सय

Submitted by पुरंदरे शशांक on 19 December, 2010 - 10:18

सय

घरातून दूर जाता
सय घरट्याची येई
सय मावेना मनात
डोळ्यातून मुक्त वाही

सय येई चिमण्यांची
सय बाग गुलाबाची
सय होऊनी असह्य
ऊराचाची वेध घेई

जिवलगाचीही सय
वेळ साधूनिया घेई
मखमली क्षण सारे
नभ झाकोळून जाई

रान ओले पाहताना
मन चिंब होत राही
चैत्रपल्लवी फुलता
मनवेडे अंकुरेही

दिठी शोधतसे साथ
रान घाटमाथ्यातून
येई सामोरी साथीला
काटेसावरी फुलून

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

"जिवलगाचीही सय
वेळ साधूनिया घेई
मखमली क्षण सारे
नभ झाकोळून जाई"

.... छान

अष्टाक्षरी छान जमलेय.
फक्त शेवटच्या ओळीत ९ अक्षरे का ??

उल्हासकाका,
गडबड दाखवल्याबद्दल खूप धन्यवाद, असेच लक्ष असू द्या. बदल केलाय, कसा वाटतोय?

कित्ति छान लिहिले आहे. वाह.

जिवलगाचीही सय
वेळ साधूनिया घेई
मखमली क्षण सारे
नभ झाकोळून जाई

असे लिहिणे सोपे नाहि. नक्किच :).