Submitted by पुरंदरे शशांक on 19 December, 2010 - 10:18
सय
घरातून दूर जाता
सय घरट्याची येई
सय मावेना मनात
डोळ्यातून मुक्त वाही
सय येई चिमण्यांची
सय बाग गुलाबाची
सय होऊनी असह्य
ऊराचाची वेध घेई
जिवलगाचीही सय
वेळ साधूनिया घेई
मखमली क्षण सारे
नभ झाकोळून जाई
रान ओले पाहताना
मन चिंब होत राही
चैत्रपल्लवी फुलता
मनवेडे अंकुरेही
दिठी शोधतसे साथ
रान घाटमाथ्यातून
येई सामोरी साथीला
काटेसावरी फुलून
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
जिवलगाचीही सय वेळ साधूनिया
जिवलगाचीही सय
वेळ साधूनिया घेई
मखमली क्षण सारे
नभ झाकोळून जाई>> अप्रतिम....!
आता मलाही येउ लागली.. खरंच.
छान.
छान.
मस्तच रे !
मस्तच रे !
"जिवलगाचीही सय वेळ साधूनिया
"जिवलगाचीही सय
वेळ साधूनिया घेई
मखमली क्षण सारे
नभ झाकोळून जाई"
.... छान
अष्टाक्षरी छान जमलेय.
फक्त शेवटच्या ओळीत ९ अक्षरे का ??
उल्हासकाका, गडबड
उल्हासकाका,
गडबड दाखवल्याबद्दल खूप धन्यवाद, असेच लक्ष असू द्या. बदल केलाय, कसा वाटतोय?
सर्व रसिकांचे मनापासून आभार
सर्व रसिकांचे मनापासून आभार
मस्त !
मस्त !
चातक, बी, रुणुझुणू, अवल -
चातक, बी, रुणुझुणू, अवल - मनापासून आभार.
कित्ति छान लिहिले आहे. वाह.
कित्ति छान लिहिले आहे. वाह.
जिवलगाचीही सय
वेळ साधूनिया घेई
मखमली क्षण सारे
नभ झाकोळून जाई
असे लिहिणे सोपे नाहि. नक्किच :).