(दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवला हे कळल्यावर मला सुचलेलं काही .....)
पुलंच्या उद्यानात फिरायला गेलो
तर भेटले तिथे दादोजी !
मी म्हणालो,
“दादोजी, अहो, काय झाले ?
हे काय तुमच्या नशिबी आले ?
अर्धी बाही वर करून
वर्षानुवर्षं पाहिले होते
पुस्तकात,
शिल्प म्हणून पाहिले होते
एकदाच ओझरते
लाल महालात,
आणखी कोठे कोठे
तुमची चित्रेच होती पाहिली ..
अहो, त्या काळी तुमच्या,
तुमचे फोटो कुठे होते ?
एक पुतळा उभा केला
त्याला म्हटले दादोजी
पण कल्पनेतले
दादोजी अगदी
तुमच्यासारखेच होते !
अलिकडे, माणसे बोलू लागली,
वाद-विवाद चर्चांमधे
तुम्हाला ओढू लागली,
खरं सांगतो दादोजी,
तुम्हाला होती एक
ब्राह्मण जात
ती तेव्हा आम्हाला कळली ...
आमच्यासाठी तुम्ही
शूर मर्द मराठी मावळा !
महाराजांच्या स्वराज्यातला
नव्हेत डोमकावळा !
तुमचा वेष लढवय्याचा,
ढाल-तलवारीचा ..
बाजीप्रभूंसारखी
तुमची शेंडी नव्हती दिसत,
किंवा त्यात नव्हते जानवे
गागाभट्टाच्या चित्रासारखे,
पुढेपुढे मिरवत !
आमची होती बडबड गाणी
खोट्या घोड्यांवरची ..
शहाजीचा शिवाजी,
शिवाजीचा संभाजी ...
मधेच अचानक
या सगळ्यात
कुठून उपटलात दादोजी ?”
सुस्कार्याने हसत हलके
दादोजी मग म्हणाले ..
“आम्ही कुठले मधे यायला ?
आम्ही आमचे काम केले.
आमचे आमचे जीवन होते
कर्तव्याने निभावून नेले ..
आमच्यानंतर कोणी कोणी
कुठे कुठे काय लिहिले
कुठे कोणी काय भकले,
मार्ग काय कळायला ?
आम्ही कोणीच ओलांडली
नव्हती आमची रेखा !
नव्हत्या आम्हाला अडवत
आमच्या जानव्याच्याही रेघा !
शेंडीपेक्षा आमचा जोर
मनगटातच जास्त होता
खांदा आमचा कोणाच्याही
खांद्यापासून हटत नव्हता ..
अरे, जातीपाती पाहून शत्रू
आम्हाला मते थोडीच देणार होता ?
दादोजीला माहित नाही
पुढे कोण काय म्हणते,
इतकेच होते मह्त्वाचे
महाराज समोर घडत होते
डोळ्यांमधे माऊलीच्या
स्वराज्याचे स्वप्न होते !”
मी म्हटले,“दादोजी,
आता इथेच का मुक्काम ?
कसा आणि किती दिवस ..?”
तर मधेच अडवत दादोजी
पाठ फिरवून चालू लागले,
पुतळा म्हणून ते थिजता-थिजता
शब्द माझ्या कानी आले,
“रामराज्याचा आदर्श बेटा,
ध्यानात कायम असू दे,
धोब्यासाठी राणीसुद्धा
रानावनात हिंडते,
आम्ही साधे नोकरदार
आमची काय कथा ?
नको पुरवू पाठपुरावा
वेळ घालवू वृथा !
आमच्यासाठी नको
करायला कोणीच मिरासदारी !
नको कुठलीच दादागिरी ..
अरे, बिन-संकल्पी भंपक राजे
खूप माजले राज्यात,
अश्या महालात
राहणे नको
उद्यानाची सावली बरी !
लोकापवादाच्या
नजरांपेक्षा
दुपारीची
उन्हे बरी,
डोमकावळ्यांच्या
थुंकीपेक्षा
चिमण्या-कावळ्यांची
विष्टा बरी !”
प्रदीप वैद्य
>>> माझ्या मते पुणे
>>> माझ्या मते पुणे महानगरपालिका यांना जितकी घाई करता येईल तितकी घाई करून हा पुतळा हलवण्याचे श्रेय सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस च्या पारड्यात घालायचे होते असे दिसते.
दादोजींचा पुतळा हलवावा असा ठराव पुणे महानगरपालिकेच्या कॉन्ग्रेस-राष्ट्रवादी कॉन्ग्रेसच्या नगरसेवकांनी मंजूर केल्यावर पांडुरंग बलकवडे यांनी शुक्रवार २४ डिसेंबर रोजी न्यायालयात याविरूध्द दावा दाखल करून पुतळा न हलविण्याचा महानगरपालिकेला न्यायालयीन आदेश द्यावा अशी न्यायालयाला विनंती केली होती. यावर न्यायाधीशांनी सोमवार २७ डिसेंबर हा सुनावणीचा पहिला दिवस निश्चित केला होता. सोमवारी पुतळा हलविण्यावर न्यायालय स्थगिती देईल व नंतर दाव्यात आपल्याला पुतळा हलविण्याची कोणतीही ऐतिहासिक वा इतर समर्थनीय कारणे देता येणार नाहीत, हे ओळखून कॉन्ग्रेस-राष्ट्रवादी कॉन्ग्रेसच्या नगरसेवकांनी घाईघाईत सोमवारी पहाटे २ वाजताच पुतळा उखडून काढला. त्यानंतर सुनावणीच्या पुढील दोन सत्रांमध्ये आपल्याला पुतळा हलविण्याची कारणे देण्यासाठी थोडा वेळ हवा आहे असे न्यायालयाला सांगून न्यायालयाकडून वेळ मागून घेतली. काल सुनावणीच्या तिसर्या दिवशी पुतळा हलविण्याची कारणे न देता, "हा दावा दिवाणी न्यायालयाला चालविण्याचा अधिकार नाही, आम्हाला आधी पूर्वसूचना दिली नाही" अशी तांत्रिक कारणे पुढे पुतळा हलविण्याची कारणे देण्याचे टाळले जात आहे.
मुळात हा पुतळा निव्वळ ब्राह्मणद्वेषातून व संभाजी ब्रिगेड या गुंडांच्या टोळीला घाबरून हटविण्यात आला आहे. पुतळा हलविण्यासाठी यांच्याकडे कोणतेही सबळ पुरावे नाहीत. पुरावे असते तर ते न्यायालयासमोर मांडण्याची टाळाटाळ का?
लिंबूटिंबू, माझ्या वैयक्तिक
लिंबूटिंबू,
माझ्या वैयक्तिक मतावरचा तुमचा प्रतिसाद अत्यंत असभ्य वाटला व त्याचा खरेच संताप आला म्हणून वरचा प्रतिसाद दिला अन्यथा कोण तुम्ही आणि कोण मी?(एकमेकांसाठी)
ही धमकी मानायची का?>>> तुम्हाला जसे आवडेल तसे
राजे, काल मी तुम्हाला औरंगजेब
राजे,
काल मी तुम्हाला औरंगजेब व अफझलखान संदर्भात तुमच्या व संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेबद्दल काही प्रश्न विचारले होते. तुमच्या उत्तराची वाट पहात आहे.
हा धागा आता प्रतिसादासाठी बंद
हा धागा आता प्रतिसादासाठी बंद करण्यात येत आहे.
Pages