षंढ ....

Submitted by विशाल कुलकर्णी on 7 December, 2010 - 23:59

सामर्थ्याचे बदलते परिमाण...
अन् संस्कृतीचे षंढ संदर्भ...
कसाब, अफजल...
तथाकथित उदात्त संस्कृती...(?)

सत्ता, सामर्थ्य ....
दहशतवादाचे राजकारण...
अन् सहिष्णुतेच्या ओझ्याखाली दबलेले...
कोवळ्या मानवतेचे निरागस, निष्प्राण गर्भ !

हम्म्म्म....
सांत्वनाच्या अगतिक.., क्षीण मेणबत्त्या....
आणि गंगातीरावर उसळलेले आगीचे कल्लोळ...
एके ५६, आर. डी.एक्स. अन् बरबटलेली मने..,
निषेधाचे खलिते, संयमाचे (?) नियम अन सौहार्दाचे थोतांड....

कुठलाच हिशोब लागत नाहीये....
समाजकारणाची समीकरणे...
सोयिस्कररित्या बदलेली....!
स्वार्थासाठी सगळीच गणिते चुकवलेली...

आपण दुसरे करणार तरी काय....
चला दोन मिनीटे मौन पाळू...
तिसर्‍या मिनीटाला कामाला लागू...
तुम्ही अगतिकता म्हणा आम्ही षंढपणा म्हणु ...! Sad

संदर्भ : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7062535.cms

विशाल.

गुलमोहर: 

Pages