भारतीय समाजात लग्नाला अजूनही प्रचंड महत्त्व आहे. मुलाचे किंवा मुलीचे लग्न न झाल्यास किंवा लग्नाला उशीर होत असल्यास लग्नाचा मुलगा/मुलगी , आई-वडिल हे मानसिकदृष्ट्या हताश होतात आणि नातेवाईक, आजूबाजूचे प्रश्न विचारून त्यांना हैराण करतात. पण लग्न ही इतकी सोपी गोष्ट नाही. अजूनही आपल्याकडे लग्न ठरवताना बरेचदा एकदा झालेल्या चहा-पोह्यांवर, एक्-दोनदाच्या झालेल्या ओझरत्या भेटींवर, कुणा मध्यस्थावर किंवा जुजबी चौकशीवर पूर्ण विश्वास ठेवला जातो. बरेचदा आयुष्यभर बरोबर राहूनही माणसे कळत नाहीत, तर ह्या तुटक भेटी/माहितीच्या आधारावर कशी कळतील? अर्थात लग्न ठरवण्याचा हा ट्रेंड हळूहळू बदलतोय, काही वेळा मुले - मुली स्वतःच लग्न ठरवतात तर काही वेळा चॅटींग/डेटींग करून, ऑनलाईन मॅट्रीमोनीयल वेबसाईट्स द्वारे ठरवतात.
लग्न कसेही ठरवलेले असो, काहीवेळा लग्नांत फसवणूक होते. जोडीदार मानसिक /शारिरिक दृष्ट्या अपंग/कमजोर निघू शकतो. कधी विवाहित असू शकतो. बरेचदा वाईट सवयी/संशयी, तापट स्वभाव असू शकतो. ईंटरनेट वरच्या चॅटिंग/डेटिंग, ऑनलाईन मॅट्रीमोनीयल वेबसाईट्स वरच्या अनेक फसवणुकीच्या प्रकरणांवर आपण बरेचदा बातम्या वाचतो/पाहतो. काही वेळा लग्न झाल्यावर जोडीदार अपेक्षांमध्ये अगदीच बसत नाही हे लक्षात येऊन मानसिक त्रास होतो, त्याची परिणती घटस्फोटातही होते.
फसवणूक मुलींचीच होते असे नाही, तर मुलांचीही होते. आणि समाजाच्या सगळ्या स्थरांतील लोकांची होते. बराच खर्च करून झालेल्या अशा लग्नातील फसवल्या गेलेली व्यक्ती आयुष्यातून उध्वस्त होते. ह्या गोष्टी टाळता येऊ शकतात.
मायबोलीकर सुनील यांनी लिहिलेली गोष्ट 'विश्वास - अविश्वास', तसेच 'कुणाशी तरी बोलायचंय' मध्ये वेळोवेळी येणार्या अनुभवांवरुन हा धागा सुरु केला आहे. इथे मायबोलीकरांना माहिती असणारे लग्नातील फसवणुकीचे प्रकार व त्यावर घेता येणारी/घेता आली असती अशी सावधगिरी ह्यावर लिहिणे अपेक्षित आहे, जेणेकरुन या माहितीचा ज्यांचे लग्न ठरायचे आहे त्यांना फायदा होईल.
जामोप्या -- बायकानी झटके
जामोप्या -- बायकानी झटके दिले की पुरुष शहाणपणा शिकतात, त्याचा हा पुरावा!!
: हहगलो:
२-२ लग्ने करायची अक्कल
२-२ लग्ने करायची अक्कल असणार्या बाईला , दुसर्याचे पैसे स्वतःहून परत करावेत, हे नवर्याने शिकवले तरच समजणार का? आणि ही बाई शाळेत मास्तरीण आहे!!! आणि हे जर नवरा करू शकला नाही तर नवर्यालाच दोषी मानायचे का?
असेच असेल तर व्यसनी पुरुषाना व्यसनापासून परावृत्त करणे हे मग बायकोचे कर्तव्य मानायचे का? आणि नवरा अशी व्यसने करत असेल, तर त्याचा दोष बायकांच्या माथी मारायचा का?
पहिल्या नवर्यावर मी अन्याय करत नाही आहे, उलट हे पैसे त्या बाईनेच परत करायला हवेत...
( मी माझ्या सासूला विचारले, ती म्हणाली त्याने याविरुद्ध तक्रार केली नाही... आम्ही काय करणार? बिचारा घटस्फोट मिळवतानाच थकला आता परत या विषयावर कशाला भांडेल? ...... बायकोवर पाळत ठेऊन तिला हॉटेलात रंगेहात पकडले, पंचनामा केला, तेंव्हा कुठे त्याचा घटस्फोट मंजूर झाला... )
नोकरीचे फायदे तर व्यक्तीशः त्या बाईलाच मिळत रहाणार.... यात त्या दुसर्या नवर्याचा स्म्बंध येतच नाही..... त्याने कर्ज आपल्या डोक्यावर घ्यायचे नाकारले, तरीही त्याची नियत खोटी आहे, असे म्हणायचा कुणाला अधिकार नाही... तो निर्णय हा त्याचा अधिकार आहे... नवरा-बायको यांचे पगार्/देणी/ आईबापाची जबाबदारी ही त्यांची वैयक्तिक जबाबदारी आहे, असे कायदा मानतो...... मुलीने तिच्या आईबापाला पाहिले नाही तरी कायदा जावयाला शिक्षा/दोष देऊ शकत नाही.... कारण तो त्या जबाबदारीच्या कक्षेत येतच नाही..... त्याने चार चांगल्या गोष्टी शिकवाव्यात, ही त्याची नैतिक जबाबदारी हे मान्य... पण जी बाई स्वतःचीच नैतिक जबाबदारी पाळत नाही, ती नवर्याच्या नैतिक जबाबदारीची काळजी कशाला करील ?
तुमचा काहितरी गैरसमज होतोय..
तुमचा काहितरी गैरसमज होतोय.. अशा बाईला मी चांगलं म्हणतच नाहिये!
तुमचा काहितरी गैरसमज होतोय..
तुमचा काहितरी गैरसमज होतोय.. अशा बाईला मी चांगलं म्हणतच नाहिये
माझा आक्षेप आहे, तो दुसर्या नवर्याला वाईट म्हणण्याला.... ...
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ये मर्द बडे दिल सर्द बडे बेदर्द चलो जी माना
मर्दों का फिर भी गुलाम है जमाना.....
पण जी बाई स्वतःचीच नैतिक
पण जी बाई स्वतःचीच नैतिक जबाबदारी पाळत नाही, ती नवर्याच्या नैतिक जबाबदारीची काळजी कशाला करील ?>> अनुमोदन भाउ.
जागोमोहनप्यारे तुमचा
जागोमोहनप्यारे तुमचा प्रोब्लेम कळला कारण अनुभव पण आहे पण तुम्ही निष्कर्ष चुकीचा काढलात.
माझ्यामते निष्कर्ष हा की लोभि, स्वार्थि माणसे फक्त सासर्चिच असतात असे नाही. त्याना जात, धर्म वा लिंग सासर्/माहेर नसते.
म्हणुन लग्नाआधी आर्थिक compatibility आणि अपेक्षा स्पष्ट करव्यात.
लग्नानंतर सर्वात जास्त मतभेद हे आर्थीक कारणावरुनच होतात हे boring, पण सत्य आहे.
माझ्या भावजयीने लग्नानंतर सांगितले की तीच्या वड्लान्नि business chya नावाखालि खुप पैसे वेळोवेळी
घालवीले. तिच्या आतेन्नि लग्न न कर्ता सर्व यान्चा भार उचलिला म्हणुन त्यांचे चालले. यासाठि ती
आप्ला पुर्ण नाही पण आर्धा पगार माहेरि पाठ्वते. हे भावाला ठिक वाटले. पण हळुहळु मागण्या वाढ्तच गेल्या.
माझा भाउ आई बाबांपसुन वेगळा रहातो. सर्व स्वैपाक आणी डिशेस नेहेमि तोच करतो (तिची आई पण वड्लान्ना असेच करायला लावाय्ची कारण ते कामधंदा करत नसत) . माझ्या भावजैपेक्षा डबल कमव्तो याउपर तिचे आईबाबा आणि बहिणि ५ वर्षात ३ वर्षे त्यांच्याकडेच होत्या. पुढे असे लक्शात आले की तिची अविवाहीत आत्या एका सिंध्याकडे कामाला होती. त्यांनी हिच्या आईवडिलान्ना घर घेउन दिले आणि बाय्कोच्या लग्नात त्यांच्याकड्चा अर्धा खर्च केला. दुर्दैव आसे की यात काही गड्बड आहे असे त्याच्या बाय्कोला माहित नाही, आणी तिला वाइट वाटेल म्हणुन भाउ बोलुही शकत नाही. तिचे आई वडील यान्च्याबरोबर फिरायला (माझ्या बाबान्नी लग्नानंतर या दोघांसाठी आम्बोळीला बंगला book केला आणि तिसर्या दिवशी हीची बहीण join झाली कारण तिला समुद्र खुप आवडतो ) सगळीकडे जातात. त्याना घराला renovation साठी, AC साठी पैसे घेतले. माझ्या आईला हार्ट्चा त्रास आहे आणि त्यान्च्याकडेही AC नाही. त्याच्या बाय्कोला guilty वाट्ते आणी ति म्हणते की आपण सासरी पण नविन फ्रिज (आम्चा २० वर्ष जुना आहे) AC घेउ.
आता भावाचा प्रोब्लेम आसा की असे खर्च ३, ३ (सासरी माहेरी आणि घरी ) करायला गेला तर त्यान्च्या भविष्याचे काय. बर आता त्याला २ मुली आहेत (आणि नाही म्ह्ट्ले तरी बाय्कोवर प्रेम ही आहे) यामुळे वेगळा पण होउ शकत नाही. तो वेगळा झाला तर हिच्या माहेर्च्यान्ना हवेच आहे कारण पुर्वी आत्येच्या पैशावर राहिले आता हिच्या पगारावर रहातिल. त्याच्या बाय्कोलाही कळते पण काय करणार लहान पणा पासुन ती खुपच आईच्या धाकात वाढ्ली आहे. काही गोष्टी तिने आइच्या सांगण्यावरुन केल्यात त्या इथे लिहिण्याजोग्याही नाहीत (एक सांगतेच लग्नानंतर ९ माहिने भावाला काही करु दिले नाही कारण तिच्या आईने सांगितले (का ते ती सांगत नाही). १००% खरे सांग्ते थोडापण मसाला नाही. भावाने फक्त मला सांगितले व आईला बोलु नको, त्याला विचित्र वाटते असे म्हणाला. बाय्को आईच्या कह्यात असेल तर असा तोन्ड दाबुन मार मिळतो. बाय्कोला असा त्रास झाला तर जशा आधार संस्था आहेत तशा ह्या प्रोब्लेम्ससाठी पुरुषान्नाही हेल्प हवी, सर्वच बाय्का काय समुपदेशनासाठी तयर होत नाहीत,
माझी आई दुख्खी असते. तिला वाटते तिनेच नीट चौकशि करय्ल हवी होती. खुप उत्साही आणी समजुत्दार होता माझा भाउ. नानबा काही काळानी business करावा अशी त्याची इच्छा होती (He is MBA from IIM Ahemdabad) पण आता काही शक्य वाटत नाही. सध्या त्याने स्वताला सावरले आहे. "Love means giving something up which is dear to you" वगैरे सांगतो. मला दु:ख हेच होते की काहिंनाच जास्त त्याग करावा लाग्तो.
म्हणुन लग्न कर्ताना आर्थिक compatibility पहाणे महत्वाचे नाहीतर मुक्याने मार मिळतो. कामाचे गुलाम होतो स्वप्ने बाजुला राह्तात आणि नान्बा सार्ख्यां कडुन उप्देश ऐकावे लागतात.
आता जमोप तुम्हाला , सर्वच स्त्रिया अशा नस्तात, माझि दुसरि भावजय अत्यंत गुणी आहे, ती पण तिच्या आई वडिलान्ना gift, पैसे पाठ्विते पण त्यांच्या कह्यात नाही. तुमचा उद्वेग समजातो पण हुंडा घेणे देणे फारच वाइट कारण बरीच लोक अशी नस्तात. पण १००% पैसे माहेरी पाठवते म्हण्जे उलट हुण्ड्याचाच प्रकार झाला, याविरुद्ध ही कायदा हवा, कारण बाय्को कमविती असली की नव्र्यालाही घरकाम पडतेच की,
मग सर्व पैसे का पाठ्वावेत. तरी तुम्ही लवकर काडिमोड घेतलात हे ठीक केले.
नान्बा स्वार्थी लोक अशी मदत केली म्हणुन क्रुतज्ञ ह्रुदय देत नाहीत उलट आजुन जास्त कसा फायदा घेता येइल हे पाहतात आणि वर कोणी आप्ल्या सासुला कशी Europechi tour करून दिलि. आप्ल्या मुलिला कशी श्रिमंत स्थळे मिळता मिळता चुकलि या कहण्या जावयाल ऐकवतात.
चुकुन वहिनीला भावजय लिहिले,
चुकुन वहिनीला भावजय लिहिले, मी बरेच्दा हा गोन्धळ कर्ते कारण नावाने हाक मारायची सवय.
-------
जागोमोहनप्यारे तुमचा प्रोब्लेम कळला कारण अनुभव पण आहे पण तुम्ही निष्कर्ष चुकीचा काढलात.
माझ्यामते निष्कर्ष हा की लोभि, स्वार्थि माणसे फक्त सासर्चिच असतात असे नाही. त्याना जात, धर्म वा लिंग सासर्/माहेर नसते.
म्हणुन लग्नाआधी आर्थिक compatibility आणि अपेक्षा स्पष्ट करव्यात.
लग्नानंतर सर्वात जास्त मतभेद हे आर्थीक कारणावरुनच होतात हे boring, पण सत्य आहे.
माझ्या वहिनीने लग्नानंतर सांगितले की तीच्या वड्लान्नि business chya नावाखालि खुप पैसे वेळोवेळी
घालवीले. तिच्या आतेन्नि लग्न न कर्ता सर्व यान्चा भार उचलिला म्हणुन त्यांचे चालले. यासाठि ती
आप्ला पुर्ण नाही पण आर्धा पगार माहेरि पाठ्वते. हे भावाला ठिक वाटले. पण हळुहळु मागण्या वाढ्तच गेल्या.
माझा भाउ आई बाबांपसुन वेगळा रहातो. सर्व स्वैपाक आणी डिशेस नेहेमि तोच करतो (तिची आई पण वड्लान्ना असेच करायला लावाय्ची कारण ते कामधंदा करत नसत) . माझ्या वहिनीपेक्षा डबल कमव्तो याउपर तिचे आईबाबा आणि बहिणि ५ वर्षात ३ वर्षे त्यांच्याकडेच होत्या. पुढे असे लक्शात आले की तिची अविवाहीत आत्या एका सिंध्याकडे कामाला होती. त्यांनी हिच्या आईवडिलान्ना घर घेउन दिले आणि बाय्कोच्या लग्नात त्यांच्याकड्चा अर्धा खर्च केला. दुर्दैव आसे की यात काही गड्बड आहे असे त्याच्या बाय्कोला माहित नाही, आणी तिला वाइट वाटेल म्हणुन भाउ बोलुही शकत नाही. तिचे आई वडील यान्च्याबरोबर फिरायला (माझ्या बाबान्नी लग्नानंतर या दोघांसाठी आम्बोळीला बंगला book केला आणि तिसर्या दिवशी हीची बहीण join झाली कारण तिला समुद्र खुप आवडतो ) सगळीकडे जातात. त्याना घराला renovation साठी, AC साठी पैसे घेतले. माझ्या आईला हार्ट्चा त्रास आहे आणि त्यान्च्याकडेही AC नाही. त्याच्या बाय्कोला guilty वाट्ते आणी ति म्हणते की आपण सासरी पण नविन फ्रिज (आम्चा २० वर्ष जुना आहे) AC घेउ.
आता भावाचा प्रोब्लेम आसा की असे खर्च ३, ३ (सासरी माहेरी आणि घरी ) करायला गेला तर त्यान्च्या भविष्याचे काय. बर आता त्याला २ मुली आहेत (आणि नाही म्ह्ट्ले तरी बाय्कोवर प्रेम ही आहे) यामुळे वेगळा पण होउ शकत नाही. तो वेगळा झाला तर हिच्या माहेर्च्यान्ना हवेच आहे कारण पुर्वी आत्येच्या पैशावर राहिले आता हिच्या पगारावर रहातिल. त्याच्या बाय्कोलाही कळते पण काय करणार लहान पणा पासुन ती खुपच आईच्या धाकात वाढ्ली आहे. काही गोष्टी तिने आइच्या सांगण्यावरुन केल्यात त्या इथे लिहिण्याजोग्याही नाहीत (एक सांगतेच लग्नानंतर ९ माहिने भावाला काही करु दिले नाही कारण तिच्या आईने सांगितले (का ते ती सांगत नाही). १००% खरे सांग्ते थोडापण मसाला नाही. भावाने फक्त मला सांगितले व आईला बोलु नको, त्याला विचित्र वाटते असे म्हणाला. बाय्को आईच्या कह्यात असेल तर असा तोन्ड दाबुन मार मिळतो. बाय्कोला असा त्रास झाला तर जशा आधार संस्था आहेत तशा ह्या प्रोब्लेम्ससाठी पुरुषान्नाही हेल्प हवी, सर्वच बाय्का काय समुपदेशनासाठी तयर होत नाहीत,
माझी आई दुख्खी असते. तिला वाटते तिनेच नीट चौकशि करय्ल हवी होती. खुप उत्साही आणी समजुत्दार होता माझा भाउ. नानबा काही काळानी business करावा अशी त्याची इच्छा होती (He is MBA from IIM Ahemdabad) पण आता काही शक्य वाटत नाही. सध्या त्याने स्वताला सावरले आहे. "Love means giving something up which is dear to you" वगैरे सांगतो. मला दु:ख हेच होते की काहिंनाच जास्त त्याग करावा लाग्तो.
म्हणुन लग्न कर्ताना आर्थिक compatibility पहाणे महत्वाचे नाहीतर मुक्याने मार मिळतो. कामाचे गुलाम होतो स्वप्ने बाजुला राह्तात आणि नान्बा सार्ख्यां कडुन उप्देश ऐकावे लागतात.
आता जमोप तुम्हाला , सर्वच स्त्रिया अशा नस्तात, माझि दुसरि वहिनी अत्यंत गुणी आहे, ती पण तिच्या आई वडिलान्ना gift, पैसे पाठ्विते पण त्यांच्या कह्यात नाही. तुमचा उद्वेग समजातो पण हुंडा घेणे देणे फारच वाइट कारण बरीच लोक अशी नस्तात. पण १००% पैसे माहेरी पाठवते म्हण्जे उलट हुण्ड्याचाच प्रकार झाला, याविरुद्ध ही कायदा हवा, कारण बाय्को कमविती असली की नव्र्यालाही घरकाम पडतेच की,
मग सर्व पैसे का पाठ्वावेत. तरी तुम्ही लवकर काडिमोड घेतलात हे ठीक केले.
नान्बा स्वार्थी लोक अशी मदत केली म्हणुन क्रुतज्ञ ह्रुदय देत नाहीत उलट आजुन जास्त कसा फायदा घेता येइल हे पाहतात आणि वर कोणी आप्ल्या सासुला कशी Europechi tour करून दिलि. आप्ल्या मुलिला कशी श्रिमंत स्थळे मिळता मिळता चुकलि या कहण्या जावयाल ऐकवतात.
आमचा काडीमोड अजुन झालेला
आमचा काडीमोड अजुन झालेला नाही... बायको सध्या गेल्या महिन्यापासूनच तिच्या घरी आहे... मी तिच्या आईबापाना ५० वेळा फोन केलेत.. आईबाप कधी त्याना पैशाची अपेक्षा नाही, कधी पैसे मागणे कसे जस्टीफाईड हे सांगतात. ! वेळ काढण्याचाच हा प्रकार नाही का? बायकोने फक्त दोन फोन केलेत. आता म्हणते तुझ्याकडे येईन, पण तुझे आईवडिलांकडे रहाणार नाही.. हा काय प्रकार? बर, पोटात पोर होतं तेंव्हा संसार, नवरा नको होता, फक्त पैसे माहेरी देणं एवढेच करायचे होते , म्हणून घटस्फोटाला तयार झाली... आता पोर पाडले, तर ती लगेच मुंबईत माझ्याबरोबर राहून नोकरी करायला तयार आहे! पण माझ्या मूळ गावी काही दिवसही रहायला तयार नाही... उद्या मला मूल झाले, मी म्हटले, चल गावाकडे १५ दिवस्/कायमचे जाऊ, ती तेंव्हा तरी घरी येणार की नाही? आणि आमच्या त्या मुलाने बिचार्याने काय करायचे? माझ्याबरोबर यायचे? का आईबरोबर तिच्या माहेरी जायचे? असली बायको असण्यापेक्षा नसलेली परवडली ..
मला हुंडा पद्धतीचे समर्थन
मला हुंडा पद्धतीचे समर्थन करायचे नाही. मी स्वतः हुंडा घेतलेला नाही. माझ्या लग्नात माझाही बराच खर्च झाला अन ते मला तोट्यात गेले :). कारण सासञांची आर्थिक स्थिती फारशी ठीक नव्हती.
एखाद्याच्या वाडवडलांकडून आलेल्या मिळकतीत(वडिलार्जित) त्याच्या मुलांचा निहित हक्क असतो. समजा 'अ' ला काही जमीन वडलांकडून जर मिळाली तर त्याला तिचा स्वतःच्या मर्जीप्रमाणे उपभोग घेता येत नाही त्यात त्याच्या वारसांचा म्हणजे मुले आणि मुलींचाही कायद्याने हक्क निर्माण होतो.(हिन्दू लॉ). मात्र 'अ'ने स्वकष्टार्जित मिलकत मिळवली तर मात्र त्याला पाहिजे तसे डिस्पोजल तो करू शकतो.त्यात मुलामुलीना हक्क नसतो. अर्थात वडलांच्या पश्चात तो मृत्युपत्र नसल्यास त्याना मिळतो ते सोडा.
पूर्वी वडलांची प्रॉपर्टी मुलीना मिळत नसे (दिली जात नसे हक्क असूनही) म्हणून लग्नात ती दुसर्याघरी जाताना तिचा 'शेअर' रोख स्वरूपात स्वखुशीने तिला दिला जायचा. पुढे या पद्धतीला विकृत वळण लागून नवर्याकडून हक्काने, अडवून, छळ करून हुन्डा म्हणून वसुलीला सुरुवात झाली.
पवारांच्या राजकारणाशी मतभेद असू शकतात पण शरद पवारांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात स्त्रियांच्या हक्काबद्दल बरेच चांगले निर्णय घेतले. कदाचित त्यांच्या अत्यंत आवडत्या मुलीमुळे व आइच्या कर्तबगारीमुळे स्त्रियांबद्दल त्याना पहिल्यापासून आपुलकी असावी.जमिनीचे अथवा प्रॉपर्टीचे वारस लावताना मुलींचे नाव भावाबरोबर लावण्याचा नियम त्यानी आणला. तसेच सरकारी जमीन अथवा घरकुल देताना त्याला नवरा आनि बायको दोघांचेही नाव लावण्याचे आदेश आहेत. एसेस्सीच्या विद्यापीठाची मार्क लिस्ट्वर आता विद्यार्थ्याच्या वडिलाबरोबर आइचेही नाव असते. राजकीय संस्थात आनि शासन व्यवहारात स्त्रियाना ३० % आरक्षण मिळवून देन्यात पवारांचा मोठा वाटा आहे.या सर्व बाबी.मुळे स्त्रियाना एक वेगळी ओळख मिळाली हे नाकारता येणार नाही.
खेड्यात शेताच्या वाटण्या अथवा विक्री व्यवहार करताना भावाना झक मारत विवाहित बहिणीना बोलावून आणून त्याना समजावून त्याची लेखी हक्कसोड पत्रके करून घ्यावी लागतात. रजिस्ट्रार ऑफिसच्या आवारात असे अनेक भाऊ, बहिणींच्या (अन मेहुण्यांच्या )नाकदुर्या काढताना दिसतात.
काही मेहुणे आपल्या बायकोला पैसे घेतल्याशिवाय सही देऊ नको असे दडपण आणतात. त्यामुळे भावाला त्रास द्यायची इच्छा नसतानाही बहीण अडून बसते. मात्र एक आहे बहिणीना या निमिताने एक आस्तित्व प्राप्त झाले आहे.
पूनम तुझ म्हनन १००% पटल.
पूनम तुझ म्हनन १००% पटल. माझा स्वताचा असाच अनुभव आहे.
मला माहित नाहि हा धागा सुरु
मला माहित नाहि हा धागा सुरु आहे कि नाहि ते.
माझे नाव सन्जय पवार मि सध्या पुन्यात असतो. वय ३४ आनि शिक्शन दिप्लोमा आहे.
माझ्या घरचान्चे माझ्यासाथि वधुसन्शोधन सुरु आहे.
मला अपेक्शित आहे पुधिलप्रमाने: -
मित्रानो नमस्कार,
माझे नाव संजय पवार आहे आणि मी ह्या community चा एक सदस्य आहे. माझे वय ३४ आहे आणि सध्या माझ्या घराचे माझ्यासाठी वधूसंशोधन करत आहेत. मी आतापर्यंत ३-४ स्थळे पाहिली आहेत. पण कुठेच जमले नाही.
मला खरतर अशी मुलगी पाहिजे जी conceive करू शकत नाही. मला कुठल्याही प्रकारचा शारीरिक किवा मानसिक आजार नाही कारण मी असे सांगितले कि लगेच इतरांच्या मनात माझ्याबद्दल नकोत्या शंका-कुशंका येवू लागतात. अशी मुलगी पाहण्याचे पहिले कारण कि त्या मुलीचा काही एक दोष नसताना तिने असे एकटेच जीवन का जगावे आणि दुसरे म्हणजे मला एक मुलगा/मुलगी (अनाथ) adopt करायचा/करायची आहे.जेणेकरून एका निष्पाप जीवाला मी नवीन जीवन देवू शकतो. कारण नवीन जीवाला जन्म देवून आपण काय देणार आहोत तर लोकसंख्येत वाढ आणि पोल्लुतिओन व इतरहि प्रोब्लेम्स दुसरे काय? तशी इच्छा नसल्यास स्वतःचे एक मूल आणि एक adopted अशी इच्छा असणाऱ्या मुलीने किंवा तिच्या घरच्यांनी मला संपर्क साधावा.
आता त्या मुली कडून मला काय हवे आहे ते सांगतो.
मुलगी शिकलेली व काम करणारीच हवी.
मुलगी IT सेक्टर मधली असेल तर आनंदच आहे कारण त्यांना IT सेक्टरमधील काम, कामाचे ताण सर्व काही माहित असते. रंगाने नाही पण मनाने सुंदर असावी. काम करणारी ह्यासाठी कि तिने माझ्यावर अवलंबून राहू नये. तिच्यात स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता असावी. (माझे job profile आहे telecom engineerचे ) आणि आमची हापिसात (office) जाण्याची वेळ ठरलेली असते पण घरी येण्याची नाहीतरी तिला हे मान्य असावे.
मला लग्नासाठी ३४ वर्षापर्यंत वाट बघायची खरच गरज नव्हती. मी वयाच्या २४ व्या वर्षीही लग्न करू शकलो असतो कारण त्यावेळेस मला एका UP च्या मुलीकडून मागणेही आले होते (चक्क मागणी घातली होती तिने मला. म्हणजे मी दिसायला काही सुंदर वैगेरे नाही पण माझे हेच विचार तिलाही आवडले होते पण तिला लग्नाची घाई होती आणि त्यावेळेस मी settled नव्हतो जे आज हि नाही). आज भले हि मी २००००/- पगार घेत असेल तरीही पुण्यात माझे घर नाही मी मित्रांबरोबर भाड्याच्या घरात राहतो आहे. माझे आई आणि बाबा मुंबईला राहतात. मला जे काही आयुष्यात तयार करायचे आहे ते स्वताच्या हिमतीवर करायचे आहे (in short I want 2 b a self-made guy). तर अशी कुठली मुलगी तुमच्या पाहण्यात असेल तर मला नक्की कळवा.
आपले विचार नक्की मांडा. आपल्या विचारांचे स्वागत आहे.
विचार चांगले आहेत पण गल्ली
विचार चांगले आहेत पण गल्ली चुकली.
संजय पवारः जर तुमचा वधू
संजय पवारः जर तुमचा वधू संशोधन हेतू असेल तर तुम्ही इथे मांडू शकता तुमचे विचार आणि अपेक्षा. हा बाफ लग्न ठरवताना घ्यायच्या सावधगिरीबद्दल आहे जेणेकरून दोन्ही घरच्या पाहुण्यांना फसवाफसवीचे प्रयोग बघावे लागणार नाहीत.
संजय पवारः तुमचा धागा
संजय पवारः तुमचा धागा चुकला.
तरीही एक विचारावेसे/ सांगावेसे वाटते. तुम्ही म्हणताय <<मला खरतर अशी मुलगी पाहिजे जी conceive करू शकत नाही<<>> अता लग्नाच्या आधी मुलीला कसे कळेल की ती conceive करु शकेल की नाही ते. अगदीच काही menstrual problems किंवा अपघाताच्या केसेस सोडल्या तर अशी तपासणी कोणी करुन घेत नाही.
मला खरतर अशी मुलगी पाहिजे जी
मला खरतर अशी मुलगी पाहिजे जी conceive करू शकत नाही<<>> किंवा अशी जोडीदार शोधा की तिचे सुद्धा असेच विचार असतील.
अता लग्नाच्या आधी मुलीला कसे
अता लग्नाच्या आधी मुलीला कसे कळेल की ती conceive करु शकेल की नाही ते. अगदीच काही menstrual problems किंवा अपघाताच्या केसेस सोडल्या तर अशी तपासणी कोणी करुन घेत नाही.
अगदी बरोबर आहे.. ..
तुम्ही तुमची कल्पना बायकोला पटवून बायकोच्या पर्मिशनने तुमची वसेक्टॉमी करुन घ्या... तुमची ट्यूब तुम्ही मोकळीच ठेवणार आणि तुमची कल्पना तुम्हाला साकारता यावी म्हणून बायको मात्र ट्यूब बंद असलेली शोधणार ! जय हो !!
रंगाने नाही पण मनाने सुंदर
रंगाने नाही पण मनाने सुंदर असावी. तिच्यात स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता असावी. >>
क्या बात है! पण हे तुमच्या दृष्टीकोनातून की तिच्या? फक्त तुमचे शुध्दलेखन जसे पहिल्या तीन वाक्यांपासून शेवटच्या वाक्यापर्यंत सुधारत गेले तसे हे विचारही नाही बदलत गेले म्हणजे मिळवली. तुम्हाला शुभेच्छा.
भाग्यश्री.. अतिशय ऊत्तम धागा
भाग्यश्री.. अतिशय ऊत्तम धागा आहे लिखानाचा.. मी मा बो. वर नवीन आहे..
ईकडे असे काही ऊपयुक्त धागे सापडतील असे वाटले नव्हते..
सर्व च्या सर्व पोस्ट एका दमात वाचुन काढल्या... सगळ्यानी.. ज्यांचे त्यांचे बरे वाईट अनुभव टाकले आहेत.. त्याचा नक्कीच ऊपयोग होईल...
मला एकच प्रश्न आहे.. कामाच्या व्यापामुळे, मुलीची चौकशी स्वता: करण्यास बर्याच अडचणी येतात..
यात भर म्हणजे.. काही लोकांकड्न चुकीची माहीती हातात आल्यामुळे चांगली स्थळे गेली.. (हा केवळ योगायोगा चा भाग आहे.. असे सगळे जण समजतात. पण हे आपल्याला नाही पटत)..
ईथुन पुढे काय करावे आणी कुणावर विश्वास ठेवावा तेच कळत नाहीये..
मी एक ठरवले होते.. की ज्याला आपला जोडीदार बनवायचा आहेच त्याच व्यक्तिला.. स्पष्टपणे विचारलेले बरे..
(ऊगीच दहा जणांच्या डोक्यातुन आलेले माहीती आणी त्यावर ती किती भरवश्याची ह्याचाच भरवसा नाही.. )
पण काही मित्रांकडुन कळालेली माहीती अशी..
१- कुठलीही मुलगी स्वता:वरुन कसे काय सांगेल की तिच्या मनाविरुध्द लग्न ठरवले जाते आहे..
२ - प्रत्यक्ष १ किंवा २ भेटीत तीने हे सांगने किती योग्य आहे?
३ - जर तिचे आधीचे प्रेमप्रकरण असेल.. (ह्या गोष्टिचा भविष्यात ती काय विचार करुन नवर्या सोबत कसे राहायचे हे ठरवते हे कळणे अशक्य)... तर ती स्वता:हुन तर नक्कीच सांगनार नाही..
४ - जर काही फॅमीली प्रॉब्लेम्स असतील ..(जामोप्या नी सांगितल्या प्रमाणे) तर त्याच्या बद्द्ल सर्व जण प्रामाणिक द्रुष्टिकोण ठेऊन लग्नाआधी सर्व काही सांगतिल ह्याची काही शाश्वती नाही..
आणी ईतर ही काही गोष्टि आहेतच................
तर ह्या सर्व गोष्टींसाठी चौकशी ची गरज भासते.. असे मला सांगितले गेले.. आणी काही अंशी ते खरे पण आहेच..
जर कुणाकडे चौकशी करण्यासाठी काय काय करावे ह्याची एक चेक लिस्ट असेल तर नक्की कळवा..
(अर्थात ते पेड एजंट वगैरे प्रकार आहेतच ते केवळ आजच्या तारखेची माहीती देऊ शकतील..
२० ते २५ हजार रू. ईंव्हेस्ट करण्यापेक्षा काही सोपा ऊपाय?? )
चौकशी प्रकरण खरच खुप बेकार आहे ..
especially जर मुलगी तुमच्या जवळच्या गावातील किंवा नाते संबधातील नसेल तर..
चौकशी प्रकरण खरच खुप बेकार
चौकशी प्रकरण खरच खुप बेकार आहे ..
चौकशी प्रकरण बेकार नाही... बर्याचशा केसेस नुसत्या चौकशीवर व्यवस्थीत होऊ शकतील... बाकी केसेस या नाहीतरी अपवादात्मक असतात... पण त्याच केसेस मध्ये धडे शिकायला मिळतात..
Girls leave their home,
Girls leave their home, parents, family, siblings, relatives & friends whom they love most & come
to husband's place after marriage. Above all they change their name as well. They should be
treated in such a manner that the married girl should not feel strange. Her husband should take
utmost care of her, give her love & respect in order to feel that marriage is not a hell its a sacred
relation between 2 souls.
चैतन्य ब्रह्म इन्ग्रजीत
चैतन्य ब्रह्म
इन्ग्रजीत लिहिलय
म्हणून
Amen!!!!
Girls leave their home,
Girls leave their home, parents, family, siblings, relatives & friends whom they love most & come
to husband's place after marriage. Above all they change their name as well. They should be
treated in such a manner that the married girl should not feel strange. Her husband should take
utmost care of her, give her love & respect in order to feel that marriage is not a hell its a sacred
relation between 2 souls.>> ही ससुराल गेन्दा फूलच्या बरोबर अटेचड स्क्रिप्ट रॅशनेल नोट वाट्तेय.
बरोबर लिहिले आहे काही वादच नाही. अनुमोदन.
सगळ मना प र मा न व्हा य्यला
सगळ मना प र मा न व्हा य्यला जिवन चित्र पट नाय.............................
प्रेम महत्वाचे बस पैसा नही
प्रेम महत्वाचे बस पैसा नही
भाग्यश्री, चांगला विषय ! लग्न
भाग्यश्री,
चांगला विषय !
लग्न म्हणजे एक जुगार आहे. कोण कधी जिंकेल अन कोण कसा हरेल काही सांगु शकत नाही! सहा वर्षे सोबत राहणारे लग्नानंतर तीन महिन्यात वेगळे होतात तर लग्ना आधी दोनदाच भेटणारे शेवटपर्यंत एकमेकांना साथ देतात! सब प्रभु कि माया है:)
पुर्ण अनुमोदन !
पुर्णपणे सहमत
पुर्णपणे सहमत
प्रेम महत्वाचे बस पैसा
प्रेम महत्वाचे बस पैसा नही>>>> ह्म्म.. त्याच प्रेमाला फोडणी देऊन खायचं का मग जेवणात?
मजेत लिहीलयं.. लगेच प्रेम कसे महत्वाचे यावर पोस्ट्स नकोत प्लीज!
मला हुंडा पद्धतीचे समर्थन
मला हुंडा पद्धतीचे समर्थन करायचे नाही. मी स्वतः हुंडा घेतलेला नाही. माझ्या लग्नात माझाही बराच खर्च झाला अन ते मला तोट्यात गेले . कारण सासञांची आर्थिक स्थिती फारशी ठीक नव्हती.
>>>>>> मला हा मुद्दाच कळला नाही.
एकतर हुंडा घेतला नाही सांगणार्यांना नेहेमी वाटतं की ते पुढारलेल्या विचारांचे आहेत. तर तसे काही त्यांनी समजू नये.
दुसरं म्हणजे, लग्नात माझाही खर्च झाला म्हणजे ?????? दोन्ही बाजूनी खर्चं केला तर योग्यच म्हणायला हवे.
मुळात खर्चं करताना, आणि विशेषतः लग्नाकरता खर्च करताना, अंथरूण पाहून पाय पसरावेत. तोच पैसा संसाराला वापरता येतो.
लग्न तोट्यात गेले ??????? आणि नफ्यात गेले म्हणजे काय? तर सगळा खर्च सासर्याने करून वर तुम्हाला हुंडा देणे.....
आजकाल, शहरांतून दोन्ही बाजू अर्धा खर्च करताना दिसतात. मानपान (ही एक वेगळीच डोकेदुखी असते) करायचे तरीही प्रत्येक बाजूने आपापले करावेत. लग्न मंडपातच भांडण करून त्या संसाराची सुरवात अशी कटू का करायची??
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/24151
लग्न हा जुगार आहे.
लग्न हा जुगार आहे.
Pages