ऐकल्याचं आठवतय. कुणाला संपुर्ण माहीत असल्यास ईथे लिहा.
एक मित्र नेहमी म्हणतो ' चहाच्या घोटाला आणि कुंकवाच्या बोटाला कध्धी नाही म्हणु नये'
चहाला मी कधीच नाही म्हणत नाही
चहाला मी कधीच नाही म्हणत नाही आयता मिळालातर.
भुंग्या
मी अश्या पद्धतीने करते.
४ जणांना ३.५ कप पाणी गरम करायला ठेवायचे. त्यात बोटभर आल्याचा तुकडा चांगला ठेचुन घालायचा. उकळेपर्यत गॅलरीतुन गवतीचहाची दोन पाने आणुन त्यात टाकायची. असेल उपलब्ध तर इलायची नाहीतर पुढे ५ चमचे साखर (जाड असेल तर सपाट, बारीक असेल तर शिगोशिग भरुन) टाकुन विरघळल्यावर ३.५ चमचे रेड्लेबल चहा टाकुन २ मिनिटांनी गॅस बंद करुन झाकण ठेवायचे. मस्त मुरलेल्या चहात गरम दुध घालुन दोन कप पाहुण्यांना पाऊण पाऊण वाटुन दोन कप मला मोठ्या मगात घेऊन बाल्कनीत मस्त आरामात सिप सिप करत चहा पिण्यात जे स्वर्ग सुख आहे न ते वर्णन काय करावे.
कप पाहुण्यांना पाऊण पाऊण
कप पाहुण्यांना पाऊण पाऊण वाटुन दोन कप मला मोठ्या मगात घेऊन बाल्कनीत मस्त आरामात सिप सिप करत चहा पिण्यात जे स्वर्ग सुख आहे न ते वर्णन काय करावे. >> मी घरी आल्यावर तु मला हॉलमधे बसवुन बाल्कनीत जाणारेस
बरे झाले काल आले नाही तेच 
कप पाहुण्यांना पाऊण पाऊण
कप पाहुण्यांना पाऊण पाऊण वाटुन दोन कप मला मोठ्या मगात घेऊन बाल्कनीत मस्त आरामात सिप सिप करत चहा पिण्यात जे स्वर्ग सुख आहे न ते वर्णन काय करावे.
>>>>
शुकु, थोडक्यात स्वर्गाचं दार तुझ्या बाल्कनीत उघडतं तर....... थांब आता सोस्सयटीत तिकिटच लावतो सुट्टीत........ "स्वर्गाचं दार बघा फक्त ५० रुपयात...... वर पाऊण कप चहा मोफत.........

चहा हा माझ्या अगदी
चहा हा माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे.
ही माझी कॄती:
२ कप चहासाठी पावणे २ कप पाणी आधण ठेवते.पाणी कोमट झालं कि त्यात २ चमचे चहा (ब्रूक बाँड रेड लेबल) टाकते.आता झाकण ठेवून उकळू देते.चहा उकळून त्याचा वास आला कि झाकण उघडून रंग चेक करते.थोडा डार्क मरुन कलर आला असेल तर त्यात अंदाजे दूध (होल मिल्क) आणि पावणे २ चमचे साखर घालते.आता चहा उकळून वर यायला लागली गॅस बंद करुन झाकण ठेवते.३-५ मि.ने चहा गाळते.
१.ह्यात मसाला/कुटलेले वेलदोडे/गवती चहा/आले/कुटलेले आले+वेलदोडे अशी बरीच व्हेरिएशन्स मूड प्रमाणे करते.

ते टाकायचे झाल्यास चहा बरोबरच टाकते म्हणजे उकळून त्याचा स्वाद छान मुरतो.
२.चहा सुरुवातीला पाण्यातच उकळावा.दूध लवकर वर येत असल्याने दुधात उकळलेल्या चहाला चांगला स्वाद येत नाही (वैम)
३.सकाळचा चहा करायचाच तर तो फक्त ताज्या दूधाचा कमीत कमी दूधाची नविन पिशवी फोडून करावा.आदल्या दिवशीचे दूध मुळीच वापरु नये
४.चहासाठी होल मिल्कच वापरावे.१ कप चहाला फारतर पाऊण कप दूध लागते.त्यासाठी कॅलरीज चा विचार करुन लो फॅट दूध वापरुन चहाचा बेरंग करु नये
५.चहा पावडर विकत घेताना त्यात डस्ट+पत्ती असे काम्बिनेशन घ्यावे.डस्टमुळे चहा दाट होतो आणि पत्तीमुळे स्वाद आणि रंग येतो.
जाहिरात नाही पण पुण्यात कुमठेकर रोडला शगुनच्या चौकातून गाडगीळ रस्त्याला लागताना उजव्या कॉर्नरला एक चहाचे दुकान आहे.त्याचे नाव बहुतेक राज ट्रेडिंग कंपनी आहे.त्यांच्याकडे उत्तम कॉम्बिनेशन्स करुन मिळतात.
४ माणसं आली आहेत आणि
४ माणसं आली आहेत आणि तुमच्यासकट आता ५ जणांचा चहा तुम्हाला करायचाय>> येताना १ लि दू ध आणायला सांगतो.
मला चहा सकाळी लागतोच असं नाही
मला चहा सकाळी लागतोच असं नाही पण प्यायलेच तर तो मात्र व्यव्स्थित, चांगलाच लागतो. तो मला जमतो असं मला वाटतं.
४ माणसांकरसां: पातेल्यात पावणे तीन कप पाणी + सव्वा कप दूध घालून उकळायला ठेवायचं. उकळी आली असं वाटलं की साधारण चार ( टे स्पू) साखर आणि २ चमचे ( टेस्पू) ब्रूकबाँड रेडलेबलची चहा पावडर टाकून मध्यम आचेवर चांगला उकळू द्यायचा. रंग पांढरट दिसता कामा नये तसेच आटीवही दिसता कामा नये. मधे मधे पावडर नीट मिक्स व्हावी ह्याकरता ढवळावा. बंद करताना आल्याचा तुकडा टाकवा व पाच एक मिनिटं झाकून ठेवावा व प्यायला द्यावा.
मी चहा पीत नाही, म्हणुन मी
मी चहा पीत नाही, म्हणुन मी चहा करतही नाही.
( हा माझा नविन प्रतिसाद, जुना लांबलचक होता. बहुतेक त्या दिवशी नवर्याशी वाजलेलं असावं कारण त्यामधे नवर्याची चहाची प्रोसेस लिहिता लिहिता त्याची फार बुराई केली होती. आज आमचा प्रेमाचा दिवस आहे. छोटंसंही भांडण झालेलं नाही, त्यामुळे ती बुराई भरी पोस्ट एडिट केली आहे.
)
मंद आचेवर चहाचं पाणी गॅसवर
मंद आचेवर चहाचं पाणी गॅसवर ठेवल्यावर ( कपाचं प्रमाण मोजून ) मग उकळी आल्यावर त्यात चहापत्ती टाकायची. ती चांगली उकळल्यावर मग दीड ते दोन चमचे साखर टाकायची. चमचाने हलवत राहील्यास साखर विरघळते.
आता चहाचा मंद सुगंध नाकाद्वारे मेंदूला चहाची आठवण करून देत असतो. मग तल्लफ आणखी वाढते. आता चमचाने तळहातावर चहा घेऊन झटकन पिऊन पहायचा. हा चहा बनवण्याच्या आनंदातला परमोच्च बिंदू.... त्यानंतर तापवलेल्या दुधाचा कप हातात घेऊन उंचावरून दूधाची धार सोडायला मजा येते. हवा तितकाच रंग बदलला कि दूध ओतणं बंद...
असा चहा(च) आवडतो. मोठ्या गॅसवर घाईघाईत केलेल्या चहाला अजिबात चव नसते. साखरेचं पानी नुसतं..
स्टोव्हवर चहा करण्याचा एकदा
स्टोव्हवर चहा करण्याचा एकदा प्रसंग आला होता.
गंमत म्हणजे तो चहा खूप टेस्टी बनला होता. मला सांगण्यात आलं कि गॅसपेक्षा स्टोव्हवरचा स्वयंपाक किंवा काहीही टेस्टी असतं आणि स्टोव्हपेक्षा चुलीवरचं .. खरंय का हे ? असल्यास कारण काय असावं ?
कसे काय बाबा तुम्ही लोक
कसे काय बाबा तुम्ही लोक प्रेमाने चहा पिऊ शकता? इकडे चहा उकळायला लागला कि माझ्या अंगावर काटा यायला लागतो. मळमळायला लागतं मला.
ऑफिसच्या कॅन्टीनमधे दुपारचा चहा उ़कळायला लागला कि चहाबाज हातातलं काम सोडुन धावतात पहिल्या धारेचा चहा प्यायला. आणि मी पळते टेरेसवर किंवा रिकाम्या कॉन्फरन्स रुममधे, वासापासुन वाचायला. अशा मला चहाबाज सासर मिळालं आहे. दिवसाला प्रत्येकी १२-१५ कप चहा पिणारं. सगळ्यांनी मला अनेक अमिष दाखवुन चहा पाजण्याचा प्रयत्न केला, पण अजुन कोणीही यशस्वी झालेलं नाही.
भुंग्या चहा करणार आहेस की
भुंग्या चहा करणार आहेस की चहाची खिचडी एवढ्या सगळ्या रेसिप्या घेऊन
सर्वांचा चहा करुन झाला असेल
सर्वांचा चहा करुन झाला असेल तर उद्यापासुन दुपारी रोज एक एक कप पाठवुन द्या इकडे!
सांजसंध्या खर आहे ते, तू
सांजसंध्या खर आहे ते, तू लिहिल्यावर मला अचानक आठवणीमधले वास आले, स्टोव्ह आणि चुलीवरच्या चहाचे. पण माझ्या आठवणीतला स्टोव्हवरचा चहा संध्याकाळचा आहे आणि चुलीवरचा सकाळचा.....
गॅसपेक्षा स्टोव्हवरचा
गॅसपेक्षा स्टोव्हवरचा स्वयंपाक किंवा काहीही टेस्टी असतं आणि स्टोव्हपेक्षा चुलीवरचं .. खरंय का हे ? असल्यास कारण काय असावं ? >>> नाकातोंडात धुर गेल्यावर सगळं टेस्टीच लागत , म्हणुन

खरं कारण माहीत नाही .
२ कप चहा रेसीपी (पुर्ण कप
२ कप चहा रेसीपी (पुर्ण कप भरून हो.. आमच्याकडे देतात, विशिष्ट ठिकाणचे असलो तरी)
दिड कप मस्त घट्ट दूध
१ कप पाणी
किसलेले आलं
४-५ वेलची कुटुन
भारतातील रेड लेबल चहा पूड
साखर आपल्या आवडीप्रमाणे कपात घ्यावी.
१. आधी दूध,पाणी व किसलेले आलं एकत्र करून उकळा ५-६ मिनीटे मध्यम आचेवर.
पण असाच चहा छान लागतो हे स्प. व प्रा. मत आहे.
२. मग दूधाला उकळी आली की साय आलीच असेल तर चमच्याने काढून टाकावी. मग चांगले २ मोठे चमचे चहा पूड टाकली व सर्र असा आवाज आला की गॅस मंद करून मग वेलची पूड टाकून झाकण ठेवायचे व पुढच्या मिनीटाला गॅस बंद करायचा(१ मिनीटातच, चहापूड टाकल्यावर उकळायचा नाही ज्यास्त.).
३. ३-४ मिनीटाने एकदम वरून असा कपात गाळून ओतायचा. एका घोटातच पुढच्याच सेंकदाला एकदम स्वर्ग गाठला असे वाटेल.
दिवसाकाठी १० मिनीटे चहा बनवायला स्वतः घातली तर उरलेले २३ तास व ४० मिनीटे चांगली जातात असा स्वानुभव आहे.
वि. सू.: दुसर्याकडून अश्या चहाची अपेक्षा केली तर स्वर्ग चुकवाल(म्हणजेच नरकात स्वागत आहे).
खास टिपा राहिल्यातच,
तर
१. दूध घट्टच असावे(म्हशीचे उत्तम, परदेशात होल मिल्क)
२. रेड लेबलच चांगले, ते गाय-बकरी चहा वगैरे बेक्कार...
३. वेळ असेल तर गवती चहा वगैरे टाकावा.
अमृततुल्य मधे बसून त्याच्या
अमृततुल्य मधे बसून त्याच्या पितळी खलबत्त्याचा आवाज ऐकत, घट्ट दुधाची उकळी आणि त्यावरची साय पहात, खरच अमृततुल्य चहाची चव आत हरवत चाललीये..
माझे बाबा करतात तो चहा मला
माझे बाबा करतात तो चहा मला फार्फार आवडतो बुवा. ते करतात ती एक विशिष्ट गोष्ट म्हणजे चहा उकळून झाकून मुरवून झाल्यावर त्यात दूध न घालता ते उकळून वरती येत असलेल्या दुधात चहा गाळतात. मग डायबेटीस वाल्यांना देवून झाला की उरलेल्यात साखर
बाकी मी अती बंडल चहा करते असं आई आणि सासूचं (चक्क) एकमत.
छ्या: भुंग्या , मुझे तुमसे ये
छ्या: भुंग्या , मुझे तुमसे ये उम्मीद नही थी ...भुंग्याने माझे पाककृतींवरचे आगामी पुस्तक " थोरली सुगरण " प्रकाशना पुर्वीच चोरले आहे ....मी त्यातली पहिली पाककृती "मॅग्गी" सकाळीच टाकली होती , अन पुढल्या पाककृत्या ...चहा ,कॉफी ,सॅलड , शेंगदाण्याची चटनी ,मिरचीचा ठेचा वैगेरे टाकणारच होतो तितक्यात भुंग्याने चहा चोरला माझा

चहा वरुएन एक जोक आठवला ..आमच्या कडंची एक म्हण -" बाईनं कुंकवाला अन पुरुषानं चहाला कधीही नाही म्हणु नये "..
.
.एकदा आपला परममित्र गडबडीत म्हणाला ....." बाईनं पुरुषाला अन कुंकवानं चहाला कधीही नाही म्हणु नये "
बेस्ट रेस्प्या
बेस्ट रेस्प्या सगळ्यांच्या!!
मी बर्याचदा सकाळी पाणी,दूध, चहा सगळं एकत्र करून ढणाढणा उकळून पीते (साखर वरून-अॅसिडीटी होत नाही म्हणे)..
पण साग्रसंगीत चहा करायलाही फार आवडतो. बर्याचदा दुपारचा चहा साग्रसंगीत असतो.
चहात मिरे,लवंग्,दालचिनी आणि वेलदोडा हे काँबीनेशन अफाट लागते!!
बाकी रेड लेबल नाही ट्राय केला.. पण सीटीसी कडक चाय पत्ती वाघबकरी भन्नाट आहे. पहिल्या घोटात झोप उडून भन्नाट फ्रेश वाटते!
छ्या तल्लफ आली!!
ट्युलिपचा चहावरचा ब्लॉग आठवला!
एक मित्र नेहमी म्हणतो '
एक मित्र नेहमी म्हणतो ' चहाच्या घोटाला आणि कुंकवाच्या बोटाला कध्धी नाही म्हणु नये' >>>>>>>>>>>
इथे एक मस्त रेसिपी आहे चहाची.
इथे एक मस्त रेसिपी आहे चहाची.
http://query.nytimes.com/gst/fullpage.html?res=9502EFD6103CF937A25752C1A...
सीटीसी कडक चाय पत्ती वाघबकरी
सीटीसी कडक चाय पत्ती वाघबकरी भन्नाट आहे. >>> १००% कडक , एकदा बाघबकरी वापरल्यावर इतर चहापत्यांना हात सुद्धा लावावासा वाटत नाही.
चार ( टे स्पू) साखर आणि २
चार ( टे स्पू) साखर आणि २ चमचे ( टेस्पू) >>> सायो टे स्पू की टी स्पू , नक्की चहा की बासुंदी ?
चहाच्या बर्याच रेसीप्या
चहाच्या बर्याच रेसीप्या मिळाल्या की...
टे स्पूनच . बासुंदी अजिबात
टे स्पूनच . बासुंदी अजिबात नाही. मला तरी चहात साखर व्यवस्थित लागते. कमी गोड चहापेक्षा नसलेला बरा.
श्री, तुम्ही बासुंदीत फक्त
श्री, तुम्ही बासुंदीत फक्त चार टे स्पून साखर घालता? विशिष्ट शहरातला तर नाहीस ना?
सायो त्याबाबतीत मी पक्का
सायो त्याबाबतीत मी पक्का अडाणी आहे. विशिष्ट शहराचा नक्कीच नाही.
तुम्ही \चहा कसा करता?>>> टीप
तुम्ही \चहा कसा करता?>>>
टीप १ चहा = \ चहा !
हे तो तुम्ही कधी अन् कोणासाठी करता यावर अवलंबून आहे!
उदा. १ वेळ घाईची (कोणतीही वेळ घाईची असू शकते!) चहा स्वप्राशनार्थ
टीप*** १ घाईच्या वेळेत चहा बाहेर प्यायला जाऊ नये! http://www.maayboli.com/node/14288
टीप १.२ इतरांसाठी घाईच्या वेळेत चहा करू नये.
कृती -
४०% पाणी, ६०% दूध ६०% साखर (चमचे) अन् ४०% चहा पूड.
टीप २.१ ह्या वेळेस चहापूड ही सोसायटी आहे की वाघबकरी की रेड लेबल वगैरे बघत बसू नये! चहापूड आहे हे फार झालं ब्रँड वगैरे नवाबी शौक वेळ असेल तेंव्हा करावेत
टीप २.२ चहापूड म्हणून चहापूडच घेत आहोत ह्याची खात्री करून घेणे उत्तम.
हे सगळं मिश्रण एका भांड्यात उकळलं की चहा तयार होतो. लागणारा वेळ ३ मिनिटं (जास्तीत जास्त ८ मिनिटं! > जर गॅस मोठा ठेवला असेल आणि तुम्ही मल्टीटास्किंग करत असाल तर हे मिश्रण उतू जायची शक्यता फार असते तसे झाल्यास वरची कृती परत करावी लागते.
)
उदा. २ वेळ आरामाची (चहा एन्जॉय करायची) चहा स्वप्राशनार्थ
प्रमाण वरील प्रमाणे
चहा पूड मात्र रेड लेबल अथवा सोसायटीच आहे ह्याची खात्री करून घेणे मस्ट!
कृती प्रथम पाणी चहाच्याच भांड्यात, भांडे शेगडीवर ठेवून गॅस पेटवावा. पाणी उकळू द्यावं व साखर घालावी आलं किसून टाकावं. चहा पूड टाकावी. हे सगळं मिश्रण एका भांड्यात उकळलं की मुरू द्यावं व नंतर कपात हे मिश्रण टाकावं वरून दूध टाकावं (साय विरहित)
टीप २.३ वेळ लावाल तेवढा
हा चहा एन्जॉय करायचा म्हणून त्याला फार नावं ठेवू नयेत! माफक प्रमाणात नावं ठेवली तरी हरकत नाही.
उदा. ३ वेळ आरामाची (चहा एन्जॉय करायची) चहा इतरांसाठी (सभ्य मित्र / मैत्रिणी वगैरे... )
प्रमाण वरील प्रमाणे
चहा पूड मात्र रेड लेबल अथवा सोसायटीच आहे ह्याची खात्री करून घेणे मस्ट!
क्रुती उदा. २ प्रमाणे.
टीप ३ ह्या चहाला शक्यतो कुणी नावं ठेवत नाही ! तेंव्हा आपणच म्हणावं की दूध जरा कमी झालंय अथवा चहा कडक हवा होता वगैरे...
उदा. ३ वेळ आरामाची (चहा एन्जॉय करायची) चहा इतरांसाठी (असभ्य / वात्रट मित्र / मैत्रिणी वगैरे...)
सर्व प्रथम चहा घेणार का असं विचारायच व ये ताना १ लि. दूध आणायला सांगायचं. दूध आणलं की ते नेमकं हवं त्या ब्रान्डचे नाही सो मी चहा करणार नाही असं जाहीर करावं.
ह्यात बराच वेळ घालवल्यावर शेवटी एकदा अनिच्छेने चहा करायला उठावं !
क्रुती उदा. २ प्रमाणे.
टीप ४ ह्या चहाला शक्यतो सगळेच नावं ठेवतात (लागणारा वेळ, स्वखर्चानं आणलेलं दूध इ. मुळे) तेंव्हा अजिबात हरकत न घेता पुढच्या वेळेस याल तेंव्हा नेम क्या ब्रान्डचच दूध आणा असं सांगावं.
आपला चहा हाच सर्वोत्तम आहे! ह्या अमृततुल्य चहाला नावं ठेवावीत असं काहीच नाही असं कायम म्हणत रहावं!
चहा, मी चहा कधीच घेत नाही
चहा,
मी चहा कधीच घेत नाही (दुध पण नाही :))
एकदा मी घरच्यांसाठी चहा तयार केला होता, त्यानंतर वेळ प्रसंगी चहा देखरेखी (Work Instruction) खाली तयार करतो.
चहा बनविने फारच सोपे असे मला वाटत होते,
(मला काय माहित पाक होईल म्हणुन )

२ कप पाणी
६ चमचे साखर
२ चमचे चहा
उकळु दिला, उकळु दिला, उकळु दिला
एव्हढे झाल्यावर जाम थकलो होतो, मग भांड्यानेच दुध ओतले,
आणी मग चहा गाळायला घेतला तर एक धार कपामध्ये पडायची एक गॅस च्या ओट्यावर.
पहिले गॅसचा ओटा स्वच्छ केला आणी मग चहा ऑफर केला.
शेवटी चहा तयार झाला.
गोड गोटुक चहा सर्वानाच कडु झाला होता
असो, सर्वांचा चहा गोड होऊ दे
अमृततुल्य मधे बसून त्याच्या
अमृततुल्य मधे बसून त्याच्या पितळी खलबत्त्याचा आवाज ऐकत, घट्ट दुधाची उकळी आणि त्यावरची साय पहात, खरच अमृततुल्य चहाची चव आत हरवत चाललीये..
>>>>>>>>>>>
किरण्यके, एकदा ये गोरेगावात...... तुला "नवदुर्गा"चा चहा पाजतो..... अगदी तुला हवा आहे तसाच.
मनिमाऊ....स्स्सेम पिंच ! लोक
मनिमाऊ....स्स्सेम पिंच ! लोक चहा एन्जॉय कसे करू शकतात, हा मला पडलेला कायमचा प्रश्न आहे.
मला वासाने ,चहाचं भांडं धुताना, चहाचा चमचा कुणी माझ्या कॉफीत बुडवला की मळमळतं !
चहाशी रिलेटेड कुठल्याही गोष्टीने मला मळमळू शकतं.:(
अनेक लोकांनी अनेक प्रकारे प्रयत्न करूनही मला चहा पिण्याची कल्पनाच सहन होत नाही.
कॉलेजात असताना एका सखीने पाजला होता....नंतर माझी अवस्था बघून तिने डोक्याला हात लावला.
नंतर रेसिडेन्सी करताना कॉलच्या दिवशी रात्रभर जागरण झाल्यावर सकाळी सगळे कामा हॉस्पिटल समोरच्या रस्त्यावर डिवायडर वरून माकडासारख्या उड्या मारून समोरच्या हॉटेल च्या मागे लपलेल्या कळकट टपरीवर चहा प्यायला जायचो. सुरूवातीला खूप विरोध केला. नंतर पीअर प्रेशरला बळी पडून( :हाहा:) प्यायला सुरूवात केली. पण हातात अर्धं रवा बिस्कीट ठेवायचे....चहाची चव जावी म्हणून शेवटी खायला.
असं वाटलं, चला आता शिकलो आपण चहा प्यायला. पण कसचं काय ? रेसिडेन्सी संपल्यावर पुन्हा तेच....चहा दिसला की मळमळणं.
नवर्याचा चहा मी सोडवला.....त्याच्या मनावर पक्कं बिंबवलं की तू चहा घेतलास की तुला अॅसिडिटी होते.
हिप्नॉटिझम !
सर्व चहाबाजांची माफी मागते..... तुमच्या आनंदात, सॉरी चहात विरजण पडलं असेल तर.
लगे रहो !
एकदा आपला परममित्र गडबडीत
एकदा आपला परममित्र गडबडीत म्हणाला ....." बाईनं पुरुषाला अन कुंकवानं चहाला कधीही नाही म्हणु नये "
पंत>>>
काय मस्त धागा आहे! आमच्या
काय मस्त धागा आहे!
आमच्या घरातदेखील प्रत्येकाला वेगळाच चहा लागतो, विशेषतः सकाळचा पहिला चहा तर प्रत्येकजण स्वतःचा स्वतःच करणे पसंद करतात.
दुसर्यांसाठी करताना मी निम्मे पाणी, निम्मे दूध, जितके कप तितके चमचे चहा आणि साखर असे सगळे एकत्र करुन २-३ उकळ्या देतो.
दुधाचा, चहाचा ब्रँड यामुळेही फार फरक पडतो. मला आता टेट्रापॅकची सवय लागली आहे, त्यामुळे सोलापूरात गेल्यावर पिशवीतल्या दुधाच्या वासाची सवय पटकन होत नाही. चहातही सध्या नविन आलेले हर्बल टी छान आहेत.
मला मात्र बिनदुधाचा बिनसाखरेचा फ्लेवर्ड चहा प्रचंड आवडतो. 'मेनलँड चायना'मधे जेवणाबरोबर देतात तसा.
पाचगणीत पोलिस स्टेशनच्याजवळ एक छोटे पारशी हॉटेल आहे तिथे अप्रतिम चिकन सलामी आणि आईस्ड ब्लॅक टी मिळतो. पुणे विद्यापीठ कँटीनला मिळणारा बंपर चहा, स्वारगेट स्टँडचे चहा-बुर्जीपाव हेही बेस्टच.
कोल्लापूरकडे प्रचंड गोड चहा करतात, जणू साखरेच्या जागी काकवीच घातली आहे! कोल्लापूर रेडीओलादेखील चहाच्या लोकल ब्रँडच्या महान जाहिराती असतात. तिथे प्रत्येक गोष्टीत अभिमान, इतिहास आणि परंपरा, त्यामुळे चहाची अॅडदेखील - 'आमीबी आमच्या आबाच्या काळापासून मगदूम च्याच पितो' इ.इ. असते.
चहा! एखादं ललित पाडायला
चहा!
एखादं ललित पाडायला चांगला विषय आहे.
मी कधीही चहा पिऊ शकतो पण वर आगावू म्हणतायत तसं कोल्हापूरी नाही जमायचा. अन् अर्धाच कप.
भरपूर दुध, भरपूर चापावडर अन् कमी साखर असलेला चा हवा.
भुंगा, धाग्याचं नाव फक्त 'चहा' च ठेवा. मग अजून रंगत येईल.
ते कोसलात नाही का 'गुलाबी' चा चं वर्णन आहे, तसंच!
मुंबईत हल्ली फारशी 'पारशी' हॉटेल्स नाही राहीलीत. पण पारशी हॉटेंलातला चहा सोबत बनपाव हे आपलं आवडतं काँम्बो.
बाकी, 'चहा' नावाच्या असंख्य चवी जाग्या केल्याबद्दल आभार अन राग दोन्हीही!
आमच्याकडे आमच्या पिताश्रींचा
आमच्याकडे आमच्या पिताश्रींचा चहा म्हणजे जीव की प्राण! घरात चहाचे पिंपच का ठेवू नये, त्यापासून ते शंकराच्या पिंडीवर जशी अभिषेकपात्रातून जलाची धार पडते तसे आडवे पडल्यावरही वर ठेवलेल्या अभिषेकपात्रातून थेट तोंडात चहाची संततधार पडली पाहिजे अशी स्वप्नरंजने करणारे पिताश्री. शेवटच्या क्षणी गंगा वगैरे काही नक्को, घोटभर चहा तेवढा घशात घाला असं सांगणारे!!
आमच्याकडे त्यामुळे चहाचे नाव जरी काढले तरी पिताश्रींना शीघ्रकाव्ये स्फुरायला लागतात!
आजीच्या पध्दतीने चहा :
दोन कप पाणी, कपभर दूध, चार ते पाच चमचे साखर, दोन चमचे चहाची भुकटी. चवीला किसलेले आले/ वेलदोडे इत्यादी असल्यास उत्तम.
एकीकडे चहासाठी पाणी व दुसरीकडे दूध उकळत ठेवायचे. पाण्याला उकळी फुटली की त्यात साखर घालून ती विरघळवणे. त्यानंतर पाणी व्यवस्थित उकळू लागले की त्यात चहापूड घालून लगेच गॅस बंद करणे व पातेल्यावर झाकण ठेवणे. दोन मिनिटांत चहा मुरेस्तोवर कप, बश्या, गाळणे, चिमटा इत्यादी सामग्रीची जमवाजमव करणे. तोवर दूधही वर येते. दुधाखालचा गॅस बंद करणे. आता चहाच्या पातेल्यावरचे झाकण काढून मुरलेला चहा गाळण्याने गाळून प्रत्येक कपात तीन चतुर्थांश ( साधारणपणे) भरणे. कपाचा उरलेला एक चतुर्थांश भाग गरम दुधाने भरणे. तयार झालेला गरमागरम चहा बशीत ओतून भुरक्या मारत पिणे.
आहाहा चहा.. चहा कसा
आहाहा चहा..
चहा कसा करायचा?
गवती चहाची पाने टाकून मस्त उकळवायचा आणि कोरा चहा, कोरा कागद आणि नवा कोरे करकरीत पावसाचे थेंब... अस्सा चहा प्यावा. थंडीच्या मौसमात मस्त ठेचून ठेचून आल्या मसाल्याचा चहा तो हि तिकडे आसाम, सिक्कीमच्या ट्रिपवर असताना हिरवाईच्या रंगात दुर दुर नजरा फिरवत प्यावा. उन्हाळ्यात मस्त आईस टि, शांत निरव तळ्यात छोटीशी डुबकी आणि अंगाची लाही लाही करणार्या उकाड्याला खिजवत खिजवत प्यावा. कांदापोह्याच्या कार्यक्रमाला चार वेळा टेस्टून थरथरणार्या ट्रेला सावरत येताना ती आणि उगाच नजरा झुकवून कटाकक्षाने तीच्याकडे पाहत प्यावा. तेव्हा मात्र नेमकं गोड होतं ते निरोपानंतरच ओळखावं. लांबच्या प्रवासातुन आलेल्या पाहुण्यांना गुळाचा चहाच द्यावा. गावाकडची पहाट, खुरवड्यात पिल्लांचा चिवचिवाट, पाखरांची किलबिल आणि पितळीत अळंग-मळंग करत सायीला ठेवतो तरंगत असा चहा फुरक्या मारून प्यावा. पितळीबाहेरून ढोपरापर्यंत ओघळलेल्या चहाचे डाग धुवायला मात्र मस्त चारी नायतर पाट शोधावा. असा चहा अनुभवणं आता तरी शक्य नाहीये.
आता आला बेड टी, शुगर फ्री टी, स्पुन आणि ढवळू ढवळू चहा आणि तो पिताना उगाचच चांगुलपणाचे हावभाव द्या.
आजही झिपर्या झाकिर साहेबांच्या तबल्याची थाप आणि ताज चहा आणि हैद्राबाद मधे एका छोट्याश्या 'दरबार'टपरीत प्यायलेला बादशाही चहा आणि त्याची लज्जत काही औरच.
भुंगेश , आम्ही चा आणि साखरेचा
भुंगेश ,
आम्ही चा आणि साखरेचा बोकणा मारतो , वरुन एक लिटर पाणी आणि म्हशीच दुध पितो , अर्धा तास गडाबडा लोळतो आणि मग गॅसवर जाऊन बसतो , एकदम जालीम चहा बनतो. कोणाला हवी असल्यास विनामुल्य पाककृती शिकवण्यात येईल.
आगाऊ, 'मेनलँड चायना'मधे
आगाऊ, 'मेनलँड चायना'मधे जेवणाबरोबर देतात तसा. >>>> प्रचंड अनुमोदन. मेनलँड चायनाचा जास्मिन टी लै भारी अस्तो.
ट्यागो >>>> तो बनपाव नाही त्याला ब्रून म्हणतात. कडक पाठीचा छोट्या कासवासारखा दिसणारा. ब्रून्-मस्का (म्हणजे आपलं अमूल हो) आणि गरम चहा = स्वर्ग. वरळीनाक्यावरच्या सिटीबेकरीत काय सही ब्रून मिळतो.
मामी धन्स ओ. अवं लानपणी
मामी धन्स ओ.
अवं लानपणी पाववाल्याकडून घेतलेली 'बटरं' अन् 'बनपाव' इत्कं लक्षातै की मी सगळ्या पार्शी हाटेलात बनपावचं आर्डर करतो. पण यापुडं 'ब्रून' 'ब्रून' 'ब्रून' चं म्हणणार!
ट्यागो, ल्हानपणी गावाकडे ते
ट्यागो, ल्हानपणी गावाकडे ते पत्र्याच्या डब्यातून बटर विकणारे यायचे त्याची आठवण झाली. तेंव्हा 'च्या-आयला बटर बापाला' अशी एक प्रेमगालीदेखील प्रचलीत होती
Pages