माझ्या आवडीचे पुस्तक-परिच्छेद

Submitted by हर्ट on 4 January, 2010 - 05:34

जेंव्हा नवीन असं काही वाचायला जवळं नसतं किंवा नवीन असे वाचताना आकलन व्हायला हवी असलेली मनाची स्थिती नसते, तेंव्हा संग्रही असलेलं आणि आधीच वाचलेलं पुस्तक मी घेतो आणि त्या पुस्तकांच कुठलं पान मला निदान विरंगुळा तरी देईल हे मला इतकं छान माहिती असतं की बरेचदा ते ते पान.. त्या त्या पानावरील ते ते परिच्छेद मुखपाठ व्हायला लागतात.

पुष्कळशी पुस्तके ही पहिल्या पानापासून अगदी अखेरच्या पानापर्यंत वाचनिय नसतात पण अधून-मधून लेखकाला मनापासून स्फुरलेलं काहीतरी असतं आणि तो ते चांगलं लिहून जातो.

हा बा.फ. मला पाचेक वर्षांपुर्वीच सुरु करायचा होता. तो मी आज सुरु करत आहे. कारण हल्ली मायबोलीकर हे अतिशय जिव्हाळ्याने पुस्तकांविषयी बोलतात. वाचकांची संख्या कितीतरी पटीने इथे वाढली आहे. आपल्या अनमोल वेळेतील थोडा वेळ आपल्या आवडीचे परिच्छेद लिहिण्याकरिता ते आनंदाने देतील. या बा.फ. मागचा माझा उद्देश अगदी सरळ साधा आहे. जे मला/तुम्हाला कधी गवसलं नाही ते यातून गवसेल. पुस्तकाची न्यारी चव कळेल जी यापुर्वी मी/तुम्ही कधी घेतली नाही. नेट वर मला/तुम्हाला मराठी पुस्तकातील काही उतारे सहज प्राप्त होऊ शकतील.

धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

...............

मस्त बीबी, बी! वाचलेल्यांची उजळणी अन न वाचलेल्या पुस्तका-उतार्‍यांचे ओझरते दर्शन होणार. वा! Happy

..

इथं आधी छापलेला मजकूर मी एडीट करतोय कारण तो प्रताधिकाराचा भंग ठरत आहे. लेखिकेची परवानगी असली तरी प्रकाशकांचीही लागते. अर्थात ती (चुकून) घेतली नाहीये म्हणून हा उतारा मी इथून काढून टाकतोय!

मदत समिती,

कृपया हा बा. फ. बंद करावा अशी नम्र विनंती. वर डुआडी यांनी कारण दिले आहेच. तसदीबद्दल क्षमस्व.

धन्यवाद!

याआधी मी पण काही उतारे उद्धृत केले होते. (इतरांनीही केले असतील). पण ते वाहत्या बीबीवर.

प्रशासकांचे धोरण काय आहे?

प्रकाशक व पुस्तकाचा स्वामित्व हक्कधारक यांच्या लेखी पूर्वपरवानगीखेरीज हे पुस्तक ज्या स्वरूपात विकले गेले आहे, त्या खेरीज अन्य कोणत्याही स्वरूपात हे पुस्तक, त्याचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ प्रसृत करता येणार नाही.

या पुस्तकाच्या स्वामित्व हक्काचा भंग होईल, अशा रीतीने कोणालाही पुस्तकातील मजकूर हा मूळ, खंडित, संक्षिप्त अशा कोणत्याही स्वरूपात संग्रहित करता येणार नाही. ज्यात संग्रहित केलेला मजकूर जाणून घेता येतो, काढून घेता येतो अशा कोणत्याही पद्धतींमध्ये (यांत्रिक, इलेक्ट्रॉनिक, छायाप्रती काढणारी व अन्य प्रकारे रेखन करणारी सारी यंत्रे) पुस्तकातील सर्व मजकूर किंवा खंडित मजकूर साठवून नंतर त्याचे वितरण व प्रक्षेपण करता येणार नाही. तसेच या पुस्तकातील मजकूर संपूर्ण, खंडित अथवा संक्षिप्त स्वरूपात कुठल्याही इतर भाषेत अनुवाद अथवा रुपांतरित करता येणार नाही. असे करण्यासाठी या पुस्तकाचा स्वामित्व हक्कधारक व वर जाहीर केलेला प्रकाशक अशा दोघांची लेखी पूर्वपरवानगी आवश्यक असेल.

हे प्रकाशकांचं धोरण आहे.

वर बी व डुआय यांनी उद्धृत केलेले उतारे राजहंस प्रकाशनाचे आहेत/होते, व राजहंस प्रकाशनाची यास परवानगी नाही.

मायबोलीवर वा इतरत्र कुठेही पूर्वप्रकाशित साहित्य (संक्षिप्त वा संपूर्ण) उद्धृत करायचे असल्यास लेखक व प्रकाशक या दोघांचीही परवानगी आवश्यक ठरते.

हा भारत सरकारच्या प्रताधिकाराबाबतच्या संकेतस्थळाचा दुवा आहे.
इथे या ठिकाणी प्रताधिकार कायद्याची तपशीलवार माहिती दिलेली दिसते.

यात म्हटल्यानुसार :

Q. : Is it not true that strict application of the principle of protection of copyright hampers economic and cultural development of the society?

Yes. If copyright protection is applied rigidly, it can hamper progress of the society. However, copyright laws are enacted with necessary exceptions and limitations to ensure that a balance is maintained between the interests of the creators and of the community.

To strike an appropriate and viable balance between the rights of the copyright owners and the interests of the society as a whole, there are exceptions in the law. Many types of exploitation of work which are for social purposes such as education, religious ceremonies, and so on are exempted from the operation of the rights granted in the Act. Copyright in a work is considered as infringed only if a substantial part is made use of unauthorizedly. What is ‘substantial’ varies from case to case. More often than not, it is a matter of quality rather than quantity. For example, if a lyricist copy a very catching phrase from another lyricist’s song, there is likely to be infringement even if that phrase is very short.

Does the law allow any use of a work without permission of the owner of the copyright, and, if so, which are they?

Subject to certain conditions, a fair deal for research, study, criticism, review and news reporting, as well as use of works in library and schools and in the legislatures, is permitted without specific permission of the copyright owners. In order to protect the interests of users, some exemptions have been prescribed in respect of specific uses of works enjoying copyright. Some of the exemptions are the uses of the work :

for the purpose of research or private study,
for criticism or review,
for reporting current events,
in connection with judicial proceeding,
performance by an amateur club or society if the performance is given to a non-paying audience, and
the making of sound recordings of literary, dramatic or musical works under certain conditions.

म्हणजे पुस्तकातला एखादा परिच्छेद (लेखकाचा श्रेयोल्लेख करून) इथे उधृत केल्यास त्यामुळे प्रताधिकार कायद्याचा भंग होत नाही असं दिसतंय.

कायदा समजण्यात माझी काही चूक झाली असल्यास जाणकारांनी ती कृपया निदर्शनास आणून द्यावी.

जुन्या मायबोलीवरदेखील प्रथितयश कवींच्या अनेकानेक कविता अगदी नावानिशी धागे करून आपण साठवलेल्या आहेत. त्यामुळे मायबोली प्रशासनाचं या बाबतीत काय धोरण आहे याचाही खुलासा झाला तर बरं होईल.

इथे ठळक केलेलं criticism / review मला तरी कुठे दिसत नाहीये.

पुस्तकाचे मूळ उतारे जसेच्या तसे दिले गेले आहेत, आणि त्याला प्रकाशकांचा आक्षेप आहे.

इतर काही ब्लॉग व संकेतस्थळांवरील असलेली अशी पाने ही अनधिकृत ठरवून त्याबद्दल कार्यवाही करण्याचाही प्रकाशकांचा विचार आहे.

प्रकाशकांची परवानगी घेतली जावी, अशी सूचना राजहंस व मेहता या दोन्ही प्रकाशकांनी छापली आहे, आणि त्या सूचनेचं पालन निश्चितच व्हायला हवं. कायदेतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली गेलेली ही सूचना आहे.

मौज प्रकाशनाने छापलेल्या कविता मायबोलीवर असणं हे अनधिकृत आहे, हे मी प्रशासकांना गेल्या महिन्यातच कळवलं आहे. त्यांनी छापलेल्या 'मर्ढेकरांची कविता' या संग्रहातील एकूण कवितांपैकी मायबोलीवर किती आहेत, याचा जरी अंदाज घेतला तरी त्यांचा आक्षेप का आहे, ते कळेल.

बाकी, आपल्या पुस्तकाचे असे उतारे इतरत्र कुठे छापण्यापूर्वी कविता महाजनही प्रकाशकांची परवानगी घेतातच.

अनेकदा बर्‍याच पुस्तकात (खासकरुन इतिहासाच्या) दुसर्‍या पुस्तकातील उतारे असतात व संदर्भ म्हणून त्याचा वापर होतो फक्त लेखकाचे, पुस्तकाचे नाव त्या संदर्भासाठी देणे आवश्यक आहे. प्रोफेशनल लेखक ती परवानगी घेत असावेत पण मी देखील दिवाळी अंकात अश्या अनेकांचे नाव देऊन काही वाक्य उधृत केली आहेत पण त्यांची परवानगी घेतली नाही. जर ती वाक्य, परिच्छेद वापरता येत नसेल तर दिवाळी अंकातील माझे व इतर अनेकांचे लेख प्रताधिकार कायद्याचा भंग करतात. ते लेख व तसे अनेक माबोकरांचे लेख मग प्रताधिकार कायद्याचा भंग करत असतील. Happy

प्रताधिकार कायद्याच्या माझा अभ्यास अजिबात नाही, पण असे वाटते की (इतर ठिकाणी अनेक लेखकांचे रेफ. पाहून) की लेखातील तो परिच्छेद, लेखकाचे नाव घेऊन टाकल्यावर चुक होत नसावी.

एखाद्या प्रकाशनाने अशी बंदी घालने किती योग्य आहे ते पण प्रत्येक पुस्तकावर अवलंबून आहे. उदा एखादे पुस्तक मी लिहीले तर त्याचे कॉपिराई़ट माझ्याकडे असेल प्रकाशनाकडे नाही, म्हणून सरसगट प्रकाशनांना तो रुल लावने योग्य होईल का ते देखील पाहवे लागेल.

शेवटी असे वाटते की हा ग्रे ऐरीया आहे. इथे "फेअर युज", योग्य उपयोग हे प्रिन्सीपल कामी येत असावे.

केदार,

तू पुस्तकातले उतारे जसेच्या तसे उधृत केले नव्हतेस. तो तुझ्या लेखाचा / अभ्यासाचा भाग होता.

मायबोलीवर कविता / उतारे हे जसेच्या तसे आहेत. कुठल्याही समीक्षेचा भाग नव्हेत.

त्या कविता ह्या लेखकाच्या नावानिशी आहेत ना. मान्य की त्या लिहीताना येथे लोकांनी परवानगी घेतली नाही, पण त्याचे क्रेडीट कोणी घेत नाही. त्यालाच मी फेअर युज म्हणत आहे आणि त्यामुळेच हा एरीया ग्रे होतो. शिवाय एखादा लेखक प्रकाशकाला हक्क देतो, एखादा देत नाही. स्वत: कडे ठेवतो.

इथे पुस्तक पूर्ण रि प्रॉड्युस कोणीही नाहीये. (कविता मात्र आहेत) त्यामुळे इथे "आवडला" म्हणून लिहीने आणि त्याचा वापर स्वतःच्या कथेत करने ह्या दोन्ही वेगळ्या क्रिया आहेत त्यामुळे त्या दोघांना वेगळ्या पद्धतिने हाताळावे लागेल.
पण कवितेच्या बाबतीत, त्या पूर्ण येत असल्यामुळे, जर त्या सदर कविने प्रकाशनाला हक्क विकले तर मग मी तुझ्या मतांशी सहमत होऊ शकतो, पण नुस्तेच प्रकाशन त्याला नको म्हणत असतील तर त्याला काही अर्थ नाही. तसेच जर कवितेतील चार ओळी नावानिशी उधृत केल्यास परत ती फेअर युज मध्ये येईल असे वाटते.

कायद्याच्या चौकटीत अनेकदा सर्व गोष्टी निट बसू शकत नाहीत.

<<त्या कविता ह्या लेखकाच्या नावानिशी आहेत ना. मान्य की त्या लिहीताना येथे लोकांनी परवानगी घेतली नाही, पण त्याचे क्रेडीट कोणी घेत नाही. त्यालाच मी फेअर युज म्हणत आहे>.

असहमत. मायबोलीवरील कवितांची संख्या भरपूर आहे. मी मर्ढेकरांच्याच कवितांचं उदाहरण दिलं आहे.
शिवाय फेअर यूजलाही काही अर्थ नाही. मर्ढेकरांच्या कवितांना त्यांच्या मुलाच्या परवानगीशिवाय चाली लावता येत नाहीत. शिवाय कार्यक्रम फुकट असला तरी त्यांची लेखी परवानगी (त्यांच्या अटी मान्य करून) घ्यावी लागते. डॉ. लागूंनी मायबोलीसाठी तशी परवानगी घेतली आहे. प्रकाशक व राघव मर्ढेकर या दोघांकडूनही.

Critisism / review हे substantial part वापरण्याबाबत आहे. एक परिच्छेद उधृत करण्याबाबत नाही.

Anyway, मायबोलीवर लिहायचं की नाही हे ठरवायला मायबोली प्रशासनाचं धोरण कळणं सर्वात महत्त्वाचं.

मग तसं असेल तर वरच्या नियमावलीनुसार कविता / परिच्छेद जसेच्या तसे उद्धृत करण्याची परवानगी मिळत नाही.

<मायबोलीवर लिहायचं की नाही हे ठरवायला मायबोली प्रशासनाचं धोरण कळणं सर्वात महत्त्वाचं.>

त्यापेक्षा प्रकाशकांना काय वाटतं हे अधिक महत्त्वाचं.

मायबोली प्रशासन ऐकीव माहितीपेक्षा प्रत्यक्ष प्रकाशकांपाशी शहानिशा करूनच धोरण ठरवेल याची मला खात्री आहे.

मी वर लिहिलेली सूचना राजहंस व मेहतांच्या पुस्तकांवर छापली आहे.
शिवाय राजहंस प्रकाशनाचा प्रतिनिधी म्हणूनच मी इथे लिहितोय. प्रशासकांना याची कल्पना आहे.

पूर्ण कवितांचा बाबतीत मी आधीच लिहीले की जर ते दोन तीन मुद्दे लागू होत असतील तर मी भंग झाला असे म्हणेन.

मर्ढेकरांच्या कवितांना त्यांच्या मुलाच्या परवानगीशिवाय चाली लावता येत नाहीत. >> चिनूक्स, चाल लावने म्हणजे त्याचा व्यावहारीक उपयोग करने. त्याला परवानगी घेतली नाही तर तो कायदेभंगच. Happy आम्हीही इथे नाटकं बसवताना मुळ लेखकाची किंवा ज्याकडे प्रताधिकार आहे त्याची परवानगी घेतो, कारण तो व्यावहारीक उपयोग आहे.

पण वाचन (ऑनलाईन वा पुस्तक) म्हणजे रि प्रॉडक्शन नाही तर त्याचा आनंद घेणे. एखादे गाणे एकदाच विकत घेतलेल्या सिडीवरून अनेकदा ऐकने ही जशी क्रिया तशीच वाचन. आता इथे प्लॅटफॉर्म वेगळा आहे (पुस्तक न घेता, ऑनलाईन) असे तू म्हणशील म्हणून जर मर्ढेकरांचे कॉपीराईट ज्यांचाकडे आहेत त्यांची परवानगी इथे ते साहित्य वाचायला ठेवायला नसेल तर ते काढने योग्य आहे. .

पण मुळ क्रिया इथे (मायबोलीवर) वाचन आहे, त्यांचा कवितेची विक्री वा व्यावहारीक उपयोग जसे त्यांचा कविता असतील, तिथे रिस्ट्रीक्टेड पेड प्रवेश व तो नफा मायबोलीला असा नाही.

परत एकदा ऑनलाईन ठेवायला मर्ढेकरांच्या मुलाची (कायदेशीर रित्या) परवानगी नसेल तर काढने योग्य पण ते पूर्ण कवितांसाठी दोन ओळी, किंवा परिच्छेदासाठी नाही असे वाटते. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.

केदार,
मी 'कार्यक्रम फुकट असला तरी' चाली लावायला परवानगी लागते, असं लिहिलं आहे.

शिवाय मायबोलीला पैसा मिळत नसला, तरी अनेक कवींच्या अजून वीस-पंचवीस कविता इथे मायबोलीवर टाकल्या तर काव्यसंग्रह पूर्ण होईल अशी स्थिती आहे. मर्ढेकरांच्याच एकूण २४ संपूर्ण कविता मायबोलीवर आहेत. एकाच काव्यसंग्रहातील इतक्या कविता फुकट प्रकाशित करण्यास प्रकाशक व राघव मर्ढेकरांनी आक्षेप घेतला तर चूक काय?

अरे बाबा वर लिहीलयं की त्यांचा आक्षेप असेल तर त्या काढा. त्यावर अ‍ॅडमिन काय तो योग्य निर्णय घेतील. तिथे मी असहमत नाहीये.

पण आधी दोन- तिनवेळेस हे ही लिहीले की पूर्ण रिप्रॉडक्शन आणि एखादा परिच्छेद, दोन-चार ओळी ह्या दोन्ही गोष्टी एक नाहीत. त्या वेगळ्या पद्धतिने हाताळाव्या लागतील.

मी इथे येईपर्यंत उतारे गायब झालेले होते.
पण चर्चा उपयुक्त वाटली

>इथे ठळक केलेलं criticism / review मला तरी कुठे दिसत नाहीये.
>पुस्तकाचे मूळ उतारे जसेच्या तसे दिले गेले आहेत, आणि त्याला प्रकाशकांचा आक्षेप आहे.

म्हणजे मी एक परिच्छेद पुस्तकाबरहुकूम उतरवून काढला आणि नंतर त्याखाली त्याचे काही बाही समीक्षण केले / लिहिले तर चालते का?

केदार, चिन्मय -- 'उद्धृत' असा आहे तो शब्द उधृत असा नाही. चु. भू. दे. घे.

चिन्मय, तुझी लेखक-प्रकाशक यांच्याशी चांगली ओळख आहे. मला वाटतं तूच त्यांच्याकडून मायबोलीसाठी लेखी परवानगी काढावी. अर्थातच आधी इथल्या प्रशासकांची परवानगी घ्यावी लागेल की त्यांच्यावतीने तू हे काम केले तर चालेल का. धन्यवाद!

मला वाटतं लेखकांना आणि प्रकाशकांना यापासून उलट फायदा आहे.

>>प्रकाशकांना यापासून उलट फायदा आहे
मलाही असं वाटलं. उतारे वाचून कोणाला पुस्तक घ्यावे वाटेलही. आपण परीक्षण लिहिताना उतारे देतो कधीकधी. उगाच हक्क म्हणून कुठवर ताणायचं ते प्रकाशकांना कळलं पाहिजे. इथं कोणी पुस्तकाच्या इ-कॉप्या काढून वाटत सुटलेलं नाही.
मी या बीबीबद्दल आणि उतार्‍यांबद्दल बोलते आहे, कवितांबद्दल नाही. आता उतारे लिहायला कोणी प्रकाशक वेड्यासारखं आक्षेप घेणार असेल तर मी त्यांचं एकही पुस्तक विकत घेणार नाही.

स्वातीचे म्हणणे बरोबर आहे. काही दिवसांपुर्वीच्या माझ्या एका ईमेल मधील हे काही उतारे. हे १९५७ च्या act वर आधारीत आहे. त्यात काही बदल झाला आहे असे मला वाटत नाही .
----------
The copyright law is fairly complicated, but there are several clauses that allow common
man the fair use of works that have been released in the public.

For instance, a copyright of a book always belongs to the author, unless a contract has been signed with the publisher. In general you may not need to take the permission of both parties. If such a contract has been signed, it is available at the register's office for inspection.

There is one clause that I do not fully understand which says something like the following: if such a copyright license has been granted, then grant lapses if not used within a certain period. Also the royalty that will be needed for its use has to be clearly stated.

The above not withstanding, if the copyright holder refuses permission after the other party is
ready to pay the royalty (which would have been fixed at the time of registration and publicly
available) the said party can approach the register's office, and if the copyright holder is
unreasonable can just grant permission directly.

maayboli clearly would not want to infringe rights of authors, but I am stating these just to say that the authors and publishers can not print arbitrary things about copyright and assume that that is legally binding.

A paragraph (any one paragraph) can be reproduced from any book without even seeking permission. The limit is two paragraphs per author in 5 years. So the "can not reproduce in part" bit is rubbish.

If an online group is restricted, and you are not charging money for it, you may be able to do
more.

If you are performing, adapting something for the public and not charging money, the copyright law is even more on the side of the performer.

Intellectual rights must be respected and those who create works (of art or otherwise) should get their dues, but there is no reason third parties (like publishers) say arbitrary things and hold everybody hostage.
-------------------------
पुण्यातील कोणी जर रजिस्ट्रारच्या कार्यालयात जाऊन राजहंसने कोणते आणि कसे करार केले आहेत ते पाहिले तर सगळ्यांना त्याने मदत होईल. कवितांच्या बाबतीत अर्थातच पुर्ण कविता पुनर्मुद्रीत करणे योग्य नाही.

आक्षेप परवानगीशिवाय उतारे घेण्याबद्दल आहे. परवानगी घ्या आणि उतारे उद्धृत करा.

शिवाय जेव्हा प्रकाशक पुस्तक छापतो, तेव्हा त्याचे publishing rightsसुद्धा असतात. उगाच कोणी लेखक त्या लेखनाचा प्रताधिकार प्रत्येकाला देऊ शकत नाही.

त्यापेक्षा प्रकाशकांना काय वाटतं हे अधिक महत्त्वाचं>>>>??? मला मायबोली प्रशासनान जर हे स्पष्ट सांगितल तर बर होईल! आधीच धोरण काय होतं आत्ताच काय आहे बदलय का? जर बदलेल असेल तर का?

पुस्तकाचे मूळ उतारे जसेच्या तसे दिले गेले आहेत>>?? खरय का हे?

आणि त्याला प्रकाशकांचा आक्षेप आहे.>>?? प्रकाशकांच्या वतीने तुझा आक्षेप आहे ना??

इतर काही ब्लॉग व संकेतस्थळांवरील असलेली अशी पाने ही अनधिकृत ठरवून त्याबद्दल कार्यवाही करण्याचाही प्रकाशकांचा विचार आहे>>> काय किती अन् कशासाठी लिहिल गेलय हे ठरवून आय गेस कार्यवाही / कारवाई होईल का?

डुआय,

तुला काल सांगितलेलंच परत सांगतो.

मेहता व राजहंस प्रकाशनानं त्यांच्या पुस्तकांवर पूर्वपरवानगीचा स्पष्ट उल्लेख केला आहे. इथे आक्षेप माझा आहे की प्रकाशकांच्या वतीनं माझा याला महत्त्व नाही. शिवाय मायबोलीच्या धोरणाचाही संबंध नाही. धोरण / करार हे प्रकाशकांचे आहेत, आणि त्यांचा स्पष्ट उल्लेख पुस्तकावर आहे.

आणि तू इथे पोस्ट करताना पुस्तकाचे मूळ उतारे वाचले नाहीस का?

बाकी, संदर्भासाठी / समीक्षेसाठी वापर व 'मला आवडलं तुम्ही वाचा' यांतला फरक सर्वांनाच कळतो. प्रकाशकही तितके वेडे नाहीत. परवानगी घेऊन, अ-व्यावसायिक वापराला कोणाचीच ना नाही.

Pages