लग्नातल्या गमतीजमती

Submitted by प्राची on 11 February, 2010 - 04:25

एका बाफवर सहज गप्पा मारताना मी माझ्या लग्नातली एक गंमत सांगितली.

सप्तपदीला मी एकटीच पहिली पाच पावलं चालले. नवरा माझा हात धरून एकाच जागी उभा. मग सहाव्या पावलाला त्याला पुढे झुकावं लागलं ते पाहून भटजी म्हणाले," अहो, तुम्ही नाही का सरकलात पुढे? तुम्हीही चालायचे असते." नवरा म्हणाला," तुम्ही सांगितलंच नाहीत." आणि टुणकन उडी मारून पुढे आला.:)

तुम्हांलाही तुमच्या लग्नात किंवा दुसर्‍या कोणाच्या लग्नात असे मजेदार अनुभव आले असतील. ते लिहा की इकडे. आपण सगळे ती मजा अनुभवू या.:)

या काही जुन्या हितगुजवरच्या गमतीजमती.
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112938.html?1153310676

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभा Rofl Sad

Happy

आमच्या लग्नाच्या वेळी मंगलअष्टका संपल्या आता "एकमेकांना हार घाला" असे भटजी नी सांगीतले पण दोघांच्या हातात हार नाही..:-) वरुन एकमेकांना आम्ही विचारतोय 'अरे तु हार नाही आणलास' Happy
४-५ मिनीटे हार ची आम्ही वाट पाहत होतो, बाकी स्टेज वरची सगळी मंडळी हार शोधतायेत.
शेवटी मिळाला ...कुणी तरी उचलुन दुसरी कडे ठेवला होता. Happy
अजुनही सिडी बघताना खुप हसु येते Happy

वरतीला जाताना मारोती दर्शनासाठी मी एकटाच सर्वात पुढे सारी वरात सोडुन १०० पावल पुढे निघुन गेलो होतो. वाजंत्री गेट असल्यामुळे मागेच थांबली मित्र तिथेच नाचण्यात गुंग. मी आपला एकटा पुढे मग वराती मंडळीच्या लक्षात आले.

आमच्या लग्नाच्या वेळी मंगलअष्टका संपल्या मी कुठलीही वाट न पाहता सरळ तीच्या गळ्यात हार टाकला
म़ग मला मित्रमंडळीनी वर उचलले, बायको तशीच उभी, मग ती मामा आला अगदी दारासिंग त्यान अलगद बायकोला उचलले पण तानातानीत हार तुटले. भटजी मुकपणे पहात होते मग दुसरे बोताऊन परत घातले गेले

माझ्या लग्नात आम्ही एकमेकांना हार घातले... लग्न संपन्न झालं आणि माझ्या मामे वहीनीनी माईकवरुन अनाऊंन्स केले "श्वेता आणि राहुल चे लग्न संपन्न झालेलं आहे तरी सर्व उपस्थितांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा" आणि माझ्या नवर्‍याचं नाव अमित आहे... राहुल माझ्या जिजाजींच नाव आहे !!! Angry Angry Angry Rofl Rofl Rofl Rofl Rofl

माझ्या लग्नाच्या वरातीच्या वेळेस वरातीत मीही नाचायला उतरायचो. मित्र मंडळी थोड्यावेळाने धरुन परत गाडित बसवायचे. घर जवळ आल्यावर घरा समोर खुप वेळ नाचणे झाले. मी बायकोला नाचायला बोलावले, ती नको नको नाही नाही करत तिथेच बसली. थोड्यावेळाने मी तिला आणन्यासाठी गेलो तरी तेच... ते पाहुन मेहुण्याने तिला उचलुन मध्ये आणले. तिथे ही नको नको ! तिकडे सगळेजण नाचतायेत मस्त पैकी, आणि तिला मी मध्ये उभारुन विनवत होतो... तेवढ्यात ति एकदम नाचायला लागली... आणि बाकीचे अवाक होऊन स्थब्ध.. ! Uhoh माझे बाबा तर अवाक्च पुर्ण. Proud तो सिन पाहन्या सार्खा झालेला... Happy काही न सुधरुन बाबा पटकन म्हणाले बास बास आत चला.... ते इत्के उर्स्फुर्त पणे बोल्लेकी ति जागेवरच शांत...तेव्हा तिचा चेहरा बघनेवल झालेला Happy

माझ्या बहिणीच्या लग्नात मंगलाष्टक झाले आणि हार घालायच्या वेळेस नवर्यामुलाला त्याच्या मित्रांनी मिळून उंच उचलून घेतलं. हे पाहून माझी मामा आणि काका माझ्या बहिणीला उचलायला पूढे झाले पण बहिण त्यांना नाही म्हणाली आणि नवर्याला म्हंटली "तुला लग्न करायचंय की खेळ? मी जबरदस्तीने गळ्यात हार टाकणार नाही, तुझं खेळून झालं की खाली उतर मग आपण लग्न करू". आणि शांत उभी रहिली. मग कुणी तरी त्या मित्रांना रागवलं आणि मुलाला खाली उतरवायला सांगीतलं.

त्या नंतर पूर्ण लग्नात ही उचला उचली किती आचरट वाटते, हार कसे फेकून घातले जातात, लग्नातल्या विधींचं कसं हसं करून टाकतात हेच विषय होते.

मुलाचे वडिल आणि आई तर अजून तिला त्या बद्दल शाबासकी देतात आणि कुणी ही लग्नाची पत्रिका द्याय्ला आलं की आवर्जून हा किस्सा त्यांना सांगतात.

मल्ली, मला ते एमोसनल अत्याचारचा हिवाईणीचा डॅन्स आठवला.. भारी! Lol

अक्षरी>> धन्य तुमची बहीण! पण खरं सांगू का... त्यातपण एक मजा असते... मी जाम एन्जॉय केलं आमचं लग्न! Happy

माझ्या भावाच्या लग्न्नातली गोश्ट आहे...दुपारी १२:३० चे लग्न्न होते..गडबडीमुळे सकाळी आम्ही काहि खाले नाहि..लग्न्नात सगळ्यात आधी जेवनाचा बेत होता.. लग्न्न मुलीकडे होते म्हनुन काऴजी नाहि असे वाटत होते..अक्षता पडता पडता आम्ही जेवणा कडे पलायन केले होते...अन पाहतो तर काय्...मुली कडचे पाहुणे आधिच जेवण करत होते...आमची वेळ आली तोवर जेवण संपले होते...अन आम्हाला हात हलवत परत यावे लागले...

सनी...:हहगलो:

माझ्या लग्नात अंतरपाट दुर झाल्यावर सगळे हार शोधत होते, पण हारच गायब होते, मग हॉल बाहेरच्या हार वाल्याकडुन एक एक रुपयाचे हार आणुन ते आम्हि गल्यात घातले

सगळ्यांचे किस्से लई भारी .हसुनहसून पोट दुखले.माझे लग्न ठरले तेंव्हा मैत्रिणिना कसे सांगायचे हेच कळत नव्ह्ते.मग मी त्यांना लोफर सिनेमाला नेले.आणी सिनेमा पाहाता पाहाता माझे लग्न ठरल्याचे त्यांना सांगितले.त्या एकदम काय? म्हणून ओरडल्या.आजुबाजुचे लोक दचकून आमच्याकडे पाहायला लागले.मी शांतपणे त्यांना सांगितले कि मी फोटो पण आणला आहे.मग पडद्यावरच्या उजेडात त्यांना फोटो दाखवला.बाहेर आल्यावर सगळ्याजणी ओरड्ल्या अगं लग्न ठरलेले असे सांगतात का?

मावसबहीणीच लग्न होत. ऐनवेळेस तोरड्या आणायला मी मामाबरोबर निघालो. कुडता नवा होता पण सलवार जुनीच घातलेली अंमळ घट्ट. बर मामाची जुन्या जमान्यातली स्कूटर पाय टाकला, तो किक मारत होता आणि हलकेच टुर्र टुर्र असा आवाज, म्हटल किती काळ ही असली स्कूटर वापरणारे.
त्यानंतर एकदोनदा मी हलल्यावर तो आवज झाला. मनात म्हटल अस्ला आवज करणार काहीच खल्लेल नाही. असो!!!
एकदाच्या तोरड्या का जोडव्या का काहीतरी घेऊन मी धापा टाकत वधुपक्षात शिरलो. मामाच्या स्कूटरला शिव्या देत भावाशी बोलत होतो. तो शांत पणे म्हणाला खाली बघ.

नाडी बांधलेला भाग सोडला तर काही फाटायच शिल्लक नव्हत.

आता मी गप्प बसाव ना पण .... "तरीच मला खुप हलक हलक वाटतय..."

एका मावशीच्या मिस्टरांकडे एक्स्ट्रा होती म्हणून आब्रू वाचली.

Biggrin Biggrin Biggrin Biggrin

मराठी लग्नांच उत्तरभारतीय करण हा एक चिड आणणारा भाग आहे.

एका भावाच्या लग्नात आम्ही अगोदरच बूट कपाटात लॉक केलेले. वहीनीकडची मंडळी उगाच चक्कर टाकून गेली.

विधी आटपल्यावर हा रीसेप्शनसाठी तयार व्हायला आला आणि लक्षात आल की त्याचा सूटच गायब आहे.

झाल वधुपक्षाशी ही गर्दी ... दार उघडेनात....

पैसे मागणारे करवल्यांचे आवाज ...

तेव्हढ्यात अलगद बाहेर पडायचा प्रयत्न करणारी ब्युटीशिअन तिथेच अडकली.

मी नी एका बहीणीनी भावाला जोरात तिच्यावर ढकलल.

हा तिच्यावर ती पडली मागे पडली एका करवलीवर.. हा सगळा गोंधळ

आणि त्यात वधुपक्षातून साडीबदलू बायकांच्या किंकाळ्या

शेवट वहीनीने तो सूट फेकला त्याच्या अंगावर आधी बाहेर हो!!!!

लाजा होम चालू होता.

बहीणच मुसमुसण्याची वाटचाल हमसून हमसून रडण्याकडे चालू होती.

जे काही तिला सांगितल त्यावरून तर तिच्या सासूबाईंच्याही मी लक्षात आहे

म्हटल "पहा ती माशी जर भटजीच्या बेंबीत गेली तर कुठून बाहेर पडेल"

माझ्या लग्नातला किस्सा..............
सप्तपदीच्या आधी जे पूजाविधी करतात ते चालले होते....
त्यात "चंद्रदर्शन" म्हणून एक प्रकार असतो त्यात नवरा नवरीला समोरासमोर उभे करतात आणि डोक्याला डोकं लावून थांबायला सांगतात.....

आम्ही तसे उभे राहिलो.... पहिली २-३ मिनिटे दोघंही शांत होतो.....
मग ५-६ मिनिटं झाली तरी भटजी काकांचं काही आमच्याकडे लक्ष जाईना तसं मात्र आम्हा दोघांनाही हसू यायला लागलं...... शेवटी अजिबातच control होइना दोघांना......... भावानं बरोबर तेंव्हाच फोटो काढून ठेवला.... डोक्याला डोकं लावून हसणारे दोघं.......... Lol

दुसरी त्याच दिवशी सकाळी साखरपुड्याची......
साखरपुडा झाला आणि सगळ्यांनी पेढे चारून चारून हैराण केलं होतं..... दोघांचे हि ५-५ पेढे खाऊन झाले होते.........
शेवटी पुन्हा कोणीतरी पेढे दिल्यावर मी अर्धाच खाल्ला आणि राहिलेला तसाच हातात धरून ठेवला होता....
नवरा म्हणाला मी खाणार नाही..... तर भटजीकाका म्हणाले..... खावा लागेल.........
मग मी आपलं विचारलं त्याला, "हा अर्धा खाशील का....?" हेतू हा की त्याला गोड आवडत नाही आणि नको असताना पूर्ण पेढा खायला लागू नये.........
झालं....... त्याच्या मित्रांनी एकच कल्ला केला..........
"ह्म्म........ खा रे खा....... खूप गोड लागेल......." Happy
मला तर तोंड कुठे लपवू असं झालं......

परवाच माझ्या वडीलांनी अटेंड केलेल्या लग्नाचा किस्सा..
नवरा नवरी एकमेकांच्या गळ्यात हार घालताना जो उचला उचलीचा प्रकार चालतो त्यात नवरीचा बॅलन्स गेला आणि हार चुकून भटजींच्या गळ्यात पडला Happy

Pages