सोनुला तिने तापाच औषध दिल आणि मांडीवर घेवुन तिला झोप येइपर्यंत हलकेच थोपटत राहिली. तोंडाने अंगाईगीता ऐवजी मोठीचा अभ्यास, तिच्या मॅथ्समधल्या सम्स चालू होत्या. पुन्हा उद्याची तयारी आहेच तिच्या सकाळच्या शाळेची. तरी बर राहुलला रात्रीची शिफ्ट आहे नाहीतर सकाळी ४ वाजता उठायचं अगदी जीवावर येत. मनातले विचार झटकुन तिने सोनुला बेडवर टाकल. मोठीला झोपायला पिटाळल आणि पुन्हा ती स्वयपाकघरात आली. भराभर फ्रीजमधुन भाजी काढुन चिरुन ठेवली उद्या दुपारची आणि सकाळच्या डब्याची. कणीक तिंबुन ठेवली. सगळी झाकपाक करुन, लाईट बंद करुन ती बेडकडे वळली तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते.
अरेच्च्या! राहिल की बघायच, आज टीव्हीवर कुठला तरी सिंधु संकपाळांचा सिनेमा होता पण ह्या कामाच्या गडबडीत टीव्ही कुठे बघायला वेळ मिळावा? उद्या सकाळचे विचार डोक्यात घोळवत ती झोपेच्या अधीन झाली. हे एक बरय, झोप येण्यासाठी अजीबात कष्ट करावे लागत नाहीत. पाठ टेकली की झोप लागते. मधे कधीतरी सोनुच्या कण्हण्याने तिला जाग आली. उठुन तिला औषधाचा एक डोस देवुन ती झोपायला वळणार इतक्याच पहाटे पावणेपाचचा गजर वाजला.
आता कुठली झोप? उठुन चहाच आधण ठेवल. सासर्यांच्या बेडरुमवर टकटक केली. हॉलमधे जावुन टीव्ही बंद केला. कधीतरी रात्री उशिरा आल्यावर राहुल टीव्ही बघताबघताच झोपला होता. तिने त्याच्या अंगावरचे पांघरुण सारखे केले. तोंडात ब्रश आणि एका हातात झाडु घेवुन तिने केरवारे केले. चहा घेताघेता सासर्यांच्या सकाळच्या नाष्ट्याची तयारी व एकिकडे गॅसवर मोठीच्या डब्याची भाजी टाकली फोडणीला. सासर्यांनी चहा घेताघेता फर्मान सोडलच, अजुन अंघोळ नसेल तर मला नाष्टा नको.
गिझर लावल्यापासुन शॉवरखाली तासभर उभ राहण्याची इच्छा तिने परत एकदा मनामधेच दाबली व दोन तांबे घाईघाईत अंगावर घेवुन ती पुन्हा स्वयंपाक घराकडे वळली. मोठीचा डबा भरुन तिने सासर्यांसाठी कुकर लावला, पालकाची भाजी करुन ठेवली. आणि मोठीला उठवण्यासाठी बेडरुमकडे वळली.
"मम्मा, थोडा वेळ झोपु दे ना ग अजुन प्लीज"
"नाही पिल्ला, सहा वाजलेत आता बस येइल ग इतक्यात"
"खुप थंडी आहे ग, पाचच मिनिटे झोपते ना" अस म्हणुन ती परत रजईत गेली.
इथं थांबुन उपयोगच नव्हता. तिने स्वतःच्या कपाटातुन प्रोजेक्ट रिपोर्ट्स काढले जे तिने चार दिवसापासुन मेहनतीने केले होते. आज तिचं प्रेझेंटेशन होत कंपनीच्या सी ई ओंसमोर. तयारी झाली होती सगळी पण वेळेत पोचतोय की नाही ही एकच शंका होती.
परत एकदा मोठीला हलवुन आणि थोडस चिडुनच तिने उठवले. ती बिचारी आता निमुटपणे उठली स्वतःच्या चिमुकल्या हातांनी एवढ्या मोठ्या रजईची वेडीवाकडी घडी घातली व बाथरुमकडे वळली. साडेसहा वाजले तरी मोठी अजुन बाथरुममधुन बाहेर आली नाही म्हणुन तिने दारावर दोन तीन थापा मारल्या हलकेच दार ढकलले तर बाईसाहेब गरम पाण्याखाली निवांत झोपल्या होत्या. सकाळची थंडी तिला काही गरम पाण्यातुन बाहेर येवु देत नव्हती. कसतरी तिच्या मागे लागुन तिने मोठीला शाळेसाठी तयार केल व गेटजवळ सोडुन आली.
बापरे तोपर्यंत ७ वाजले होते आता १५ मिनिटात स्वत:चे आवरुन छोटीला पाळणाघरात सोडुन तिला बसस्टॉप गाठायचा होता. सकाळी कितीही लवकर उठा वेळच पुरत नाही अस पुटपुटत तिने भराभर स्वतःच आवरल एका हातात स्वत:ची पर्स प्रोजेक्टची फाईल दुसर्या हातात छोटीची बास्केट, कडेवर सोनु असा लवाजमा घेवुन ती गाडीकडे पार्कींगमधे आली. ओह थंडीमुळे हल्ली गाडी लवकर सुरु होत नाही. तिने चालतच देशपांडे काकुंच घर गाठल. तोपर्यंत कंपनीची बस स्वारगेटवरुन निघाल्याचा मिस कॉल येवुन गेला होता. तिने दारातुनच सोनुला देशपांडे काकुंच्या हवाली केल. ती बिचारी झोपेतच होती आणि थोडी ग्लानीतसुद्धा.
काय राहिल, काय विसरल याचा विचार करायला सुद्धा वेळ नव्हता. तशीच घाईघाईत गाडीत शिरली. ड्रायव्हरने आज परत एकदा रागाने बघितल. पण त्याच्याकडे लक्ष देण तिला महत्वाच वाटल नाही. लगेच शेजारचीने तिच्या सासुच्या कंप्लेंटस करायला सुरवात केली. तिने हसुन प्रतिसाद दिला. थोड समजावल. डोक गाडीच्या सीटवर टेकताच डोळे मिटले व आजच्या प्रोजेक्टची रिव्हीजन केली.
हा एकमेव अर्धा तासाचा वेळ तिचा हक्काचा होता. या अर्ध्या तासात ती बर्याचदा मुलींचा, स्वत:चा, घराचा, भविष्याचा विचार करायची. स्वप्न रंगवायची प्रोजेक्ट लीड करण्याची. आजपर्यंत खुप संधी आल्या पण काही ना काही कारणाने तिला पाणी सोडाव लागल त्यावर. पण आता नाही यावेळी नाही हार पत्करायची. मनाची पक्की तयारी झाली होती तिच्या. आयुष्यभराच स्वप्न पुर्ण व्हायची वेळ आल्यावर माघारी फिरणार नव्हती ती. राहुलशी बोलुन झाल होत, तो तयारही झाला होता. एक सुस्कारा सोडला तिन विश्वासाने.
शेजारणीने हळुच धक्का देवुन उठवल्यावर तिने डोळे उघडले पटकन बसमधुन उतरली. देसाई सरांना भेटायलाच हव या प्रोजेक्टमधे खुप मदत केलीय त्यांनी. देसाई शांतपणे चहा घेत होते. तिच्या चेहर्यावरची उत्सुकता बघुन त्यांनी तिला डोळ्यांनीच आश्वस्त केल. ती हसली व कॉन्फरंसकडे वळली.
खरतर पहिल प्रेझेंटेशन नव्हत तिच पण हुरुप आणि उत्साह पहिल्यासारखाच होता. आजपर्यंत आत्मविश्वासाने डिझाईन केलेली सगळी प्रोजेक्टस कुणीतरी दुसर्यानेच एक्झिक्युट केली होती. पण यावेळी तीच एक्झिक्युट करणार असं तिन देसाईंना सांगीतल होत. त्यांना कोण अभिमान वाटला होता तिचा. त्यांची खुप आवडती विद्यार्थिनी होती ती. त्यांच्यानंतर त्यांचा वारसा जपणारी.
खुप छान प्रेझेंट केले तिने रिपोर्टस स्लाईडसच्या सहाय्याने स्वतःच्या प्रभावी व्यक्तिमत्वाने. देसाईसरांची कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर तिने मोबाईल पाहिला. बापरे राहुलचे ६ मिसकॉल. तिने बाहेर येवुन लगेच त्याला कॉल केला.
"मुर्ख कुठे तरफडली होतीस इतका वेळ?? केव्हाचा फोन करतोय मी"
"राहुल अरे ऑफिसात आहे ना मी"
"माहितिये, खुर्चीवर बसुन कॉम्पवर बडवायला काय अक्कल लागते ग??"
"काय झालय?" तिने स्वतःचा अपमान गिळत विचारल.
"अरे वा, आहे की आठवण घराची" तो कुत्सितपणे म्हणाला.
"फोन का केला होतास?"
"सोनुला ताप असताना तू गेलीसच का ऑफिसला?? तिला कोण सांभाळणार??"
"अरे मी दिलय औषध तिला"
"आणि देशपांडे काकुंना कोण सांगणार?? त्यांचा दोनदा फोन येवुन गेला" राहुलने रागाने फोन आपटला.
तिला आठवल काय विसरल होत ते, प्रोजेक्टच्या नादात आणि सकाळच्या घाईत ती देशपांडेकाकुंना सोनुच्या तापाच सांगायचच विसरली होती. तिने लागलिच त्यांना फोन केला. सोनुच्या तब्येतीची चौकशी केली. सोनु रडुन झोपली होती. मोठीच्या शाळेतुन प्रोजेक्ट पुर्ण न केल्याने नोटीस आली होती. तिने देशपांडे काकुंना हे राहुलला न सांगण्याचे कबुल करुन घेवुन फोन ठेवला.
राहुलचा परत एकदा फोन आला.
"हातातल काम सोडुन लगेच घरी ये, बाबांचा पाय मुरगाळला आहे आणि मला आता सेकंड शिफ्टला जायच आहे."
"पण राहुल" पुढच ऐकायला राहुल लाईनवरच नव्हता.
प्रोजेक्ट मिळाल्याचा आनंद, देसाईसरांची पाठीवरची थाप, इतरांनी केलेल कौतुक, मुलीच आजारपण, नवर्याचा त्रागा, मैत्रीणीची सासु, मोठीचा शाळेतला प्रोजेक्ट सगळ डोक्यात मोठा पिंगा धरुन नाचायला लागल.
का सगळ मी सहन करायच?? मुली काय माझ्या एकटीच्याच का?? कुणी कुणी मदत करत नाही. किती किती फ्रंटवर लढायच?? नवरा म्हणुन तो करतो ते कष्ट मग मी काय करते?? मुलींचा अभ्यास मीच घ्यायचा का? सगळ्यांची दुखणी खुपणी मीच करायची का? घर आणि संसार फक्त माझाच आहे का?? मला माझा विचार करायचा अधिकारच नाही का?? मी आकाशात भरारी मारायची नाहीच का? मला कायम दुसर्यांसाठीच जगाव लागणार का?
कितीतरी प्रश्न आणि फक्त प्रश्न उत्तर माहित असलेले नसलेले किंवा ज्यांच्या उत्तरांची कवाड आपणच बंद केलेले. न संपणारे प्रश्न.
तिने मनाचा निश्चय केला यासगळ्यातुन बाहेर पडण्याचा, स्वत:च आयुष्य परत एकदा स्वतःच्या पद्धतिने जगण्याचा. ती देसाईसरांच्या केबीनकडे वळाली.
घरी गेल्यावर सासर्यांच्या रुममधे डोकावली. ते कण्हत होते 'आई ग, फार दुखतय ग'. तिच्यातली आई लगेच जागी झाली. तिने त्यांना हाताला धरुन उठवल दवाखान्यात नेल. तिथुनच देशपांडे काकुंना फोन करुन उशिरा येतेय थोडी, तुमच्याकडेच दोघींना खिचडी खायला घाला अस सांगीतल. सासर्यांना घेवुन घरी यायला बराच उशिर झाला. मग त्यांना गरम गरम उपमा करुन दिला खायला व ती मुलींना आणायला देशपांडे काकुंच्या पाळणाघराकडे गेली.
मुलिंचे कोमेजले चेहरे पाहुन पोटात तुटल तिच्या. सोनुला जवळ घेताना तिने मोठीशी तिच्या प्रोजेक्टबद्दल डिस्कस केल. तिची कळी खुलली. आई पुन्हा एकदा वाट्याला आली होती त्यांच्या १२ तासांनंतर.
घरी आल्यावर तिने सोनुसाठी डॉ. मानकरांच्या हॉस्पिटलमधे फोन करुन दुसर्या दिवशीची अपॉईंट्मेंट घेतली. सोनुला परत औषध दिल. तिच्या डोक्यातुन हात फिरवताना तिला सुद्धा दिवसभराच्या थकव्याने झोप लागली.
पहाटे कधीतरी राहुलने तिच्या मानेखाली उशी दिली, अंगावर पांघरुण टाकल, सोनुला गादीवर ठेवल. तिच्या कपाळावर येणार्या केसांना बाजुला सारुन तो हलकेच पुटपुटला,
"मी खुप वाईट आहे ना, बट स्टील आय लव्ह यु गार्गी"
हसली ती सुद्धा आणि बर्याच गोष्टींची आखणी केली मनातल्या मनात, मोठीच्या प्रोजेक्टला लागणारा मायक्रोसॉफ्ट वर्ड्चा स्क्रीनशॉट, सासर्यांच इंजेक्शन, सोनुची अपॉईंटमेंट, राहुलचा आवडता बदामाचा शिरा आणि देसाई सरांना प्रोजेक्ट एक्झिक्युट करत नसल्याचा इमेल.
हे सगळं असू शकतं, असावं या
हे सगळं असू शकतं, असावं या पातळीवर का सुरू आहे? सत्य परिस्थिती खूप वेगळी आहे... का करावं हा मुद्दा आपण त्रयस्थपणे पाहतो आहोत म्हणून म्हणतो आहोत... वेअर द शू अॅण्ड यू विल नो व्हेअर इट एक्झॅक्टली बाईटस...
आपण या स्थितीत असतो तर नेमकं काय केलं असतं? आपल्याही घरात अशी स्थिती आलीच असेल ना एकदा ना एकदा? तेव्हा आपण कशाला महत्त्व दिलं? असो...
पुरुषांचंदेखील असतं की, पण
पुरुषांचंदेखील असतं की, पण प्रमाण कमी. कोणीतरी लिहिलं होतं ना, कित्येक पुरुष पैसे मिळवण्यासाठी, कुटुंब चालवण्यासाठी आवडीच्या क्षेत्राचा त्याग करतात. Finally its a choice one makes.
स्त्रीला प्रेशरला सकम्ब न करण्याचा पर्याय आहे हेच मुळी आता आता कुठे समजू लागलंय! अनेक स्त्रीयांना ह्याचा पत्ताच नसतो.. वेळ आली तर कुटुंबासाठी मीच माघार घेणार हे गिव्हन असते त्यांच्यासाठी. इथे मात्र घरचे पुढे आले आपणहोऊन आणि सांगितले की पुढे हो तू, आम्ही सांभाळतो बाकी सगळं, तरच ते भान तिला येईल. चॉइस आहे, मार्ग काढता येईल- असा अवेअरनेसच नसेल तिला, तर माघार घेण्याव्यतिरिक्त ती करणार काय दुसरे? तिला माघार घेणे हाच पर्याय आहे असे वाटतेय!
कॉम्पवर बसायला अक्कल लागते का
कॉम्पवर बसायला अक्कल लागते का म्हणणार्या नवर्याने दिखाव्याचं सॉरी म्हणणं आणि सासर्यांनी सुनेच्या कुतरओढीचा कणभरही विचार न करता आडमुठेपणा करणं यानंतर तो निर्णय आगतिकतेपोटी, असुरक्षिततेपोटीच आलेला वाटतो. या निर्णयानंतर त्या नवर्याला, सासर्याला कणभरही कृतज्ञता असणारे का? कथेत तरी वाटत नाही. आजूबाजूच्या उदाहरणांच्यातही दिसत नाहीच. मग शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड हाच प्रकार दुसरं काहीच नाही.
अश्या नसतात का बाया आजूबाजूला तर असतात पण त्यांचं उदात्तीकरण किंवा त्यांच्या त्यागाचं उदात्तीकरण होऊ नये असं मनापासून वाटतं.
हा एवढा त्याग हा एखादीचा चॉइस असू शकतो पण असा त्याग करणं म्हणजेच स्त्रीच्या आयुष्याची परीपूर्ती, तीच खरी चांगली स्त्री बाकीच्या सगळ्या वाईट असा मूर्ख आणि टुकार प्रचार साहित्यातून आणि चित्रपटातून आणि आजकालच्या तमाम मालिकांच्यातून होत असतो तो होऊ नये हे नक्की वाटतं.
किती सहजपणे या तथाकथित महान त्यागाला विरोध दर्शवणार्या बायांना सगळं सहज सोपं मिळत गेल्याचं गृहित धरलं गेलं ते वरती आपण पाह्यलंच. ते तसं होऊ नये यासाठी हे उदात्तीकरणही होऊ नयेच.
लेखिकेचं स्वातंत्र्य लक्षात घेऊनही जर कथा अश्या उदात्तीकरणाकडे झुकत असेल तर ते तसे असू नये असे म्हणावेसे वाटते. अशी उदाहरणे ही मॉडेल्स किंवा एक्झॅम्प्लर्स म्हणून समोर न येता केवळ एक वस्तुस्थिती एवढीच म्हणून समोर यावीत आणली जावीत.
पौ, नी, << Finally its a
पौ, नी,
<< Finally its a choice one makes.
स्त्रीला प्रेशरला सकम्ब न करण्याचा पर्याय आहे हेच मुळी आता आता कुठे समजू लागलंय! अनेक स्त्रीयांना ह्याचा पत्ताच नसतो.. ...असा अवेअरनेसच नसेल तिला, तर माघार घेण्याव्यतिरिक्त ती करणार काय दुसरे? तिला माघार घेणे हाच पर्याय आहे असे वाटतेय! >>
<< किती सहजपणे या तथाकथित महान त्यागाला विरोध दर्शवणार्या बायांना सगळं सहज सोपं मिळत गेल्याचं गृहित धरलं गेलं ते वरती आपण पाह्यलंच. >>
अनुमोदन.
अश्या परीस्थितीतली माणसं निर्णय घेतात, सकृतदर्शनी सोप्या वाटणार्या मार्गाचा. पुष्कळ अंशी ह्यात असते ती कराव्या लागणार्या संघर्षापासून पळ काढायची वृत्ती.
<< पण ही निवड त्या 'प्रेमात' करायची वेळ ही बाईवरच का येते? >> ज्याला त्रास होतो त्यालाच निर्णय घ्यावे लागतात.
<< मग याचीच corollary पुरुषांचे बायको/ संसार/ मुलं यापेक्षा नोकरी/करियर/अचिव्हमेंटस वर जास्त प्रेम असते असे असते का?>> माझ्यामते ह्याच उत्तर व्यक्तिसापेक्ष असावे. माझ्यापुरतं याच उत्तर मुलं / संसार / बायको ह्याच क्रमाने आहे. नोकरी हे माझ्यासाठी पैसे कमवण्याचं साधन आहे.
आशूडी, डिसअॅग्री. << प्रत्येक मुद्यामागे "असे का?" या प्रश्नाचे शेपूट लागले की ती होते स्त्रीमुक्ती, पिळवणूक, अन्याय यावरची चर्चा. >> ह्या वाक्यातच, हीच ह्यामागची कारणे आहेत हे गृहितक दिसतय.
माझ्यामताने प्रत्येकजण स्वतःच्या निर्णयाला जबाबदार असतो.
फक्त हीच नाहीत रे, पण अनेक
फक्त हीच नाहीत रे, पण अनेक कारणांपैकी ही काही आहेतच.
आशुडी, वस्तुस्थितीला मी
आशुडी, वस्तुस्थितीला मी नाकारत नाहीये. पौर्णिमा आणि नीची पोस्टस् हे असले आत्मसन्मान नसलेले (स्फोटक शब्दप्रयोग) निर्णय घ्यायला स्त्री का उद्युक्त होते ते सांगताहेत
पण म्हणजे अम्या आपण एकाच
पण म्हणजे अम्या आपण एकाच मुद्द्याच्या बाजूने बोलतोय रे. हो ना? की मला काहीतरी वेगळं समजतंय?
मला किंचित वेगळेपणा
मला किंचित वेगळेपणा जाणवतोय.
तूझा विरोध आहे तो ह्या प्रकाराच्या उदात्तीकरणाला.
मी बोंबलतोय ते असं काही घडल की त्या खाजगी (एका सज्ञान व्यक्तीने परिस्थितीचा पूर्ण विचार करुन, स्वतःच्या कुवतीला झेपेल अश्या घेतलेल्या) निर्णयाला "पुरुषांनी स्त्रीवर केलेला अन्याय" अस साध सरळ सोप आणि विकाउ लेबल लावण्याला.
निर्णयाला "पुरुषांनी स्त्रीवर
निर्णयाला "पुरुषांनी स्त्रीवर केलेला अन्याय" अस साध सरळ सोप आणि विकाउ लेबल लावण्याला.<<
अम्या, ते तसं नाहीये. म्हणजे असं लेबल असू नयेच पण 'पुरूषप्रधान संस्कृतीने स्त्रीवर केलेले अन्याय' हे अनेकदा पुरूषांकडूनच पुरूषांनी स्त्रीवर केलेले अन्याय असे वाचले जाते हे नाकारता येणार नाही.
सहिच. मनाला छेदुन जाणार, अगदि
सहिच.
मनाला छेदुन जाणार, अगदि प्रत्येकीच्या मनातलीच कथा.
पु.ले.शु.
चान अहे चर्चा. नीधप यान्चे
चान अहे चर्चा. नीधप यान्चे विचार अवडले.
नी, मान्य.
नी, मान्य.
कथा आणि त्याखालची चर्चा
कथा आणि त्याखालची चर्चा वाचली. कथेतील पात्रांचे वागणे न पटणे, शेवट वेगळा हवा होता असं वाटणे, कथेत (माझ्या ) मनासारखं न घडल्याने नंतर अस्वस्थता अनुभवत रहाणे ह्या सगळ्या संघर्षातून मी वेळोवेळी गेलेली आहे. मागे मानुषी ह्यांच्या एका कथेत एक बाई परदेशातल्या एका कुटुंबात घर सांभाळण्याची नोकरी घेतात असं काहीसं कथानक होतं. त्यांची मुलगी लग्न होऊन त्यात शहरात असते आणि तिलाही अशा प्रकारच्या मदतीची गरज असते. त्या वेळी ती कथा ( विशेषतः शेवट ) वाचून भलताच त्रास झाला होता. स्वातीची 'उत्तर' किंवा शोनूची 'सावरा रे' वाचतानाही हेच झालं होतं. 'उत्तर' तर सुरुवातीला पटलीही नव्हती पण त्या खालच्या चर्चेने आंणि स्वातीच्या पोस्टने मात्र माझं चांगलंच प्रबोधन केलं ( अॅरिस्टॉटलचं 'Probable impossibilities are to be preferred to improbable possibilities' हे वाक्य जवळजवळ विस्मरणात गेलं होतं. ती पोस्ट वाचून त्यावर नव्याने विचार केला गेला. ) त्या पोस्टने कथांकडे बघायचा माझा दॄष्टीकोन बदलला असं म्हणता येईल. शेवटी साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब आहे. ते चांगल्या गोष्टींचे असेल नाहीतर वाईट. किंवा एखाद्या कथेत मला आवडेल अशीच गोष्ट प्रतिबिंबित झालेली असेल तरी ती हुबेहूब असेल नाहीतर distorted ( लेखकाची शैली ) ! मी प्रत्येक वेळी स्वतःला मध्ये घालण्याची मोठीच चूक करत होते. स्वतः न डोकावता प्रतिबिंब बघावं. आवडलं तर आवडलं, न आवडलं तर अशी कित्येक न आवडणारी / न पटणारी माणसं आजूबाजूला असतातच की. कथा आवडली नाही, पात्रं आवडली नाहीत हे सांगणं ठीक पण त्यांनी कसं वागायला हवं होतं किंवा शेवट असा हवा होता हे सांगणं हा आपला अधिकार नाही असं आता वाटतं.
वरच्या कथेत डिटेलिंग पुष्कळच कमी आहे असं वाटलं. पण जेवढं आहे त्यावरुन गार्गी परिस्थितीला शरण गेलेलीच दिसते त्यामुळे शेवट वाचून फारसं आश्चर्य वाटलं नाही
मी पहिल्या पोस्टीतच
मी पहिल्या पोस्टीतच लेखिकेच्या कथा लिहिण्याचा सन्मान केला आहे. तो तिचा हक्क आहे. आपला एक प्रतिसाद आहे फक्त. नी, रैना, शर्मिला उत्तम पोस्टे.
माझी कामातली प्रूव झालेली अक्कल काढणार्या माणसाबरोबर मी रिलेशनशिप तर सोडा कॉफी पण पिऊ शकणार नाही. ती कॉफी त्याच्यावर फेकण्याचाच चान्स आहे. त्रास व तड्जोडी सर्व एकटे पालक करतातच. ही गार्गी एका टेंटेटिव नात्यात आहे पण सर्व एकटीनेच करत आहे. म्हणून उलट वाईट वाट्ले तिच्या मेहनतीचे. सर्व एकट्यानेच करायचे तर काय/कसे करायचे ते स्वातंत्रय हवे. जर दोघांचा संसार आहे तर त्याचा सहभाग हवा. हे नॉन निगोशिएबल आहे. सासरा इत्का इन्फ्लेक्सिबल असेल तर ही कॅन टेक अ हाइक. पहाटे अंघोळ करून ती आजारी पडली तर? मी घर तोडायचा विचार शेवट परेन्त करणार नाही पण जर हेच व असेच असेल तर माझ्या मुलींना जास्त चांगल्या ट्रीट मेंट चा हक्क आहे. त्यांच्या गरजेला आई नसेल तर आई बनून काय उपयोग? मग बाबा तरी हवा. जो प्रेम करेल, घेऊन घरी येइल. जेवू घालेल औषधे देइल. उत्तम चर्चा.
गुब्बी, पुलेशु ग.
>>त्यांच्या त्यागाचं
>>त्यांच्या त्यागाचं उदात्तीकरण होऊ नये
अनुमोदन. नीधपच्या सगळ्या प्रतिसादाशी सहमत.
कथा आवडली शुभांगी.
कथा आवडली शुभांगी.
करिअरच्या ऐवजी घरातल्या
करिअरच्या ऐवजी घरातल्या जबाबदार्यांना प्राधान्य देणं हा "रड्या" पर्यायच आहे का ?
अजिबात नाही. माझ्या माहितीतल्या एका जोडप्याने मुलांचे शिक्षण, तुलनात्मक पगार अशा अनेक गोष्टींचा विचार करून नवरा घरी राहील आणी बायको नोकरी करेल असा निर्णय घेतला. परस्पर संमतीने असा निर्णय घेणे वेगळे आणी पत्नीनेच सोशिकपणे करावे ही अपेक्षा ठेवणे वेगळे.
मामी पटेश आणि आवडेश.
मामी पटेश आणि आवडेश.
गुब्बे, कथा आणि चर्चा दोन्ही
गुब्बे, कथा आणि चर्चा दोन्ही छान! कर्तबगार गार्गीची सर्कस छान उभी केलीस. तोच तो पुरुषी पद्धतीने विचार करणारा आणि शेवटी पश्चाताप करणारा नवरा...चीड आणणारा पण वास्तवच दाखवणारा. छान परावर्तीत केलास.
कथेचा शेवट एकाचवेळी आशादायक आणि निराश करणारा वाटला. आशादायक यासाठी की मुलींना आईचा आणि आईला मुलींचा मनसोक्त सहवास लाभणार. गार्गीला तासभर शॉवरखाली आंघोळ करणे शक्य होणार...(अर्थात पाणी असेल तर :फिदी:) तिची ओढाताण कमी होणार. तिला सिंधूताई सपकाळांचा सिनेमा टिव्हीवर चुकला तरी चित्रपटगृहात जाऊन पहाणे शक्य होणार आणि अजूनही काही आवडीनिवडी जपता येणार...
निराशावादी यासाठी की तिचे करियर हा तिच्या आवडीचाच भाग होता. ती पैशासाठी काम करतेय असे कथेत कुठेच दाखवले नाही. तिच्या प्रोजेक्टच्या प्रेझेन्टेशनमधे तिला उत्साह आहे, चैतन्य वाटते म्हणजेच तो तिच्या आनंदाचाच भाग आहे आणि त्याचा तिने त्याग केलेला आहे. मार्ग शोधायचा अजिबात प्रयत्न केलेला दिसत नाही...
पण एक मात्र आहे. दोन्ही निर्णयांमधल्या प्लस आणि मायनस बाजूंचा विचार करुन त्यातल्या त्यात तिला ज्या निर्णयात जास्त समाधान वाटतं, तो तिने घेतल्याचं जाणवलं...पण जरा घाईघाईतच...
>>कथेचा शेवट एकाचवेळी आशादायक
>>कथेचा शेवट एकाचवेळी आशादायक आणि निराश करणारा वाटला. आशादायक यासाठी की मुलींना आईचा आणि आईला मुलींचा मनसोक्त सहवास लाभणार. गार्गीला तासभर शॉवरखाली आंघोळ करणे शक्य होणार...(अर्थात पाणी असेल तर ) तिची ओढाताण कमी होणार. तिला सिंधूताई सपकाळांचा सिनेमा टिव्हीवर चुकला तरी चित्रपटगृहात जाऊन पहाणे शक्य होणार आणि अजूनही काही आवडीनिवडी जपता येणार.. >>
सानी, काहीतरी गोंधळ होतोय. गार्गीचे आयुष्य आहे तसेच ओढाताणीचे मन मारत जाणार आहे. ती फक्त प्रोजेक्ट एक्झिक्युट करायची जबाबदारी नाकारतेय. जे तिने आधीही दर वेळेला केलेय. घरातले दुसरे कुणी मदत करत नाही म्हणून फरपट होत असताना मुलींचे सगळे एकट्याने करणे म्हणजे मुलींचा मनसोक्त सहवास नक्कीच नाही.
नी,मामी पोस्ट आवडली.
>>so to live with dignity you need to fight.
डेलिया, अगदी पटले.
>>करिअरच्या ऐवजी घरातल्या
>>करिअरच्या ऐवजी घरातल्या जबाबदार्यांना प्राधान्य देणं हा "रड्या" पर्यायच आहे का ?
घरासाठी करीअर सोडणे हा रड्या पर्याय आहे , असे अजीबात कोणाचेही म्हणणे नसेल इथे. पण नायिकेची जी परीस्थिती रंगविली आले कथेत , ती नक्कीच 'रडी' आहे यात शंका नाही. मला 'बंदीनी' सीरियल ची आठवण आली. ती बिच्चारी सगळीकडे खपतीये, मरतीये आणि तरीही शिव्याच खात जगतीये. बरे, एव्हढे करुनही मुलींकडे दुर्लक्षच.
याला 'रडकथा' नाही म्हणणार तर काय ???
आणि मीच वर म्हण्ल्याप्रमाणे हा 'घर' की ' करीअर' असा संघर्ष वाटत नाही मला. घरातील माणसे प्रेमाने, सन्मानाने वागवत असतील तर स्त्री योग्य तो निर्णय आनंदाने घेईल. यात चीड येते सर्वात जास्त ती तिला मिळणार्या अपमानास्पद वागणुकीची. ती अगदी नोकरी न करणारी गृहिणी जरी असेल तरी तिला याच प्रकारची वागणुक मिळेल अगदी २४*७ तिने घरासाठीच कष्ट केले तरीही.
ज्याप्रकारची नायिका कथेत रंगवलेली आहे, त्यावरुन ती समंजस, हुशार, कष्टाळू आणि तिच्या कामाशी ( घरातले किन्वा ऑफिसचे काम दोन्ही ) प्रामाणिक वाटते. अशा स्त्रीला घरात सन्मानपुर्वक वागणुक मिळालीच पाहिजे. नवर्याकडून , सासर्यांकडून आणि मुलांकडून सुद्धा. त्याएवेजी जर तिला फडतुस कारणांवरुन अपमानास्पद वागणुक मिळत असेल आणि त्याला विरोध न करता तीच पड खात असेल (मनातल्या मनात टीपे गाळत ) तर ती रडकथाच , नाही का ?
उलटपक्षी , मी तर म्हणेन तिने मुलींसाठी नोकरी सोडली तरी हरकत नाही. एव्हढी कुतरओढ करण्यापेक्षा ते चांगलेच. पण मला असे अपमानस्पद बोलायचे काम नाही , हे ठणकावून नवर्याला सांगितले पाहिजे. आणि मी स्वयपाक किन्वा घरातील इतर कामे माझ्या सोयीप्रमाणेच करणार , चालत असेल तर घ्या नाहीतर आपापली सोय बघा हे सासर्यांना ठणकावून सांगायला पाहिजे.
त्या नव्र्याच आश्च्र्य वाट्ल
त्या नव्र्याच आश्च्र्य वाट्ल बाबा.माणुस असा कसा बर्? नायिका सुपर् वुमन आहे ना मग अजुन कशि बर त्याला शेप अप नाहि केले तिने?भा.ल्.महाब्ळांचि "नवरा बनवावा तसा बनतो" वाचा एक्दा.
चेश्टा नाही पण , त्या कथेचा मुळ मुद्दा लै भारी होता हो असो.
म्हन्जे लग्न झाल्या बरोबर ही प्रक्रिया सुरु नवरे को पहलेसे बतनेका मालूम करानेका कि भै देखो हम ऐसे है ,हमे ये पसन्द है,वो नहि है,ऐसे बात करो; वैसे मत करो.बेसिक मध्ये मी तुमचि सग्अळ्यन्ची आहे पन पहिला मी माझी आहे.माझा सन्मान मला सर्वात प्रिय आहे.त्यानन्तर तुम्हिच!:)
आन्घोळ करुन ब्रेकफास्ट? गप्पा मारत मारत सास् र्याना सान्गाय् च कि बाबा काय करुया खुप गड्ब ड होते सेरिअल किन्व ब्रेड चालेल का? आणि गडब ड होतेय राहुल मुलिला तयार कर किन्वा बाबा प्लिज मुलिन्चे ड्बे भराल का आज?
किन्वा नवर् को शान्त प णे "सरळ बोल आप् ण दोघे माणुस आहोत". हे जर आल असत तर ................
नोकरि गिव अप करुन्, अप मान सहन करुन, कोणि सान्गित् लेय? कधि प्रेमाने कधि चतुर पणे,तर कधि फाइट करुन आप् ले जग् णे सज वाय् चे.बाय् कान्च्या कडे सॉलिड पट् वाय् चि ताकद असते. ति बिन् बोभाट वापरत रहायला पाहिजे...अरे फिर मजाल है किसिकि....
दुनिया झुकति है गार्गि बस तुम सिखो कैसे ...ऑऊर झु़काओ.
टाय् पिन्ग्च्च्या नानाचि टान्ग...:)
जबरी.... चर्चा! कथा आणि चर्चा
जबरी.... चर्चा!
कथा आणि चर्चा दोन्ही सुरेख.
मलातरी कथेत तिच्या पड घेण्याचं उदात्तीकरण नाही वाटलं. एका समंजस, हुशार, कर्तृत्ववान स्त्रीचं घरात, घरासाठी जवळ जवळ "वाट्टेल तितकं" मोडणं, झुकणं ह्याचं नुस्तं चित्रण आहे. एक उत्तम चित्रण आहे. फक्तं त्याला अधिक भरणा, तपशीलांचा हवा होता असं मला वाटतं.
अगो म्हणतेय तसं आपल्याला बाजूला सारून व्यक्तिचित्रणं, प्रसंग, त्यांची गुंफण जेव्हा बघायचा प्रयत्नं केला तेव्हा, बाहेर ऑफिसात स्वतःचं स्वत्वं टिकवून धरू शकणारी (कदाचित) ती घरात का बरं अशी बिन कण्याची होत असेल? वगैरे माझ्या मनातले प्रश्नं अनुत्तरित रहातायत.
शुभांगी, पुढल्या लेखांची वाट बघते.
शुभांगी कथा म्हणुन छानच
शुभांगी कथा म्हणुन छानच लिहिली आहेत.
सायो, स्वाती२ अनुमोदन
डेलिया, म्हणजेज नायिका "रडी"
डेलिया, म्हणजेज नायिका "रडी" आहे. त्यामुळे निर्णय "रड्या निर्णय" नसून "रडीचा निर्णय आहे असं का ?
नोरा रच्याकने ईब्सेन काय म्हणतो ? बरेच दिवस दिसला नाही... जाताना दार हळू लावणे. मागच्या वेळी आपटलेल्या दाराचे पडसाद अजून वाजताहेत.
हा प्रसंग छोटासा असला तरी
हा प्रसंग छोटासा असला तरी त्यातून अनेक प्रश्न उभा राहतात. ज्यांची उत्तरे शोधणे अवघड आहे. तिची माघार. त्याचं अपमानास्पद(?) बोलणं. त्याला ऑफिसला जायचे आहे म्हणून तिने ऑफिस सोडून येणे. घरच्या जबाबदारीसाठी तिच्याच करिअरवर गदा येणं. छोट्या छोट्या आनंदापासून दूर रहायला लागणं. काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवणं खूप अवघड आहे. नव्या पिढीसमोर शिक्षण, मानवी हक्क, स्त्रीयांचं समाजातलं बदलतं स्थान, त्यांची बदलती मानसिकता, पुरूषी मानसिकतेला आव्हान असणारी नवी सामाजिक रचना, या सगळ्यासोबत मराठी माणूस म्हणून किंवा हिंदू किंवा भारतीय म्हणून कुटूंब व्यवस्थेवर असलेलं प्रेम. व त्या व्यवस्थेच्या फायद्यांची जाणीव, या सार्या बाबी एकाच वेळी चालून येताहेत. योग्य दिशा व अनुत्तरीत प्रश्नांची समाधानकारक उत्तरे सापडायला वेळ लागेल. तोवर आपण असेच अस्वस्थ राहणार आहोत.
संयम, तडजोड, चर्चा, घरी शांत वातावरण, निश्चीत व योग्य दिनचर्या, आरोग्य आणि मनोरंजनाच्या साधनांचा योग्य आधार यातून आदर्श घराची मांडाणी करणं अवघड आहे पण गरजेचही आहे. जवळ जवळ प्रत्येक घरात हा प्रश्न थोड्या फार फरकाने जाणवतोच.
विषय खूप छान मांडला आहे.
अम्या, इब्सेन रे....
अम्या, इब्सेन रे....
बदल केलाय गं
बदल केलाय गं
आवडलं लिखाण.
आवडलं लिखाण.
गुब्बे तुझ्या कथेला माझा
गुब्बे तुझ्या कथेला माझा प्रतिसाद...
माझं काय..?
Pages