जेंव्हा नवीन असं काही वाचायला जवळं नसतं किंवा नवीन असे वाचताना आकलन व्हायला हवी असलेली मनाची स्थिती नसते, तेंव्हा संग्रही असलेलं आणि आधीच वाचलेलं पुस्तक मी घेतो आणि त्या पुस्तकांच कुठलं पान मला निदान विरंगुळा तरी देईल हे मला इतकं छान माहिती असतं की बरेचदा ते ते पान.. त्या त्या पानावरील ते ते परिच्छेद मुखपाठ व्हायला लागतात.
पुष्कळशी पुस्तके ही पहिल्या पानापासून अगदी अखेरच्या पानापर्यंत वाचनिय नसतात पण अधून-मधून लेखकाला मनापासून स्फुरलेलं काहीतरी असतं आणि तो ते चांगलं लिहून जातो.
हा बा.फ. मला पाचेक वर्षांपुर्वीच सुरु करायचा होता. तो मी आज सुरु करत आहे. कारण हल्ली मायबोलीकर हे अतिशय जिव्हाळ्याने पुस्तकांविषयी बोलतात. वाचकांची संख्या कितीतरी पटीने इथे वाढली आहे. आपल्या अनमोल वेळेतील थोडा वेळ आपल्या आवडीचे परिच्छेद लिहिण्याकरिता ते आनंदाने देतील. या बा.फ. मागचा माझा उद्देश अगदी सरळ साधा आहे. जे मला/तुम्हाला कधी गवसलं नाही ते यातून गवसेल. पुस्तकाची न्यारी चव कळेल जी यापुर्वी मी/तुम्ही कधी घेतली नाही. नेट वर मला/तुम्हाला मराठी पुस्तकातील काही उतारे सहज प्राप्त होऊ शकतील.
धन्यवाद!
दिपकचा किंवा बीचा हेतू निखळ,
दिपकचा किंवा बीचा हेतू निखळ, आपल्याला जे आवडले ते इतर वाचकांना आनंद देणे इतकाच होता, पूर्वपरवानगी वगैरे टेक्निकल गोष्टींची त्यांना कल्पना नव्हती (नेटवरच्या अशा गोष्टींची प्रकाशकांनाही जिथे निटशी कल्पना अजून नाही तिथे वाचकांना असणे हे अजून दूरचे), हे लक्षात आल्यावर दिपक लेखिकेशी आणि प्रकाशकांशी बोललाही आहे, हेतू वाईट नसल्याने गोष्ट इथेच संपायला हरकत नव्हती. जेमतेम एक परिच्छेदाइतकेही लिखाण इथे नसताना त्याला 'उतारे' संबोधणे हेच मुळात चुकीचे आहे. स्वातीने सुरुवातीलाच यासंदर्भात (कायदा नक्की काय सांगतो) जे कोट केले होते तेही पुरेसे होते. हे सगळे चिनूक्सला माहित असताना उगीच हे प्रकरण वाढवून त्याचा वैयक्तिक इश्यू केल्यासारखा वाद कां घालत आहे तो? अक्षरवार्तामधेच फक्त अशा तर्हेचे उतारे दिले जावेत, अन्यत्र नाही असं काही त्याला वाटतय कां? माफ करा पण चर्चा वाचून माझा तरी असाच समज होतोय.
पुढे अशा पद्धतीने उतारे देताना, तो किती मोठा असावा याचे नियम ठरवून दिले आणि प्रकाशकांना कल्पना दिली की असे उपक्रम आम्ही चालवतो मायबोलीवर तर मला नाही वाटत कोणताही प्रकाशक किंवा लेखक अगदी कायदेशीर, तांत्रिक बाबी, लेखी परवानगी वगैरे ताणत बसेल (जसे आत्ता इथे होतेय). आणि जो अगदीच नकारात्मक भुमिका घेईल त्याचे साहित्य नाही द्यायचे. नुकसान वाचकांचे होईल तसेच ते प्रकाशकांचेही होईल. उलट जास्त. मराठी पुस्तके विकत घेऊन वाचत नाहीत लोक असा त्यांचाच ओरडा असतो. तेव्हा अशी सहज प्रसिद्धी ती सुद्धा मायबोलीसारख्या भरपूर सुशिक्षित वाचकवर्ग लाभत असलेल्या संकेतस्थळावरुन असेल तर कोणता प्रकाशक नाही म्हणेल? मात्र त्यांना जर मुद्दाम कोणी नकारात्मकच सल्ले दिले तर गोष्ट वेगळी.
मॅजेस्टीकच्या अशोक कोठावळ्यांशी बोलीन मी उद्या. त्यांचं काय मत याबाबतीत तेही कळेल.
शर्मिला, आपण जे उल्लेख करत
शर्मिला,
आपण जे उल्लेख करत आहत ते सर्व संपादीत केलेले आहेत. आपण ते उतारे चाचले होते का? कृपया पुरेशी माहिती नसताना माझ्यावर भलते आरोप करू नका.
नियम माहिती नव्हता तेव्हा मी या बाफवर व विपुत तो नियम माहिती करून दिला होता, चर्चा तिथूनच सुरू झाली. हा नियम राजहंस, मेहता व पॉप्युलर हे प्रकाशक स्पष्ट मराठीत त्यांच्या पुस्तकांवर छापतात.
स्वातीने दिलेल्या नियमात 'आवडलं म्हणून प्रकाशित करता येतं' असं कुठेही म्हटलेलं नाही.
प्रकाशकांनी परवानगी नाकारल्या गेल्यानंतरसुद्धा आज पुस्तकातील उतारा / उतारे इथे टाकले गेले होते. शिवाय प्रकाशकांची परवानगी आहे, असंही लिहिलं होतं.
प्रकाशकांचा फायदा होत असेल तर उपक्रम चालवायला कोणाचीच हरकत नाही. मात्र त्यासाठी परवानगी आवश्यक आहे. इथे तशी परवानगी घेतली गेलेली नव्हती.
मी यापूर्वीही इथे लिहिलेलं आहे की, काय व कशासाठी उद्धृत करत आहात, ते सांगितल्यास प्रकाशक परवानगी नाकारणार नाहीत. मात्र, 'आवडलं म्हणून' अनेक कथा, कविता, कादंबर्या आंतरजालावर आहेत, व प्रकाशकांना त्यांचं साहित्य अशाप्रकारे प्रसृत व्हायला नको आहे.
प्रकाशकांनी जर त्यांच्या परवानगीबद्दल पुरेसं स्पष्ट लिहिलं असेल, तर परवानगी ही घ्यायलाच हवी.
यापुढे परवानगी घेण्याबद्दल
यापुढे परवानगी घेण्याबद्दल मला वाटतं कोणाचंच दुमत नाहीये. आधी कल्पना नव्हती, पण त्यानंतर प्रकाशकांशी, लेखिकेशी बोलणं झाल्यावरही उगीच प्रकरण ताणलं गेलं नको इतकं असं मला वाटतय. परिच्छेद आकाराने लहान करुन प्रकाशकांशी सकारात्मक बोललं गेलं असतं (तु राजहंसशी संबंधित असल्याने हे तुच करु शकला असतास खरं तर) तर त्यांची काहीही हरकत नसती असं मला खात्रीपूर्वक वाटतं. तुझ्यावर मी का आरोप करु उगीच? वरची चर्चा वाचल्यावर माझा जो समज झाला तो मी स्पष्टपणे लिहिलाय इतकंच.
शर्मिला, <परवानगी घेण्याबद्दल
शर्मिला,
<परवानगी घेण्याबद्दल मला वाटतं कोणाचंच दुमत नाहीये.> हे तितकंसं खरं नाही.
तुम्ही सर्व प्रतिसाद नीट वाचले तर तुमच्या लक्षात येईल की मी केवळ प्रकाशकांच्या नियमांची माहिती देतो आहे.
आणि सकारात्मक म्हणजे नक्की काय? मायबोली हे काही एकच संकेतस्थळ किंवा ब्लॉग नाही. इतर असंख्य ब्लॉगांवर असलेलं, परवानगीशिवाय छापलेलं साहित्य तुम्ही बघितलं आहे का? आज इथे एक उतारा आला, तसेच इतरत्र त्याच पुस्तकातले अनेक उतारे आले, तर त्याचं काय करायचं?
मी मायबोलीवर अनेक लेख पुनःप्रकाशित केले आहे, आणि करणारही आहे. त्यासाठी मला प्रताधिकारधारकांनी व प्रकाशकांनी परवानगी दिलीच होती. परवानगी देणं, न देणं हा प्रकाशकाचा निर्णय असतो. तो अमान्य करण्याचं कारण काय?
मुळात इथे मी नियमाची (जो प्रत्येक पुस्तकावर छापलेला आहे) माहिती दिली. त्यावर तो नियम योग्य आहे अथवा नाही, यावर चर्चा झाली. पण प्रकाशकांची परवानगी नसताना परत तोच उतारा इथे देण्याचं कारण काय?
<प्रकाशकांशी, लेखिकेशी बोलणं झाल्यावरही उगीच प्रकरण ताणलं गेलं नको इतकं असं मला वाटतय. >
हे आपल्याला का वाटतं? वरच्या ईमेली वाचल्या तर नक्की काय घडलं हे आपल्याला लक्षात येईल.
जाता जाता, तुम्ही माझ्या हेतूंविषयी केलेल्या टिप्पणीविषयी. - मला विजया मेहतांच्या एका लेखाचा काही भाग मायबोलीवर प्रसिद्ध करायचा आहे. विजया मेहतांची परवानगी असली तरी त्यांच्या प्रकाशकांची परवानगी नाही. आणि हे प्रकाशक म्हणजे राजहंस प्रकाशन.
अनिल अवचटांच्या लेखांविषयी
अनिल अवचटांच्या लेखांविषयी -
मी जालावर अवचटांचे लेख वाचलेले/ बघितलेले नाहीत. पण एकदा, त्यांच्या बलुतेदारीवरील एका लेखाविषयी त्यांना फोन केला होता तेव्हा विचारले होते की हा लेख जालावर टाकू का? प्रताधिकाराचे काय? तर तेव्हा ते जरूर टाका, जेव्हढे जास्त लोक वाचतील तेव्हढे उत्तम असे म्हणाले होते. मी पुन्हा एकदा नक्की चालेल का असे विचारले, तेव्हाही ते हो म्हणाले होते. पुढे मी टंकायचा आळस केल्याने काही झाले नाही. पण तात्पर्य म्हणजे, त्यांची हरकत नव्हती. तेव्हा सध्या जिथे कुठे लेख आहेत, तिथल्या चमूने त्यांना विचारले असू शकेल.
असू शकेल. पण त्यांच्या
असू शकेल. पण त्यांच्या प्रकाशकांना हे मान्य आहे का?
चिन्मय, वरच्या सगळ्या पोस्ट्स
चिन्मय,
वरच्या सगळ्या पोस्ट्स मधून निघणारा अर्थ काय ???
जर हा बीबी चालवायचा असेल तर...
मला आवडलेल्या "अबक" पुस्तकातला एखादा उतारा मी त्या पुस्तकाचे लेखक "पफभ" आणि प्रकाशक "क्षयज्ञ" ह्यांच्या लेखी परवानगीने (ज्यात मायबोली संकेतस्थळावर हा उतारा देण्यास आमची हरकत नाही असे स्पष्ट लिहिलेले असेल) देता येईल.. हेतू योग्य असेल तर प्रकाशक किंवा लेखक परवानगी देतीलच पण ती न देण्याचा पूर्ण अधिकार त्यांना आहे ! आणि जर त्यांनी परवानगी नाकारली तर उतारा देता येणार नाही. दिला तर कायदेशीर कारवाई करण्याचा लेखकाला / प्रकाशकाला किवा त्यांचा प्रतिनिधी म्हणून तुला हक्क आहे.
हो किंवा नाही सांग.
सुरुवातीला चर्चा चांगली चालू होती. आज त्यात वैयक्तीक टिका टिपण्ण्या का यायला लागल्या ते मात्र कळलं नाही !!
हो.
हो.
प्रकाशकाला किवा त्यांचा
प्रकाशकाला किवा त्यांचा प्रतिनिधी म्हणून तुला हक्क आहे >>
अरे पग्या असा कायदा अजूनही निर्माण झालेला नाही, तो प्रसववेदनेत आहे असे वर वाचले आहे. मग सद्य कायद्याप्रमाने "फेअर युज" असेल तर तसे करायला काय हरकत आहे हे कळत नाही.
ज्यांना इथे परिच्छेद आणि उतारे टाकायचे आहेत त्यांनी बिलकुल टाकावेत. टाकल्यावर का आवडला हे दोन ओळीत लिहीले की ते समिक्षण होते. समिक्षणावर कायद्याने बंदी नाही. फक्त पुस्तक च्या पुस्तक मात्र लिहू नका.
मायबोली हे काही एकच संकेतस्थळ
मायबोली हे काही एकच संकेतस्थळ किंवा ब्लॉग नाही. इतर असंख्य ब्लॉगांवर असलेलं, परवानगीशिवाय छापलेलं साहित्य तुम्ही बघितलं आहे का? आज इथे एक उतारा आला, तसेच इतरत्र त्याच पुस्तकातले अनेक उतारे आले, तर त्याचं काय करायचं? >>>
अरे पण आपण इथे फक्त मायबोलीबद्दलच विचार करुयात नां? मायबोलीच्या मर्यादित अवकाशात एका पुस्तकातलं किती व काय छापायचं यावर तरी नियंत्रण राखणं सहज शक्य आहे नां? आणि परवानगी घेणे यापुढे आवश्यक आहे असे कळल्यावर कोण कशाला रिस्क घेईल?
आधी जुन्या मायबोलीवर जे साहित्य प्रकाशित झाले आहे ते त्यावेळी असा मुद्दाच कुणी उकरुन काढला नसल्याने किंवा तेव्हा नेटसंदर्भात तसा काही कायदाच नसल्याने झाले आहे आणि अजून राहिले आहे. तो एक वेगळा इश्यू आहे.
प्रकरण ताणलं गेलं असं मला वाटलं त्याचं कारण वर दिलेलं आहे मी. ईमेल्स वाचल्यावरच लिहिलं होतं ते मी.
असो. रेघेच्या या बाजूला असा किंवा त्या बाजूला. कायद्याबद्दल अढी बसेल इतका आडमुठेपणा नको आणि कायद्याकडे दुर्लक्ष करुन गैरफायदा मुद्दाम उठवण्याइतका निर्ढावलेपणही नको इतकंच मला वाटतं.
जाता जाता- नेटवर अनंत सामंतांचेही बरंच साहित्य (आख्खी पुस्तकं) बेकायदेशीर उपलब्ध आहे आणि त्याबद्दल वर्तमानपत्रातून त्यांनी आवाज उठवल्यावर ते काढलं गेलं होतं पण कालांतराने ते परत आलं. आता तेही असं चालायचंच असं म्हणून हताशपणे गप्प बसले आहेत आणि उलट नव्या पिढीला साहित्य निदान वाचावं अशी तरी इच्छा आहे (मग नेटवर फुकट का होईना) हेच छान असंही म्हणतात. [अनिल अवचटांचे लेख तर सामाजिक प्रश्नांबद्दल! मग त्यांनी तर खरं जास्त खुश व्हायला हवंय ( हे मी गमतीत माझं वैयक्तिक मत म्हणून लिहितेय. बेकायदेशीरतेचा कोणताही प्रचार वगैरे नाही.) ].
<रे पण आपण इथे फक्त
<रे पण आपण इथे फक्त मायबोलीबद्दलच विचार करुयात नां? >
आपण करुयात. पण प्रकाशकांचं काय? तुम्ही म्हणताय तसं मायबोलीवरून पायरसी होणार नाही वगैरे मान्य केलं, पण त्यासाठी मुळात परवानगी नको का? आणि जर तशी परवानगी नाकारली गेली, तर प्रकाशकांची कारणं समजावून घ्यायला नकोत का?
केदार,
तसा हक्क नाही हे कुणी सांगितले? तसा करार झालेला असतो.
मी ते सर्वसमावेशक नवीन कायद्याचं लिहिलं होतं, त्याचा आत्ताच्या परवानगीशी काय संबंध?
लेखक्/प्रकाशक/इतर कुणी यांचे
लेखक्/प्रकाशक/इतर कुणी यांचे मालकीहक्क सांभाळले जावे, कायद्याचंही पालन व्हावं आणि त्याबद्दल मायबोलीचं धोरण कसं असावं याबद्दल जाणीवपूर्वक प्रयत्न चालू आहेत. पण ते काम पूर्ण व्हायच्या अगोदरच इथलं वातावरण नको तेव्हढं तापलंय. तेंव्हा हा धागा बंद करण्यात येत आहे.
Pages