कढाई आलु खास

Submitted by सुलेखा on 18 December, 2010 - 01:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ बटाटे मध्यम आकाराचे..
२ सिमला मिरची..
अर्धी वाटी तुप..
१ चमचा आले-लसुण पेस्ट..
१ मध्यम आकाराचा कांदा सालासकट गॅस वर भाजुन घ्यावा..
भाजलेला कांदा+६ काजु यांची मिक्सर मधे पेस्ट करुन घ्यावी..
२ चमचे भरडलेले धणे..
४ लाल सुक्या मिरच्या..
३ टोमॅटो ची प्युरी..
१ चमचा कसुरी मेथी..
मीठ चवीनुसार..

क्रमवार पाककृती: 

१. बटाटया ची साले काढुन त्याच्या प्रत्येकी ८ फोडी करा..
२ सिमला मिरची च्या बिया काढुन मोठे तुकडे करावे..
३.गरम तुपात बटाटे तळुन घ्या. नंतर मिरच्या १ मिनिट च तळुन घ्याव्या..
४आता उरलेल्या तुपात भरडलेले धणे,लाल मिरच्यांचे तुकडे परतुन घ्यावे..
५.लगेच च आले-लसुण पेस्ट्,टोंमॅटो-प्युरी घालुन तुप सुटे पर्यन्त परतावे..
६.आता कांदा-काजु पेस्ट परतावी. तळलेला.बटाटा व मिरची घालावी..
७.चवीप्रमाणे मीठ्,कसुरी मेथी घालुन घालुन पुन्हा एकदा छान परतावे.
गरम पोळी/ लहान गाकरासारखी कडक रोटी[तुप लावुन]/पराठ्या बरोबर वाढावी..

वाढणी/प्रमाण: 
३ जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
भोपाळ ला मिलिटरी एरीयात रहात होते.तिथली माझी पंजाबी मैत्रिण.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रेसिपी सुलेखाजी ! मंजुडी आणि आर्च चे फोटो तर तोंपासु Happy तुम्ही तेल वापरले का तुप? तेल वापरले तर चवीत काही फरक पडेल का? १-२ दिवसातच ही भाजी करेनच

वरती वांग्याचे भरीत करतानांची टिप पण छान आहे.. करुन बघेल..

माधुरी,
इथे मी तुप वापरले आहे .पण साधी रोजची भाजी असते तेव्हा बटाटे तेलात तळुन करते व कढईत कमी तेल घेवुन त्यात प्रत्येक वेळी थोड्या थोड्या बटाट्याच्या फोडी घालुन तळुन घेते.उरलेल्या तेलात फोडणी करते [बटाटे तळलेले असल्याने फोडणी साठी कमी तेल ही चालते.अर्थात तेला-तुपाचे चे प्रमाण आपल्यावर आहे.]त्यामुळे तळणीचे तेल उरत नाही. .तेल व तुप दोन्हीच्या चवीत फरक आहे.पण जर इतके तुप वापरायचे नसेल तर तेल वापरुन केलेल्या तयार भाजीत वरुन थोडे तुप सोडले तरी तुपाची चव येईल्.जर तेलात च भाजी केली तरी मसाला वेगळ्या पद्धतीचा आहे त्यामुळे चव वेगळी रहाणार्..

सुलेखा, ही वाचुनच एवढी यम्मी वाटते आहे. शनिवारी मी खुप शोधली, पण मला सापडलीच नाही. आता पुढच्या शनिवारीच ट्राय करु शकते मी. Sad

गेल्या विकांताला केली ही भाजी. पण एक शंका आहे. हळद घालायची नाहीये का? इथे दिली नाहीये म्हणून मी हळद घातली नाही, पन हळद घातल्याने चव अजून छान येईल असं वाटतंय. बाकी घरी भाजी आवडली हे वेगळे सांगायला नकोच!

हळद घातली तर टोमॅटो प्युरी ने येणारा लाल रंग थोडा कमी होईल्.पण आपल्या स्वयपाकात आपण नेहमी हळद वापरतो.पंजाबी स्वयपाकात बर्याचदा हळद्,मोहोरी ,गरम मसाला [त्याऐवजी धने पुड व खडा मसाला वापरतात.]वापरत नाहीत.त्यामुळे चव तर छान येईल तेव्हा हळद घातली तरी चालेल.

अल्पना.खुपच छान्.आता यात अजुन एक करुन पहा.कुकर मधे च करायची.प्रेशर येईपर्यंत मंद गॅस वर ठेवायची.शीटी येउ देवु नको. दम वर मस्त चवीची भाजी तयार होईल.पाणी नांवापुरतेच घाल.

हो सुलेखा, माझ्याहातून एकदा चुकून असं झालं होतं. प्रेशर कूकरला लावली आणि गॅस मोठा करायला विसरले. शिट्या ऐकून मग गॅस बंद करू या विचारांत काहीतरी भलतंच काम करत बसले. बराच वेळ झाला तरी शिटी ऐकू येईना, तेव्हा उलगडा झाला. बटाटे मस्त झाले होते, पण मसाला सगळा सुकला. कलेजीसारखी भाजी लागत होती त्यादिवशी... सुका मसाला आणि अगदी किंचीत जळकट Wink

मंजुडी,माझ्या कडुन ही असे प्रकार घडतात्.पण मस्त वाटलं हे वाचुन कि माझ्यासारखीच एक .............धन्स ग.

वत्सला छोटे बटाटे सोलुन थोडेसे मीठ घातलेल्या पाण्यात ठेवावे.काट्याने चारी बाजुला थोडेसे टोचे [प्रत्येकी ५-६ जागी] मारुन घ्यावे.व नंतर तळावेत..लहान असतील तर चिरु नको.थोडा मोठा असेल तर एकाच्या दोन फोडी कर व तळ.तेव्हा टोचे मारुन घेवु नकोस्.अखंड बटाटा असेल तेव्हाच टोचे मारायचे आहेत

काल नवर्‍याने केलेली, मस्त झाली. भाजीचा कलर जरा जास्तच डार्क आला, बहुधा टोमॅटो पेस्टमुळे असेल. धन्यवाद सुलेखा.

सुलेखा , काल केली होती ही भाजी , मस्तच झाली होती.. लेकीने - नवर्‍याने अगदी आवडीने खाल्ली
थ्यांकु Happy
नेक्स्ट टाईम ह्या मधे बटाट्याच्या ऐवजी बेबी-कॉर्न + पनीर (आणि अर्थातच सिमला मिर्च) घालुन करण्याचा विचार आहे.

मी पण केली आहे आज,मस्त झाली आहे,ढोबळी मिरची मस्त लागतेय,पण बटाटे जरा कोरडे वाटले,चव मस्त आली आहे भाजीला.धन्यवाद

गेल्याच आठवड्यात केली होती.. छोटे बटाटे वापरले होते.. पण ते वापरताना इथली एक पोस्ट बघितलीच नाही त्यामुळे ते नीट आत पर्यंत शिजले नव्हते.. पुढच्या वेळेस टोचे मारून मगच तळायला पाहिजेत....

टेस्ट जबरी येते पण कांदा भाजलेला असल्याने...

एक सूचना - ज्या काही बारीक बारीक टिपा आहेत.. ज्या मूळ पाककृतीची पोस्ट टाकल्या नंतर आहेत.. त्या पाककृतीच लिहा...म्हणजे आमच्या सारख्या नवख्यांकडून त्या चुका होणार नाहीत... प्रत्येक वेळेस पाकृ करताना सगळ्या पोस्ट्स वाचल्या जात नाहीत.

हिम्सकुल,पाकृ.लिहीताना शक्यतोवर सविस्तर लिहीते.प्रत्येकाच्या प्रश्नांमुळे या तळटिपा आपसुक तयार झाल्या आहेत .तरीपण पुढील वेळेस तुमच्या सुचनेप्रंमाणे प्रयत्न करीन.

आज केली. सह्ही चव आहे. धन्यवाद सुलेखा ताई Happy

फोटो मोबाईल मधे आहे. जमेल तेव्हा अपडेटेन इथे.

Hi Sulekha !

१. बटाटया ची साले काढुन त्याच्या प्रत्येकी ८ फोडी करा..

Cant we do it without pilling potatos ? I believe potatos w/out pilling are more nutritious ? Will it spoil the taste then ?

Just a thought.

Pages