लग्न ठरवताना घ्यायची सावधगिरी

Submitted by सिद्धा on 6 January, 2010 - 21:01

भारतीय समाजात लग्नाला अजूनही प्रचंड महत्त्व आहे. मुलाचे किंवा मुलीचे लग्न न झाल्यास किंवा लग्नाला उशीर होत असल्यास लग्नाचा मुलगा/मुलगी , आई-वडिल हे मानसिकदृष्ट्या हताश होतात आणि नातेवाईक, आजूबाजूचे प्रश्न विचारून त्यांना हैराण करतात. पण लग्न ही इतकी सोपी गोष्ट नाही. अजूनही आपल्याकडे लग्न ठरवताना बरेचदा एकदा झालेल्या चहा-पोह्यांवर, एक्-दोनदाच्या झालेल्या ओझरत्या भेटींवर, कुणा मध्यस्थावर किंवा जुजबी चौकशीवर पूर्ण विश्वास ठेवला जातो. बरेचदा आयुष्यभर बरोबर राहूनही माणसे कळत नाहीत, तर ह्या तुटक भेटी/माहितीच्या आधारावर कशी कळतील? अर्थात लग्न ठरवण्याचा हा ट्रेंड हळूहळू बदलतोय, काही वेळा मुले - मुली स्वतःच लग्न ठरवतात तर काही वेळा चॅटींग/डेटींग करून, ऑनलाईन मॅट्रीमोनीयल वेबसाईट्स द्वारे ठरवतात.

लग्न कसेही ठरवलेले असो, काहीवेळा लग्नांत फसवणूक होते. जोडीदार मानसिक /शारिरिक दृष्ट्या अपंग/कमजोर निघू शकतो. कधी विवाहित असू शकतो. बरेचदा वाईट सवयी/संशयी, तापट स्वभाव असू शकतो. ईंटरनेट वरच्या चॅटिंग/डेटिंग, ऑनलाईन मॅट्रीमोनीयल वेबसाईट्स वरच्या अनेक फसवणुकीच्या प्रकरणांवर आपण बरेचदा बातम्या वाचतो/पाहतो. काही वेळा लग्न झाल्यावर जोडीदार अपेक्षांमध्ये अगदीच बसत नाही हे लक्षात येऊन मानसिक त्रास होतो, त्याची परिणती घटस्फोटातही होते.

फसवणूक मुलींचीच होते असे नाही, तर मुलांचीही होते. आणि समाजाच्या सगळ्या स्थरांतील लोकांची होते. बराच खर्च करून झालेल्या अशा लग्नातील फसवल्या गेलेली व्यक्ती आयुष्यातून उध्वस्त होते. ह्या गोष्टी टाळता येऊ शकतात.

मायबोलीकर सुनील यांनी लिहिलेली गोष्ट 'विश्वास - अविश्वास', तसेच 'कुणाशी तरी बोलायचंय' मध्ये वेळोवेळी येणार्‍या अनुभवांवरुन हा धागा सुरु केला आहे. इथे मायबोलीकरांना माहिती असणारे लग्नातील फसवणुकीचे प्रकार व त्यावर घेता येणारी/घेता आली असती अशी सावधगिरी ह्यावर लिहिणे अपेक्षित आहे, जेणेकरुन या माहितीचा ज्यांचे लग्न ठरायचे आहे त्यांना फायदा होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लग्नात फसवणुक होवु नये म्हणुन घ्यायचे २ उपाय

१) लग्नच न करणे

२) समजा लग्न केलेत अन फसवणुक झाली तर किमान ५- ५० अजुन लग्न करणे म्हणजे किमान परसेंटेज फसवणुक १००% वरुन किमान २०-२५% वर आणता येईल Biggrin

आता थोडेसे गंभीर

लग्न ही मुळातच एक अत्यंत्य कृत्रीम व्यवस्था आहे . २ व्यक्तीं कधीच १००% कॉम्प्लीमेन्टरी असु शकत नाहीत .
त्यामुळे लग्नानंतर ( मग ते अरेंज असे कि लव्ह ) वाद विवाद हे निश्चीतच आहेत .
आता पार्टनरचा स्वभाव विचित्र आहे त्याने/ तीने फसवणुक केली असे म्हणताना तुम्हाला त्याचा स्वभाव कळत नाही ही तुमची इन कॉम्पीटन्सी आहे तुम्ही च फसवणुक केलीत असे म्हणायला वाव आहे .

तात्पर्य : लग्ना नंतर जे काही भले बुरे प्रकार पार्टनर बद्दल कळतील ते त्याचे व्यक्तीमत्वाचे पैलु आहेत जे आपल्या पेक्षा वेगळे असु शकतात हे मोकळ्या मनाने मान्य करणे हाच "फसवणुक" टाळण्याचा एकमेव मार्ग आहे .
हे झाले मानसिक फसवणुकी बाबत.
शारीरिक बाबतीत लग्ना आधी पत्रिका पाहण्या पेक्षा लोक मेडीकल टेस्ट का करत नाहीत हे अगम्य आहे .
.

जामोप्या ,

धर्म बदलल्यावर जुन्या धर्मातली लग्न व्हॉईड ठरते का ?

(avaaMtar
जामोप्या ,

धर्मांतर : फायदे अन तोटे असा एक धागा काढावात अशी मी आपल्याला नम्र विनंती करत आहे :खोखो:)

http://www.maayboli.com/node/24151?page=3

जुन्या लग्नाचे लडतर तसेच रहाणार.. मी म्हणतोय की पुरुषाने पहिलेच लग्न करताना धर्म बदलावा..

मला एक मॉरल प्रश्न पडला आहे. एखाद्या मुलामध्ये वंध्यत्व अथवा काही लैंगिक समस्या असतील तर लग्नाआधी त्या मुलीकडच्यांना सांगणे\लग्नच न करणे अपेक्षित आहे, नाहीतर ती फसवणूक मानली जाते...जे योग्य आहे.
पण आजकाल बर्‍याच मुलींना रिप्रॉडक्टिव्ह समस्या (CPOS वगैरे) असतात, त्यावर ट्रीटमेंट\डॉक्टरचा सल्ला घेतलेला असतो आणि त्यांना मूल होणे खडतर आहे हे मुलीकडच्यांना उमजलेले असते. तरीही लग्नावेळी सहसा याची पूर्वसूचना दिली जात नाही. पुरुषदेखील लग्न करतात ते केवळ शारिरीक गरजांसाठी/घरकामाला बाई मिळावी म्हणून नव्हे, तर त्यांनाही प्रेम, आधार आणि बरोबरीने अपत्यसुख अशा पूर्ण अनुभवाची अपेक्षा असते. अशावेळी मुलींच्या अशा समस्या लपवून ठेवणे योग्य वाटते का?

हो अशी फसवणुक दोन्ही बाजुने होते. माझ्या एका मित्राचे लग्न ठरवताना, त्याने जी मुलगी पाहिली तिचे पोट मोठे दिसायचे बाकी अंगाच्या मानाने. त्याने तिला लग्नाआधी विचारलेही तेव्हा ती म्हणाली की तिचे पोट जरा मोठेच आहे पहिल्यापासुन. लग्न झाले आणि मग तिचे पोट वारंवार दुखु लागले. त्याने डॉ. कडे नेल्यावर, तपासण्या झाल्यावर कळाले की पोटात कसलासा गोळा आहे तो ऑपरेशन करुन काढावा लागेल. नेमके आजाराचे नाव आठवत नाही. तिने नंतर त्याला कबुली दिली की हे आधीच माहेरी ठाउक होते पण त्यांना ऑपरेशनचा खर्च करायचा नव्हता. लग्नानंतर बघतील काय ते असा विचार करुन लग्न लावुन दिले. मित्राने तो विषय सोडुन दिला. आता मजेत आहेत.

Pages