कढाई आलु खास

Submitted by सुलेखा on 18 December, 2010 - 01:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ बटाटे मध्यम आकाराचे..
२ सिमला मिरची..
अर्धी वाटी तुप..
१ चमचा आले-लसुण पेस्ट..
१ मध्यम आकाराचा कांदा सालासकट गॅस वर भाजुन घ्यावा..
भाजलेला कांदा+६ काजु यांची मिक्सर मधे पेस्ट करुन घ्यावी..
२ चमचे भरडलेले धणे..
४ लाल सुक्या मिरच्या..
३ टोमॅटो ची प्युरी..
१ चमचा कसुरी मेथी..
मीठ चवीनुसार..

क्रमवार पाककृती: 

१. बटाटया ची साले काढुन त्याच्या प्रत्येकी ८ फोडी करा..
२ सिमला मिरची च्या बिया काढुन मोठे तुकडे करावे..
३.गरम तुपात बटाटे तळुन घ्या. नंतर मिरच्या १ मिनिट च तळुन घ्याव्या..
४आता उरलेल्या तुपात भरडलेले धणे,लाल मिरच्यांचे तुकडे परतुन घ्यावे..
५.लगेच च आले-लसुण पेस्ट्,टोंमॅटो-प्युरी घालुन तुप सुटे पर्यन्त परतावे..
६.आता कांदा-काजु पेस्ट परतावी. तळलेला.बटाटा व मिरची घालावी..
७.चवीप्रमाणे मीठ्,कसुरी मेथी घालुन घालुन पुन्हा एकदा छान परतावे.
गरम पोळी/ लहान गाकरासारखी कडक रोटी[तुप लावुन]/पराठ्या बरोबर वाढावी..

वाढणी/प्रमाण: 
३ जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
भोपाळ ला मिलिटरी एरीयात रहात होते.तिथली माझी पंजाबी मैत्रिण.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल केली होती ही भाजी. मस्स्स्त झाली!
photo (11).jpg

रेसिपी सोप्पी आहे अगदी. प्रॅडी, एक अंदाज - तो कांदा जर नीट भाजला गेला नसेल तर कच्च्या कांद्याची ग्र्वी कडू लागते. तसे असेल तर एक सोपा उपाय आहे यावर - मंद आचेवर भरपूर परतायची ती ग्रेवी. कांदा नीट शिजला की कडवटपणा जातो.

सुलेखाताई या पाकृतीसाठी ध्न्यवाद Happy मी हे आलु करुन पाहिले. एकदम सोप्पी आणी चविला एकदम भन्नाट झाली होती. नवर्याला आणी लेकिला फार आवडली.

.

Pages

Back to top