फिरुनी पुन्हा

Submitted by शुभांगी. on 20 December, 2010 - 23:25

सोनुला तिने तापाच औषध दिल आणि मांडीवर घेवुन तिला झोप येइपर्यंत हलकेच थोपटत राहिली. तोंडाने अंगाईगीता ऐवजी मोठीचा अभ्यास, तिच्या मॅथ्समधल्या सम्स चालू होत्या. पुन्हा उद्याची तयारी आहेच तिच्या सकाळच्या शाळेची. तरी बर राहुलला रात्रीची शिफ्ट आहे नाहीतर सकाळी ४ वाजता उठायचं अगदी जीवावर येत. मनातले विचार झटकुन तिने सोनुला बेडवर टाकल. मोठीला झोपायला पिटाळल आणि पुन्हा ती स्वयपाकघरात आली. भराभर फ्रीजमधुन भाजी काढुन चिरुन ठेवली उद्या दुपारची आणि सकाळच्या डब्याची. कणीक तिंबुन ठेवली. सगळी झाकपाक करुन, लाईट बंद करुन ती बेडकडे वळली तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते.

अरेच्च्या! राहिल की बघायच, आज टीव्हीवर कुठला तरी सिंधु संकपाळांचा सिनेमा होता पण ह्या कामाच्या गडबडीत टीव्ही कुठे बघायला वेळ मिळावा? उद्या सकाळचे विचार डोक्यात घोळवत ती झोपेच्या अधीन झाली. हे एक बरय, झोप येण्यासाठी अजीबात कष्ट करावे लागत नाहीत. पाठ टेकली की झोप लागते. मधे कधीतरी सोनुच्या कण्हण्याने तिला जाग आली. उठुन तिला औषधाचा एक डोस देवुन ती झोपायला वळणार इतक्याच पहाटे पावणेपाचचा गजर वाजला.

आता कुठली झोप? उठुन चहाच आधण ठेवल. सासर्‍यांच्या बेडरुमवर टकटक केली. हॉलमधे जावुन टीव्ही बंद केला. कधीतरी रात्री उशिरा आल्यावर राहुल टीव्ही बघताबघताच झोपला होता. तिने त्याच्या अंगावरचे पांघरुण सारखे केले. तोंडात ब्रश आणि एका हातात झाडु घेवुन तिने केरवारे केले. चहा घेताघेता सासर्‍यांच्या सकाळच्या नाष्ट्याची तयारी व एकिकडे गॅसवर मोठीच्या डब्याची भाजी टाकली फोडणीला. सासर्‍यांनी चहा घेताघेता फर्मान सोडलच, अजुन अंघोळ नसेल तर मला नाष्टा नको.

गिझर लावल्यापासुन शॉवरखाली तासभर उभ राहण्याची इच्छा तिने परत एकदा मनामधेच दाबली व दोन तांबे घाईघाईत अंगावर घेवुन ती पुन्हा स्वयंपाक घराकडे वळली. मोठीचा डबा भरुन तिने सासर्‍यांसाठी कुकर लावला, पालकाची भाजी करुन ठेवली. आणि मोठीला उठवण्यासाठी बेडरुमकडे वळली.

"मम्मा, थोडा वेळ झोपु दे ना ग अजुन प्लीज"

"नाही पिल्ला, सहा वाजलेत आता बस येइल ग इतक्यात"

"खुप थंडी आहे ग, पाचच मिनिटे झोपते ना" अस म्हणुन ती परत रजईत गेली.

इथं थांबुन उपयोगच नव्हता. तिने स्वतःच्या कपाटातुन प्रोजेक्ट रिपोर्ट्स काढले जे तिने चार दिवसापासुन मेहनतीने केले होते. आज तिचं प्रेझेंटेशन होत कंपनीच्या सी ई ओंसमोर. तयारी झाली होती सगळी पण वेळेत पोचतोय की नाही ही एकच शंका होती.

परत एकदा मोठीला हलवुन आणि थोडस चिडुनच तिने उठवले. ती बिचारी आता निमुटपणे उठली स्वतःच्या चिमुकल्या हातांनी एवढ्या मोठ्या रजईची वेडीवाकडी घडी घातली व बाथरुमकडे वळली. साडेसहा वाजले तरी मोठी अजुन बाथरुममधुन बाहेर आली नाही म्हणुन तिने दारावर दोन तीन थापा मारल्या हलकेच दार ढकलले तर बाईसाहेब गरम पाण्याखाली निवांत झोपल्या होत्या. सकाळची थंडी तिला काही गरम पाण्यातुन बाहेर येवु देत नव्हती. कसतरी तिच्या मागे लागुन तिने मोठीला शाळेसाठी तयार केल व गेटजवळ सोडुन आली.

बापरे तोपर्यंत ७ वाजले होते आता १५ मिनिटात स्वत:चे आवरुन छोटीला पाळणाघरात सोडुन तिला बसस्टॉप गाठायचा होता. सकाळी कितीही लवकर उठा वेळच पुरत नाही अस पुटपुटत तिने भराभर स्वतःच आवरल एका हातात स्वत:ची पर्स प्रोजेक्टची फाईल दुसर्‍या हातात छोटीची बास्केट, कडेवर सोनु असा लवाजमा घेवुन ती गाडीकडे पार्कींगमधे आली. ओह थंडीमुळे हल्ली गाडी लवकर सुरु होत नाही. तिने चालतच देशपांडे काकुंच घर गाठल. तोपर्यंत कंपनीची बस स्वारगेटवरुन निघाल्याचा मिस कॉल येवुन गेला होता. तिने दारातुनच सोनुला देशपांडे काकुंच्या हवाली केल. ती बिचारी झोपेतच होती आणि थोडी ग्लानीतसुद्धा.

काय राहिल, काय विसरल याचा विचार करायला सुद्धा वेळ नव्हता. तशीच घाईघाईत गाडीत शिरली. ड्रायव्हरने आज परत एकदा रागाने बघितल. पण त्याच्याकडे लक्ष देण तिला महत्वाच वाटल नाही. लगेच शेजारचीने तिच्या सासुच्या कंप्लेंटस करायला सुरवात केली. तिने हसुन प्रतिसाद दिला. थोड समजावल. डोक गाडीच्या सीटवर टेकताच डोळे मिटले व आजच्या प्रोजेक्टची रिव्हीजन केली.

हा एकमेव अर्धा तासाचा वेळ तिचा हक्काचा होता. या अर्ध्या तासात ती बर्‍याचदा मुलींचा, स्वत:चा, घराचा, भविष्याचा विचार करायची. स्वप्न रंगवायची प्रोजेक्ट लीड करण्याची. आजपर्यंत खुप संधी आल्या पण काही ना काही कारणाने तिला पाणी सोडाव लागल त्यावर. पण आता नाही यावेळी नाही हार पत्करायची. मनाची पक्की तयारी झाली होती तिच्या. आयुष्यभराच स्वप्न पुर्ण व्हायची वेळ आल्यावर माघारी फिरणार नव्हती ती. राहुलशी बोलुन झाल होत, तो तयारही झाला होता. एक सुस्कारा सोडला तिन विश्वासाने.

शेजारणीने हळुच धक्का देवुन उठवल्यावर तिने डोळे उघडले पटकन बसमधुन उतरली. देसाई सरांना भेटायलाच हव या प्रोजेक्टमधे खुप मदत केलीय त्यांनी. देसाई शांतपणे चहा घेत होते. तिच्या चेहर्‍यावरची उत्सुकता बघुन त्यांनी तिला डोळ्यांनीच आश्वस्त केल. ती हसली व कॉन्फरंसकडे वळली.

खरतर पहिल प्रेझेंटेशन नव्हत तिच पण हुरुप आणि उत्साह पहिल्यासारखाच होता. आजपर्यंत आत्मविश्वासाने डिझाईन केलेली सगळी प्रोजेक्टस कुणीतरी दुसर्‍यानेच एक्झिक्युट केली होती. पण यावेळी तीच एक्झिक्युट करणार असं तिन देसाईंना सांगीतल होत. त्यांना कोण अभिमान वाटला होता तिचा. त्यांची खुप आवडती विद्यार्थिनी होती ती. त्यांच्यानंतर त्यांचा वारसा जपणारी.

खुप छान प्रेझेंट केले तिने रिपोर्टस स्लाईडसच्या सहाय्याने स्वतःच्या प्रभावी व्यक्तिमत्वाने. देसाईसरांची कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर तिने मोबाईल पाहिला. बापरे राहुलचे ६ मिसकॉल. तिने बाहेर येवुन लगेच त्याला कॉल केला.

"मुर्ख कुठे तरफडली होतीस इतका वेळ?? केव्हाचा फोन करतोय मी"

"राहुल अरे ऑफिसात आहे ना मी"

"माहितिये, खुर्चीवर बसुन कॉम्पवर बडवायला काय अक्कल लागते ग??"

"काय झालय?" तिने स्वतःचा अपमान गिळत विचारल.

"अरे वा, आहे की आठवण घराची" तो कुत्सितपणे म्हणाला.

"फोन का केला होतास?"

"सोनुला ताप असताना तू गेलीसच का ऑफिसला?? तिला कोण सांभाळणार??"

"अरे मी दिलय औषध तिला"

"आणि देशपांडे काकुंना कोण सांगणार?? त्यांचा दोनदा फोन येवुन गेला" राहुलने रागाने फोन आपटला.

तिला आठवल काय विसरल होत ते, प्रोजेक्टच्या नादात आणि सकाळच्या घाईत ती देशपांडेकाकुंना सोनुच्या तापाच सांगायचच विसरली होती. तिने लागलिच त्यांना फोन केला. सोनुच्या तब्येतीची चौकशी केली. सोनु रडुन झोपली होती. मोठीच्या शाळेतुन प्रोजेक्ट पुर्ण न केल्याने नोटीस आली होती. तिने देशपांडे काकुंना हे राहुलला न सांगण्याचे कबुल करुन घेवुन फोन ठेवला.

राहुलचा परत एकदा फोन आला.

"हातातल काम सोडुन लगेच घरी ये, बाबांचा पाय मुरगाळला आहे आणि मला आता सेकंड शिफ्टला जायच आहे."

"पण राहुल" पुढच ऐकायला राहुल लाईनवरच नव्हता.

प्रोजेक्ट मिळाल्याचा आनंद, देसाईसरांची पाठीवरची थाप, इतरांनी केलेल कौतुक, मुलीच आजारपण, नवर्‍याचा त्रागा, मैत्रीणीची सासु, मोठीचा शाळेतला प्रोजेक्ट सगळ डोक्यात मोठा पिंगा धरुन नाचायला लागल.

का सगळ मी सहन करायच?? मुली काय माझ्या एकटीच्याच का?? कुणी कुणी मदत करत नाही. किती किती फ्रंटवर लढायच?? नवरा म्हणुन तो करतो ते कष्ट मग मी काय करते?? मुलींचा अभ्यास मीच घ्यायचा का? सगळ्यांची दुखणी खुपणी मीच करायची का? घर आणि संसार फक्त माझाच आहे का?? मला माझा विचार करायचा अधिकारच नाही का?? मी आकाशात भरारी मारायची नाहीच का? मला कायम दुसर्‍यांसाठीच जगाव लागणार का?

कितीतरी प्रश्न आणि फक्त प्रश्न उत्तर माहित असलेले नसलेले किंवा ज्यांच्या उत्तरांची कवाड आपणच बंद केलेले. न संपणारे प्रश्न.

तिने मनाचा निश्चय केला यासगळ्यातुन बाहेर पडण्याचा, स्वत:च आयुष्य परत एकदा स्वतःच्या पद्धतिने जगण्याचा. ती देसाईसरांच्या केबीनकडे वळाली.

घरी गेल्यावर सासर्‍यांच्या रुममधे डोकावली. ते कण्हत होते 'आई ग, फार दुखतय ग'. तिच्यातली आई लगेच जागी झाली. तिने त्यांना हाताला धरुन उठवल दवाखान्यात नेल. तिथुनच देशपांडे काकुंना फोन करुन उशिरा येतेय थोडी, तुमच्याकडेच दोघींना खिचडी खायला घाला अस सांगीतल. सासर्‍यांना घेवुन घरी यायला बराच उशिर झाला. मग त्यांना गरम गरम उपमा करुन दिला खायला व ती मुलींना आणायला देशपांडे काकुंच्या पाळणाघराकडे गेली.

मुलिंचे कोमेजले चेहरे पाहुन पोटात तुटल तिच्या. सोनुला जवळ घेताना तिने मोठीशी तिच्या प्रोजेक्टबद्दल डिस्कस केल. तिची कळी खुलली. आई पुन्हा एकदा वाट्याला आली होती त्यांच्या १२ तासांनंतर.

घरी आल्यावर तिने सोनुसाठी डॉ. मानकरांच्या हॉस्पिटलमधे फोन करुन दुसर्‍या दिवशीची अपॉईंट्मेंट घेतली. सोनुला परत औषध दिल. तिच्या डोक्यातुन हात फिरवताना तिला सुद्धा दिवसभराच्या थकव्याने झोप लागली.

पहाटे कधीतरी राहुलने तिच्या मानेखाली उशी दिली, अंगावर पांघरुण टाकल, सोनुला गादीवर ठेवल. तिच्या कपाळावर येणार्‍या केसांना बाजुला सारुन तो हलकेच पुटपुटला,

"मी खुप वाईट आहे ना, बट स्टील आय लव्ह यु गार्गी"

हसली ती सुद्धा आणि बर्‍याच गोष्टींची आखणी केली मनातल्या मनात, मोठीच्या प्रोजेक्टला लागणारा मायक्रोसॉफ्ट वर्ड्चा स्क्रीनशॉट, सासर्‍यांच इंजेक्शन, सोनुची अपॉईंटमेंट, राहुलचा आवडता बदामाचा शिरा आणि देसाई सरांना प्रोजेक्ट एक्झिक्युट करत नसल्याचा इमेल.

गुलमोहर: 

हे राम. असुदेंनी रॉकेल ओतलेले आहे. मी काडी टाकायचे सत्कर्म करते Proud

करिअरच्या ऐवजी घरातल्या जबाबदार्‍यांना प्राधान्य देणं हा "रड्या" पर्यायच आहे का>>
तिने कायम तसे करणे, करावे लागणे (कशामुळेही), तिने तडजोडी कराव्या बाई म्हणून अशी अपेक्षा करणे हे चुकीचे आहे.
स्वेच्छा/ आनंदाचा भाग असेल तर प्रश्नच मिटला.

करेक्ट रैना, मला हेच म्हणायचय. तीने स्वतः घेतलेला निर्णय आहे तो. आजूबाजूच्या परिस्थितीमुळे तो अनिच्छेने घेतलेला आहे अस वाटू शकतं.

हेच पुरुषांच्याही वाट्याला येउ शकतं. एखाद्या गोष्टीत रस / गती असतानाही, दुसरा पर्याय निव्वळ पोटासाठी / कौटुंबिक जबाबदार्‍यांसाठी घ्यावा लागण ह्यातही नेमक हेच दु:ख दडलेल आहे.

शेवटी स्वेच्छा असली तरीही लॉन्ग टर्मस् चा विचार करुन घेतलेला निर्णय आहे. ईट शुड बी रिस्पेक्टेड

शर्मिला तुझ्या वैयक्तित मतांचा खरच खुप आदर आहे. आणि ती चुकीची आहेत अस मी अजिबात म्हणत नाहीये.
पण फक्त आपल्यासारख्या विचार करणार्‍यांमुळे हे चित्र किती अंशी बदलतय हे महत्वाच. पण वास्तव हे आहे की त्याच प्रमाण खुप कमी आहे. आणि हे वास्तव बदलायचा प्रयत्न नक्कीच झाला पाहिजे पण नाकारुन तर चालणार नाही ना?

रैना, साधना, शर्मिला बौद्धिक चर्चा चाललिये त्यामुळे थांबु नका. आपण कुणावरही वैयक्तित ताशेरे ओढत नाही आहोत. फक्त आपली मत मांडतोय आणि कथा हे एक निमित्त आहे.

डेलिया, चर्चा वाढवुन माझ्या कथेचा टीआरपी वाढवत नाहिये बरका मी Wink

तीने स्वतः घेतलेला निर्णय आहे तो >> असुदे? तिने तो आनंदाने घेतलाय का? कथेतून नक्कीच असं जाणवत नाहीये. परिस्थितीने (किंवा घरच्या व्यक्तिंच्या आडमुठेपणामुले) हा निर्णय घेणं तिला भाग पाडलय असंच तर दिसतय कथेत.

घरातल्या 'कर्त्या' बाईला असा निर्णय घ्यायला लागणे, अशी तडजोड करायला लागणे हे एक कुटुंब म्हणून आपल्याला कमीपणा आणणारं आहे असा अ‍ॅटीट्यूड जोपर्यंत समाजात डेव्हलप होत नाही तोपर्यंत अशा चर्चा करत रहायलाच हव्या. अगदी टोकाला जाऊनही.

बाईची करिअर हा तिच्या 'वैयक्तिक अचिव्हमेन्टचा' भाग आहे आणि तो 'कुटुंबा'ला मारक आहे हा दृष्टीकोन भल्या भल्या स्त्रीपुरुषांचा असतो. याउलट पुरुषाची करिअर हा कुटुंबाचा अभिमानाचा भाग ठरतो. एकविसाव्या शतकातही हे असं असावं यात काहीच चुकीचं वाटत नाही अनेकांना हे दुर्दैव.

जी कुटुंब घरच्या बाईच्या (गृहलक्ष्मीच्या म्हणा अगदी) करिअरला, बाहेरच्या जगातल्या तिच्या प्रगतीलाही 'आपली' मानून तिला सपोर्ट करतात, तडजोडी करतात फक्त ती आणि तीच कुटुंब आजच्या काळातली आदर्श कुटुंब.

शुकु, तुझी कथा मला आवडली होती आणि ही चर्चाही...
खरं सांगायचं तर आपल्याकडे मुलींनी लग्न झालं की थेट झिजायलाच सुरूवात करावी अशीच अपेक्षा केली जाते... आणि बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा स्थैर्य असणं आणि त्यासाठी प्रयत्न करणारे असतात लोक... मोठ्या मुश्किलीने उभा केलेला संसार का मोडायचा? शिवाय लग्नाला काही वर्ष झाल्यावर स्वभावाची पारख होतेच एकमेकांना... एकीकडे आलेला राग, त्रागा, चिडचिड आणि मग समर्पणवृत्ती... हेच स्त्रीस्वभावाचं उत्तम चित्रण केलं आहेस तू कथेत... मनात चाललेली आंदोलनं, झुगारून देण्यासाठीची तिची धडपड आणि सगळं असूनही तिचं प्रेम... राहुलचा राग आला नाही मला... त्याचं वागणं टिपिकल पुरुषी वृत्तीला साजेसं आहे... आपली चूक आहे हे त्याला जाणवलंय आणि त्याचं प्रेमही आहे तिच्यावर... त्याला दुटप्पीपणा नाही म्हणता येणार... याच प्रेमावर तिने आपला प्रोजेक्ट निछावर केलाय... तिला कळलंय आयुष्यात काय हवं आहे ते...
कथेचं नावही साजेसं... हा प्रसंग एकदा घडलेला नाही... अनेकदा घडला असणार आणि पुन्हा हेच घडत असणार...

<< हा निर्णय घेणं तिला भाग पाडलय>>

कोणी फोर्स केलाय ?

मुलांच प्रेम, नवर्‍याच प्रेम (?), स्वतःच्या भविष्याबद्दलची असुरक्षिततेची भावना ?

थिंक अगेन. ही लढाई ती हरलीये असं वाटत असेल तर तीला हरवणारी ती स्वतःच आहे.

जी कुटुंब घरच्या बाईच्या करिअरला, बाहेरच्या जगातल्या तिच्या प्रगतीलाही 'आपली' मानून तिला सपोर्ट करतात, तडजोडी करतात फक्त ती आणि तीच कुटुंब आदर्श असतात. >> जर याची कुटुंबीयांनी वारंवार वाच्यता न करुनही, त्या स्त्रीला त्याची जाणीव असेल, आणि ती जे करते आहे त्यात समाधान, आनंद स्त्री आणि कुटुंब दोघांनाही वाटत असेल तर!

कोणी फोर्स केलाय ? >>> पुन्हा तेच? "परिस्थितीने (किंवा घरच्या व्यक्तिंच्या आडमुठेपणामुळे) हा निर्णय घेणं तिला भाग पाडलय असंच तर दिसतय कथेत."

मुलांच प्रेम, नवर्‍याच प्रेम (?), स्वतःच्या भविष्याबद्दलची असुरक्षिततेची भावना ? >>> नाही पटले.
कसलं प्रेम? आणि तिलाच का ते वाटावं? मुलं पुरुषांची नसतात का?

बाईची करिअर हा तिच्या 'वैयक्तिक अचिव्हमेन्टचा' भाग आहे आणि तो 'कुटुंबा'ला मारक आहे हा दृष्टीकोन भल्या भल्या स्त्रीपुरुषांचा असतो. याउलट पुरुषाची करिअर हा कुटुंबाचा अभिमानाचा भाग ठरतो. >> अनुमोदन.
म्हणजे पुरुषाच्या आयडेंटीटीशी अर्थकारण जोडले व्यवस्थित. पुरुष म्हणजे त्याचे काम/आर्थिक जवाबदारी, आणि बाई म्हणजे नातीगोतीगोतावळादेह असे का ते म्हणे?

परत तेच. परिस्थिती तुमच्यावर निर्णय लादत नाहीये. ते तूम्ही स्वतःहून घेता. मामींनी लिहिलाय तो (किंवा तत्सम) पर्याय उपलब्ध नाहीये का ? तो निर्णयही ह्याच परिस्थितीत घेतला जाउ शकतो ना ? मग का नाही घेतला ?

चॉईस वॉज हर्स अ‍ॅन्ड शी चोज व्हॉट शी फेल्ट दॅट शी कॅन अ‍ॅफोर्ड (नॉट व्हॉट शी 'वॉन्टस्') राईट ?

तीची लिमिटस् तीने ठरवलीयेत. ती बरोबर असतील वा चूक. पण तो तीचा निर्णय आहे.

<< नाही पटले.
कसलं प्रेम? आणि तिलाच का ते वाटावं? मुलं पुरुषांची नसतात का? >>

मलाही नाही पटलय. तूम्ही द्या बरं उत्तर.

(वरचा एकही शब्द कुणाला वैयक्तिक लिहिलेला नाही आहे. बर्‍याच दिवसांपासून एक प्रश्न मनात खदखदतोय. त्याच्या निराकरणाचा प्रयत्न चाललाय)

राहुलचा राग आला नाही मला... त्याचं वागणं टिपिकल पुरुषी वृत्तीला साजेसं आहे... आपली चूक आहे हे त्याला जाणवलंय आणि त्याचं प्रेमही आहे तिच्यावर... त्याला दुटप्पीपणा नाही म्हणता येणार... याच प्रेमावर तिने आपला प्रोजेक्ट निछावर केलाय... तिला कळलंय आयुष्यात काय हवं आहे ते...>>>>>>>> तिने राहुलबरोबर ह्या प्रोजेक्टसंदर्भात चर्चा केलेली आहे.तरीही राहुल तिच्यावर ओरडतो,कारण नेमकी त्याचदिवशी मुलगी आजारी पडते,त्याच्या वडलांचा पाय मुरगळतो.जर हे झालं नसतं तर राहुल गुडीगुडीच वागला असता.एखाद्या दिवशी राहुलने सांभाळलं तर काय जातं?
आणि जर मी चुकत नसेन तर राहुलला मुलगी आजारी आहे हे तेव्हा कळतं जेव्हा पाळणाघरातुन फोन येतो,नाहितर त्याला कळलं पण नसतं.(ठमादेवी,मी वाद नाहि घालत हं तुमच्याबरोबर Happy )
राहुलचं गार्गीवर प्रेम असेलहि पण मलातरी असलं प्रेम नाहि पटत्.सगळं गार्गीने करुन झाल्यावर फक्त सॉरी?
आणि गार्गीपण दुसर्‍या दिवसापासुन पुन्हा रडत रडत हे सगळं करणार. राहुल काय करतो (कथेत सांगितल्याप्रमाणे) तर नोकरी.आणि गार्गी नोकरी,मुलींचं सगळं बघणं.सासर्‍यांची काळजी,स्वयंपाक्,पहाटे ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत काम एके काम. हे नाहि पटलं. Sad

ही लढाई ती हरलीये असं वाटत असेल तर तीला हरवणारी ती स्वतःच आहे.>>>>>>>>>> माझ्याकडुन ह्याला जोरदार अनुमोदन. जोपर्यंत ती सहन करेल तोपर्यंत असच चालणार. तीने विरोध करावा,लढावं,समोरचा बदलु शकतो.जरी नाहि बदलला तरी आपलं आयुष्य आपल्या तत्वांवर जगण्याचं समाधान तरी मिळतं.

(वरचा एकही शब्द कुणाला वैयक्तिक लिहिलेला नाही आहे. बर्‍याच दिवसांपासून एक प्रश्न मनात खदखदतोय. त्याच्या निराकरणाचा प्रयत्न चाललाय)
आणि गार्गीपण दुसर्‍या दिवसापासुन पुन्हा रडत रडत हे सगळं करणार. राहुल काय करतो (कथेत सांगितल्याप्रमाणे) तर नोकरी.आणि गार्गी नोकरी,मुलींचं सगळं बघणं.सासर्‍यांची काळजी,स्वयंपाक्,पहाटे ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत काम एके काम. हे नाहि पटलं. >>>

मला वाटतं आपण आता शुभांगीच्या कथेचा 'एक साहित्य' या मूल्यांकनाच्या दृष्टीकोनातून विचार न करता समाजातल्या अशा कोणा एका 'गार्गीची केसस्टडी' वर चर्चा होते आहे असा विचार करुया. म्हणजे मग ती पुरेशा वस्तुनिष्ठतेने होऊ शकेल आणि 'वैयक्तिक बोलत नाही आहोत'वगैरे कमेन्ट्स टाकण्याचे कष्ट वाचतील सगळ्यांचे Proud

समाजातल्या अशा कोणा एका 'गार्गीची केसस्टडी' वर चर्चा होते आहे असा विचार करुया.
शर्मिला, हे मी आधीच सांगितलय बघ वर.
अम्या आता तुला तुझे प्रश्न विचारायला हरकत नाही. Happy

भान मला असं वाटतं की आपल्याला पटो अथवा न पटो... सर्वसाधारण घरांमधून हेच होतं... आपण कितीही, काहीही असावं असं म्हटलं तरी हे घडणं आपण थांबवू शकत नाही... (म्हंजे आपल्या घरात, आपल्यापुरतं काय करू शकतो हे आपण ठरवू शकतो..) जवळपास ७० टक्के घरांमध्ये हेच होतं... घरात पाहुणे आले, मुलं आजारी पडली, काहीही झालं तरी स्त्रीनेच सांभाळायचं, ही वृत्ती आहे...
आपल्या मागच्या पिढ्यांनी मुलग्यांचे लाड करून त्यांना घरच्या कामापासून दूर ठेवलं... बाईने घरच्या सगळ्या जबाबदार्‍या उचलायच्या... मुलाने काम केलं, जरा घरात लक्ष दिलं की मग तो बायकोचा बैल झाला... हेच लाड डोक्यात गेलेला एक मुलगा आहे हा... तो ऑफिसाबद्द्ल जे बोलला ते त्यांचे संस्कार... आणि रात्री त्याने म्हटलं की सॉरी आणि प्रेम वगैरे हे त्याचं मन आहे... आता मी मला काय पटलं, काय नाही हे सांगत नाहीये तर जे घडतं ते सांगतेय... ही अशीच्या अशी घटना (म्हंजे संदर्भ थोडे वेगळे) मी पाहिली आहे... या पुढच्या पिढ्यांमध्ये असं होणार नाही कदाचित... पुरुषाने मारलं तरी बाईने शांतच राहायचं असे संस्कार आपल्या आधीच्या पिढ्यांनी केलेत... ते बदलणं आपल्या हातात आहे... याच पुरुषी अहंकारामुळे राहुलला आपल्या बायकोचं काम खालच्या दर्जाचं वाटतं...
माणूस बदलत असतो, हा असा...
आमच्या शेजारी एक मामा राहतात... ते त्यांच्या बायकोशी भांड भांड भांडतात... मारायला हातही उचलतात... पण मामी एक दिवस कुठे गेल्या, किंवा त्यांची तब्येत बिघडली की कासावीस होतात... आम्ही चिडवतो त्यांना... तुझं माझं जमेना, तुझ्याशिवाय करमेना... याला दुटप्पीपणा कसा म्हणणार?

मला वाटतं आपण आता शुभांगीच्या कथेचा 'एक साहित्य' या मूल्यांकनाच्या दृष्टीकोनातून विचार न करता समाजातल्या अशा कोणा एका 'गार्गीची केसस्टडी' वर चर्चा होते आहे असा विचार करुया. म्हणजे मग ती पुरेशा वस्तुनिष्ठतेने होऊ शकेल आणि 'वैयक्तिक बोलत नाही आहोत'वगैरे कमेन्ट्स टाकण्याचे कष्ट वाचतील सगळ्यांचे >>>>>> मस्तच्,पण आशा करते आतापर्यंत जशी चर्चा चालु आहे तशीच पुढे पण निकोप चर्चा व्हावी Happy

शर्मिला, तसच आहे. इथे कथेवर चर्चा कुठे केलीये मी ? Happy वैयक्तिक वगैरे अशासाठी लिहिलय की, हे अगदीच स्त्रीमुक्ती, पिळवणूक , अन्याय वगैरेंवर जाउ नये म्हणून

कशाचे उत्तर देऊ असुदे?

चॉईस वॉज हर्स अ‍ॅन्ड शी चोज व्हॉट शी फेल्ट दॅट शी कॅन अ‍ॅफोर्ड (नॉट व्हॉट शी 'वॉन्टस्') राईट >> अग्रीड. पण समाजात अशा अनेक स्त्रियांवर आणि स्त्रियांवरच ही वेळ का यावी? दर वेळेस तो त्यांचा चॉईस असतो ?

हे अगदीच स्त्रीमुक्ती, पिळवणूक , अन्याय वगैरेंवर जाउ नये म्हणून >> मग हे सगळे कशावरुन येतात रे? आपण तेच बोलतोय आणि/पण ते बोलत नाही आहोत असं उगीच आपल्याला वाटतंय. Happy

नाय आशूडी. मी त्यावर नाही बोलते.

मी एका मुद्द्यावर बोलतोय.

माणसाने घेतलेला निर्णय हा परिस्थितीनुरुप वगैरे असला तरीही तो त्याचा / तीचा व्यक्तीसापेक्ष असतो. त्याला "रड्या निर्णय" किंवा गतिकतेने घेतलेला निर्णय स्मजून कीव करायला वा शस्त्र उगारत बसू नये.

तो निर्णय त्याने / तीने घेतला कारण त्याला किंवा तीला पटला म्हणून

'प्रेम' ही एक अत्यंत अतार्किक गोष्ट असू शकते ह्यात. उदा.- माझं माझ्या नवरा/संसार/मुलं ह्यावर त्यांच्या गुणदोषांसकट माझ्या नोकरी/ करियर/ अचिव्हमेन्ट्सपेक्षा जास्त प्रेम आहे. म्हणून जेव्हा वेळ येईल दोन्हीपैकी एकाचा चॉईस करायची, तेव्हा मी नवरा-मुलं ह्यांनाच प्राधान्य देणार. 'त्याग' ह्याचीच हीही एक बाजू.

तटी: उदाहरणातील 'मी' म्हणजे मी नाही, बाईची मानसिकता लिहिली आहे फक्त Happy

पूनम मुद्दा मान्य, पण मुळात एकाचीच चॉइस का करावी लागावी?
बाईची करिअर हा तिच्या 'वैयक्तिक अचिव्हमेन्टचा' भाग आहे आणि तो 'कुटुंबा'ला मारक आहे हा दृष्टीकोन भल्या भल्या स्त्रीपुरुषांचा असतो. याउलट पुरुषाची करिअर हा कुटुंबाचा अभिमानाचा भाग ठरतो.>>> अनुमोदन

कथेसंदर्भात रैना, कविता यांना अनुमोदन.

पण ही निवड त्या 'प्रेमात' करायची वेळ ही बाईवरच का येते? Happy
मग याचीच corollary पुरुषांचे बायको/ संसार/ मुलं यापेक्षा नोकरी/करियर/अचिव्हमेंटस वर जास्त प्रेम असते असे असते का?

मग याचीच corollary पुरुषांचे बायको/ संसार/ मुलं यापेक्षा नोकरी/करियर/अचिव्हमेंटस वर जास्त प्रेम असते असे असते का?>>> अगदी अगदी

सुंदर लिखाण्..विचार करण्यास लावणारी कथा.
आवड्ली....

गार्गि नावाचं पात्र सोडुन.

"मन मारुन जगणे काळ्यापाण्याची शिक्षा" "सोन्याच्या पिंजर्‍यातला पक्षि"....असं माझ मत.

असं मन संसारात सुध्दा रमणार नाही.

'वाळवंटात' मन मारुन जगणारा,
चातक

एक्झॅक्टली रैना. असुदे, आता हे रैनाचं पोस्ट सांगेल बघ, की हे विषय नेहमी तिकडेच का जातात. तू म्हणतोस तशी शस्त्र उगारली जातात, उगारावी लागतात कारण हे निर्णय घेणारी बहुतांशी स्त्रीच असते. मग अर्थातच प्रत्येक मुद्यामागे "असे का?" या प्रश्नाचे शेपूट लागले की ती होते स्त्रीमुक्ती, पिळवणूक, अन्याय यावरची चर्चा.

Pages