चहा....... म्हणजे पृथ्वीवरचं अमृतच म्हणतात. तसं बघितलं तर अगदी सोम्यागोम्या कोणालाही अगदी बेसिक करता येण्यासारखी गोष्ट म्हणजे चहा.....
पण वर वर साधा दिसणारा हा चहा सुध्दा अतिशय वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. अगदी एकाच घरातली चार माणसे चार वेगळ्या पद्धतीने चहा करतात आणि चव बदलते. पाणी, चहा पावडर, साखर यांचं भिन्न घेतलं जाणारं प्रमाण...... पाण्याला किती वेळ उकळी दिली, उकळायच्या आधी साखर, पावडर एकत्र घातली की साखर घालून मग उकळल्यावर पावडर आणि मग पुन्हा एक उकळी. काही जण दुधातच साखर आणि चहापावडर घालून उकळवतात. असे एक ना अनेक प्रकार व्यक्तीगणिक बदलतात.
वरवर साधा वाटणारा हा चहा करता मात्र कित्येक प्रकारे करता येतो आणि प्रत्येक कृतीची चव निराळी लागते. याचमुळे कधीकधी अत्यंत रद्दड झालेला टमरेलभर चहा (टमरेल म्हणजे आकाराने मोठा कप ) कसाबसा घशाखाली ओतावा लागतो.
तर अश्या निरनिराळ्या पध्दतीतून तुम्ही नेमका चहा कसा करता ते इथे जरूर लिहा....
कृपया इथे स्टेपवाईज लिहा कृती. कारण दूध आधी घालतो की नंतर चहापावडर आणि साखर एकत्र घालतो का, किती उकळवतो अश्या छोट्या छोट्या गोष्टीवर चहाची चव बदलते.
तुमच्या घरात ४ माणसं आली आहेत आणि तुमच्यासकट आता ५ जणांचा चहा तुम्हाला करायचाय.....
कसा कराल?????? गुरू होजा ओ शुरू........
झाडाखाली असलेल्या कोणत्याही
झाडाखाली असलेल्या कोणत्याही ठिकाणचा चहा मला आवडतो.
मज्जा येतेय +१ करायला.
मज्जा येतेय +१ करायला.
उपयोग नाही अज्जीबात.
उपयोग नाही अज्जीबात. झाडाखालचा चहा कसा पिणार तुम्ही? समजा पिकल्यावर टप्पकन गळुन त्या चहात/ चहाच्या किंवा दुधाच्या भांड्यात पडलात तर चटका बसेल की.:फिदी:
मी एकदा असे वाचले होते १)
मी एकदा असे वाचले होते १) चहा उकलयानंतर त्यात थोडे मीठ टाकावे ....चव वाढते
२)चहा उकलयानंतर त्यात एक छोटा चमचा तूप टाकावे थोडा रिचनेस पणा येतो
मी काही वापरले नाही वाचले होते मला गवती चहा आणि आजकाल ग्रीन टी आवडतो ..........
हा चहाचा धागा आणि तो मामीचा
हा चहाचा धागा आणि तो मामीचा बिस्कीटांचा धागा एक करून चहा-बिस्कीटे पार्टी होऊन जाऊ द्या.
मी बरीच वर्षे रेड लेबल चहा
मी बरीच वर्षे रेड लेबल चहा वापरत होते. सासरी तोच घेत म्हणून. आता सोसायटी टी आणत आहे. नाजूक आणि फ्लेवरफुल आहे. रेड लेबल इतका कडक नाही. अगदी साधा चहा केला कपाला सव्वा चमचा साखर तरी मस्त होतो आहे.
हॅपीली अन मॅरिड नावाच्या साइट वर टी, कॉफी, शुगर असे लिहिलेले मस्त डबे मिळतात ते ऑन लाइन खरेदी केले आहेत व त्यात " आतातरी नावाप्रमाणेच वस्तू ठेव" अशी तंबी मिळाल्याने चहा साखर कॉफीच आहे. फेस बुक वर पण त्यांचे पान आहे. जरूर बघा साइट. छान घरगुती वस्तु आहेत.
मदर इन लॉ डाइस असे काहीतरी पण आहे खूप हसलो ते वाचून.
कॉफी पिणारे इथे कोण? नेस कॅफे क्लासिकची नव्या आकाराची बाटली आली आहे. छान आहे. चहा बिस्किट पार्टी कधी बरे?
मी एकदा असे वाचले होते १) चहा
मी एकदा असे वाचले होते १) चहा उकलयानंतर त्यात थोडे मीठ टाकावे ....चव वाढते
२)चहा उकलयानंतर त्यात एक छोटा चमचा तूप टाकावे थोडा रिचनेस पणा येतो
एकदा हळद, तिखट, गरम मसाला, धने-जिरे पूडदेखिल टाकून बघा आणि कसे लागते ते इथे येऊन लिहा
चहात तूप कशाला? तो बटर किंवा
चहात तूप कशाला? तो बटर किंवा खारी बुडवली गरम चहात की येतो तूपाचा थर खाली कपात. खूपच रिचनेस वाढतो.
बरं, चहात ब्रँडी मिसळली की चहा चढतो... एकदम एकलेय.
कोणी टाटा टीची १८६८ मालिकेतली
कोणी टाटा टीची १८६८ मालिकेतली उत्पादनं वापरली आहेत का?
मला हे फेसबुकवर दिसलं.
यातला सगळ्यांत स्वस्त चहा - मसाला चाय १०० ग्रामला ३५० रुपये फक्त वाटतोय. बाकीच्यांच्या किंमती आणि फ्लेवर्स तिथे जाऊन पहाच.
मला तिथल्या डेझर्ट चायबद्दल उत्सुकता आहे. नेमका तोच आउट ऑफ स्टॉक आहे.
इथे आलंय का माहीत नाही, पण आज
इथे आलंय का माहीत नाही, पण आज try केलेली पद्धत
रिकामे पातेले गॅस वर, मंद आच त्यात साखर घातली, कडे कडेची जळायला आणि बाकीची विरघळायला म्हणजे कॅरेमलाईझ व्हायला लागली की त्यात एक चमचा दूध.. तेही ब्राऊन झालं की अजून एक चमचा.. असं साधारण पाव कप दूध चहाच्या रंगाचं दिसेपर्यंत उकळू द्यायचं, मग त्यात जेवढा चहा करायचा तेवढं दूध. लगोलग चहा पावडर.. उकळी येऊ द्या, जेवढं दाट पाहिजे तेवढं होऊ द्या..
टीप फक्त एकच, साखर जळताना दूध चमचा चमचा घालायचं, भसकन ओतलं तर साखरेचा गोळा होतो, तो टाळायचा आहे.
खूप सुंदर चहा बनतो
मी फेसबुकवर याची रील पाहिली.
मी फेसबुकवर याची रील पाहिली. अर्धी साखर कॅरॅमलाइज करून पाणी. ते उकळलं की तुम्हांला हवे ते मसाले (आलं इ.) , उरलेली साखर, चहापत्ती. ते चांगलं उकळल्यावर दूध. मग मध्ये मध्ये डावाने फेटत चहा चांगला उकळू द्यायचा.
सक्काळी हे करायला लागणारे उत्साह आणि वेळ दोन्ही नसतात. त्यामुळे अजून करून पाहिलं नाही.
(संध्याकाळी कॉफी)
टाटा चा शेअर असलेला टीबॉक्स
टाटा चा शेअर असलेला टीबॉक्स ब्रँड चे सॅम्पलर चे पाकीट घेतले.कलकत्ता मसाला, पंजाब मसाला, जयपूर, वायनाड, आसाम, आयुर्वेदिक असे बरेच चा सॅम्पल आहेत.पण 4 सॅम्पल पाकिटं संपल्यावर कंटाळा आला.प्रत्येकात ओव्हरपॉवरिंग वेलची फ्लेवर आहे.आणि मला चहात वेलची इतकी आवडत नाही की 5 फ्लेवर जवळजवळ सारखे दिसणारे प्यावे.
ज्यांना वेलची चहा प्रचंड आवडतो त्यांनी सॅम्पलर घ्यायला हरकत नाही.
मी उरलेली पाकिटं रिझर्व्ह ला ठेवून परत आवडत्या वाघ बकरी वर आले आहे.
>> साखर घातली, कडे कडेची
>> साखर घातली, कडे कडेची जळायला आणि बाकीची विरघळायला
साखर जळून भांड्यास चिकटून बसत नाही का याने?
आता हा धागा ‘सोपे कॅरामल
आता हा धागा ‘सोपे कॅरामल पुडींग’ च्या मार्गाने जाइल.
हो, मी आधी भरत यांनी लिहिलंय
हो, मी आधी भरत यांनी लिहिलंय तसे प्रयोग केले तेव्हा 2 वेळा भांड्याला साखर चिकटणे, गोळा होणे, भांडे काळे होणे, तसेच पाचकळ चहा होणे हे प्रकार झाले होते.. (अर्थात यात क्रियेला दोष नाही, असलाच तर तो वेळ प्रमाण जुळून न येण्याचा आहे) पण जिद्द सोडली नाही आणि हा एक उपाय करून बघितला, चमचा चमचा दूध जेणेकरून साखर जाळली तरी कडू होत नाही आणि चिकटत देखील नाही.. अर्थात आजचा हा पहिला यशस्वी प्रयोग उद्या आणि परवा यशस्वी ठरला तर खरे
पाणी नाही घालायचं?
पाणी नाही घालायचं?
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/v/HXnZYdheNgEiEz5i/?mibextid=oFDknk
साखरेचं कॅरॅमल करून चहा
ओके. गोड आवडत नाही, पण एकदा
ओके. गोड आवडत नाही, पण एकदा कसा होतो बघायला करुन बघेन.
+१
+१
अनु दे टाळी , मी पण वाघ बकरी
अनु दे टाळी , मी पण वाघ बकरी वाली . आधी सोसायटी वापरायची .
आणि दूध म्हशीचे .
मला तर पाव कप पाणी उकळत ठेवून त्यात २ चमचे साखर आणि एक छोटा सपाट चमचा चहाची पावडर घालून ते मिश्रण चांगले उकळले कि त्यात पाऊण कप दूध . .. मग तो हि मस्त उकळून दाटसर झाला कि तो चहा माझ्या आवडीचा
मी पण वाघ बकरी वाली>>> मी पण
मी पण वाघ बकरी वाली>>> मी पण
एकदा घेतली होती वाघबकरी.
एकदा घेतली होती वाघबकरी..आवडली नाही.. सोसायटी आधी आवडायची आता नाही आवडत..आता 3रोझेस किंवा ताजमहल.
मला कडक चहा लागतो.वाघ बकरी
मला कडक चहा लागतो.वाघ बकरी बरा वाटला.रेड लेबल पण आवडतो.पण तो आधीपासूनच हर्ब घातलेला नॅचरल्स आवडत नाही.प्लेन वाला आवडतो.
Red label masala tea व
Red label masala tea व Instant tea हे दोन्ही मला आवडतात.
आधी पाणी भरपूर उकळून मग त्यात पावडर टाकून पुन्हा थोडा वेळ उकळत ठेऊन मग नंतर साखर+दूध हा माझा "कडक चहा" बनवण्याचा फॉर्म्युला. याऐवजी, आधीच जर दूध+साखर टाकली व ते रेणू पाण्याच्या रेणूंच्यामध्ये जाऊन बसले व सॅच्युरेशन झाले की मग चहापुडीच्या रेणूंना त्यात जागाच उरत नाही. म्हणून तसा चहा कडक होत नाही/होऊ शकत नाही अशी माझी विज्ञानावर आधारीत चहा थियरी आहे. (फुल्लप्रूफ नसेल कदाचित. आव्हान दिले जाऊ शकते
)
तरीही या धाग्यावर कुमार सरांनी लिहिलेला प्रतिसाद सध्या विचाराधीन आहे. याशिवाय वरती दिलेला कॅरामल चहा सुद्धा करून पहायचा आहे.
तुम्ही चहा कसा करता?
तुम्ही चहा कसा करता?
आम्ही आमचा जन्म ज्या महिन्यात झाला त्यानुसार चहा बनवतो..
https://youtube.com/shorts/ho-nJWwT4_o?si=3JXwLH1kBkPVNCD4
>>टाटा चा शेअर असलेला टीबॉक्स
>>टाटा चा शेअर असलेला टीबॉक्स ब्रँड चे सॅम्पलर चे पाकीट घेतले.
अनु, हे दुकांनामध्ये (बिग बझार इ.) मिळते की अॅमेझॉन इंडीयावर घ्यावे लागेल? मला आवडतो वेलचीयुक्त चहा
हीच कंपनी ना? https://www.teabox.com/
यंदाच्या भारतभेटीत मला मसाला चहा घ्यायचाच आहे.
चहाचा फार शौकीन नाही परंतु
चहाचा फार शौकीन नाही परंतु मला "वाघ-बकरी" ह्या चहाच्या नावाचे खूप आश्चर्य वाटते. ह्या ब्रँडचे नाव असे का ठेवले असेल? गत वर्षी त्यांच्या मालकांचा भटक्या कुत्र्यांमुळे दुर्दैवी मृत्यू झाला.
मागे एक WA फॉरवर्ड आले होते की एकदा नवरा बायकोला एकत्रपणे चहा घेताना बघितल्यावर त्यांना हे नाव सुचले (म्हणे).
ख खो वाब जा.
हो टीबॉक्स वेब साईट.
हो टीबॉक्स वेब साईट.
ज्यांना वेलची फ्लेवर आवडत असेल त्यांनी घ्यावे सॅम्पलर.नाहीतर त्यांचा एखादा स्पेसिफिक चा घटक वाचून घेतला तरी चालेल.
ऑफिसमध्ये रेडी मिक्स वापरतो.
ऑफिसमध्ये रेडी मिक्स वापरतो. आधी सोसायटी वापरत होतो. पण आता Desire (www.desireinstantchai.com) चा मसाला चहा वापरतोय , झाले चार महिने. प्रचंड आवडला आहे.
थँक्स अनु.
थँक्स अनु.
भ्रमर, हा चहापण लक्षात ठेवते. धन्यवाद.
चहा परत आणायची वेळ झालेलीच
चहा परत आणायची वेळ झालेलीच आहे. भ्रमर, तुम्ही लि।इलेला, डिझायर मिळतो का बघते.
चिडचिड:
चिडचिड:
टिबॉक्स च्या 10 चाय सॅम्पल मध्ये 8फ्लेवर वेलची वाले आहेत.जे 2 वेलची वाले नाहीयेत त्यातल्या एकांत चॉकलेट पावडर आहे(चहात चॉकलेट पावडर.उद्या बटाटेवडे द्या गुलाबजाम पाक मध्ये बुडवून.)
त्यांच्या फेसबुक पानावर पण लिहिलं की 10 मधले 8 फ्लेवर वेलची वाले असतील तर 'व्हेरिएशन' म्हणूच नका.वेलची हा इतका तीव्र फ्लेवर आहे की तो व्हेरीएशन मधले बाकी सर्व फरक मारून टाकतोय. त्यावर त्यांचे उत्तर आले नाही, 'वाह वाह, तुमच्या चहा ने ऍसिडिटी होत नाही' अश्या कमेंट असलेला नवा धागा आला.
चहात वेलची अजिबात न आवडणाऱ्या माणसाने 6 वेलची फ्लेवर संपवले.आता 2 मोअर टू गो.(घटक पूर्ण 10 चे वाचले नव्हते, 2-3 चहाचे झूम करून वाचले होते)
ही चिडचिड वेलची चहा पित करते आहे हे वेगळे सांगणे न लगे.(यावरून उगीच कोणत्या तरी अलंकाराचे व्याकरण उदाहरण 'औषध नलगे आणि नल गे मजला' आठवले.)
Chocolate चहा छान लागतो
Chocolate चहा छान लागतो
उटी ला प्यायला तेव्हा आवडला होता.
बाकी तुमची चिडचिड पोचली.
Take a chill pill
(Ref : k3g)
मला तुम्ही नाही म्हटलं तरी
मला तुम्ही नाही म्हटलं तरी चालेल.
किल्ली तू त्यांना नाही म्हण
किल्ली तू त्यांना नाही म्हण

Chocolate चहा छान लागतो >>
Chocolate चहा छान लागतो >> लम्सा टी चा फ्लेवर पण चॉकलेट कडे झुकणारा आहे , मला पण आवडतो .
उरला सुरला बोर्नव्हिटा वगैरे असेल तर तो हि एक चमचा घालून चहा केला तर मस्त होतो .
हा हा, भयंकर जोक मला या
हा हा, भयंकर जोक
मला या प्रकारचे सर्व जोक आठवले.
(हिंदी बोलून दाखव.त्यात काय आहे? हे बघ बोललो.'हिंदी')
एकदाच हेझलनट कॅरॅमल चोकलेट
एकदाच हेझलनट कॅरॅमल चोकलेट फ्लेवर चहा घेतला होता. एकदम सही वाटला.. पण तसा कुठेही मिळाला नाही विकत घ्यायला गेले तेंव्हा.
एरवी फक्त लेमनग्रास्/गवती चहा फ्लेवर & आले घातलेलाच चहा आवडतो.
चहात चॉकलेट पावडर.उद्या
चहात चॉकलेट पावडर.उद्या बटाटेवडे द्या गुलाबजाम पाक मध्ये बुडवून >>>
भापो! मी पण इमॅजिन नाही करू शकत आहे. चॉकलेट घातलेली कॉफी मात्र आवडलेली आहे. यावेळी देशातून येताना घेऊन आलेय.
फक्त लेमनग्रास्/गवती फ्लेवर & आले घातलेलाच चहा आवडतो >>> किती किती +१ देऊ?
अतुल पीजे तरी हसले
अतुल
पीजे तरी हसले
किती किती +१ देऊ>>> rmd देशात आलो की गवती चहा & खेकडा भज्जी २ प्लेट मागऊन खाउया
मलापण, लेमनग्रास, थोडं आलं,
मलापण, लेमनग्रास, थोडं आलं, तुळस. मस्त लागतो.थंडी असेल तर थोडा लवंग पण.
rmd देशात आलो की गवती चहा &
rmd देशात आलो की गवती चहा & खेकडा भज्जी २ प्लेट मागऊन खाउया >>> नक्की नक्की!
नाहीतर तुम्ही दोघी इकडे या, मी करते असा फर्मास चहा आणि भजी
इकडे म्हंजे अमेरिकेत???
इकडे म्हंजे अमेरिकेत???(शंकऱ्या: वर म्हंजे आकाशापरेंत???)
अर्थात अमेरिकेत. पुण्यात
अनु माबोकराना चहा पिण्याचे
अनु माबोकराना चहा पिण्याचे आमंत्रण द्या आणि संपवा वेलची फ्लेवर

पुण्यातला चहा भज्जीच परवडेल
पुण्यातला चहा भज्जीच परवडेल मग
शंकऱ्या: वर म्हंजे आकाशापरेंत?>>> आई गं
यावे यावे.
यावे यावे.
नाहीतर तुम्ही दोघी इकडे या,
नाहीतर तुम्ही दोघी इकडे या, मी करते असा फर्मास चहा आणि भजी Happy >>> मुंबई ते नागपुर प्रवास खर्च विचारात घेता मुंबईतच संत्री स्वस्त पडतील.
उटी / कुन्नूर चा होमवूड चहा
उटी / कुन्नूर चा होमवूड चहा पण मस्त आहे.
उटी का कूर्ग चा चॉकलेट चहा
उटी का कूर्ग चा चॉकलेट चहा मस्त होता. बऱ्याच वर्षा आधी आणला होता तिथून.
या चहाला दूध कमी लागतं असा जावईशोध पण आईने त्या वेळी लावला होता.
नक्की कुठे जायचं ते ठरलं का? चहाची वेळ निघून गेली
Pages