Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता:
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना
वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना
परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्या भांडणं-वादांना पण परंपरा आहे.
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल.
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अंजली, तिला येताना मिनोतीकडून
अंजली, तिला येताना मिनोतीकडून बेडगी,मुसळी वगैरे घेऊन यायला सांग नी कामाला बसव.
१३ मे फ्रायडेची काहीतरी
१३ मे फ्रायडेची काहीतरी स्केअरी थीम ठेवा.
सायो, बेडगी मिरच्या असतात आणि
सायो, बेडगी मिरच्या असतात आणि बडगी म्हणजे बत्त्यातला खल!!!
अंजू, कल्लोळाला अनेकानेक शुभेच्छा!!
धन्यवाद मिनोती ९ दिवस
धन्यवाद मिनोती
९ दिवस राहिले.
१४ मे: तापमान दिवसा ७८, रात्री ५८. भरपूर सूर्यप्रकाश.
ओ बुवा, बशीचं काय झालं? लागा
ओ बुवा, बशीचं काय झालं? लागा तयारीला बिगी बिगी!
झाली का बारा बस बुक? सिंडीचं
झाली का बारा बस बुक? सिंडीचं विमान तिकिट? रोज इथे येऊन विचारणार आहे.
सायो, मी नाही जातेय.
सायो, मी नाही जातेय.
मोगर्याची (मिळाली आहेत) आणि
मोगर्याची (मिळाली आहेत) आणि कडिपत्त्याची रोपं (अजून बघते आहे) हवी आहेत पटपट सांगा.
मला हवीत असे एकदा लिहीले
मला हवीत असे एकदा लिहीले आहेच, अजून एकदा कन्फर्म करायचय का?
नाही गं. तुझ्या नावाचं (लालू,
नाही गं. तुझ्या नावाचं (लालू, स्वातीपण) ठेवलं आहे बाजूला.
कोणाला कसले मसाले, कॉफ्या,
कोणाला कसले मसाले, कॉफ्या, वाल अस्लं काय पायजे असेल ते लिहा.
पण प्रयत्न करणेत येईल.)
(म्हणजे मिळेलच असं नाही,
म्हणजे माझ्याकडचे रोप
म्हणजे माझ्याकडचे रोप दुसर्याला दिले तर चालेल ना बाई ? एका रोपावर पाच जणांचा डोळा आहे
नाही नाही, तिला कढीपत्ता अजून
नाही नाही, तिला कढीपत्ता अजून मिळालेला नाहीये.
(कडिपत्त्याचं नाव घेते माझा डोळा पैला! :P)
माझ्याकडे थोडे कडवे वाल आहेत.
माझ्याकडे थोडे कडवे वाल आहेत. पेणचे. कुणाला हवे असल्यास कळवा.
सिंडे, तू कधी येणार आहेस इथे त्यावर अवलंबून आहे.
कडवे वाल मला हवेत.
कडवे वाल मला हवेत.
कडिपत्त्याचं नाव घेते माझा
कडिपत्त्याचं नाव घेते माझा डोळा पैला >>>
माझ्याकडे विकतचा बेडेकर कैरी
माझ्याकडे विकतचा बेडेकर कैरी लोणच्याचा मसाला आहे, कोणाला हवा असल्यास सांगा.
माझ्यासाठी आण थोडा. हवाईची
माझ्यासाठी आण थोडा. हवाईची कोना कॉफीपण आहे माझ्याकडे.
'विकतचा' असं स्पेशली
'विकतचा' असं स्पेशली म्हटल्यामुळे वाक्याचा उत्तरार्ध 'कोणाला फुकट हवा असेल तर सांगा' असा ऐकू आला.
रुनी, वाटे लाव
रुनी, वाटे लाव
भाकरी केलीत तर थापून करणार का
भाकरी केलीत तर थापून करणार का ?
स्वाती विकतचा = घरी न केलेला
स्वाती
विकतचा = घरी न केलेला
बेडेकर मसाला घरी केलेला कसा
बेडेकर मसाला घरी केलेला कसा असणार तू बेडेकर असल्याशिवाय?
दिघेमॉमींचा "घरचा" मसाला
दिघेमॉमींचा "घरचा" मसाला आहे मागच्या पानावर म्हणून हा "विकतचा" होता.
बेडेकरांच्या घरी केलेला असु
बेडेकरांच्या घरी केलेला असु शकतो ना
भाकरी अजून कशा करतात? आमच्यात
भाकरी अजून कशा करतात? आमच्यात ओतलेली करत नाहीत.
अरे GTG साठी भेटणार आहात का
अरे GTG साठी भेटणार आहात का सहकार भांडार मधुन पोती आणुन मसाला वाटप करणार आहात!!!
हाणा रे याला. गटगमध्ये काय
हाणा रे याला. गटगमध्ये काय काय चालतं हे माहितच नाही ह्याला.
सायो: GTG कस unique हव!
सायो: GTG कस unique हव! प्रत्येक वेळी मसाला वाटप, झाड/फुलांची देवाणघेवाण (u know अगदी चाळ mentality बर का!), झालच तर ही भाकरी ती भाजी तो पुलाव, वगैरे करायच्या printed recipes (going green जसे ह्याना माहितच नाही...) आणि कहर म्हणजे हे सर्व GTG मध्ये कसे झाले ह्याचा आन्खो देखा हाल पुन्हा इथे type करायचा (म्हणजे too much waste of time ना!)....
पश्चिम किनार्यावरून कोणी
पश्चिम किनार्यावरून कोणी जाणार असाल तर माझ्याकरता ती कुर्गी कॉफी आणा!
Pages