रानकंद - करांदे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 24 June, 2010 - 03:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

करांदे धुवुन काप करुन
आपट्याचा पाला
राखाडी
मिठ (जाडे असल्यास चांगले)

क्रमवार पाककृती: 

कापलेले करांदे राखेमध्ये घोळवुन तो पातेल्यात आपट्याचा पाला मध्ये मध्ये घालून रचावे. टोपाच्या कडेने करांदे बुडे पर्यंत अलगद पाणी टाकावे आता हे उकळवत ठेवावे. उकळी आली की पाणी काढुन टाकावे (टोपावर झाकण ठेउन टोपाच्या दोन कडांना झाकणा सकट धरुन उतरते धरुन पाणी काढावे). हे पाणि एकुण दोन वेळा काढावे. तिसर्‍या पाण्यात मिठ घालावे व करांदे शिजवुन घ्यावेत. मग हे पुर्ण गार झाल्यावर स्वच्छ धुवुन खायला घ्यावेत.

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे
अधिक टिपा: 

करांदे हे मातीने भरलेले असतात. त्यामुळे ते पहिला स्वच्छ धुवुन घ्यावेत. हे चवीला कडवट असतात. त्यामुळे सगळ्यांनाच आवडतात असे नाही. पण ज्यांना आवडतात ते अजुन अजुन मागुन खातात. ह्याला वापरणारी राखाडी लाकडांची असते.

माहितीचा स्रोत: 
आईची किमया.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग वर्षूदी ते गोडे करांदे. वर लिहीलेले करांदे खुप कडू असतात ते नाही तसेच खाऊ शकत.

निलुदा, किट्टू धन्यवाद.

Pages