सोसायटी नावाची वाचाळ वस्ती. भाग २

Submitted by Sanjeev.B on 30 November, 2010 - 00:24

http://www.maayboli.com/node/21530
(भाग १)

====================

श्री

-: भाग २ :-
:- दुस-या दिवशी :-
सौ : कसे आहात मेहरा वहिनी.
मेहरा वहिनी : चंगी हु, आप कैसे ?
सौ : मी पण चंगी, काय विषेश ?
मेहरा वहिनी : काही नाही.
सौ : भावजी नाही आलेत मिटींग ला ?
मेहरा वहिनी : ऑफिस में बहुत काम है, इस लिए नही आए. (मनात : ईसे क्या करना है)
सौ : पण आज तर रविवार आहे ना. (मनात : दारु ढोसत बसला असणार, नाही तर त्या भटक भवानी च्या पाठी शेपुट हलवत फिरत असणार, ती भटक भवानी पण कुठे दिसत नाहिए.)
मेहरा वहिनी : बहुत काम है, इस लिए आज भी बुलाया है.
सौ : रोझी ला बघितलत का तुम्ही ? (मुद्दाम)
(डबल डोर फ्रिज साठी होकार मिळाला नाही म्हणुन मेहरा वहिना ना डिवचने)
मेहरा वहिनी : आपके मिस्टर नही आए.
सौ : (मनात : हिला काय करायचंय, स्वतःच्या नव-या कडे बघ ना) नही, हमारे ईनको किनई, ऐसे सब चीझों में जरा भी स्वारस्य नही, वह बोलें मी नाही येत, तुच जा, म्हणुन मैं एकटीच आई, नाही तरी पण आपण सर्व बायकाच असतो ना मिटींगला, हम सब बायका बायका ही ठरवेंगे
मेहरा वहिनी : किसके घर पर है मिटिंग ? चलो चलते है.
सौ : घर पर नही हय, ईधर बाहेर ही गोळा होने को बोला हय ना वोह जाधवीण (जाधव) के घर के समोर, आप चलिए, मैं मालवणकर आजी के लिए रुकी हु.

मेहरा वहिनी निघतात.

थोड्या वेळाने मालवणकर आजी येतात.

सौ : काय हो, किती ऊषीर केलात ?.
मालवणकर आजी : काय करु, घरचं आवरतंच नाही बघा, सगळं निस्तरे पर्यंत जरा ऊषीर झाला, आणि त्यात आमचं हे कार्टं, एक झ्याक बातमी घेऊन आलं बघा, कधी एकदा सगळ्यास्नी सांगु असे झालंय बघा.
सौ : काय झालं ?
मालवणकर आजी : अहो आमच्या ह्या दिवट्यानं (आजी चा नातु) त्या भटक भवानी ला आणि त्या मेहरांना सकाळी एकत्र पाहिलं कि हो त्या बागेत. ह्या दिवट्यानं कुठे बोंबलु नये म्हणुन त्याला फुगा ही घेऊन दिला कि. पण असल्या गोष्टि कुठे लपतात का हो, मी विचारलं आमच्या कार्ट्याला, कुणि दिलं फुगा, सांगायलाच तयार नव्हता, शेवटी हाणलन दोन बुक्के पाठी वर, तेव्हा सांगतो कसा, मेहरा काका नी दिलं, ते नेहमीच देतात चाकलेट, आज मी फुगा मांगलन, तर फुगा नी चाकलेट दोन्ही बी दिल्या.
सौ : काय म्हणताय काय, आणि मी आताच काही वेळा पुर्वी मेहरा वहिनी ना विचारलं तर म्हणते कशी, की ऑफिस ला गेलेत म्हणुन.
मालवणकर आजी : सोडा हो, तिचं काय ऐकताय तुम्ही.
सौ : शी बाई, काय हो त्या मेहरा वहिनी ना कसं हो जमत नाही स्वतः च्या नव-याला मुठीत ठेवायला, आम्ही बघा, आमचे नवरे ढुंकुन हि बघत नाही पर स्त्री कडे.
मालवणकर आजी : आणि त्या भटक भवानी ला काही लाज लज्जा, लगीन झालेल्या पुरुषा बरोबर लफडं, वाचव रे परशुरामा ह्या घोर कलियुगा पासुन. चला चला मिटिंगाला ऊषीर होतोय बघा.
सौ : तात्या नाही आलेत ?
मालवणकर आजी : आज रविवार ना, जास्त झाली वाटतं, २ वेळा उळट्या केल्यान म्हाता-यानं, ऊगाच का दुस-यांना त्रास म्हणुन लवंडताहेत, तरी सांगत होते, सोसल तेव्ढचं घ्या, पण माझं मेली म्हातारी चं ऐकतंय कोण.

क्रमशः ………

गुलमोहर: