.
दुःख सारे शांत व्हावे शल्य सारे मावळावे, हीच साधी भावना या सावळ्या रंगात आहे
तो विधाता गात होता गोड गाणे त्या क्षणाची, भाववेडी कल्पना या सावळ्या रंगात आहे
मोगऱ्याला का गुलाबाचा कधीही राग येतो, सावळा गोरा कशाला भेद जगती नित्य होतो
जे कुणी म्हणतात गोरे चांगले कसले अडाणी, राजहंसी वेदना या सावळ्या रंगात आहे
केस काळे लांब वेणी स्मीत गाली पांघरोनी वागणे साधे प्रभावी तू गुणांची खाण अवघी
पण तुझ्या या सावळ्या रंगात आहे खास जादू, काय जादू सांगना या सावळ्या रंगात आहे
पान गोरी छान गोरी ऐकुनी येते उदासी शोधते काही रसायन जे तनूला शुभ्र करती
सावळ्या रंगात गोडी सांगते कोणी तिला ना, का अशी अवहेलना या सावळ्या रंगात आहे
सावळे असणे स्वयंभू शुभ्र नसणे सावळे ना माणसाला लाभलेला दागिना हा जन्मताना
सावळ्या रंगास लाभे तेज चंद्राचे उन्हाचे, मानभावी चेतना या सावळ्या रंगात आहे
(सावळ्या मुलीची गाणी / तुषार जोशी, नागपूर)
अप्रतिम कविता... गुणगुणतच
अप्रतिम कविता...
गुणगुणतच वाचली.
केस काळे लांब वेणी स्मीत गाली पांघरोनी वागणे साधे प्रभावी तू गुणांची खाण अवघी
या अशा ओळींची, शब्दांची रेलचेल वाचताना आनंद देतेय. त्या दॄष्टीनंही कविता सुंदर आहे आणि आशयाच्या बाबतीतही सधन आहे.
सावळे असणे स्वयंभू शुभ्र नसणे सावळे ना माणसाला लाभलेला दागिना हा जन्मताना
सावळ्या रंगास लाभे तेज चंद्राचे उन्हाचे, मानभावी चेतना या सावळ्या रंगात आहे
सावळ्या रंगावर इतकं सुंदर लिहील्याचं वाचनात आलं नव्हतं..
कविता वाचून समाधान मिळालं.
वा वा ... चांगली गझल
वा वा ... चांगली गझल तुषारराव..
फ़ार चांगला आशय..
आशय मस्त!!
आशय मस्त!!
सुंदर कविता.
सुंदर कविता.
छानच कविता...
छानच कविता...
सही! खूप आवडली.
सही! खूप आवडली.
वृत्त हाताळणी चांगली आहे.
वृत्त हाताळणी चांगली आहे.