लग्नातल्या गमतीजमती

Submitted by प्राची on 11 February, 2010 - 04:25

एका बाफवर सहज गप्पा मारताना मी माझ्या लग्नातली एक गंमत सांगितली.

सप्तपदीला मी एकटीच पहिली पाच पावलं चालले. नवरा माझा हात धरून एकाच जागी उभा. मग सहाव्या पावलाला त्याला पुढे झुकावं लागलं ते पाहून भटजी म्हणाले," अहो, तुम्ही नाही का सरकलात पुढे? तुम्हीही चालायचे असते." नवरा म्हणाला," तुम्ही सांगितलंच नाहीत." आणि टुणकन उडी मारून पुढे आला.:)

तुम्हांलाही तुमच्या लग्नात किंवा दुसर्‍या कोणाच्या लग्नात असे मजेदार अनुभव आले असतील. ते लिहा की इकडे. आपण सगळे ती मजा अनुभवू या.:)

या काही जुन्या हितगुजवरच्या गमतीजमती.
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112938.html?1153310676

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा माझ्या आतेबहिणीच्या लग्नातला किस्सा.

तिने यु पी च्या मुलाशी लग्न केलं. ह्या नॉर्थ इंडियन्स बायकांना गायची भारी हौस. आवाज असो नसो त्या गातात. माझ्या आतेभावाचा मुलगा अडिच वर्षांचा असेल तेंव्हा. गाण्याला तो 'लाला' म्हणायचा.

मुलाची काकी तिच्या बेसूर्‍या आवाजात गात होती. ट्प्पे वगैरे असतील आता आठवत नाही. हे पोरगं तिच्या समोर उभं राहून ओरडत राहिलं " हा लाला बंद करा. हा लाला बंद करा." आमची सगळ्यांची हसून पुरेवाट.

काकीला मराठी कळत नव्हत नाहितर काय "बारात वापस नेली असती गाऊ देत नाही म्हणजे काय!" Happy

एकापेक्षा एक किस्से आहेत हं.
१०/१५ वर्षांनि लग्न म्हणजे कमालच ना !

आमचा लग्न मुहुर्त रात्रि ३ वाजता होता. कोणि आणि का काढला देव जाणे.
रात्रि ९ पासुन कसले कसले विधि होते हॉलवर. आणि लग्नाच्या दिवशि जेवायचे नसते उपास करायच असतो असहि सांगितलेले होते. पण माझ्या आईला वाटले एवध्या रात्रि लग्न. मग नविन घरात गेल की पोरिला खायला देतील कि नाहि. म्हणुन हॉलवर जायच्या आधि मला जेवायला दिल तिने Proud
ल्ग्न लागायच्या आधिच लोक जेवणार होती. ३ वाजेपर्यंत कोण थांबणार.
इथे लग्नविधि संपतच नव्हते गरमीत त्या होमपुढे बसुन माझि हालत खराब त्यात झोप आवरत नव्हती. शेवटि कधितरि लग्न लागल आणि पहाटे केव्हातरी आम्हि त्याच्या घरि गेलो. मी आधिच जेवले अस्ल्याने मला भुक लागली नव्हती झोप भयानक आली होती.
आणि बिचार्‍या नवर्‍याची भुकेने हालत खराब. त्याच्या आईने इत़कि दुरदृष्टी न दाखवल्याने तो आदल्या दिवशि सकाळपासुन नुसत पाणि पिउन होता. बिच्चारा Proud
आपल्याकडे बायका करतात तसा कडकडीत उपास. तो पहिला आणि शेवटचा उपास असेल त्याचा.

अजुन एक गंमत म्हणुजे आपल्याकडे लग्नाआधि हळ्द लागल्यावर नवरा नवरि भेटत नाहित. पण आम्हि भेटलो. नुसते भेटलो नाहि तर चक्क लग्नाच्या आदल्यादिवशि बाईकवरुन अर्धा तास फिरुन आलो. लग्नाच्या आदल्यादिवशि फिरायची गम्म्त खरच खुप वेगळिच आहे Happy

आडो Rofl

हो ग अर्धवट झोपेत खरच. मला अगदि घड्याळ बघायच होत मुहुर्ताला. का कोण जाणे. पण ते बघायचहि लक्षात राहिल नाहि.

Proud पंजाबी लोकांमध्ये/ नॉर्थ इंडियन लोकांमध्ये होतात ना गं अशी मध्यरात्री लग्नं? काय कारण पण, काही आयडिया?

उत्तर भारतात लग्न गोरज मुहूर्तावर किंवा रात्री होतात त्याचे धार्मिक कारण काही असेल तर माहित नाही पण मुख्य कारण प्रचंड उन्हाळा हे आहे. उन्हाळ्यात दिवसा जिथे घराबाहेर पडणे शक्य नाही अश्या ठिकाणी रात्री जेव्हा तापमान bearable असते तेव्हा लग्न केले जाते. अर्थात ही प्रथा पुढे उत्तर भारतीय दुसरीकडे कुठे गेले तरी त्यांच्याकडे पाळली गेल्याचे दिसुन येते, महाराष्ट्रात राहुन पण त्यांच्याकडे लग्ने रात्री होतात.

बरोबर गं रुनी. मी ही हेच लिहीणार होते की कुठेही गेले तरी लग्नं मात्र रात्रीच होतात.

<<" हा लाला बंद करा. हा लाला बंद करा.">>> Rofl

माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळी भटजी (पुरोहित) म्हणत असलेले अनेक मंत्र वगैरे बहिणीला व्यवस्थित तोंडपाठ म्हणता येत होते. गणेशपूजनाच्या वेळी तीही भटजींबरोबर उत्साहाने अथर्वशीर्ष जोरजोरात म्हणत होती!! आपल्या लग्नाचे विधी चालू असताना पुरोहितांबरोबर जोरजोरात मंत्रघोष करणारी आगळी नववधू पाहून उपस्थितांची मात्र चांगलीच करमणूक झाली!

सावली, लग्न लागलं तेव्हा मी झोपेत होते. माझ्या मनाविरुद्ध केलं गेलं वगैरे कांगावा करायला भरपूर स्कोप आहे तुला Biggrin

पंजाबी लोकांमध्ये/ नॉर्थ इंडियन लोकांमध्ये होतात ना गं अशी मध्यरात्री लग्नं? काय कारण पण, काही आयडिया?>>> अशीच रात्रीची लग्ने आंध्रातही होतात. एका लग्नात चौकशी केली असता एका वृद्धाने ऐतिहासीक कारण दिले. ते असे: फार पुर्वी लग्न वेळेस गनीम किंवा लुटरू वरातीवर हल्ले करून ऐवजच नव्हे तर तरुण मुली सुद्धा पळवून न्यायचे. त्यांच्यापासून संरक्षण म्हणून ही रीत सुरु झाली असावी.

रात्रीच्या वेळेला जास्त धोका नाही का गनीम आणि लुटारुंचा?

मला कळलेले कारण म्हणजे एक दिवस संपून दुसरा नव्या साथीदाराबरोबर सुरु करायचा. म्हणजे सिंगल आयुष्य संपून नव्या दिवसाबरोबर नव मॅरीड आयुष्य सुरु करायच.

नंणदेच्या लग्नात भट्जी जरा येडे होते असं त्यांच मत आहे. त्यांनी कन्यादान करणा-या काकांनाच जिजाजींच्या बोटात अंगठी घालायला सांगीतली म्हणे- रैना बर्‍याच ठिकाणी ही प्रथा आहे. माझ्या साखरपुड्याच्या वेळी मला अंगठी सा.बांनी घातली होती तर नवर्‍याला माझ्या बाबांनी

माझ लग्न झाल त्यादिवशी भारत- ऑस्ट्रेलिया एकदिवसिय सामना होता. नवरा क्रिकेटचा भारी शौकिन. वधु-वर आणि भटजी सोडले तर सगळेजण मॅच बघण्यात गुंग त्यामुळे नवर्‍याची मनातुन चिडचिड होत होती. एका पिक ओव्हरला सचिन खेळत होता आणि आमची सप्तपदी सुरु झाली. नवरा केविलवाण्या नजरेने भटजींना म्हणाला की आपण जरा सचिनची षटपदी झाल्यावर माझी सप्तपदी सुरु करायची का?? भटजी अवाक Lol

ती कुडी नव्हे. कुडी म्हणजे मुलगी. (हिन्दी, पंजाबी मध्ये)

मी मराठी आणि नवरा हिन्दी भषिक उत्तर प्रदेशिय म्हणून आयडी घेतला "मराठी कुडी"

शुभांगी Lol

माझ्या एका लांबच्या बहिणीचं लग्न होतं. तिच्या सासरच्यांचे मराठी चित्रपटसृष्टीशी थेट संबंध. त्यामुळे लग्नाला व रिसेप्शनला अनेक चित्रपट तारका, अभिनेते, निर्माते व चित्रपटसृष्टीशी संबंधित लोक उपस्थित होते. पण त्यामुळे मजा अशी झाली की अनेक निमंत्रितांची नजर वर-वधू ऐवजी त्या तारे-तारकांवर खिळलेली! लग्न लागल्यावर वधुवरांना शुभेच्छा देण्याबरोबर नट नट्यांच्या सह्या घेण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी जाम गर्दी उसळलेली! आजही आम्ही तिला कधीतरी चिडवतो, की लग्नाला अनेक पाहुणे तुला शुभेच्छा द्यायला नव्हते आले, तर त्यांच्या आवडत्या नटनट्यांना भेटायला आले होते, म्हणून! Light 1

नणंदेच्या मुलीचं अलिगढला लग्न. मी या आघी नवर्‍याच्या आत्याच्या मुलीचं लग्न मथुरेला अटेंड केलं होतं पण ते थोड्यावेळेकरता. हे घरचचं लग्न. त्यामुळे ४ दिवस आधीपासून जाऊन वगैरे रहाणं आलं. मुळात ते रात्रीच्या लग्नाची कन्सेप्टच पटत नव्हती. पण लग्नाच्या दिवशी जेव्हा त्या भल्यामोठ्या मॅरेज हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा मी चांगलीच इम्प्रेस झाले होते. मुंबईतले लग्नाचे हॉल, पुण्यातल्या लग्नाच्या लॉन्स यापलिकडे केवळ, मुंबईच्या रेसकोर्स वरची लग्न बघितलेली. त्यामुळे लग्नाचं मैदान इतकं मोठं असू शकत? यावर विश्वासच बसेना. शेजारीच दुमजली इमारत. त्यातल्या खोल्या जवळच्या प्रत्येक फॅमिलीकरता. भरपूर रोषणाई आणि खाण्यापिण्याचे झाडून सगळे प्रकार मौजूद.

मी स्वत:लाच फटकारलं...उगाच पूर्वग्रहदूषित नजरेनी न पाहता लग्न एन्जॉय करायचं ठरवलं. मंडळी खातपीत म्युझिकवर मस्त नाचत होती. मुलाची 'बारात' साधारण १० वाजता का काय आली. मग मुख्य कार्यक्रम 'जयमाला' म्हणजे वधुवरांनी एकमेकांना हार घालणे. तो करण्याकरता मुख्य स्टेजपासून जवळच दुसरा एक उंच चबुतरा उभारला होता. मला 'युपी लग्न-साक्षर' करण्याचं काम माझी मोठी जाऊ स्वतःहून करत होती. तिनं अभिमानानं सांगितलं "अभी इसपर चढकर जयमाला पडेगी... आजकल ये ही टाईप की जयमाला पडती है|".....मी एकदम उत्सुकतेनं बघू लागले.

आणि मग जे काही घडलं ते बघून मला हसावं की रडावं तेच कळेना. त्या उंच चबुतर्‍याच्या दोन बाजूंनी असलेल्या पायर्‍यांवरून एका बाजूनी नवरी आणि दुसर्‍या बाजूने दुल्हेराजा चढू लागले. त्याबरोबर माईकवरून एक माणूस प्रचंड उत्साहाने लाईव कॉमेंटरी करायला लागला. मागे हिंदी सिनेमातली 'शादी - प्यार - मेहेबूब' रेलेटेड गाणी लागायला लागली - बहरो फूल बरसाओ मेरा मेहेबूब आया है| इ. चबुतर्‍याच्या मागे लपवलेलं एक मशिन गुलाबपाकळ्यांचा वर्षाव करू लागलं ... एक अतिशय फिल्मी वातावरण निर्माण झालं. लग्नाची पवित्रता वगैरे गेली तेल लावत.

मग त्या दोघांना चबुतर्‍यावरती एकमेकासमोर उभं केलं आणि ते छोटसं स्टेज चक्क गोलगोल फिरायला लागलं की! अशा त्या गरगरणार्‍या स्टेजवर तोल सांभाळत, गुलाबाच्या पाकळ्याचा पाऊस झेलत दोघांनी एकमेकांना हार घातले. मागे तो धावतं वर्णन करणारा एकदम फुल्ल फॉर्मात होताच .... एकच कल्ला चालू होता. तरी मी म्हणत होते ठीकच आहे. ही त्यांची पद्धत आहे तर काय करणार....

जयमाला पडताच मंडळी आता officially जेवणावर ताव मारायला लागली. एकीकडे नवरानवरी मुख्य स्टेजवर बसून आहेर स्विकारत होते, फोटो काढत होते. पण मग जेवण झाल्यावर पाहुणे जायला लागले. मला कळेना लग्नाच्या मुख्य विधींकरता कोणीच कसं थांबणार नाही? पण म्हणे विधींकरता फक्त जवळचे नातेवाईक असतात. बघता बघता जेवण आटपली, बरीचशी मंडळी गेली. तर काय? मंडपवाल्याने रोषणाई पण उतरवायला सुरवात केली. इथे अजून सप्तपदी व्हायचीये आणि लॉन एकदम ओकंबोकं वाटायला लागलेलं - पण ते मलाच अर्थात. बाकीच्यांना सवय होती या सगळ्याची. बरं तर. लग्नविधीचा मंडप तर अजून शाबूत आहे ना? मग झालं तर. मी स्वतःची समजूत घातली.

आमचं जेऊन झाल्यावर मी आणि जाऊबाई लग्नविधीच्या मंडपात पोचलो. तर तिथे इनमिन १० मंडळी. बाकी सगळे चक्क झोपायला गेलेले. अगदी मुलीची सख्खी मावशी - माझी धाकटी नणंद सुध्दा. मग ते विधी बराच वेळ चालले होते. मधून मधून मंडळी येऊन एखादी चक्कर टाकून जायची. आम्ही पण मधे जाऊन झोपेचा घाणा काढला .... पण अगदी कंटाळा कंटाळा आला होता. माझी मुलगी केव्हाच झोपली होती आणि नवरा त्याच्या भावांबरोबर गप्पा मारत वर खोलीत.

पहाटे विधी संपले आणि मग बिदाई वगैरे झाली. आम्ही कारमधे बसताच क्षणी झोपलो. घरी येऊन मी कसेबसे कपडे बदलले आणि जी ताणून दिली ती संध्याकाळी उठले. सगळी लग्न कम्पल्सरी सकाळची करण्याचा नियमच केला पाहिजे असं वाटायला लागलय..... सगळ्यात टेन्शनवाली गोष्ट अशी की, की ही केवळ सुरवात आहे ... अजून बरीच भाचरंडं लग्नाच्या लाईनीत आहेत.

मामी, खरंच गंमत वाटली वाचून.... माझ्या मित्रमंडळी, मैत्रिणींचीही अशीच मध्यरात्री लग्नं झाली आहेत. पण मी त्या लग्नांना जयमाला इ.इ. प्रकारांना न थांबता तेथील राजेशाही भोजनावर ताव मारून सटकायचे काम मोठ्या प्रामाणिकपणे केले आहे. त्यांनी त्यांच्या लग्नविधींविषयी सांगितलेल्या वृत्तांताशी हे वर्णन अगदी जुळणारे!! Happy

Pages