कालच्या "डोम्बिवली गटग" मध्ये डुआय ने केलेल्या request मुळे माझा manogat.com वर ३ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला लेख इथे पुनर्प्रकाशित करीत आहे. ज्यांनी manogat.com वर वाचला आहे, त्यांनी पुनर्वाचनाचा आनंद घ्यावा आणि ज्यांच्यासाठी नवीन आहे, त्यांनी enjoy करावा. हा लेख मी manogat वर ३ भागांमध्ये लिहिला होता. इथे एकाच भागात देत आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
भाग-१
सासरची कोकणस्थ असले तरिही माहेरची मी देशस्थ. विदर्भातली देशस्थ. कारण माझे वडील मूळचे विदर्भातले. त्यामुळे घरी बोलल्या जाणारया मराठी मध्ये अधून मधून विदर्भीय फोडणी हमखास असायची.
आता आताच मनोगता वर खास पुणेरी भाषेतील मजेशीर वाक्प्रचार वाचनात आले. वाटले आपणही आपल्याला माहीत असलेले काही गमतीशीर विदर्भीय वाक्प्रचार आणि शब्द मनोगती ना सांगुया.
झांबल झांबल करणे : धांदरटपणा करणे/ नक्की काय करावे ते नीट न सुचणे
(उदा. काय झांबल झांबल करतो आहेस?? पटकन काय ते काम उरक.)
रुंगळ रुंगळ करणे : एखाद्या च्या आगे मागे सतत रेंगाळणे
(उदा. ती आई वेडी असल्याने सतत आईच्या मागे रुंगळ रुंगळ करत असते.)
कुईटला वास : घाणेरडा वास/दुर्गंधी
(उदा. काय कुईटला वास आहे तुझ्या मोज्यांचा !)
घुरट वास : गाई-गुरांच्या अंगाला येणारा घाणेरडा वास/दुर्गंधी
(उदा. तबेल्यात जाऊ नकोस. घुरट वास येतोय.)
कुईटला आणि घुरट हे दोन्ही तसे दुर्गंधी व्यक्त करणारे शब्द असले तरिही नक्की कुठे कोणता शब्द चपखलपणे वापरायचा ते फ़क्त एक विदर्भीयच जाणे.
चाटु ("च" चा उच्चार "चमचा" मधील "च" प्रमाणे) : तव्यावर डोसा टाकताना वापरावयाचा डाव
ठुनी : आधार/टेकू
जागा करणे : जेवण झाल्यानंतर जमीन पुसून घेणे
भणभण माश्या मारणे : काहीच उद्योगधंदा न करता नुसते स्वस्थ बसणे
लोळलाळ करणे : दुपारची वामकुक्षी करणे
या खेरीज पुष्कळ शब्द आहेत, पण आता या क्षणी आठवत नाहीयेत. माझ्या लग्ना आधी, मी आणि माझ्या धाकट्या बहिणीने गमती गमतीत एका वहीत असे सर्व विदर्भीय वाक्प्रचार आणि शब्द व त्यांचे अर्थ जमा केले आहेत व त्या शब्दसंग्रहाला "विदर्भीय शब्दसूची" असे नाव दिले आहे. माझा प्रेमविवाह असल्याने आणि भावी नवरा कोकणस्थ असल्याने माझ्या बहिणीला चिंता होती की आमच्या घरात बोलले जाणारे काही शब्द माझ्या नवरयाला समजतील की नाही. त्यामुळे अशी शब्दसूची लिहून मी ती माझ्या नवरयास द्यावी आणि त्याने ते शब्द पाठ करून मगच मला मागणी घालण्या साठी माझ्या वडिला समोर यावे, असे ती गमतीने म्हणे.
पुढच्या वेळी माहेरी जाणे जेव्हा होइल तेव्हा ती शब्दसूची शोधून अन्य काही शब्द पुढच्या भागात देईन. तोवर तुम्ही तुम्हालाही असे कही "हटके" विदर्भीय शब्द माहीत असल्यास कळवा.
याशिवाय विदर्भीय भाषेची एक लक्षात येण्या सारखी खासियत अशी की विदर्भीय लोक हिंदी शब्दांचा वापर फार करतात.
उदा. तो तिथून वापस (परत) गेला. या बाबतीतली अजून उदाहरणे आता आठवत नाहियेत. आठवल्यास पुढच्या भागात कळवेन. त्याच पमाणे आपण जसे "वाघ-बिघ, काम-बिम, दात-बित" असे शब्दप्रयोग करतो, तसे विदर्भीय लोक "वाघ-गिघ, काम-गिम, दात-गित" असा शब्दप्रयोग करतात. ("बि" ऐवजी "गि").
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
भाग-२
नमस्कार!
भाग १ मध्ये कबूल केल्या प्रमाणे या भागात मी आणि माझ्या बहिणी ने तयार केलेली विदर्भीय शब्दसूची इथे देत आहे. या शब्दसूचीत जवळ जवळ ९० शब्द/ वाक्प्रचार / म्हणी आहेत. पण वेळे अभावी आणि जागे अभावी ते सर्व इथे देणे शक्य होणार नाही. पण जमतील तितके देते आहे. बाकीचे ३ ऱ्या भागात देइन.
म्हणी :
बाप तशी लेक, मसाला एक (खाण तशी माती)
हालो मालो दिव्यात तेल घालो (इकडून तिकडे फिरत वेळ काढणे/timepaas करणे/ रवटाळणे)
खायला लागलं गोड आणि बुदूबुदू झोड (याचा अर्थ कोणास माहीत असल्यास कृपया सांगावा.)
ढुई ढुई पाणी, घाल पाणी चिंचोणी (खूप पाणी घालून पदार्थ पातळसर बनवणे/ जरूरी पेक्षा जास्त पातळ करणे)
मला पहा आणि फुलं वाहा. (आपण स्वतः काही काम न करता बसून राहणे आणि लोकानी आपली खातिरदारी करावी अशी अपेक्षा करणे)
म्हाली पणा आणि घोडा हाणा (याचा अर्थ कोणास माहीत असल्यास कृपया सांगावा.)
पेंड पुंडका आणि हिऱ्याचा मुंडका (याचा अर्थ कोणास माहीत असल्यास कृपया सांगावा.)
आंधळा डोळा पाण्याला गेला (डोळ असून नीट न दिसणे)
पैसा ना अदला भप्पुला गडे (घरात नाही दाणा आणि हवालदार म्हणा)
शब्द :
बिरवांगं = टोमॅटो
पोपट = वाल
बरबटी = चवळीचे दाणे
घोळणा = मेथी वगैरे पालेभाज्यांची कच्ची पाने धुवून त्यात मीठ व तिखट घालून बनवलेले सॅलड
डेमणा = छोटासा
चिलमी गप्पा = वायफळ बडबड
चीपीची तब्येत = कृश तब्येत (दोन्ही "च" च उच्चार "चष्मा" मधील "च" प्रमाणे)
फैलते ताट = पसरट ताट
ढामी = आळशी
पतली चादर = पातळ चादर
आशुक माशुक = मस्तपैकी तूप / तेल वगैरे लावून (उदा. आज थालिपीठं आशुक माशुक कर)
बहिरं टप्पर = एकदम बहिरा
दादोडा = मोठी पुळी
धगुरडा = वयाने मोठा / निबर
भगुनं = पातेलं
संगीन = साधे नसलेले
लेंडार = लवाजमा
गुगाळणा = खराब (हा शर्ट गुगाळणा झाला आहे.)
वाक्प्रचार:
नाकाच्या सुताने = कशाचीही पर्वा न करता / बिनधास्त (उदा. काय नाकाच्या सुताने पंखा लावून ठेवला आहे. किंवा नाकाच्या सुताने वरण्भात खा.)
फकाफका लाईट लावणे = कारण नसताना वीज जळवणे (प्रखर उजेड करणे)
पोट्टातून हसणे = मनापासून हसणे
पोट्टातून आवडणे = मनापासून आवडणे
पूसपास करणे = पुसून घेणे
फतंफतं करणे = काम नीट न उरकणे
झुलीला हात लावणे = कामाला नुसते हात लावणे पण प्रत्यक्षात काहीच काम न करणे (काम केल्याचा आभास निर्माण करणे)
वाळूचुळू घालणे = वाळत घालणे (कपडे वगैरे)
पाणी पडणे = पाऊस पडणे
धसणे = घुसणे
हनननं होणे = आर्थिक परिस्थिती हालखीचे होणे
इगरणे = इतरावणे (उदा. आंब्याचा रस खाऊन ह इगरला आहे.)
घोणे घेणे = ज्या गोष्टीतून काहीही निष्पन्न होणार नाही अश्या गोष्टीसाठी कष्ट घेणे
कळंगणे = मळणे (हा शर्ट कळंगला आहे.)
धमंधमं कामे करणे = पटापट कामे आटपणे
पुढचे शब्द ३ ऱ्या भागात देईन.
या भागा वरील तुमच्या प्रतिक्रीया कळवा.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
भाग-३
हे घ्या अजून काही विदर्भीय शब्द आणि वाक्प्रचार:
शब्द :
अंगारपेटी = काडेपेटी
शष्प = पालेभाज्यांचा पाने काढल्या नंतर उरणारा टाकून देण्याचा भाग
चिमणी चे तेल = रॉकेल
तोंडाचे चवणे = जीभेचे चोचले
फोतरं = टरफले
माकोडा = मुंगळा/डोंगळा
आसणीच्या घासणीवर = स्वत: च्या मर्जीने कुठेही कसेही
विस्कट-वास्कट/ विस्कळ-वास्कळ = अस्ताव्यस्त
हागोडं काम = अर्धवट काम
आळशी ढोणी = खूप आळशी
फकडी = फुलपाखरू
रपसप = मजबूत/ दणकट
मरतांगडं = मरतुकडं
मांजोळी = रांजणवाडी
ओंगळ = ओघळ
वाक्प्रचार:
पाटपाणी करणे = जेवायला बसण्याची पूर्वतयारी करणे
लेडंबेडं होणे = लडबडणे
लोळती वळणे = जीभ टाळ्याला चिकटणे (बोलती बंद होणे)
ओलंगट्टं होणे/ ग़टग़ट ओले होणे = खूप ओले होणे
कानांत भेंडं जाणे = काहीच ऐकू न येणे
थुक्याला थुका लावणे = काम नीट न करणे
फणकी सारखी नाचणे = आकांडतांडव करणे
डोळा पाणी हाणणे = डोळ्यातून पाणी येणे
लसूण निसणे = लसूण सोलणे
लगर लगर करणे = घाई गडबड करणे
डुल राहणे = खाऊन पिऊन खुशाल राहणे
पोटात खलंलंलं होणे = खूप भूक लागणे
धोपा - अळूची पाने =
धोपा - अळूची पाने = चमकोरा
मधात मधात
मी उभा राहुन राहलो
कुचीन
ईच्चक
हे सगळे हिदी शब्द
आलु
आद्र्क
अंगुर [द्राक्शे]
पत्ता कोबि
मटर
मला जेवण जात नसेल तर मी मला
मला जेवण जात नसेल तर मी मला 'धकत नाही' अस म्हणायचे....कुणालच काहि कळयच नाहि!
मी सासरी (विदर्भातच) गेलो
मी सासरी (विदर्भातच) गेलो होतो. बसमध्ये चढतांना मागुन आवाज आला,
एक बाई म्हणत होती , "येंगा न हो , भाऊ."
मला जेवण जात नसेल तर मी मला
मला जेवण जात नसेल तर मी मला 'धकत नाही' अस म्हणायचे >>>
येस्स. माझ्या आजी (बाबांची आई) च्या तोंडून हा वाक्प्रचार मी ही ऐकला आहे.
गाडी धकली - गाडी सुरु झाली
गाडी धकली - गाडी सुरु झाली
गुढगा - टोनगडा
गुढगा - टोनगडा
नागपूरकरांच्या भाषेवर
नागपूरकरांच्या भाषेवर हिंदीचा इतका प्रभाव आहे की " जेवतो आहे" इथे "जेवून राहिलो आहे" (जसे "खा रहा हूं") होते आणि "जातो आहे""("जा रहा हूं") हे "जाऊन राहिलो आहे" होते !!! उर्वरीत विदर्भदेखील ह्या एका वाक्यातील दोन क्रियापदांच्या वापरास अपवाद नसेल असे "वाटून राहिले आहे".
मी डब्याचे झाकण 'कहाडले'
मी डब्याचे झाकण 'कहाडले' (काढले), किंवा मी जेवण 'वहाडले' (वाढले)..
"येंगा न हो , भाऊ." याला पण
"येंगा न हो , भाऊ."
याला पण पर्याय आहेत.
"नेंगा न हो , भाऊ."
"चेंगा न हो , भाऊ."
अर्थात येंगणे, नेंगणे आणि चंगणे म्हणजेच चढणे.
Bathroom - न्हानि
Bathroom - न्हानि
वरील पैकी येंघा(वेंघणे.)
वरील पैकी येंघा(वेंघणे.) न्हाणि, चंघणे =चढणे . कहाडले, वहाडले, लसूण निसणे,हे शब्द अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अशिक्षीत लोकांकडून वापरले जातात. त्यामुळे ते खास वैदर्भीय आहेत असे नाही. मराठीचाच एक भाग आहेत.
धकणे हाही शब्द आहे पण थोडा वेगळा अर्थ आहे. घ्या धकवून म्हणजे घ्या चालवून एवढ्या वेळेला.
तेवढ्या पैशात धकून जातंय मणजे 'चालून जाणे' अशा अर्थाने.
तसेच कोईट आणि घुरट वास इकडेही आहेत
झोर्या = पिशवी.
झोर्या = पिशवी.
@ रोबीनहऊड: आपण मा.बो. चे
@ रोबीनहऊड:
आपण मा.बो. चे सक्रिय व फार जुणे सदस्य आहात. पण " अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अशिक्षीत लोकांकडून वापरले जातात" या श्ब्दान्नि थोड वाईट वाटल...
हा धागा समाजातील कुठल्या गटातिल लोक कुठला शब्द वापर्तात ते नसुन बोली भाशेतील भिन्नता जानून घेणे व त्यचा गोडवा अनुभवने हे आहे असे मला वाटते....
जे वाटल ते लिहील...राग मानून घेयु नये...
मस्त मजा येतेय हे भाषा
मस्त मजा येतेय हे भाषा वैविध्य जाणून घ्यायला!
एखादी कृती करण्याला "करून
एखादी कृती करण्याला "करून सोडणे" असे म्हणण्याचा प्रघात आहे का विदर्भात? घरी गेल्यावर लुंगी घालून सोडतो असे एकदा एका नागपुरी मित्राच्या बोलण्यात आले होते.
कहाडले, वहाडले हे शब्दप्रयोग खानदेशातसुद्धा प्रचलित आहेत.
रस मलाई. हा उल्लेख मुद्दाम
रस मलाई.
हा उल्लेख मुद्दाम करण्याचे कारण असे की हे शब्द ज्याना पुस्तकी भाषेचा परिचय झालेला नाही अशा केवळ बोलीभाषाच वापरणार्या लोकांकडूनच या शब्दांचा वापर होतो हे सांगणे आहे.जी माणसे थोडे बहुत शिकली त्यानी शिष्ट भाषेतले शब्द उचलले. त्यामुळे अगदी दुसरी तिसरी शिकलेले लोकही यंघणे ,चंघणे च्या ऐवजी चढणे असे प्रमाण क्रियापद वापरू लागले. मात्र शुद्ध अशिक्षीत लोकांची जी टिपिकल क्रियापदे आहेत ती तशीच अनाघ्रात , मूळ स्वरूपात राहिली म्हणून मुद्दाम त्याचा उल्लेख तसा केलाय. उदा:- आमच्या गावात (आमच्या आजीसह ) अशिक्षीत लोक सर्रास 'वोपणे' हे क्रियापद वापरतात. मात्र इतर लोक 'विकणे' हा शब्द वापरतात. वोपणे सारखे शब्द संत काव्य एव्हन ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांतही आढळतात...
रोबीनहूड - आपले उत्तर आवडले
रोबीनहूड - आपले उत्तर आवडले आणि डोक्स्यात घुसले (म्हण्जे कळाले)...तुम्हि जे बोलला ते माझ्या आणि माझ्या आजी आजोबान्च्य बोलण्यातला फरक समजाऊन सान्गते.
बित्तुबंगा - "करून सोडणे" माहिति नाही पण "करून टाकणे" महिती आहे - "जेवण करून टाक"
"करून सोडणे" असे म्हणण्याचा
"करून सोडणे" असे म्हणण्याचा प्रघात आहे का विदर्भात? >>>
नाही..
करुन टाक मात्र म्हणतात..
म्हणजे "जाताजाता एवढं करुन टाक"असं..
किंवा नुसतं "कपडे वाळत घाल" च्या ऐवजी " कपडे वाळत घालून टाक/घालून दे" असं ( "कपडे सुखाने डाल दे" चे रुपांतर)..
हे "यंगणे/चेंगणे" वगैरे मी तरी इतकी वर्षं नागपूरात राहून ऐकले नाही कधी
बाकी नागपुरी आणि वैदर्भिय आणि वर्हाडी आणि झाडीपट्टी असे ठळक भेद आहेत म्हणा..
शिवाय नागपूरी भाषेत "पुलापलिकडची आणि अलिकडची" असेही सुक्ष्म भेद आहेतच
अजून एक म्हणजे जितका प्रभाव हिंदीचा मराठीवर आहे तितकाच नागपुरी मराठीचाही तिकडल्या हिंदीवर आहे..कुठलाही हिंदी मनुष्य "धनिया" न म्हणता "सांबार" च म्हणतो, "बहुत" च्या ऐवजी "भौत" च म्हणतो, "यायला पाहिजे" ला "आनेको होना" वगैरे..
खरं पाहता नागपुरात लोक मराठी किंवा हिंदी न बोलता, "नागपुरी" च बोलतात म्हणायला पाहिजे
आणि तो टिपिकल टोन्.. इतरांना अतिशय रफ आणि गुर्मीत बोलल्यासारखा वाटणारा
मला सुरुवातीला पुण्यातले लोक फारच मधाळ बोलतात असे वाटायचे 
"मला सुरुवातीला पुण्यातले लोक
"मला सुरुवातीला पुण्यातले लोक फारच मधाळ बोलतात असे वाटायचे"
हे ऐकून फाआआआआआआआआआआआआआआआआआर हसु आल!!!
खरंच रस मलाई.. म्हणजे
खरंच रस मलाई..
म्हणजे कसं ते कसं समजऊ आता 
म्हणजे पुण्यातल्या भाषेत रफनेस नाहिये असं मला वाटतं..टोकदार पणा असला तरी
>>>म्हणजे पुण्यातल्या भाषेत
>>>म्हणजे पुण्यातल्या भाषेत रफनेस नाहिये असं मला वाटतं..टोकदार पणा असला तरी स्मित म्हणजे कसं ते कसं समजऊ आता
ए. फू. मी प्रयत्न करते.
विहिरीजवळ तरुणी गेली. विहिरीत वाकून पाहू लागली. हे बघून...
नागपुरी माणूस :
"ए पोट्टे, कुव्यात काय पायते? पाय घसरला तर मर्शीन्नं ! बाजू व्हय!"
पुणेरी माणूस :
" पाय घसरून विहिरीत पडला, तर तुम्हाला बाहेर काढायचा खर्च कोण करणार? त्यापेक्षा बर्याच कमी किमतीत तुम्ही ओठ्ठा आरसा विकत घेऊन प्रतिबिंब बघू शकता."
मृण्मयी - BEST!!!!! मी विचरच
मृण्मयी - BEST!!!!!
मी विचरच करत होते काय लिहू...तुम्हि एकदम सहि उदा. दिल!!!
मृ, तुस्सी ग्रेट्ट हो .... !!
मृ, तुस्सी ग्रेट्ट हो .... !!
आरसा
आरसा :-p
"ए पोट्टे, कुव्यात काय पायते?
"ए पोट्टे, कुव्यात काय पायते? पाय घसरला तर मर्शीन्नं ! बाजू व्हय!" >>>>>>>>> मस्त, तो टिपीकल हेल आठवला......
माझ्या नणंदा, दीर
माझ्या नणंदा, दीर नोकरीनिमित्ताने भोपाळला स्थायिक झाले. त्यामुळे मुळ वर्हाडित आणखी भोपाळी शब्दांची भर ... एक वेगळच मिश्रण ऐकायला मिळतं.
>> लसूण निसणे << हा शब्द
>> लसूण निसणे <<
हा शब्द प्रयोग तर रायगड जिल्ह्यातही आहे.
मृ, येस्स्स, हेच म्हणायचं
मृ,
येस्स्स, हेच म्हणायचं होतं मला
भेन्डि जमली/बसली नाही - trick
भेन्डि जमली/बसली नाही - trick did not work
चाबी देणे - कान भरणे
अरे, हे नंतरचे प्रतिसाद मी
अरे, हे नंतरचे प्रतिसाद मी आत्ता पाहतेय
नागपूरकरांच्या भाषेवर हिंदीचा इतका प्रभाव आहे की " जेवतो आहे" इथे "जेवून राहिलो आहे" (जसे "खा रहा हूं") होते आणि "जातो आहे""("जा रहा हूं") हे "जाऊन राहिलो आहे" होते !!! >>
पटले. असेच असावे!
मृण्मयी,
ते पुणे-नागपूर तुलना (आरसा, प्रतिबिंब इ.) खूप धमाल आहे
चाबी देणे - कान भरणे >>> करेक्ट. बाबांच्या तोंडून चावी साठी हमखास 'चाबी' असाच उच्चार ऐकला आहे.
"यंगणे/चेंगणे" >> मी पण कधी ऐकलं नाही
Pages