सन २०१२ मध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा अन पंचायत समित्यांच्या निवदणुका होत आहेत. वृत्तपत्रांतील बातम्यांवरुन अनेकांना याबद्दल कल्पना असेलच. आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील ७५ जि.प. गट अन १५० पं.स. गणांमध्ये मार्च २०१२ ला निवडणुका होणार आहेत. त्यासाठी पॅनेल उभा करण्याचा विचार आहे. या संबंधी ६ महिने अगोदर पासुन जिल्हा स्तरावर कार्यक्रम राबवायचा आहे.
खालील बाबींचा समावेश असेलः
१) निवडणुक लढवु इच्छिणार्या सुशिक्षित तरुणांची निवड करणे. (निवड प्रक्रिया कशी करावी? वृत्तपत्रांत जाहिरात देणे ई?)
२) त्यांना निवडणुक व्यवस्थापणाचे प्रशिक्षण देणे. (नवीन अभ्यासक्रम तयार करणे/ उपलब्ध प्रशिक्षण संस्थांची मदत घेणे.)
३) प्रत्यक्ष निवडुन आले तर, काय करावे लागेल ह्याची पुर्व कल्पना देणे.
सुशिक्षित, राजकीय वारसा नसलेले लोक राजकारणात येत नाहीत हा समज पुसुन, एक उदाहरण घालुन द्यायचे आहे.
प्रशासकीय, राजकीय आणि खाजगी संस्थांमधील व्यवस्थापनाचा अनुभव असणार्या मायबोलीकरांनी आपले विचार मांडावेत ही अपेक्षा. देश विदेशातील राजकीय व्यवस्थापनाची उदाहरणे दिल्यास उत्तम.
१३ तालुके, २२५ उमेदवार ह्यांची प्रचार यंत्रणा राबवणे हा ही एक मोठा प्रोजेक्ट असेल. त्या दृष्टीने मार्गदर्शन अपेक्षित आहे.
(मा. प्रशासकः हा धागा 'प्रतिमंत्रिमंडळा' मध्ये आहे, परंतु, राजकारण/ व्यवस्थापन अश्या सदरात हलवल्यास उतम. धन्यवाद)