भारतीय समाजात लग्नाला अजूनही प्रचंड महत्त्व आहे. मुलाचे किंवा मुलीचे लग्न न झाल्यास किंवा लग्नाला उशीर होत असल्यास लग्नाचा मुलगा/मुलगी , आई-वडिल हे मानसिकदृष्ट्या हताश होतात आणि नातेवाईक, आजूबाजूचे प्रश्न विचारून त्यांना हैराण करतात. पण लग्न ही इतकी सोपी गोष्ट नाही. अजूनही आपल्याकडे लग्न ठरवताना बरेचदा एकदा झालेल्या चहा-पोह्यांवर, एक्-दोनदाच्या झालेल्या ओझरत्या भेटींवर, कुणा मध्यस्थावर किंवा जुजबी चौकशीवर पूर्ण विश्वास ठेवला जातो. बरेचदा आयुष्यभर बरोबर राहूनही माणसे कळत नाहीत, तर ह्या तुटक भेटी/माहितीच्या आधारावर कशी कळतील? अर्थात लग्न ठरवण्याचा हा ट्रेंड हळूहळू बदलतोय, काही वेळा मुले - मुली स्वतःच लग्न ठरवतात तर काही वेळा चॅटींग/डेटींग करून, ऑनलाईन मॅट्रीमोनीयल वेबसाईट्स द्वारे ठरवतात.
लग्न कसेही ठरवलेले असो, काहीवेळा लग्नांत फसवणूक होते. जोडीदार मानसिक /शारिरिक दृष्ट्या अपंग/कमजोर निघू शकतो. कधी विवाहित असू शकतो. बरेचदा वाईट सवयी/संशयी, तापट स्वभाव असू शकतो. ईंटरनेट वरच्या चॅटिंग/डेटिंग, ऑनलाईन मॅट्रीमोनीयल वेबसाईट्स वरच्या अनेक फसवणुकीच्या प्रकरणांवर आपण बरेचदा बातम्या वाचतो/पाहतो. काही वेळा लग्न झाल्यावर जोडीदार अपेक्षांमध्ये अगदीच बसत नाही हे लक्षात येऊन मानसिक त्रास होतो, त्याची परिणती घटस्फोटातही होते.
फसवणूक मुलींचीच होते असे नाही, तर मुलांचीही होते. आणि समाजाच्या सगळ्या स्थरांतील लोकांची होते. बराच खर्च करून झालेल्या अशा लग्नातील फसवल्या गेलेली व्यक्ती आयुष्यातून उध्वस्त होते. ह्या गोष्टी टाळता येऊ शकतात.
मायबोलीकर सुनील यांनी लिहिलेली गोष्ट 'विश्वास - अविश्वास', तसेच 'कुणाशी तरी बोलायचंय' मध्ये वेळोवेळी येणार्या अनुभवांवरुन हा धागा सुरु केला आहे. इथे मायबोलीकरांना माहिती असणारे लग्नातील फसवणुकीचे प्रकार व त्यावर घेता येणारी/घेता आली असती अशी सावधगिरी ह्यावर लिहिणे अपेक्षित आहे, जेणेकरुन या माहितीचा ज्यांचे लग्न ठरायचे आहे त्यांना फायदा होईल.
ह्म्म्म्म, हे खरे आहे, कायदा
ह्म्म्म्म, हे खरे आहे, कायदा तेव्हाच उपयोगात आणता येतो, जेव्हा कोणाची तक्रार असेल. (अर्थात काही सिरीअस अपवाद वगळता)
आई ग.. हे लग्न आहे . मला ह्या
आई ग.. हे लग्न आहे .
मला ह्या चर्चेत फक्त व्यवहार च दिस्तोय.
असं नको ना..
त्यापेक्षा खरच ते दोघं (कोंणतेही नवरा बायको)मनाने एकरुप होतिल यासाठी काही चर्चा नाही का होउ शकत??
मनाने एकरुप होतिल यासाठी काही
मनाने एकरुप होतिल यासाठी काही चर्चा नाही का होउ शकत>> हाहाहा ही चर्चा करणार कोण पण? इथंली बहुतेक मंडळी विवाहीत आहेत (असावीत. अंदाज!)
@सायकोट - मला वाटतय तू
@सायकोट - मला वाटतय तू म्हणतेस तसं एकरूप होण्याकरता आपले बेसिक्स जुळणं महत्त्वाचं.
मला वाटतं हे बेसिक मुद्दे वरती बर्याच जणांनी टाकलेत. त्यांच एकत्रीकरण खालती:
आवडीनिवडी
स्वच्छता
सौंदर्यदृष्टी
पारंपारिकता
एकंदर मूल्ये
जोडीदाराबद्द्लच्या, त्याच्या करिअरबद्द्लच्या कल्पना
जोडीदाराच्या खाजगी अवकाशाचा आदर
मित्र मैत्रिणींची जुजबी माहिती..
अपेक्षा आपण न बोलता उमजायला हव्या अशी आशा करणं अजिबात चुकीचं आहे.
त्याची वृत्ती आनंदी आहे का?
त्याचे त्याच्या घरच्यांशी,भावाबहिणीशी संबंध कसे आहेत?
साखरपुडा झाला असल्यास लग्नापूर्वी काही काळ कोर्टिन्ग साठी जरूर असावा.
धार्मिक आणी जनरल विचारांमधे फार तफावत असली तरी लग्नाला नकार द्या.
समोरचा आपली काय किम्मत करतोय- तो आपल्याशी काय विचार करून लग्न करतोय ते ही बघून घ्या.
तो/ती आपल्याला आपल्या आईवडीलांपासून तोडून तर टाकत नाहिये ना? सगळ्यांच मिळून एक कुटुंब असा विचार करण्याची त्याची क्षमता आहे ना? नसेल तर आपल्याला ते चालणार आहे का?
सर्वात महत्वाच दोघांच्याही (इथे घरचे ही अपेक्षित आहेत) अपेक्षा पुर्ण पणे क्लिअर असाव्यात, त्या अपेक्षांच वर्गिकरण म्हणजे प्रायोरिटि नुसार चार्ट मनामधे क्लिअर असावा. आणि तो एकमेकांसमोर लग्ना आधी मांडावा.
तर प्रत्यक्षात संसार करताना तो कायम गोड गुलाबी नसुन जर थोडी फार तडजोडीची तयारी दोन्ही बाजुने असेल तर तो बराचसा अल्हाददायक होतो.
संवादाच महत्व, तडजोडीची तयारी ह्या प्राथमिक गोष्ट महत्वाच्या
जेव्हा आपण एकमेकांचे differences समजून घेत (वेळप्रसंगी भांडत- पण नंतर समजावून घेत) - त्यांना accept करत जगलो तर आणि तरच आपण आनंदी होऊ शकतो.
आपण emotionally आणि intellectually compatible आहोत का
मुलाच्या/मुलीच्या मित्रमैत्रिणींची ओळख करून घेणं - जेणे करून दुसर्या व्यक्तीला जास्त चांगलं ओळखता येईल - आणि कम्फर्ट बिल्ड होईल.
बाकी भांडण - त्यातून बिल्ड होणार अन्डरस्टँडीग हे सगळं एकत्र रहायला लागल्यावर होतंच होतं..
अरे, मायबोलीवर लग्नाळु (यंदा
अरे, मायबोलीवर लग्नाळु (यंदा कर्तव्य आहे) लोकांसाठी वेगळा बाफ आहे का? माझी भाची आणि पुतणी, यांच्यासाठी वरसंशोधनाचा प्रयत्न जारी आहे. माबोवरुन काही लीड्स मिळाल्यास खबरदारीची एक पायरी वाचेल असं वाटतं. आपलं मार्गदर्शन प्रार्थनीय आहे.
इथे एक आहे.
इथे एक आहे.
धन्यवाद स्वाती, क्विक
धन्यवाद स्वाती, क्विक रेस्पाँस बद्धल. पण तुम्ही दिलेला दुवा चुकीचा आहे; "फुटकळ" नावाच्या कथेकडे नेतो. काही हिडन मेसेज वगैरे नाही ना?
राज, कथा वाचून पहा. मग एक
राज, कथा वाचून पहा. मग एक 'चल, फूट कळ्ळं! म्हणून आहे तेही वाचा.
आयला, मला रॉबर्ट लँग्डन (दा
आयला, मला रॉबर्ट लँग्डन (दा विंची कोड) च्या भुमिकेत शिरावं लागणार तर... थँक्स एनिवे...
राज, तुम्हाला वर मायबोलीकरच
राज, तुम्हाला वर मायबोलीकरच हवा(अमेरीकेतीलच हवा अश्या अटीसारखे) असे काही आहे का?
पुतणी व भाचीला आयडी घ्यायला सांगा इथे मायबोलीवर. ऑल द बेस्ट.:)
च्यायला, दोन्ही कथा (वा जे
च्यायला, दोन्ही कथा (वा जे काही आहे ते) क्वेंटीन टरँटीनोच्या थोबाडीत मारतील अशा आहेत. काही झेपलं नाही बुवा. कोणि या पामराला सरळ्सोप्या लिंक्स देइल का? (असल्यातर?)
मनःस्विनी, हल्लींच्या मुलींप्रमाणे त्यांना NRI नको (मुंबई/ठाणे पहिली पसंती); नाहितर मीच शोधला असता. त्यांची FB जनरेशन आहे, मायबोलीवर रुळतील की नाही शंका आहे; पण सांगुन बघतो.
कथालेखक टण्या, चमन, फचिन
कथालेखक टण्या, चमन, फचिन कोणीच यात बसत नाही.
राज,कुठल्या लिंक्स हव्यात?
राज,कुठल्या लिंक्स हव्यात? इथे एक वर-वधू साईट आहे(थकेली है)
>>मायबोलीवर रुळतील की नाही शंका आहे; पण सांगुन बघतो.<<
तुम्हीच आता गळ लावून बसा इथे (फु. आगावू सल्ला).
(No subject)
>>लग्न ठरण्यापूर्वी नवरा
>>लग्न ठरण्यापूर्वी नवरा मुलगा हा पुरुष आहे आणि नवरी मुलगी स्त्री आहे आणि दोघांना पुरुष-स्त्री असेच नैसर्गिक आकर्षण आहे, हे बघणे ही सध्याच्या काळाशी सुसंगत सावधगिरी आह>><<
ह्याच्यावरून एक गोष्ट एकलेली एकाची,
१-२ दा भेटलात ना आता आणखी काय बघायचेय. पटकन हो किंवा नाही सांग स्थळाला( एक माहितीतल्या बाई त्यांच्या मुलाला सांगत होत्या आमच्यासमोर विमानतळावर असताना. हा मुलगी नाकारून परत अमेरीकेत चाललेला). मुलगा खरेतर 'सरळ' न्हवता. म्हणून मुलीला नाकाराचा तरी नाहीतर आणखी भेटुया करत करत शेवटी मुलीच कंटाळून जायच्या व नाही म्हणायच्या. इथे बाईंना माहीती नाही ना की इथे मएरीकेत मुलगा काय करतो व खरे काय कारण.
>>तुम्हीच आता गळ लावून बसा
>>तुम्हीच आता गळ लावून बसा इथे (फु. आगावू सल्ला). <<
मायबोलीवरीलच पाहीजे असे नाही. मायबोलीकर ज्येष्ठांनी आपल्या ओळखी वा नात्यातलं स्थळ सुचवलं तर उत्तम.... (यालाच आगाऊपणा म्हणतात का? :))
थोडक्यात असे वर्गिकरण केले तर
थोडक्यात असे वर्गिकरण केले तर ....
मानसिक :
१) वैचारीक पातळी जुळते का ते पहावे.
२) मानसिक विकार ई. ची खातरजमा करावी.
वयक्तिक :
१) आयुष्यातील ध्येय, भविष्यातील योजना जाणुन घ्याव्यात.
२) स्वभाव, आवडी-निवडी, सवयी ई.
शारिरीक :
१) रंग-रुप आपल्याला साजेसे किंवा आवडणारे.
२) शारिरिक व्याधी उदा: दुर्धर आजार, डोळ्यांचे विकार (बर्याचदा बायकोला/नवर्याला चष्मा आहे हे नंतर कळते. )ई.
सामाजिक :
१) समाजातील व्यक्तीं कढुन त्याच्या/तिच्या सामाजिक वर्तनाची माहिती घेणे.
२) त्याचे/तीचे सामाजिक विचार जाणुन घेणे.
आर्थिक :
१) तिची/त्याची आर्थिक क्षमता आपल्याला मान्य असायला हवी.
२) आर्थिक व्यवहार स्पष्ट शब्दात (शक्य असल्यास कायद्यानुसार) व्हायला हवेत.
काही सुचना असल्यास जरुर सांगा.
लग्न करणं कॅन्सल
लग्न करणं कॅन्सल
<<लग्न करणं कॅन्स<<>> सुटली
<<लग्न करणं कॅन्स<<>>
सुटली बिचारी...:दिवा:
चान्गला बीबी आहे मी अनुभव /
चान्गला बीबी आहे
मी अनुभव / अनुभुती शिवाय काही लिहीत नाही
मला एकाच लग्नाचा अनुभव असल्याने ( ) व तो बरा असल्याने त्याबाबत लिहीण्यासारखे विशेष काही नाही
तरीही, वरील चर्चेमधे पुढील मुद्दे विचारात घ्यावेत असे पूर्वानुभूतीनुसार वाटते
१) दुसरी विशिष्ट अपेक्षान्नी युक्त (मेल्/फिमेल) "पार्टी" शोधण्या आधी, अत्यन्त कठोरपणे स्वतःच्या परिस्थितीचे रास्त व सत्य मूल्यमापन करुन आपल्या "अपेक्षान्ना जरा मुरड घालून" मग त्यास साजेसा जोडीदार शोधू लागलो तर बरेचसे प्रश्न सुटतात! पण आपली बाजू "वरचढ" "भारीची" वगैरे समजुन चालल्यास पदरी निराशाच येणार. अर्थातच मूल्यमापन कशाचे करावे? तर आपले शिक्षण, घरदार, जबाबदार्या, आपला हेकट्/तापट्/हट्टी इत्यादी दुर्गुणान्नी परिपूर्ण स्वभाव, आपले छन्द व व्यसने, आर्थिक परिस्थिती, आपल्या अपेक्षा व स्वावलम्बनाने पुर्या करण्याची लायकी वगैरे अनेक.........
२) दुसर्या पार्टीबाबत महत्वाचा प्रश्न येऊ शकतो तो "आधीच्या खर्या खोट्या प्रेमप्रकरणातून"
आधीची प्रेमप्रकरणे खरी असतील तर प्रश्नच असतो, ती लग्नानन्तरही चालू रहाणार असतील तर परिस्थिती अवघड बनते, मात्र जर का आधीच्या प्रकरणान्च्या "केवळ वावड्या" उठविल्या गेल्या असतील तर गोन्धळात अजुन भर! या सगळ्याचा नीट सान्गोपान्ग विचार व्हावा
३) लग्न म्हणजे (बरेचदा लायकी नसताना झटपट) "श्रीमन्त होण्याचा" एक राजरोस मार्ग असे दोन्ही पार्ट्यान्नी समजले नाही तर बरेचसे प्रश्न निकालात निघतात.
४) लग्न म्हणजे केवळ वैयक्तिक शरिरसुख, सौख्य वगैरे कल्पनान्च्या फारसे नादी न लागता, लग्न म्हणजे एकमेकान्साठी जगत "मानवी" वन्श वृद्धी हे मानले व त्याकरता जगायचे ठरले तरीही बरेचसे प्रश्न निकालात निघतात (अर्थात व्यक्तिस्वातन्त्र्याच्या जमान्यात व वैयक्तिक करिअर च्या रेसमधे सामिल लोकान्ना वरील उद्देश कितपत भावतील याचि मला शन्काच आहे)
असो, बीबीचा मूळ विषय फसवणूकीचे अनुभव व सावधगिरीचे सल्ले असा असल्याने कदाचित वरील पोस्ट गैरलागु ठरेल. तरी क्षमस्व!
बीबीच्या विषयानुरुप सान्गायचे तर अफाट अनुभव (अर्थात इतरान्ना आलेले) माहित आहेत, पण ते सान्गुन लग्नेच्छून्या मनात शन्केची पाल चुकचुकवायचे पातक मला नकोसे वाटते
बाकी कुन्डली (स्वतःची) बघुन लग्नाचे योग काय कसे याबाबत आधीच मार्गदर्शन घेतल्यास बरे असेही वाटते!
इथे लिहिलेले मुद्दे खरेच खुप
इथे लिहिलेले मुद्दे खरेच खुप चांगले आहेत. लग्न करु इच्छिणा-यांना तर फायदा होईलच पण ज्यांची मुले/मुली लग्नाची आहेत त्यांनाही मदत होईल.
बायकोला/नवर्याला चष्मा आहे
बायकोला/नवर्याला चष्मा आहे हे नंतर कळते
>> बस क्या बापू .. चष्मा क्या व्याधी है क्या.. ये तो सिर्फ आखोंका एक्सटेंशन है.. और प्रोपरली चूझ करो तो स्टाईल स्टेट्मेंट भी..
आधीची प्रेमप्रकरणे खरी असतील तर प्रश्नच असतो
>> माझ्या माहितीनुसार आजकाल बर्याच जणांचे एक-दोन ब्रेकअप्स झालेले असतातच - आमच्या काळात प्रेम = लग्न करायचच करायचं
आजकाल टाईमपास म्हणून अफेअर करतात.. आणि तितक्याच सहज सोडूनही देतात..
खूप कलीग्ज च्या वगैरे केसेस पाहिल्यात.
http://dating.personals.yahoo
http://dating.personals.yahoo.com/singles/datingtips/88858/10-things-a-g...
और प्रोपरली चूझ करो तो स्टाईल
और प्रोपरली चूझ करो तो स्टाईल स्टेट्मेंट भी..
साधारण अपेक्षा यादी (अवाजवी
साधारण अपेक्षा यादी (अवाजवी नाही) तयार करावी. त्यामधे कोणत्या गोष्टींबाबत किती तडजोड करू शकतो / शकते ते ठरवावे. आपण दुनियेत खुप भारी नाही आहोत हे लक्षात घ्यावे, त्यामुळे लै भारी जोडीदार मिळावा / मिळावी अशी अपेक्षा ठेवू नये. मुलाची / मुलीची एकंदरीत background , घरी कोण कोण असते, जे आहेत ते कसे आहेत हे आपल्या अंदाजाने तपासुन पहावे. आणि मग हो किंवा नाही निर्णय घेऊन टाकावा.
एवढे करूनही लग्न झाल्यानंतर आणखी काही गोष्टींबाबत तडजोड करावी लागली तर ती आनंदाने करावी.
कधी कधी आपल्या मतांचा जोरा पण दाखवावा पण तुटेल एवढे ताणू नये.
साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपुर्ण
लोकसत्ताच्या चतुरंगमधला याच
लोकसत्ताच्या चतुरंगमधला याच विषयावरचा हा लेख.
कृपया इथल्या जाणकारांनी एक
कृपया इथल्या जाणकारांनी एक माहिती पुरवा !
आपल्या देशात हुंडा घेणे/देणे कायद्यानी गुन्हा आहे का?
जर असेल तर मायबोलीवर अशा गुन्ह्याला सपोर्ट करणार्या पोस्ट्स (काहीही वैयक्तिक कारण असो)ठेवल्या पाहिजेत का ??( जसे नुकतेच पायरसीला प्रोत्साहन नको म्हणून पायरेट्ड सिनेमाच्या लिंक्स डिलिट केल्या, पुस्तक प्रकाशकांच्या कॉपी राइट चा सन्मान राखला गेला, त्याच अधारावर अॅडमिन नी हुंड्याला सपोर्ट करणार्या पोस्ट्स डिलिट्/एडिट कराव्यात.)
दीपांजलीशी सहमत. फक्त हुंडा
दीपांजलीशी सहमत. फक्त हुंडा देणे/घेणे हा गुन्हा असल्याची व त्याच्याशी संबंधित कायद्याची लिंक ठेवावी.
दीपांजली यांस सम्पूर्ण
दीपांजली यांस सम्पूर्ण अनुमोदन.
In fact,यांचे पत्ते काढून यांना पोलिसात द्यावे.
वरील हुंडा देण्याच्या पोस्ट
वरील हुंडा देण्याच्या पोस्ट च्या संदर्भात.
The Dowry Prohibition Act, 1961
Section 3
Penalty for giving or taking dowry.- [(Note: Section 3 re-numbered as sub-section (1) thereof by Act No.63 of 1984, sec.3) (1)] If any person, after the commencement of this Act, gives or takes or abets the giving or taking of dowry, he shall be punishable with imprisonment for a term which shall not be less than [(Note: Subs. by Act 43 of 1986, Sec.3) five years, and with fine which shall not be less than fifteen thousand rupees or the amount of the value of such dowry, whichever is more:]
हा केस लॉ ही बघा ज्यांना हुंडा देण्याची इच्छा आहे त्यांनी.
http://www.antidowry.org/articles/news/54-if-taking-dowry-is-a-crime-so-...
Pages