कालच्या "डोम्बिवली गटग" मध्ये डुआय ने केलेल्या request मुळे माझा manogat.com वर ३ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला लेख इथे पुनर्प्रकाशित करीत आहे. ज्यांनी manogat.com वर वाचला आहे, त्यांनी पुनर्वाचनाचा आनंद घ्यावा आणि ज्यांच्यासाठी नवीन आहे, त्यांनी enjoy करावा. हा लेख मी manogat वर ३ भागांमध्ये लिहिला होता. इथे एकाच भागात देत आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
भाग-१
सासरची कोकणस्थ असले तरिही माहेरची मी देशस्थ. विदर्भातली देशस्थ. कारण माझे वडील मूळचे विदर्भातले. त्यामुळे घरी बोलल्या जाणारया मराठी मध्ये अधून मधून विदर्भीय फोडणी हमखास असायची.
आता आताच मनोगता वर खास पुणेरी भाषेतील मजेशीर वाक्प्रचार वाचनात आले. वाटले आपणही आपल्याला माहीत असलेले काही गमतीशीर विदर्भीय वाक्प्रचार आणि शब्द मनोगती ना सांगुया.
झांबल झांबल करणे : धांदरटपणा करणे/ नक्की काय करावे ते नीट न सुचणे
(उदा. काय झांबल झांबल करतो आहेस?? पटकन काय ते काम उरक.)
रुंगळ रुंगळ करणे : एखाद्या च्या आगे मागे सतत रेंगाळणे
(उदा. ती आई वेडी असल्याने सतत आईच्या मागे रुंगळ रुंगळ करत असते.)
कुईटला वास : घाणेरडा वास/दुर्गंधी
(उदा. काय कुईटला वास आहे तुझ्या मोज्यांचा !)
घुरट वास : गाई-गुरांच्या अंगाला येणारा घाणेरडा वास/दुर्गंधी
(उदा. तबेल्यात जाऊ नकोस. घुरट वास येतोय.)
कुईटला आणि घुरट हे दोन्ही तसे दुर्गंधी व्यक्त करणारे शब्द असले तरिही नक्की कुठे कोणता शब्द चपखलपणे वापरायचा ते फ़क्त एक विदर्भीयच जाणे.
चाटु ("च" चा उच्चार "चमचा" मधील "च" प्रमाणे) : तव्यावर डोसा टाकताना वापरावयाचा डाव
ठुनी : आधार/टेकू
जागा करणे : जेवण झाल्यानंतर जमीन पुसून घेणे
भणभण माश्या मारणे : काहीच उद्योगधंदा न करता नुसते स्वस्थ बसणे
लोळलाळ करणे : दुपारची वामकुक्षी करणे
या खेरीज पुष्कळ शब्द आहेत, पण आता या क्षणी आठवत नाहीयेत. माझ्या लग्ना आधी, मी आणि माझ्या धाकट्या बहिणीने गमती गमतीत एका वहीत असे सर्व विदर्भीय वाक्प्रचार आणि शब्द व त्यांचे अर्थ जमा केले आहेत व त्या शब्दसंग्रहाला "विदर्भीय शब्दसूची" असे नाव दिले आहे. माझा प्रेमविवाह असल्याने आणि भावी नवरा कोकणस्थ असल्याने माझ्या बहिणीला चिंता होती की आमच्या घरात बोलले जाणारे काही शब्द माझ्या नवरयाला समजतील की नाही. त्यामुळे अशी शब्दसूची लिहून मी ती माझ्या नवरयास द्यावी आणि त्याने ते शब्द पाठ करून मगच मला मागणी घालण्या साठी माझ्या वडिला समोर यावे, असे ती गमतीने म्हणे.
पुढच्या वेळी माहेरी जाणे जेव्हा होइल तेव्हा ती शब्दसूची शोधून अन्य काही शब्द पुढच्या भागात देईन. तोवर तुम्ही तुम्हालाही असे कही "हटके" विदर्भीय शब्द माहीत असल्यास कळवा.
याशिवाय विदर्भीय भाषेची एक लक्षात येण्या सारखी खासियत अशी की विदर्भीय लोक हिंदी शब्दांचा वापर फार करतात.
उदा. तो तिथून वापस (परत) गेला. या बाबतीतली अजून उदाहरणे आता आठवत नाहियेत. आठवल्यास पुढच्या भागात कळवेन. त्याच पमाणे आपण जसे "वाघ-बिघ, काम-बिम, दात-बित" असे शब्दप्रयोग करतो, तसे विदर्भीय लोक "वाघ-गिघ, काम-गिम, दात-गित" असा शब्दप्रयोग करतात. ("बि" ऐवजी "गि").
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
भाग-२
नमस्कार!
भाग १ मध्ये कबूल केल्या प्रमाणे या भागात मी आणि माझ्या बहिणी ने तयार केलेली विदर्भीय शब्दसूची इथे देत आहे. या शब्दसूचीत जवळ जवळ ९० शब्द/ वाक्प्रचार / म्हणी आहेत. पण वेळे अभावी आणि जागे अभावी ते सर्व इथे देणे शक्य होणार नाही. पण जमतील तितके देते आहे. बाकीचे ३ ऱ्या भागात देइन.
म्हणी :
बाप तशी लेक, मसाला एक (खाण तशी माती)
हालो मालो दिव्यात तेल घालो (इकडून तिकडे फिरत वेळ काढणे/timepaas करणे/ रवटाळणे)
खायला लागलं गोड आणि बुदूबुदू झोड (याचा अर्थ कोणास माहीत असल्यास कृपया सांगावा.)
ढुई ढुई पाणी, घाल पाणी चिंचोणी (खूप पाणी घालून पदार्थ पातळसर बनवणे/ जरूरी पेक्षा जास्त पातळ करणे)
मला पहा आणि फुलं वाहा. (आपण स्वतः काही काम न करता बसून राहणे आणि लोकानी आपली खातिरदारी करावी अशी अपेक्षा करणे)
म्हाली पणा आणि घोडा हाणा (याचा अर्थ कोणास माहीत असल्यास कृपया सांगावा.)
पेंड पुंडका आणि हिऱ्याचा मुंडका (याचा अर्थ कोणास माहीत असल्यास कृपया सांगावा.)
आंधळा डोळा पाण्याला गेला (डोळ असून नीट न दिसणे)
पैसा ना अदला भप्पुला गडे (घरात नाही दाणा आणि हवालदार म्हणा)
शब्द :
बिरवांगं = टोमॅटो
पोपट = वाल
बरबटी = चवळीचे दाणे
घोळणा = मेथी वगैरे पालेभाज्यांची कच्ची पाने धुवून त्यात मीठ व तिखट घालून बनवलेले सॅलड
डेमणा = छोटासा
चिलमी गप्पा = वायफळ बडबड
चीपीची तब्येत = कृश तब्येत (दोन्ही "च" च उच्चार "चष्मा" मधील "च" प्रमाणे)
फैलते ताट = पसरट ताट
ढामी = आळशी
पतली चादर = पातळ चादर
आशुक माशुक = मस्तपैकी तूप / तेल वगैरे लावून (उदा. आज थालिपीठं आशुक माशुक कर)
बहिरं टप्पर = एकदम बहिरा
दादोडा = मोठी पुळी
धगुरडा = वयाने मोठा / निबर
भगुनं = पातेलं
संगीन = साधे नसलेले
लेंडार = लवाजमा
गुगाळणा = खराब (हा शर्ट गुगाळणा झाला आहे.)
वाक्प्रचार:
नाकाच्या सुताने = कशाचीही पर्वा न करता / बिनधास्त (उदा. काय नाकाच्या सुताने पंखा लावून ठेवला आहे. किंवा नाकाच्या सुताने वरण्भात खा.)
फकाफका लाईट लावणे = कारण नसताना वीज जळवणे (प्रखर उजेड करणे)
पोट्टातून हसणे = मनापासून हसणे
पोट्टातून आवडणे = मनापासून आवडणे
पूसपास करणे = पुसून घेणे
फतंफतं करणे = काम नीट न उरकणे
झुलीला हात लावणे = कामाला नुसते हात लावणे पण प्रत्यक्षात काहीच काम न करणे (काम केल्याचा आभास निर्माण करणे)
वाळूचुळू घालणे = वाळत घालणे (कपडे वगैरे)
पाणी पडणे = पाऊस पडणे
धसणे = घुसणे
हनननं होणे = आर्थिक परिस्थिती हालखीचे होणे
इगरणे = इतरावणे (उदा. आंब्याचा रस खाऊन ह इगरला आहे.)
घोणे घेणे = ज्या गोष्टीतून काहीही निष्पन्न होणार नाही अश्या गोष्टीसाठी कष्ट घेणे
कळंगणे = मळणे (हा शर्ट कळंगला आहे.)
धमंधमं कामे करणे = पटापट कामे आटपणे
पुढचे शब्द ३ ऱ्या भागात देईन.
या भागा वरील तुमच्या प्रतिक्रीया कळवा.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
भाग-३
हे घ्या अजून काही विदर्भीय शब्द आणि वाक्प्रचार:
शब्द :
अंगारपेटी = काडेपेटी
शष्प = पालेभाज्यांचा पाने काढल्या नंतर उरणारा टाकून देण्याचा भाग
चिमणी चे तेल = रॉकेल
तोंडाचे चवणे = जीभेचे चोचले
फोतरं = टरफले
माकोडा = मुंगळा/डोंगळा
आसणीच्या घासणीवर = स्वत: च्या मर्जीने कुठेही कसेही
विस्कट-वास्कट/ विस्कळ-वास्कळ = अस्ताव्यस्त
हागोडं काम = अर्धवट काम
आळशी ढोणी = खूप आळशी
फकडी = फुलपाखरू
रपसप = मजबूत/ दणकट
मरतांगडं = मरतुकडं
मांजोळी = रांजणवाडी
ओंगळ = ओघळ
वाक्प्रचार:
पाटपाणी करणे = जेवायला बसण्याची पूर्वतयारी करणे
लेडंबेडं होणे = लडबडणे
लोळती वळणे = जीभ टाळ्याला चिकटणे (बोलती बंद होणे)
ओलंगट्टं होणे/ ग़टग़ट ओले होणे = खूप ओले होणे
कानांत भेंडं जाणे = काहीच ऐकू न येणे
थुक्याला थुका लावणे = काम नीट न करणे
फणकी सारखी नाचणे = आकांडतांडव करणे
डोळा पाणी हाणणे = डोळ्यातून पाणी येणे
लसूण निसणे = लसूण सोलणे
लगर लगर करणे = घाई गडबड करणे
डुल राहणे = खाऊन पिऊन खुशाल राहणे
पोटात खलंलंलं होणे = खूप भूक लागणे
मस्त आठवण करुन दिलीत. २१ मे
मस्त आठवण करुन दिलीत.
२१ मे ला जाउन रायलो गावाकडे, १०-१२ दिवस मस्त खिलवनं पिलवनं चालतं.
बिरवांगं = टोमॅटो (याला भेद्रं नाही म्हणत का तुमच्या गावाले )
पोपट = वाल ( पोपट चपटी असतेन्जी, वाला दोन्हीकडे सेमच असते)
भगुनं = पातेलं (यालेतर आमच्याकड गंज म्हणतात)
आणी हंड्याला गुंड म्हणतात.
काही शब्द नी म्हणी वाचुन मी
काही शब्द नी म्हणी वाचुन मी
छान! पोट्टातून आवडले हो
छान! पोट्टातून आवडले हो
>>पोट्टातून आवडले हो <<<
>>पोट्टातून आवडले हो <<< हाहा हा
>>>काही शब्द नी म्हणी वाचुन
>>>काही शब्द नी म्हणी वाचुन मी <<<
कवुडी, अगं खरंच माझ्या माहेरी आम्ही हे सर्व शब्द वापरतो..........
>>बिरवांगं = टोमॅटो (याला भेद्रं नाही म्हणत का तुमच्या गावाले ) <<
yess......... भेद्रं सुद्धा म्हणतात माझे बाबा याला..........
सही शब्द आहेत ! निंबुडा
सही शब्द आहेत !

निंबुडा निबुंडा निंबुडा!!!
>>>निबुंडा >>><<< हा कोणता
>>>निबुंडा >>><<<
हा कोणता नवीन शब्द create केलात ???
(No subject)
श्री, तिला राय्-बच्चन आवडते
श्री, तिला राय्-बच्चन आवडते अस तिचा नवराच म्हणाला काल. म्हणुन ती निंबुडा आहे
त्या शब्दाचा नी विदर्भाचा अर्थाअर्थी काही एक संबंध नाही आहे 
>>>तिला राय्-बच्चन आवडते <<<<
>>>तिला राय्-बच्चन आवडते <<<<
शतवार 
>> तिला राय्-बच्चन आवडते अस
>> तिला राय्-बच्चन आवडते अस तिचा नवराच म्हणाला काल << मी सुद्धा साक्षीदार आहे याचा!!!
धम्माल ठसकेबाज शब्द आहेत.
धम्माल ठसकेबाज शब्द आहेत. खरेच, एखाद्या भाषेच्या झणझणीत, खणखणीत रूपांचे असे प्रांतवार नमुने त्या भाषेच्या सौंदर्यात भरच घालतात!
पोट्टा - मुलगा. पोट्टी -
पोट्टा - मुलगा. पोट्टी - मुलगी पोट्ट्याइले - मुलाला (पूट्ट्याइले खायाला द्ये)
भैत्ताडः बेअक्कल. झक्की - विक्षिप्त. सुतना - पायजमा
डुल राहणे = खाऊन पिऊन खुशाल राहणे लोळलाळ करणे : दुपारची वामकुक्षी करणे
थालिपीठं आशुक माशुक
दुपारी आशुक माशुक थलिपीठ खाऊन, पान गिन खाऊन, सुतना लेउन, पतली चादर घेऊन लोळलाळ करावी. डुल राह्यतो मी.
<<<दुपारी आशुक माशुक थलिपीठ
<<<दुपारी आशुक माशुक थलिपीठ खाऊन, पान गिन खाऊन, सुतना लेउन, पतली चादर घेऊन लोळलाळ करावी. >>>
हे लय भारी ..........
झक्की कस्ली ड्येंजर भाषा
झक्की
कस्ली ड्येंजर भाषा आहे!!!!
मस्त संकलन आहे. झक्की,
मस्त संकलन आहे.
झक्की,
>>दुपारी आशुक माशुक थलिपीठ खाऊन, पान गिन खाऊन, सुतना लेउन, पतली चादर घेऊन लोळलाळ करावी. डुल राह्यतो मी.
यावर नागपुरकर म्हणेल, "बावाजी एकदम सही बोलून र्हायले. पन ते सुतन्याले 'लेऊन' म्हंजे काय कराचं थे बी सांगून द्या जो!"
लोटने - निवांत पडने टोंघळा -
लोटने - निवांत पडने
टोंघळा - घुटना
भागुबाई - घाबरट
मासोळी - मासा
फाटने - टरकने
होतकाडात - थोबाडात
टेंभलने - रडने
(कारे पोट्ट्या काय झाल? काउन टेंभलुन राह्यला?)
जुआ - जुगार
म्हणी :
मुतात मासोळ्या मारने (अशक्यप्राय काम करन्याचा प्रयत्न करने.)
नागपुर ला मराठी लोक हिंदी शब्दांचा वापर करतात असेच नाही, तर घरी हमखास्/सर्रास हिंदी बोलतात. (कदाचीत सर्रास हा पन विदर्भीय शब्द?)
निम्बुदा , माझे पन
निम्बुदा , माझे पन तुझ्यासारखे ..... विदर्भ + कोकन....ढम्माल मज्जा येते
झक्की , जबरी सिक्सर मुतात
झक्की , जबरी सिक्सर

मुतात मासोळ्या मारने >>>
निंबुडा निबुंडा
निंबुडा निबुंडा निंबुडा!!!>>
दुपारी आशुक माशुक थलिपीठ खाऊन, पान गिन खाऊन, सुतना लेउन, पतली चादर घेऊन लोळलाळ करावी. डुल राह्यतो मी.>>
_
_
निंबुडा एकदम जबरी. माझे वडील
निंबुडा

एकदम जबरी. माझे वडील पण विदर्भातलेच आहेत. ते आणि काका बोलायला लागले की आम्हाला खूप हसु यायचे.
मग ते आम्हाला काय हसुन र्हायला पोट्ट्याहो म्हणत असत.
बाकी मेथीचा घोळणा, गंज (सरळ उभे भांडे, ज्यात ताक करतात), पाटपाणी करणे हे आम्हीपण वापरतो. बहुदा मराठवाड्यात पण हे शब्द वापरले जातात.
जबरी शब्द आहेत.
जबरी शब्द आहेत.
मस्त मोठ्याने बोलून पाहिले.
मस्त मोठ्याने बोलून पाहिले.
हे शब्दं आम्हीपण घरी रोजच्या
हे शब्दं आम्हीपण घरी रोजच्या बोलण्यात वापरतो..
झांबल झांबल...झ्यामल झ्यामल..एवढाच काय तो फरक..
भगुनं म्हणजे बहुगुणं ज्यात बरेच पदार्थ करता येतात
मुतात मासोळ्या मारणे : मुतात माश्या मारणे...
नागपुरकडची खास शिवी आहे भैताड..किंवा बह्याड..तिकडे लोक कुणाला बावळट नं म्हणता बह्याड किंवा भैताड म्हणतात...
बहुदा मराठवाड्यात पण हे शब्द
बहुदा मराठवाड्यात पण हे शब्द वापरले जातात.>> होय.
लेंडार = लवाजमा>> मराठवाड्यात याला उत्ताडा असं म्हणतात.
विदर्भात क्रियापद पण वेगळ्या
विदर्भात क्रियापद पण वेगळ्या पद्धतीने वापरले जाते कधी कधी. असं ऐकलं आहे.
जाणकारांनी खुलासावे.
मी ऐकलेली उदाहरणे म्हणजे देऊन दे, घेऊन घे इत्यादी
देऊन दे, घेऊन घे इत्यादी हो
देऊन दे, घेऊन घे इत्यादी
हो गं हो........... माझे बाबा म्हणतात खरं असं......... मी ही आधी कधी हे notice नव्हतं केलं
मी ऐकलेली उदाहरणे म्हणजे देऊन
मी ऐकलेली उदाहरणे म्हणजे देऊन दे, घेऊन घे इत्यादी>> अगदी, अगदी. जरा तंदरीत असलो कि आजही पटकन तसच बोलुन जातो.
परवा एका सोबत बोलताना देऊनद्या म्हणालो आणि तो बघतच राहिला.
मी पण अशीच बघत राह्यलेली आहे
मी पण अशीच बघत राह्यलेली आहे अनेकदा. ९ वी मधे नागपूरहून नवीन मैत्रिण आली होती माझ्या बाकावर ती म्हणायची.
ती फळा पुसला न म्हणता फळ्यावरचं मिटवलं म्हणायची.
दुसरा एक नागपुरी विद्यार्थी पण हे घेऊन घे इत्यादी म्हणायचा. तसंच तो पैजेच्या ऐवजी शर्यत म्हणायचा.
असं होणं शक्यच नाही म्हणलं की त्याचं वाक्य असायचं मी दाखवतो, लावते शर्यत?
मला आधी कळायचंच नाही की आता शर्यत कसली? कुठून कुठे पळायचं आणि का? त्याचा इथे संबंध काय? इत्यादी... मग लक्षात आलं लावते शर्यत? चा अर्थ यावर आपली पैज असा आहे..
Pages