Submitted by मंदार शिंदे on 23 August, 2010 - 11:54
नव्या पिढीचे तरुण आम्ही, वृद्धांहूनी का करुण आम्ही?
लढण्याआधीच गेलो हरुन आम्ही, लागली कुणामुळे ही वाट?
लढत लढत हारणार्या, हरत हरत जिंकणार्या
सळसळत्या तारुण्याची, हा देश पाहतो वाट.
ओवाळणारे भक्त नाही, झेपावणारे रक्त नाही
घाव झेलण्या शक्त नाही, लागली कुणामुळे ही वाट?
भक्तीने ओथंबलेल्या, शक्तीने ओसंडलेल्या
खणखणीत तारुण्याची, हा देश पाहतो वाट.
धडाडणारी छाती नाही, घडविणारी माती नाही
पोसणारी नाती नाही, लागली कुणामुळे ही वाट?
मातीत सोने पिकविणार्या, नात्यांतून भविष्य फुलविणार्या
कार्यकर्त्या तारुण्याची, हा देश पाहतो वाट - उगवेल कधी ती पहाट?
गुलमोहर:
शेअर करा
उत्तम !!! वाचणारा प्रत्येकजण
उत्तम !!! वाचणारा प्रत्येकजण एक एक किरण बनल्यास पहाट नक्कीच होईल.
आवडली.
आवडली.
छान
छान
अप्रतिम !!
अप्रतिम !!
सही
सही
छान !
छान !
सर्व प्रतिक्रियांबद्दल
सर्व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !
धडाडणारी छाती नाही, घडविणारी
धडाडणारी छाती नाही, घडविणारी माती नाही
पोसणारी नाती नाही, लागली कुणामुळे ही वाट?
तशी वाट तर सरकारांनीच लावली ...घरातल्या आणि बाहेरच्या !
वाह !
मंदारजी ,
खुप दिवसांनी अशी आतुन हलवुन सोडणारी (मर्दावानी) कविता वाचायला मिळाली ...!
पण तुम्ही इतके दिवस होता कुठे ...?
(No subject)
नव्य पीढीचे तरुण आम्ही....
नव्य पीढीचे तरुण आम्ही.... वृद्धांहूनही करुण आम्ही.... क्या बात है मंद्या.....
हा देश पाहतो वाट उगवेल हो अशी
हा देश पाहतो वाट
उगवेल हो अशी पहाट ..........
धन्यवाद, अनिल, कैलास व
धन्यवाद, अनिल, कैलास व जितेंद्र !
वास्तविक मला कवितेबद्दल काही
वास्तविक मला कवितेबद्दल काही कळत नाही. म्हणून मी इथे लिहिणे योग्य नाही.
पण जर या कवितेतल्या शब्दांचा शब्दशः अर्थ घेतला तर लिहावेसे वाटते.
<लढण्याआधीच गेलो हरुन आम्ही, लागली कुणामुळे ही वाट?>
नव्य पीढीचे तरुण आम्ही.... वृद्धांहूनही करुण आम्ही
असे नका म्हणू हो!!
तरुणांनी असे विचारसुद्धा डोक्यात आणू नये.
सर्वच पिढ्यांना वाटते की दिवस वाईट आले आहेत, पण तरी ते परिस्थितीला तोंड देवून समाज नि राष्ट्राची प्रगति करतात. अजूनहि अनेक तरुण आशावादी आहेत, करतील ते भले देशाचे. इथे मायबोलीवरच कुणि त्याबद्दल कविता लिहीली होती.
कदाचित् कवितेचा अर्थ काही वेगळाच असेल. जसे शास्त्रीय संगितात सूर महत्वाचे शब्द काही का असेनात, तसेच कवितेत भावना महत्वाच्या, शब्द काही का असेनात, असे काही असेल तर ते मला समजत नाही. क्षमस्व.