४ बटाटे मध्यम आकाराचे..
२ सिमला मिरची..
अर्धी वाटी तुप..
१ चमचा आले-लसुण पेस्ट..
१ मध्यम आकाराचा कांदा सालासकट गॅस वर भाजुन घ्यावा..
भाजलेला कांदा+६ काजु यांची मिक्सर मधे पेस्ट करुन घ्यावी..
२ चमचे भरडलेले धणे..
४ लाल सुक्या मिरच्या..
३ टोमॅटो ची प्युरी..
१ चमचा कसुरी मेथी..
मीठ चवीनुसार..
१. बटाटया ची साले काढुन त्याच्या प्रत्येकी ८ फोडी करा..
२ सिमला मिरची च्या बिया काढुन मोठे तुकडे करावे..
३.गरम तुपात बटाटे तळुन घ्या. नंतर मिरच्या १ मिनिट च तळुन घ्याव्या..
४आता उरलेल्या तुपात भरडलेले धणे,लाल मिरच्यांचे तुकडे परतुन घ्यावे..
५.लगेच च आले-लसुण पेस्ट्,टोंमॅटो-प्युरी घालुन तुप सुटे पर्यन्त परतावे..
६.आता कांदा-काजु पेस्ट परतावी. तळलेला.बटाटा व मिरची घालावी..
७.चवीप्रमाणे मीठ्,कसुरी मेथी घालुन घालुन पुन्हा एकदा छान परतावे.
गरम पोळी/ लहान गाकरासारखी कडक रोटी[तुप लावुन]/पराठ्या बरोबर वाढावी..
काल केली होती ही भाजी.
काल केली होती ही भाजी. मस्स्स्त झाली!
रेसिपी सोप्पी आहे अगदी. प्रॅडी, एक अंदाज - तो कांदा जर नीट भाजला गेला नसेल तर कच्च्या कांद्याची ग्र्वी कडू लागते. तसे असेल तर एक सोपा उपाय आहे यावर - मंद आचेवर भरपूर परतायची ती ग्रेवी. कांदा नीट शिजला की कडवटपणा जातो.
सुलेखाताई या पाकृतीसाठी
सुलेखाताई या पाकृतीसाठी ध्न्यवाद मी हे आलु करुन पाहिले. एकदम सोप्पी आणी चविला एकदम भन्नाट झाली होती. नवर्याला आणी लेकिला फार आवडली.
ही भाजी पुरीसोबत चांगली लागेल
ही भाजी पुरीसोबत चांगली लागेल का? दसऱ्याला खीर-पुरी, वरण-भात आणि ही भाजी करायचा विचार आहे.
.
.
अशिता,खीर-पुरीबरोबर काही तिखट
अशिता,खीर-पुरीबरोबर काही तिखट -पातळ कालवण हवेच ना ....त्यामुळे छान च लागेल.
धन्यवाद सुलेखाजी!
धन्यवाद सुलेखाजी!
मस्त झाली भाजी!
मस्त झाली भाजी!
थॅक यू सुलेखाताई.
आशिता१३०५, चिन्नु कढाई आलु
आशिता१३०५, चिन्नु कढाई आलु खास आवडल्याबद्दल धन्यवाद.
Pages