किलबिल : सानिकाचे बाल गणेश!

Submitted by maitreyee on 11 September, 2010 - 07:41

बाल गणेश
सानिका, वय साडेपाच.
माध्यमः पेन्सिल, क्रेयॉन्स, रंगीत मार्कर्स
माझी मदत : रेफरन्स म्हणून अनेक चित्रे नेटवरून शोधून तिला दाखवणे,
(बाकी प्रयत्न बराच केला, अगं हात पाय असे का, ते तसे कर, हातात चेंडू नाहिये काही तो, मोदक असा असतो वगैरे पण तिने जाम ऐकले नाही, शेवटी म्हणाली "व्हाय डोन्ट यु ड्रॉ युअर ओन गणेशा?" Happy )
sanika-bal-ganesh pic.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सानिका, मस्त काढलेत हं गणपतीबाप्पा! त्यांचे दागिने, हातातला बॉल आणि हेअरस्टाईल खूपच आवडली. Happy

>>>व्हाय डोन्ट यु ड्रॉ युअर ओन गणेशा?" >>>> मैत्रेयी, सानिका मनातल्या मनात 'बघुया तुझे गणेशा कसे दिसतायत, किंवा काय दिवे लावत्येस' असंही म्हणाली असेल. Proud

Lol सही काढलाय हा गणपती. कपाळावर बटा रुळतायत, हातात बॉल. आत्ता लग्गेच आयपीएलच्या टीममध्ये जातील असं वाटतंय.

Sanika,

Very cute Ganesh!! Looks like he is ready to play with you Happy

I would like to see more of your paintings.

मस्त चित्र काढले आहे. डोळे-बट-दागिने एकदम क्युट.
हातातला बॉल आणि उभी रहायची स्टाईल बघुन वाटते आता बाप्पा युएस ओपनच्या मॅच मधे सर्व्हीस करण्यासाठी उभे आहेत Happy

एकदम निराळ्याच रुपात गणपती दिसला आज! डोक्यावरचा नारदमुनी, बट, पापण्या, बॉल.. अफाट कल्पनाशक्ती आहे.. सानिका, शाब्बास!

.

Pages