दादोजी भेटले उद्यानात ..

Submitted by vaiddya on 30 December, 2010 - 11:29

(दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवला हे कळल्यावर मला सुचलेलं काही .....)

पुलंच्या उद्यानात फिरायला गेलो
तर भेटले तिथे दादोजी !
मी म्हणालो,
“दादोजी, अहो, काय झाले ?
हे काय तुमच्या नशिबी आले ?

अर्धी बाही वर करून
वर्षानुवर्षं पाहिले होते
पुस्तकात,
शिल्प म्हणून पाहिले होते
एकदाच ओझरते
लाल महालात,
आणखी कोठे कोठे
तुमची चित्रेच होती पाहिली ..
अहो, त्या काळी तुमच्या,
तुमचे फोटो कुठे होते ?
एक पुतळा उभा केला
त्याला म्हटले दादोजी
पण कल्पनेतले
दादोजी अगदी
तुमच्यासारखेच होते !

अलिकडे, माणसे बोलू लागली,
वाद-विवाद चर्चांमधे
तुम्हाला ओढू लागली,
खरं सांगतो दादोजी,
तुम्हाला होती एक
ब्राह्मण जात
ती तेव्हा आम्हाला कळली ...

आमच्यासाठी तुम्ही
शूर मर्द मराठी मावळा !
महाराजांच्या स्वराज्यातला
नव्हेत डोमकावळा !

तुमचा वेष लढवय्याचा,
ढाल-तलवारीचा ..
बाजीप्रभूंसारखी
तुमची शेंडी नव्हती दिसत,
किंवा त्यात नव्हते जानवे
गागाभट्टाच्या चित्रासारखे,
पुढेपुढे मिरवत !

आमची होती बडबड गाणी
खोट्या घोड्यांवरची ..
शहाजीचा शिवाजी,
शिवाजीचा संभाजी ...

मधेच अचानक
या सगळ्यात
कुठून उपटलात दादोजी ?”
सुस्कार्‍याने हसत हलके
दादोजी मग म्हणाले ..
“आम्ही कुठले मधे यायला ?
आम्ही आमचे काम केले.
आमचे आमचे जीवन होते
कर्तव्याने निभावून नेले ..

आमच्यानंतर कोणी कोणी
कुठे कुठे काय लिहिले
कुठे कोणी काय भकले,
मार्ग काय कळायला ?

आम्ही कोणीच ओलांडली
नव्हती आमची रेखा !
नव्हत्या आम्हाला अडवत
आमच्या जानव्याच्याही रेघा !

शेंडीपेक्षा आमचा जोर
मनगटातच जास्त होता
खांदा आमचा कोणाच्याही
खांद्यापासून हटत नव्हता ..

अरे, जातीपाती पाहून शत्रू
आम्हाला मते थोडीच देणार होता ?

दादोजीला माहित नाही
पुढे कोण काय म्हणते,
इतकेच होते मह्त्वाचे
महाराज समोर घडत होते
डोळ्यांमधे माऊलीच्या
स्वराज्याचे स्वप्न होते !”

मी म्हटले,“दादोजी,
आता इथेच का मुक्काम ?
कसा आणि किती दिवस ..?”

तर मधेच अडवत दादोजी
पाठ फिरवून चालू लागले,
पुतळा म्हणून ते थिजता-थिजता
शब्द माझ्या कानी आले,

“रामराज्याचा आदर्श बेटा,
ध्यानात कायम असू दे,
धोब्यासाठी राणीसुद्धा
रानावनात हिंडते,

आम्ही साधे नोकरदार
आमची काय कथा ?
नको पुरवू पाठपुरावा
वेळ घालवू वृथा !

आमच्यासाठी नको
करायला कोणीच मिरासदारी !
नको कुठलीच दादागिरी ..

अरे, बिन-संकल्पी भंपक राजे
खूप माजले राज्यात,
अश्या महालात
राहणे नको
उद्यानाची सावली बरी !

लोकापवादाच्या
नजरांपेक्षा
दुपारीची
उन्हे बरी,
डोमकावळ्यांच्या
थुंकीपेक्षा
चिमण्या-कावळ्यांची
विष्टा बरी !”

प्रदीप वैद्य

गुलमोहर: 

छानच

अप्रतिम सादरीकरण. अगदी प्रत्येकाच्या मनातलेच विचार तुम्ही मांडलेत.

नाही नाही,
दादोजी हे ब्राह्मण होते म्हणुन त्यांची हाकलपट्टी झालेली नाहिये. त्यांची हाकलपट्टी करण्याचे मुख्य कारण होते ते चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर उभे करण्यात आले.

ते शहाजी राजांचे खाजगी नौकर होते.

आता खाजगी नौकरानी कर्तव्य बजावणे हा त्याचा धर्म होय. दादोजीनी जे केले ती त्यांची ड्युटी होती.

अशा प्रकारची ड्युटी केल्याने त्या बदल्यात त्याना आर्थीक मोबदला दिल्या जात होता. ईथेच सगळं संपायला पाहिजे. पगार घेतला व कामं केली की नौकराचा संबंध संपायला पाहिजे.

पण ब्राह्मण इतिहासकारानी त्याला नको तेवढं महत्व देऊन पुढे आणलं व गुरु म्हणुन उभं केल ह्या सगळ्या उचापत्या करायची काय गरज होती.

बरं इतिहासाप्रमाणे या दादोजींचा एक हाथ आदिलशाहनी कापुन टाकला होता, मग असा माणुस शस्त्राचं शिक्शण कसं काय देणार ? एवढं साधं गणित इतिहासकार विसरलेत व ईथेच त्यांच पितळ उघडं पडलं.

आता प्रश्न येते लाल महालातील पुतळ्याचा.

बाल शिवाजी आई सोबत आहेत तिथे या दिवांजीचा पुतळा कशाला पाहिजे. त्या काळात फोटु काढायची सोय नव्हती म्हणुन चित्र किंवा शिल्पानी ते प्रतिक आपल्या पुढे ठेवण्याचा हा एक प्रयास होता.

आता मला सांगा तुमच्या बालणीच्या फॅमिली फोटु मधे तुमच्या आई शेजारी कोणाचा फोटु असायला हवा ? बापाचा ना ? मग ईथे त्या नौकराचा फोटु कशाला पाहिजे?

बरं, हा फोटु (पुतळारुपी) हटवला नसतात तर ५०-६० वर्षानंतर हाच फोटुतला माणुस शिवाजीचा बाप अशी आरोडी फोडायला वाव होता. देश-विदेशातला माणसाना तसेच वाटले असते. म्हणुन या फोटुतुन त्या दिवांजी (नौकराला ) काढुन टाकणे गरजेचे होते.

दादोजी हे खाजगी नौकर होते. नौकराना नौकराच्या जागी ठेवणे केंव्हाही बेहत्तर. तेच केलं.

सारांशः दादोजी ब्राह्मण होते म्हणुन हटविण्यात आले नाहीत. ते खाजगी नौकर होते त्यांची फॅमिली फोटुत घुसखोरी नको म्हणुन हटविण्यात आले. हे सत्य आहे.
समस्त माबोकर आता या अँगलनी बघतिल ही अपेक्शा.

सारांशः दादोजी ब्राह्मण होते म्हणुन हटविण्यात आले नाहीत. ते खाजगी नौकर होते त्यांची फॅमिली फोटुत घुसखोरी नको म्हणुन हटविण्यात आले. हे सत्य आहे. समस्त माबोकर आता या अँगलनी बघतिल ही अपेक्शा>>>

महाराजांच्या पदरी अनेक ब्राह्मण होते. त्यांचेही महत्व ब्राह्मणांनी वाढवलेच असते. पण तसे झाले नाही. इतकेच काय, सावंत,पाटील अशा मराठ्यांनी जो इतिहास लिहीला आहे त्यातही कुठेही ब्राह्मणद्वेष किंवा दादोजींबाबत हल्की विधाने दिसत नाहीत. मराठ्यांनी पुतळा हलवण्याऐवजी इतिहासाचा अभ्यास करून 'दादोजी कसे केवळ नोकर होते' हे सिद्ध केल्यास ती अधिक भरीव कामगिरी ठरेल.

प्रश्न असा आहे की २०१० मध्ये हा मुद्दा इतका का महत्वाचा ठरावा? संभाजीराजे होते, शाहू झाले, बाळाजी विश्वनाथ आणि नंतर तर अनेक पेशवे झाले, शिंदेशाही होती, होळकरशाही होती. इतके सर्व मराठा आणि ब्राह्मण नंतर होऊन गेले तेव्हा हा मुद्दा का निघाला नाही? बहुधा तेव्हा असा मुद्दा निघाला असता तर 'हात कलम' झाले असते. आता लोकशाही आहे त्यामुळे निघू शकतो.

आग्र्याहून सुटका झाल्यानंतर दोन ब्राह्मणांचे औरंगजेबाने केलेले हाल हे नेताजी पालकरचे जेवढे हाल केले तेवढेच होते. पण इतिहासकारांनी कुठेही असे म्हंटलेले नाही की केवळ ब्राह्मणांमुळे महाराज सुटू शकले. खुद्द महाराजांनी सुटका झाल्यानंतर संभाजीराजांना दोन ब्राह्मणांच्याच हवाली करून दौलतीकडे मोर्चा वळवला कारण संभाजीराजे त्यांच्या वयामुळे कुठेही ओळखू आले असते. संभाजीराजांनी तर कुणाला ओळख पटू नये म्हणून शेंडी धारण करून संध्याही केलेली आहे.

शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत दादोजींचा सहभाग आहे हा मुद्दा जर खोटा असेल तर लाल महालात राहून दादोजींनी जे प्रशासन पुण्यात व आजूबाजूच्या परिसरात उभे केले होते त्याची शिकवण महाराजांना कुठून मिळाली असती? कारण तेव्हा अंमल तर आदिलशाहीचा होता.

मुद्दा ब्राह्मण मराठा असाही नाही आणि मालक नोकर असाही नाही, मुद्दा केवळ राजकारण असाच असावा असे वाटते.

-'बेफिकीर'!

कविता आवडली...

ते खाजगी नौकर होते त्यांची फॅमिली फोटुत घुसखोरी नको म्हणुन हटविण्यात आले.
--- सोनिया गांधीं आणि राहुल गांधी समवेत मनमोहन सिंगांचे फोटो नकोत (विनाकारण गैरसमज पसरतिल) किंवा इंदिरा गांधींसोबत त्यांच्या कुठल्याच ``नोकराचे`` फोटो नकोत हे म्हणणे जेव्हढे हास्यास्पद आहे तेव्हढीच वरची संपुर्ण पोस्ट आणि त्यातिल विचार हास्यास्पद आहेत.

तुम्ही लवकर बरे व्हा यासाठी शुभेच्छा.

मुद्दा केवळ राजकारण असाच असावा असे वाटते.
--- असावा नाही आहे. राजकारणातील बड्या धेंडांचे काळी कृत्ये, अपयश झाकण्यासाठी हे तयार करुन ठेवलेले द्वेषाचे रसायन वेळप्रसंगी उतारा म्हणुन वापरले जाते... हमखास १०० % यश, इतिहास गेला खड्यात.

दादोजी ब्राह्मण होते म्हणून ब्राह्मणाना महाराजांचे विरोधक ठरवायचे, हाच नियम लावायचा तर महाराजांचा विश्वास्घात करणारे अनेक विरोधक मराठाही होते.. आता त्यांचं हे ब्रिगेडवाले काय करणार आहेत?

दादोजी काय होते नव्हते याच्याशी देणं घेणं नाही.

ते त्या फॅमिली फोटुत नको होते, बास.........

बेफिकीर,
इतिहासकारानी सिद्ध केलंय म्हणुन दादोजी पुस्तकातुन हद्दपार झालेत. तुम्ही म्हणताय त्यात तथ्य नाही. पुराव्यानिशी सिद्ध करा ते स्विकारलं जाईल.

उगीच ब्राह्मण द्वेषाकडे गाडी फिरवु नका.

ईथे प्रश्न आहे, सत्य असत्याचा.

नविन इतिहासकारानी आधी तांत्रिक पातळीवर जुन्या इतिहासाचे मुखवटे फाडले म्हणुन हे बदल स्विकारले गेलेत. हेच आजच सत्य आहे.

पुढे संशोधनानी ते फिरवायला तुम्हाला कुणी अडवलेलं नाहिये.

बरं, हा फोटु (पुतळारुपी) हटवला नसतात तर ५०-६० वर्षानंतर हाच फोटुतला माणुस शिवाजीचा बाप अशी आरोडी फोडायला वाव होता. म्हणुन हा या फोटुतुन त्या दिवांजी (नौकराला ) काढुन टाकणे गरजेचे होते.

याला म्हणतात पराचा कावळा करणे,

मुळात "शिवाजीचा बाप दादोजी" हा विचार येणे हेच असंस्कृत पणाचे लक्षण आहे. आणी ५०-६० वर्षानंतर असे होईल या भीतीस्तव पुतळा काढणे हास्यास्पद आहे.

बरं इतिहासाप्रमाणे या दादोजींचा एक हाथ आदिलशाहनी कापुन टाकला होता, मग असा माणुस शस्त्राचं शिक्शण कसं काय देणार ?

दोन हात नसतांना पोहणारे या जगात आहे.त्यामुळे एक हात असतांना शिकवणे त्यांच्यासारख्या योध्दास काय कठीण? उगाच तर्कलावुन आपल्या बुध्दीचे प्रदर्शन करणारे खुप आहेत.

दादोजी ब्राह्मण होते म्हणुन हटविण्यात आले नाहीत. ते खाजगी नौकर होते त्यांची फॅमिली फोटुत घुसखोरी नको म्हणुन हटविण्यात आले. हे सत्य आहे

दादोजी ब्राह्मण होते म्हणुन हटविण्यात आले, रामदास स्वामी सुध्दा नको आहेत, ज्ञानेश्वर नको आहे.
गागाभट्ट नको आहे, बाबासाहेब पुरंदरे समितीत नको आहे यात कोठे आहे फॅंमीलीसोबत फोटो. मग हा ब्राम्हणद्वेश (वाद) नाही तर काय आहे.

मी मागेही लिहिले होते , परत लिहित आहे . काहीही झाले की मायबोलीवर "मराठा" या विषयावर सगळे का तुटून पडतात ?
संभाजी ब्रिगेड ही सर्व मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करते असे कुणी सांगितले ?
मराठा महासंघाच्या अध्य़क्षानीही हेच विचारले आहे .
दादोजींबाबत तुमचा वाद ब्राम्हण विरुद्ध इतर असु द्या ना , त्याला ब्राम्हण विरुद्ध "मराठा" रंग द्यायची काय गरज आहे ?

रामदास स्वामी सुध्दा नको आहेत, >> कारण हा रामदास खोटारडा व शत्रुचा गुप्तहेर होता.

ज्ञानेश्वर नको आहे.>> कारण हा भित्रा आत्महत्या करणारा एक कर्तुत्वशुन्य मुलगा. त्यानी आयुष्य एक ट्रान्स्लेशन सोडुन कवडीचं काम नाही केलं. मग याचा उगाच काय म्हणुन उदो उदो करायचा ?


बाबासाहेब पुरंदरे
>> हा माणुस खोटा इतिहास लिहण्यात पटाईत आहे हे नविन इतिहासाच्या स्विकृतीने सिद्ध होते. आता अशा लोकाना का म्हणुन स्विकारावे.

वरिल सगळ्याना बाद ठरविण्याची कारण ब्राह्मण नसुन त्यांचा करंटेपणा आहे. आता ते जातिने ब्राह्मण आहेत हा केवळ योगायोग आहे.

वाह, वाह्,.....ग्रेट....!!
वैद्य, तुम्हाला माझा प्रणाम....!
खूप मस्त...

आणि हो,
मायबोलीचा कंटाळा येऊ देऊ नका हं...
मी अत्ताच जॉईन झालीये,
तुमच्या कडून खूप काही वाचायचय, ऐकायचय, आणि शिकायचय...:-)

नविन इतिहासकारानी आधी तांत्रिक पातळीवर जुन्या इतिहासाचे मुखवटे फाडले म्हणुन हे बदल स्विकारले गेलेत. हेच आजच सत्य आहे.

हे बदल फक्त ज्यांनी केले त्यांचेच सरकार असल्यामुळे स्विकारल्या गेले आहे याला स्विकारले म्हणता येणार नाही. जबरदस्तीने लादले गेले आहे.

जुन्या इतिहासाचे मुखवटे फाडले
मुखवटेच नाही कपडे सुध्दा फाडले, इतिहासाचे धिंडवडे काढले

>>> --- सोनिया गांधीं आणि राहुल गांधी समवेत मनमोहन सिंगांचे फोटो नकोत (विनाकारण गैरसमज पसरतिल)
Proud Proud Proud

>>> बरं इतिहासाप्रमाणे या दादोजींचा एक हाथ आदिलशाहनी कापुन टाकला होता,

हा कोणी लिहिला इतिहास? अनिल सोनवणींनी का अजून कोणी? अनिल सोनवणींच्या ब्लॉगवरच्या सर्व लेखातून ब्राह्मणद्वेष दिसतो. दादोजींच्या मृत्युनंतर ३५० वर्षांहून अधिक काळ जे कुठल्या इतिहासकाराला सापडले नाही, ते या सोनवणीला बरे सापडले?

>>> इतिहासकारानी सिद्ध केलंय म्हणुन दादोजी पुस्तकातुन हद्दपार झालेत. तुम्ही म्हणताय त्यात तथ्य नाही. पुराव्यानिशी सिद्ध करा ते स्विकारलं जाईल.

पांडुरंग बलकवडे यांच्या लेखात दादोजी हे शिवरायांचे गुरू असल्याचे अनेक ऐतिहासिक पुरावे आहेत. यावर्षीच्या किस्त्रीमच्या दिवाळी अंकात एका इतिहासकाराने (नाव विसरलो) दादोजी गुरू आहेत हे सिध्द करणारा एक दीर्घ लेख लिहिला आहे.

>>> दादोजी काय होते नव्हते याच्याशी देणं घेणं नाही.

बरोबर आहे. ते जातीने ब्राह्मण होते हे कारण त्यांची हकालपट्टी करण्यासाठी पुरेसं आहे.

बरं, हा फोटु (पुतळारुपी) हटवला नसतात तर ५०-६० वर्षानंतर हाच फोटुतला माणुस शिवाजीचा बाप अशी आरोडी फोडायला वाव होता. म्हणुन हा या फोटुतुन त्या दिवांजी (नौकराला ) काढुन टाकणे गरजेचे होते.

हा असा विचार येणे हेच आपले अपयश आहे. असे विचार मांडताना कृपया पुनः विचार करावात .....
तुम्ही भले जर-तर च्या भाषेत मांडले आहे , तरी देखिल विचार येणे हेच असंस्कृत पणाचे लक्षण आहे....

चुक सुधरावी हा सल्ला....

धन्यवाद "राजे". रामदास स्वामी, संत ज्ञानेश्वर, बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयीचे आपले महान विचार ऐकून आपली खरी ओळख पटली.

रामदास स्वामी सुध्दा नको आहेत, >> कारण हा रामदास खोटारडा व शत्रुचा गुप्तहेर होता.

ज्ञानेश्वर नको आहे.>> कारण हा भित्रा आत्महत्या करणारा एक कर्तुत्वशुन्य मुलगा. त्यानी आयुष्य एक ट्रान्स्लेशन सोडुन कवडीचं काम नाही केलं. मग याचा उगाच काय म्हणुन उदो उदो करायचा ?

बाबासाहेब पुरंदरे >> हा माणुस खोटा इतिहास लिहण्यात पटाईत आहे हे नविन इतिहासाच्या स्विकृतीने सिद्ध होते. आता अशा लोकाना का म्हणुन स्विकारावे>>>>

=============================================================

पहिले व तिसरे विधान बेसलेस वाटले. दुसरे विधान (ज्ञानेश्वरांबाबतचे) हे वैयक्तीक मत आहे, तेव्हा त्यावर काही बोलता येणे शक्य नाही.

-'बेफिकीर'!

मास्तुरे,
तुम्ही उगीच गैरसम करुन घेताय.

अहो ज्याना कुणाला असं वाटतं की, दादोजी हेच गुरु होते त्याना ते सिद्ध करण्यासाठी दारं उघडी आहेत.
किंबहुना कुणी असं सिद्ध केलच तर ते स्विकारण्याची तयारीही आहे. आपण तेवढे फेक्सीबल आहोत.

पण ते सिद्ध करणारा कुणी पुढेच येत नाही. हाच खरा प्रोब्लेम आहे.

यावरुन असा अंदाज येतो की कुठल्यातरी मासिक वा वृत्तपत्रातुन पुरावा असल्याचा दावा करणारे स्वतःच्या संशोधनावर साशंक आहेत.

नाहितर त्याना कुणी अडवलं. आणि तुमच्या आमच्या सारखे उगीच त्या मासिकातील लेखाच्या आधारे खोट्या गृहितांवर वाद घालतो.

अहो ज्याना कुणाला असं वाटतं की, दादोजी हेच गुरु होते त्याना ते सिद्ध करण्यासाठी दारं उघडी आहेत.
किंबहुना कुणी असं सिद्ध केलच तर ते स्विकारण्याची तयारीही आहे. आपण तेवढे फेक्सीबल आहोत

म्हणजे सगळ्या गोष्टीचे पुरावे आहेत फक्त दादोजी गुरु होते की नव्हते हाच बाकी आहे.

ही चर्चा काहीशी भरकटली आहे व त्यात माझाही सहभाग आहे याबाबत क्षमस्व! माझ्यामते वेगळ्या धाग्यावर हे असावे.

-'बेफिकीर'!

बेफिकीर,
शिवाजी महाराजांच्या समकालीन बखरीत रामदासांचा कुठेच उल्लेख नाही. पेशवे कालिन बखरित तो घुसडण्यात आला.

पुरंदरे खोटारडे आहेत याचा पुरावा म्हणजे शालेय पाठ्यक्रमातील बदललेला इतिहास होय.

---------------------------------

हे घुसडणे प्रकार किती टोकाचं असते याचं एक उदा. देतो. तुमचं वाचन दांडग असल्यास लक्षात येईलच. (मी मुद्दाम पुस्तकाचं, लेखकाचं व त्या नेत्याचं नाव लिहत नाहि. बघा तुम्हाला लक्शात येतं का)

एक बुकर पुरस्का विजेत्या पुस्तकाचं इकडे भाषांतर करण्यात आलं. त्या मुळ इंग्रजी पुस्तकात असा उल्लेख आहे.

" पुण्यातील एक *** विद्वान व देशभक्त म्हणून ज्याची ख्याती आहे तो लंडनला शिकत होता व तो समलिंगी होता"

हा उल्लेख भाषांतरकारानी कटाक्शाने टाळला.

हे पुण्यातिल लेखक असंला घाणेरडा प्रकार करण्यात खुप पटाईत आहेत. त्यांच्या सोईनुसार एवढ्या प्रसिद्ध पुस्तकात बदल केला, तर मग इतिहासाची काय बिशाद.

हे पुरंदरे ह्याच पिंडाचे.

म्हणजे सगळ्या गोष्टीचे पुरावे आहेत फक्त दादोजी गुरु होते की नव्हते हाच बाकी आहे.>> तसं नाही.

राजांच्या समकालीन लिखानावर नजर टाका.

पेशवे कालीन बखरी अविश्वसनिय आहेत.

सभासदांची बखर वाचा. हे महाराजांच्या समकालीन लिखान आहे.

यात समर्थांचा उल्लेख नाही.

दादोजीं काय होते हे ही ईथे वाचता येईल.

आपण म्हणता ते शक्य आहे राजे, पण पुतळा हलवण्यात मला कोणताही 'इतिहास बदलण्याचा किंवा बदललेला इतिहास सिद्ध करण्याचा' हेतू वाटत नाही. ते केवळ राजकारण वाटते. माझे वाचन दांडगे नाही. आपण दिलेला संदर्भ मला माहीत नाही.

-'बेफिकीर'!

पेशवे कालीन बखरी अविश्वसनिय आहेत>>>

याचा पुरावा येथेच लिहावात कृपया, शक्य असल्यास लिंकही द्यावीत, म्हणजे वादावर काही प्रमाणात पडदा पडू शकेल. तसेच, रामदास शत्रूला मिळालेले गुप्तहेर होते याबाबतही काही ठोस लिखाण असल्यास कृपया नोंदवावेत.

-'बेफिकीर'!

पुरंदरे खोटारडे आहेत याचा पुरावा म्हणजे शालेय पाठ्यक्रमातील बदललेला इतिहास होय.
---- शालेय पाठ्यक्रमात केलेला बदल हे पुरावा नाही ठरु शकत. तेथे गुंतगुंतीचे राजकीय गणिते महत्वाची असतांत.

Pages