चूक..

Submitted by मी मुक्ता.. on 27 February, 2011 - 05:32

आभाळात चंद्र,
क्षितिजावर लाली,
फुलांच्यात गुलाब
आणि ॠतुंमध्ये वसंत
खरच इतका महत्वाचा असतो का..
की त्यांच्याशिवाय बाकी सगळंच बिनमहत्वाचं ठरावं?
तशी जगत होतेच की मी माझी पोकळी घेवुन..
मग कोणत्या एका क्षणी हसता हसता डोळे भरुन आले..
सुर्यास्त पहाताना माझ्या नजरेतल्या भावनांचं प्रतिबिंब
तुझ्या नजरेत मला दिसलं..
आणि तुझ्या माझ्याही नकळत त्या मनातल्या पोकळीचे दरवाजे
उघडले मी तुझ्यासाठी...
तुला डोकावू दिलं माझ्या खोल आत..
आणि तसंच सामावुनही घेतलं त्यात..
खरं सांगु का,
तू येण्याआधी ती पोकळी इतकी भयानक खरंच नव्हती..
उलट तीच मला सोबत करत होती..
तिच्या भरुन रिकामं होण्याने,
ते रिकामपण जास्तच जाणवायला लागलय..
आता मुद्दाम पहावं लागतं,
स्वतःला जाणिव करुन द्यावी लागते की,
चंद्राशिवाय पण आभाळ आहे..
क्षितिजावर अजुनही रंग आहेत..
इतरही फुलं आहेत..
इतरही ऋतू आहेत..
पण आधीच्या स्वाभाविक गोष्टी
आता समजूत घातल्यासारख्या वाटतात..
मला या पोकळीची जाणीव झाली
यात काही चूक झाली का...
तुला माझ्यात डोकावू देणं
ही चूक होती..
खरंच चूक होती?

गुलमोहर: 

मुक्ता,
मनाला शिवून गेली रचना. विरहाचं दु:ख बरोबर आणी बेमालूम रेखटलय. पोकळी हेच सर्व दु:खाचं मूळ आहे. दुसरं भयानक सत्य असं की.पोकळी असणं हेच माणसाला प्राण्यां पासून वेगळं अस्तित्व देतं. एकंदरीत रचना मस्त जमलीय. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.

छान!
(फक्त कवितेत कंसात प्रश्नचिन्ह टाकण्याचं प्रयोजन काय यावर विचार करत होतो, म्हणून प्रतिक्रीया दिली नव्हती.. अजूनही ते कळलेलं नाहीये मला)

भुंगा, निशिकांतजी,
खूप खूप आभार.. Happy

आनंदयात्री ,
कंसात प्रश्नचिन्ह यासाठी की प्रश्नचिन्हासह आणि त्याच्याशिवाय असे दोन अर्थ अभिप्रेत आहेत मला.. म्हणजे चूक केली हे साधं वाक्य.. आणि खरंच चूक केली का? हा प्रश्न...

"तिच्या भरुन रिकामं होण्याने,
ते रिकामपण जास्तच जाणवायला लागलय.."

.... छान

मुक्ता, बरेचदा गद्यलेखनात कंसात प्रश्नचिन्ह टाकले जाते. आणि mostly त्याचा अर्थ जो तू दिला आहेस तसाच - आधीच्या वाक्यात/शब्दात व्यक्त झालेल्या भावनेवर प्रश्नचिन्ह - असतो. त्यापेक्षा वेगळ्या अर्थासाठी कंसात प्रश्नचिन्ह अजूनतरी वाचनात आलेले नाही. पण लेखनाचा form जर कविता असेल तर कंसात प्रश्नचिन्ह कशाला? अर्थ लागण्या/न लागण्याचा प्रश्न नाही, चूक केली असं वाटत असेल, तर तसं म्हणावं, आणि खरंच चूक केली का असं वाटत असेल तर थेट प्रश्नचिन्ह टाकावं... आणि नक्की होत नसेल, तर दोनदा म्हणावं, एकदा साधं, आणि एकदा प्रश्नचिन्हासकट... Happy
असो.

मुक्ता,
हा भाव तू फारच छान मांडतेस.. अगदी खोलवर लागते कविता...

तू येण्याआधी ती पोकळी इतकी भयानक खरंच नव्हती..
उलट तीच मला सोबत करत होती..
तिच्या भरुन रिकामं होण्याने,
ते रिकामपण जास्तच जाणवायला लागलय..

हे फारच आवडलं...

मुक्ता,
कविता आवडली !
खरच इतका महत्वाचा असतो का..
की त्यांच्याशिवाय बाकी सगळंच बिनमहत्वाचं ठरावं?

अस कधि कधि वाटतं पण !
Happy

चांगली रचना आहे, आवडली... Happy
>>>
तुला माझ्यात डोकावू देणं
ही चूक होती..
खरंच चूक होती?

>>>>
मला वाटतं, ती चूक असेलही, पण त्या चूकेनं काही आत्मभान आलं आहे ना? मग ती चूक पून्हा पून्हा करायला हरकत नाही !

Khup jabardast ahe kavita!!!!! far avadli.... aajach vachat hoto times of india madhe... Mhere there's pain there's love.... when the love arrow strucks deep,what we experience is a feeling of pain,but it is not pain,it's love.... pain is wht separates human beings frm animals.... pain and love are two sides of same coin...

Khup jabardast ahe kavita!!!!! far avadli.... aajach vachat hoto times of india madhe... Where there's pain there's love.... when the love arrow strucks deep,what we experience is a feeling of pain,but it is not pain,it's love.... pain is wht separates human beings frm animals.... pain and love are two sides of same coin... Happy