मर्यादावेल
अगदी मुंबईत नाही पण जरा बाहेरच्या समुद्रकिनार्यावर गेलो कि हि मर्यादावेल दिसणारच.
उन्हाळ्यात जरा बीचवर जावे, समुद्राच्या कोमट पाण्यात डुंबावे आणि बाहेर येताच पायाला वाळुचे चटके बसावेत. मग एखाद्या बॅलेरिनासारखे चवड्यांवर धावत जावे अश्यावेळी पावलाला पहिला गार स्पर्श होतो तो या मर्यादावेलीचा.
साधारण आपट्याच्या पानासारखी पण जाडसर पाने. साधारण समुद्राच्या पाण्याची रेषा जिथे संपते किंवा तिथल्या उंचवट्यावर हि पसरलेली असते. हिचे मर्यादावेल हे नाव अगदी सार्थ आहे. समुद्राच्या किनार्यावरची शेवटची वनस्पति ही. सुरुची माडाची वगैरे झाडे हिच्यामागेच.
तशी हि समुदाला पण त्याची मर्यादा घालुन देते. या वेलीला समुद्राचे पाणी स्पर्श करत नाही.
तसे हिचे शास्त्रीय नाव, Ipomoea pes-caprae हिलाच बीच मॉर्निंग ग्लोरी किंवा गोट्स फुट असेही म्हणतात. वाळु धरून ठेवण्यासाठी हिचा मुख्य उपयोग. तसे ब्राझिलमधे काहि औषधात हिचा वापर करतात. साधारणपणे भुमध्य समुद्र सोडला तर बहुतेक समुद्रकिनार्यावर हि दिसते. आधी पांढर्या वाळुवर हि हिरवी वेल शोभून दिसतेच आणि जांभळी फुले तर शोभा अजुनच वाढवतात.
आपण जिची चर्चा करतोय ती गोंदाची फळे हि तर नव्हेत ? याचे मोठे झाड असते. गोव्यात एका घरी हे झाड दिसले. त्यानी पण, बरे दिसते म्हणुन लावले, असे सांगितले.
केवळ दिसण्यासाठी झाड लावणारे ते रसिकच म्हणायला हवेत.
ही गोंदणंच
हो हो हेच ते. आणि अनामिकावर तुम्ही झुडुप लिहिलं होतंत ते निसटलं नजरेतून.
गोंदणाचं मोठं झाड असतं. चढून फांद्यावर बसता येईल इतकं. म्हणजे लहान मुलं तरी.
छान फोटो आहेत
मी पाहिलीत हि जांभळी फुले खुप गणपतीपुळ्याला गेले होते तेव्हा.. मला ती गोकर्ण वाटली, फक्त पाने वेगळी असलेली. भर उन्हात पण पाने गार असायची त्यामुळे, त्याच्या वर पाय ठेऊन उभे राहायचो थोडा वेळ.
सुंदर
दिनेशजी सुंदर फोटो आहे फुलाचा! पण एक विचारायचं होतं; मी किनार्यावर अनेकदा मर्यादा वेल बघितली आहे. पण तुम्ही टिपलय तसं छानसं फूल बघायला मिळाल्याचं आठवंत नाही. या फुलांचा काही हंगाम असतो का?
वेल
मर्यादावेल भारीच थंड असते. खरोखर कोमट पाण्यातुन आल्यावर तर हिचा थंडावा हवाहवासाच. छायाचित्र फारच सुरेख आले आहे. काय भडक रंग आहे फुलाचा. स्क्रिनसेव्हरवर साठवला आहे. अधुनमधुन किबोर्डला काम नसले कि कसे एकामागोमाग पडद्यावर येतात.
ही फळे किरण्या आहेत..
दिनेश, मर्यादावेलीच वर्णंन इतकं सुंदर केलत तुम्ही.. की वाचतच बसावस वाटत आहे. जेंव्हा तुम्ही निसर्गाबद्दल बोलायला लागतात तेंव्हा तुम्हच्याती खरा दिनेश दिसतो आणि तोच दिनेश मला जास्त भावतो.
बरं.. ती पिवळी फळे बहुतेक किरण्या आहेत त्या.. उन्हाळ्यात हीचा रस पिला तर शरीर गार गार राहत.
आभार
तिलकश्री, तसा काहि हंगाम नसतो, पण डिसेंबरमधे जास्त फुलतात. समुद्रावरच्या खार्या वार्यात टिकणे कठीण असते ना, म्हणुन दुपारचा आत कोमेजतात.
किशोर, माझ्याकडे असा मोठा संग्रह आहे. फक्त मी काढलेल्या फोटोंचा. एकदा सीडी करून पाठवुन देईन.
बी, तुझ्याकडे पण आहे कि खास माहिती ! एकदा तुझ्याबरोबर फिरायला हवे. हि फळे जेमतेम १ सेमी व्यासाची. हिच का ती ? गोव्यात एकच झाड दिसले होते, आणि ज्यांच्याकडे होते, त्याना काहिच माहिती नव्हती.
समुद्रकिनार्यावर नोनी नावाच्या फळाचे पण झाड दिसते. त्याचा रस पण आरोग्यासाठी चांगला असतो. आता त्याबद्दल लिहिन.
भोकरे आहेत
भोकरे आहेत का ती ?
वा !!
दिनेशजी मस्त फोटो आहे हा फुलांचा. हे वेल मी वेंगुर्ला भेटीच्या वेळेस पाहिले होते पण त्याची फुले मात्र पहील्यांदाच पहातो आहे.
भोकरे नाहीत
असामी भोकरे नाहीत ती. भोकरांची पाने मोठी व जाड असतात आणि भोकरे पिकली कि हिरवी वा पांढरी होतात. मी लिहीले होते भोकरांबद्दल आधी.
गोंधळला जीव..
दिनेश, एकसारखीच दिसणारी किती झाडं आणि फुले आहेत, कधीकधी जीव गोंधळून जातो.
बर.. इथेच एक विचारावेसे वाटते. मला 'कचनार' चे मराठी नाव सांगू शकाल का?
मस्त...
मस्त...
मर्यादावेल म्हणजेच सागरगोटे
मर्यादावेल म्हणजेच सागरगोटे ना?
सागर गोट्याचे काटेरी झुडूप
सागर गोट्याचे काटेरी झुडूप असते ज्याला अंगभर नुसते काटेच काटे असतात. त्याच्या काटेरी फळंच्या आत गुळगुळीत गोल बिया असतात ते सागरगोटे. मराठीत सागरगोटे म्हणून गुगल वर शोधलात तरी फोटो दिसतील.
धन्यवाद साधना
धन्यवाद साधना
हे जे दुसरे झाड आहे ते माझ्या
हे जे दुसरे झाड आहे ते माझ्या माहेरीपण आहे. त्याला काय म्हणतात ते मात्र माहीत नाहीत. ही फळं खायला चिकट आणि गोड लागतात. पुण्यात मी ह्याचं अगदी मोठं झाड पाहिलं होतं.
व्वा! मस्त नाव आणि फुल पण.
व्वा! मस्त नाव आणि फुल पण. आणि ती पिवळी फळ पण छान दिसतायत.