Submitted by प्राची on 11 February, 2010 - 04:25
एका बाफवर सहज गप्पा मारताना मी माझ्या लग्नातली एक गंमत सांगितली.
सप्तपदीला मी एकटीच पहिली पाच पावलं चालले. नवरा माझा हात धरून एकाच जागी उभा. मग सहाव्या पावलाला त्याला पुढे झुकावं लागलं ते पाहून भटजी म्हणाले," अहो, तुम्ही नाही का सरकलात पुढे? तुम्हीही चालायचे असते." नवरा म्हणाला," तुम्ही सांगितलंच नाहीत." आणि टुणकन उडी मारून पुढे आला.:)
तुम्हांलाही तुमच्या लग्नात किंवा दुसर्या कोणाच्या लग्नात असे मजेदार अनुभव आले असतील. ते लिहा की इकडे. आपण सगळे ती मजा अनुभवू या.:)
या काही जुन्या हितगुजवरच्या गमतीजमती.
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112938.html?1153310676
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मंद्या
मंद्या
स्मिते भटजी गार झाले असणार
स्मिते
भटजी गार झाले असणार
मामी, मंद्या, dreamgirl,
मामी,



मंद्या,
dreamgirl,
स्मिता,
dreamgirl मस्त किस्सा...
बर्याच दिवसानी आले आणि खूप
बर्याच दिवसानी आले आणि खूप हसले.
माझ्या बायकोला जुळी बहीण
माझ्या बायकोला जुळी बहीण आहे..त्यामुळे आमच्या लग्नात तर अशक्य गोंधळ उडालेला...
लग्नाच्या दिवशी तिची बहीण काहीतरी कामानिमित्त कार्यालयाबाहेर चालली होती. ते नेमके आमच्या काकूने पाहिले...आणि तिला बोलायचीही संधी न देता...
अगं असं आपल्याच लग्नात बाहेर नाही जायचं, तुला काय पाहिजे ते मला सांग मी आणून देते..नवरी मुलगी अशी मंडपाबाहेर पडून कशी चालेल..इ.इ. असे बरेच मोठे लेक्चर दिले.
कहर म्हणजे मी सुद्धा गोंधळलो होतो...
माझी बायको शालू बदलायला गेली ती बराच वेळ येईच ना..इकडे गुरूजीमाझा जीव खायला लागले..शेवटी मीच तिला बोलवायला म्हणून वधूपक्षापाशी गेलो तर तिची बहिण बाहेर आली...
गडबडीत मी तिलाच म्हणालो.."किती उशीर???..ते गुरूजी ठणाणा करतायात बघ...चल लवकर.."
तिलाही वाटले की काहीतरी पुजेचे सामान, निरांजन वगैरे हवे असेल म्हणून बोलावत असतील. म्हणून तीपण आली भराभरा..
तिथे आल्यावर जेव्हा गुरूजी तिला म्हणाले हं, बसा पाटावर...
तेव्हा तिच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला...
"अय्या मी कशाला...???"
मी चमकून तिच्याकडे पाहिले आणि पाहतो तर तिच्या मागून माझे अर्धांग शालू सावरत येत होते...
बापरे त्या गोष्टीवरून मला आजही चिडवतात..नक्की तुझ्या मनात कोण भरली होती...वगैरे वगैरे....
@स्मिता, अशक्य हासले आहे मी,
@स्मिता, अशक्य हासले आहे मी, भटजीच्या गळ्यात.@ मंदार, तु थांबवच जरा आता, नहीतर माझी नोकरी जाइल हसुन हसुन
आशुच्याम्प,.... (काश,
आशुच्याम्प,....
(काश, लिम्बीची कुणी जुळी बहिण अस्ती तर... शेखचिल्ली चेहरा ) 
मी कोणत्या लग्नाला गेलेलो असलो, अन कुणी उचलाउचली केली तर चक्क शिव्या घालतो, साल्यो तुम्हाला काही रितीरिवाज, धर्मबिर्म, पावित्र्य आहे की नाही? अन असलच करायच असेल तर बोम्बलायला आम्हाला कशाला बोलावता? डोम्बार्याला बोलवा की लग्न लावायला!
असो.
My favorite dish is khima and
My favorite dish is khima and my wife’s name is Reema
मझ्या नवर्याने लग्नात घेतलेल नाव.
आशु एकावर एक मोफत असं वाटलं
आशु
एकावर एक मोफत असं वाटलं का रे? 
आशु बापरे आशु दोघी सोबत
आशु
बापरे आशु दोघी सोबत असतील तर किती गोंधळ होत असेल तुझा.... 
<<एकावर एक मोफत असं वाटलं का
<<एकावर एक मोफत असं वाटलं का रे? >>

रिमा नाव एकदम मस्तच ग...
स्मिता, आता नाय होत....दोघी
स्मिता, आता नाय होत....दोघी एकत्र असल्या की बायकोची करडी नजर असते माझ्यावर
आश्या, पण चुकुन एखाद वेळेस
आश्या, पण चुकुन एखाद वेळेस तरी झाले असेल .....
>>स्मिता, आता नाय होत....दोघी
>>स्मिता, आता नाय होत....दोघी एकत्र असल्या की बायकोची करडी नजर असते माझ्यावर
कॉन्व्हर्सली, जिची करडी नजर असेल तुझ्यावर ती बायको - असं समजतोस ना लब्बॉडा
स्मिता भटजींचा चेहरा इमॅजिन
स्मिता
भटजींचा चेहरा इमॅजिन करून अशक्य हसतेय
बिच्चारे पहिल्या लग्नातील हाराचं ओझं बाळगताना दमले असतील तोच दुसरा अनपेक्षित हल्ला!!! 
एकावर एक मोफत>>
dreamgirl अग भटजींचा चेहरा
dreamgirl अग भटजींचा चेहरा पाहण्यासारखा होता.... पण नवर्यामुलाचा त्याहुन पाहण्यासारखा होता .... ते पाहुन आम्ही इतके हसत होतो....
dreamgirl
dreamgirl
(No subject)
नातेवाईक लग्नाला येतात आणि
नातेवाईक लग्नाला येतात आणि आपापली सोय करुन घेतात...ज्याचे लग्न असते त्याचा सुद्धा विचार करत नाही..
माझ्या भावाच्या लग्नात असेच झाले ... सिमंतीचे जेवण आटोपल्यावर सगळे पटापट झोपण्यासाठी धावले... थंडी अस्ल्यामुळे गाद्या आणि चादरी पटापट पकडल्या.... आणि झोपले पण ...शेवटी नवरदेवाला म्हणजे माझ्या भावाला एकही गादी नव्हती... तो तसाच खुर्चीमध्येच झोपला...:हहगलो: तेव्हा खर राग आला होता पण नंतर खुप हसु येत होते.... आम्ही आजही त्याला चिडवतो...
स्मिता वाजंत्री वाले गादी
स्मिता

वाजंत्री वाले गादी उशी घेऊन झोपले होते, माझ्या एका मित्राने त्यांना विनंती केली होती
भाऊ उशी तरी भेटेल का?
तो म्हणाला नाही
मित्र म्हणाला : अरे दुल्हे राजा कि चाहिए.
शेवटी मलाच मध्यस्थी करावी लागली.
वाजंत्री वाले गादी उशी घेऊन
वाजंत्री वाले गादी उशी घेऊन झोपले होते,
राजे
राजे

शोभा
शोभा

माझी रूमपार्टनर विमं मध्ये
माझी रूमपार्टनर विमं मध्ये नावनोंदणीसाठी गेलेली. तिथल्या "अनुभवी संस्थापकांनी" तीची कसून चौकशी केली... "बाहेर कुठे 'काSSही' नाहीय ना???" आणि त्यांनी ते स्वतः कसे "फसवले" गेले त्यांच्या भाषेत
त्याचे किस्से सांगितले...
मागे अशाच काही मुली बाहेर "लफडं" (हा त्यांचाच शब्द ब्वॉ... नाहीतर तुम्ही करता ते प्रेम आम्ही करतो ते... आस्सं काही नाही बर्का
) असूनही घरच्यांच्या जबरदस्तीमुळे नाव तर नोंदवायच्या आणि ऐन लग्नाच्या वेळी गोंधळ घालायच्या...
एकजण मंगलाष्टका चालू असताना सावधान ऐकून थेट रामदासस्वामी इश्टाईलनी मागच्या मागे पळाली बाहेर येऊन रिक्षा पकडून निघून गेली... तरी मंडळी येवढी बेसावध की अक्षता टाकतायतंच!!
दुसरी तर थेट बॉलीवूड ईश्टाईल! तिने पळून घ्यायचेही कष्ट घेतले नाहीत. मंगलाष्टका झाल्या. मुहुर्ताला भटजींनी हार घालायचा इशारा करताच... नवरा मुलगा निमुटपणे मान तुकवून गळ्यात हार पडण्याची वाट बघत बसला.. तेवढ्यात... त्याच्या बाजूने एक साधासा झब्बा घातलेला दुसरा मुलगा चपळाईने पुढे झेपावला. वधूने डोळ्यांचं पातं लवायच्या आत तेवढ्याच चपळाईने त्या मुलाला हार घातला आणि ह्याने तिला! भटजींचे मंत्रपठण चालूच! त्यांना काय कोणाचेही कोणाशीही का होईना लग्न लावल्याशी अन दक्षिणेशी मतलब! सजलेला वरीजनल नवरा मान खाली घालूनच हुबा! इस सबसे अंजान! बाकीची प्रेक्षक मंडळी हैरान! नवर्या मुलाकडचे परेशान!!! नवर्या मुलीचे आईवडील बेजान!!! आणि तो डुप्लीकेट नवरा भाग्यवान! होना याच्या पैशाने त्याचं लग्न! पुन्हा धुमधडाक्यात, फुटकी कवडीपण न मोजता! है ना डोकॅलिटी!!!
स्वत:च्या पोरीने ४४० चे बल्ब झळकवले यात ते विमं वाले काय करणार??) दोघांनीही या विमं वाल्यांना धरलं! (यालाच चोराच्या उलट्या... म्हणतात काय??
) आत्ता बोला!! क्यो मंडळी, जोरका धक्का हाय जोरोंसे लगा ना??
आणि हे लग्न लागल्यावर वर आणि वधूंकडल्या (
एक फु.स. (नाय नाय फूस नाय लावत, ताईचा सल्ला देतेय :फिदी:)
(लाय्नीतल्या (उप) वरांनो, खरंच शादीका लड्डू खाऊन पस्तावायचे असेल तर उचला उचलीत वेळ काढण्यापेक्षा वधूकडून पटकन हार घालून घ्या(नाहीतर तुमच्या हातातोंडाशी आलेला लाड्डूचा घास कोणतरी दुसराच घेऊन जाईल :फिदी:) आणि "सुटलो बुवा!SSSSS!!!" रिअॅक्शन असेल तर मग प्रश्नच नाही!!!
याच्या पैशाने त्याचं
याच्या पैशाने त्याचं लग्न!>>>>>>>>
स्मिता, अगदी असच माझ्या
स्मिता, अगदी असच माझ्या मैत्रिणीच्या लग्नात झाल होत. फक्त ती खुर्चीत झोपली नाही. तीच लग्न ओक्टो-नोव्हे.मध्ये होत. थंडीचे दिवस. सीमांतपूजनाचे जेवण सर्वांनी पटापट केले. आणि सगळ्यांनी अंथरुणे -पांघरुणे काबिज केली. आमचं जेवण झाल्यावर, भावी वधू, आणि आंम्ही दोघी मैत्रिणी झोपायला आलो. पाहतो तर काय? अंथरून , पांघरून काहीच शिल्लक नव्हते. शेवटी भावी वधूने स्वत:च्या रुखवतावर मांडलेले बेडशीट राग्गानेच काढले. आणि तिघींनि ते एकच बेडशीट पांघरले. रात्रभर झोप लागली नाही. कारण तिघीही थंडीने कुडकुडत होतो. अजूनही ती आठवण काढून आम्ही हसतो.
ड्रीमगर्ल
ड्रीमगर्ल
शोभा
शोभा
हाहाहा.. मज्जा आली सर्वांचे
हाहाहा.. मज्जा आली सर्वांचे किस्से वाचोन
आशु... बापरे चक्क सीता और गीता ????
Pages