फराळ फटाके: जीवनाच्या दिवाळीतले!!!

Submitted by निमिष_सोनार on 1 November, 2010 - 08:30

सगळ्या सणांमध्ये

दिवाळीचा वेगाळाच थाट

सर्वांना अंधारामध्ये

दाखवी प्रकाशाची वाट ...

...

प्रकाश पसरवते

पणतीची पेटलेली वात

या दिवा़ळसणामध्ये

करा दु:खावर मात ...

...

निराशेच्या "भुईचक्राला"

लावून टाका आग

गोल गोल फिरत स्वतःमध्ये

निराशा होईल खाक ...

...

"फुलबाजीच्या" झगमगत्या

आनंदी तुषारांद्वारे

फुलवा मनामनांत

आनंदाचे "झाड"...

...

सद्वीचारांची ठीणगी लावा

रॉकेटच्या मुखात

महत्त्वाकांक्षेचे "रॉकेट" उडू द्या

उंचच उंच आकाशात ...

...

सुतळी "बॉम्बसारखे"

छिन्नविछिन्न होवू द्या

मनातले नकारात्मक

कीडलेले भाग ...

...

"शंकरपाळ्यांसारखी"

चौकट तोडा

बघा मोकळ्या मनाने

या सुंदर जगात ...

...

"चकलीसारखे"

गुरफटू नका

या सभोवतालच्या

मायावी संसारात ...

...

भ्रमाचा कडवट "लाडू"

जिद्दीने फोडा

आणि मन रमवा

थोडे देवधर्मात ...

...

मुखातले ओले कटू शव्द

बंद करा

खोबर्‍या सारखे

"करंजीच्या" आकारात ...

...

या दिवाळीला

साजरी करा

गुलाबी थंडीच्या

गोड वातावरणात ...

...

-लेखक : निमिष सोनार, पुणे

आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या :
http://thinknimish.blogspot.com

गुलमोहर: