हे असं का घडतं??
हा मी जुन्या मायबोलीवर लिहिलेला एक लेख आहे. एका तत्कालिक घटनेवर मनात उठलेल्या प्रतिक्रियेवर. त्या वेळेला मनात फार चलबिचल झाली होती. असे कसे घडू शकेल असे प्रश्न होते आता दोन तीन वर्षानंतर ती घटना देखील नीट आठवत नाहिये. रोजच्या अमानुष खून्, बलात्कार आणि अतिरेकी कारवाया. काय काय लक्षात ठेवणार. आणि किती लक्षात ठेवणार??
कदाचित माझे मन मुर्दाड बनत चाललेय.
किंवा कदाचित या घटना आता "नॉर्मल" झाल्या आहेत.
हे असं घडतच असतं!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/127163.html?1182433706
रात्रीचे बारा वाजून गेलेले. मी अर्थातच स्वप्नात हरवलेली. कर्कशपणे मोबाईल वाजायला लागला. पाहिलं तर एकदम ओळखीचा नंबर. ज्या ऑफ़िसमधे दोन वर्षं काम केली तो नंबर कुणी फोनबूकमधे ठेवत नाही पण लक्षात तर राहतोच ना?
मी फोन घेतला.
"हेलो... " पलीकडून एकदम दमलेला आवाज आला.
"हाय.. किती दिवसानी फोन केलास.." माझी झोप पारच उडाली. रित्विकचा फोन म्हटल्यावर मला बरं वाटतं. एक तर नवीन नवीन गॉसिप ऐकायला मिळतं शिवाय दुसर्या दिवशी छापून येणार्या बातम्या आता लगेच समजतात.
तो शांत होता,
"रित्विक... आहेस ना.."
"हो"
"मग बोल ना.. असा काय घुम्यासारखा."
"नंदु. मला वैताग आलाय."
काही नवीन नाही. दिवसातून पंचवीस वेळा तरी हे वाक्य तो सगळ्याना ऐकवत असतोच.
पण आज त्याचा मूड अजिबात चांगला नव्हता. आवाजातूनच ते जाणवत होतं.
"काय झालं?"
"मालाडमधे. नऊ वर्षाच्या मुलगा. त्याचा गळा दाबून मारलं. तीन दिवस बॉडी घरात लपवली. It was like hell.. smelling, I saw it..." तो एका दमात बोलून गेला.
मी आता काय ते समजले. मी किंवा रित्विक दोघंही या असल्या assignments कधीच नीट केल्या नाहीत. माझी तर पहिलीच assighnment होती २६ जुलै. आठवडाभर मेलेल्या म्हशी. वाहणारी प्रेतं, कुजलेली मुलं हेच सगळं पाहत होते. त्या आधी पण रत्नागिरीत असताना पहिल्याच दिवशी आत्महत्या केलेल्या बाईच फोटो काढायला पाठवलं होतं. रक्त, मांस हाडं प्रेत हे सगळं पाहायला धाडस लागतं. जे माझ्यात नाही. काम केलं ते करायचं म्हणुन केलं. हॉस्टेलवर परतल्यावर सुद्धा असलीच दृश्य डोळ्यासमोर दिसायची. ताटातला घास नकोसा व्हायचा.
"रित्विक,,तू का गेलास?"
"नंदु, ज्याने मारलं तो १६ वर्षाचा होता. अत्यंत चंगल्या घरातला मुलगा. and you know something.. he was an adopted child "
"त्याने थंड डोक्याने हे सगळा खून केला आणि नंतर त्या मुलाला शोधायचं नाटक पण केलं."
"रिट्स,, कम ऑन, तू स्टोरी केलीस ना मग आता का विचार करतो. विसर ना. घरी जा आणि मस्त जेवुन झोप. "
"मी कसं विसरू? मला तर ते सगळं बघवत सुद्धा नव्हतं ते फोटो. ती बॉडी. त्याचे रडणारे घरवाले. का मेला तो मुलगा? त्याची काय चूक होती?"
बाप रे. रित्विक फ़ारच विचार करत होता. प्रत्येक क्राईम स्टोरीचा असा विचार केला तर लवकरच नरिमन पॉइंटला धोंडे मारताना दिसेल.
"हे बघ, चूक कुणाचीही नसते. न आपली न त्याची. पण अशा गोष्टी जगात घडत असतात. त्यामुळे..."
"पण का घडतात?" त्याने माझं वाक्य तोडलं.
"मला नाही माहीत. मी कधी असं केलं नाही. मला कुणी असं काही केलं नाही. मग मी कसं बोलणार? पण ज्याच्या बाबतीत घडतं ते मात्र दुर्दैवी ठरतात. आपण काहीच करु शकत नाही." मी शांतपणे सांगितलं,
"पण मग लोक का मारतात? बाकीचा कुठलाही प्राणी माण्साइतका हुशार नाही म्हणे. मग ते का असा एकमेकाचा खून करत नाही. कधी कधी आपली "जनावर" म्हणायची सुद्धा लायकी नसते. छोट्या छोट्या कारणासाठी गळे चिरणारे आपण. आपयाच बायका मुलाना विष घालून मारणारे आपणच. एक बॉम्बने अख्खं शहर बरबाद करणारे आपणच. काय फ़ायदा आपल्या हुशारीचा?"
"हे बघ, मला इतकं काही समजत नाही. म्हणून मी इतका विचार करत नाही. ज्या गोष्टीचा मला त्रास होतो मी त्या गोष्टी विसरायचा प्रयत्न करते. जे थांबवणं माझ्या हातात नाही मी का त्याचा विचार करु?"
"तुला नाही वाटत तू खूप स्वार्थीपणे विचार करत आहेस?"
"नाही. कारण जिथे मी contribute करू शकते तिथे मी करतेच ना? पण जिथे मी काहीच करू शकत नाही तिथे माझं contribution काय कामाचं?"
"पण मग या घटना घडतच रहाव्यात का?"
"मी असं कुठे म्हटलं आहे? पण या घटना थांबवण्यासाठी मी काहीच करु शकत नाही हे ही तितकंच खरं. "
पलीकडे शांतता होती.
"हा... मी एक करू शकते. असं कुठलही कृत्य मी करणार नाही यासाठी मी प्रयत्न करू शकते.
रित्विक हसला.
"तू करणार नाहीस याची मला खात्री आहे. तुला तर चाकूसुद्धा धड वापरता येत नाही."
"बघ, इथेच चुकलास तू. मी कशी वागेन एखाद्या परिस्थितीमधे ते मीही सांगू शकत नाही. आपण बरेचदा आपल्या आजु बाजुच्याना इतकं गृहित धरतो की त्याचं काहीतरी बिनसलय. आईवडील, शिक्षक, मित्र मैत्रीणी कुणीच या भावनिक परिस्थितीचा विचार करत नाही,"
"म्हणजे सगळा दोष बाकीच्याचा... स्वत्:चा काहीच नाही."
"तू वकीलासारखी माझी उलट तपासणी घेऊ नकोस. अशा घटना एका दिवसात घडत नहीत, त्याला तशी पार्श्वभूमी असते. ती पार्श्वभूमी समजावून घेणं फ़ार गरजेचं असतं. स्पेशली टीन एजर्सच्या बाबतीत. कारण शारिरीक आणि मानसिक दोन्हीकडे त्याहंचं एक युद्ध स्वत्:cशीच चालू असतं. मला मानसशास्त्र वगैरे समजत नाही. पण या वयातल्या मुलाशी मुलीशी कायम interaction होत राहतं आणि त्यातून एक गोष्ट जाणवत राहते ही मुलं कुठे तरी काहीतरी शोधत आहेत. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे आपणही केव्हातरी त्याच्या वयाचे होतोच ना. तेव्हा आपण आपल्याला कसं सांभाळलं.."
"पण नंदु, तुला नाही वाटत हा सगळा कुठेतरी मीडीयाचा दोष आहे,"
"हे बघ, दोषारोप करायचेच आहेत तर कितीतरी कारणं आहेत. पण ती सगळी कारणं इथे जरूरीची ठरतत का? जो मरतो तो माणूस असतो, जो मारतो तोही माणूसच असतो.. कारण नसतं."
रित्विक परत शांत झाला. खरंतर मी त्याच्याबरोबर दुसर्या कसल्यातर्र विषयावर गप्पा मारुन त्याचा मूड हलका करायला हवा होता. पण मीही जरा झोपेतच होते. त्यामुळे धडाधड लेक्चर देत सुटले.
"हे बघ, रित्विक,आपण विचार करतो म्हणून आपल्याला त्रास होतो. त्यापेक्षा जर या गोष्टीचा विचारच केला नाही तर बरं... तुला ती गेट वे ची केस आठवस्ते, कुठला तरी एक मुलगा आला आणि त्या मुलीला भोसकून गेला. मी त्या स्पॉटवर चार मिनिटात पोचले होते. गेटवेच्या एका फोटोग्राफरने या घटनेचे फोटो काढले होते. अजूनही ते आठवलं की माझ्या अंगावर शहारे येतात. पण लोक आज त्या घटनेला विसरून पण गेले. We are shock absorbers आपण हे सगळे शॉक सहन करतो म्हणून आपणच जास्त विचार करतो. तेव्हा इतका विचार करू नकोस. विसर... हे असं घडतं आणि घडतच असणार. तू किंवा मी यात काहीही करू शकत नाही. त्यामुळे आपण हे करू शकत नाही म्हणून त्रास करवून घ्यायचा की जे शक्य आहे ते करायचं हा आपला चॉईस आहे."
रित्विक बराच वेळ शांत बसला.
"अजून काही बातमी?" मी विषय बदलायचा प्रयत्न केला.
"काही नाही..."
"तुझी ऐश्वर्या हनीमूनवरून परत आली ना.." ऐश्वर्या हा रित्विकचा स्वतंत्र "बीट" होता.
"तिचं लग्न झालं याची आठवण करून द्यायची गरज आहे का?"
जवळ जवळ तासभर आम्ही बोलत होतो. त्याचा मूड बर्यापैकी सावरला होता.
दुसर्या दिवशी सवयीने पेपर वाचायला घेतले. पंचवीसच्या पंचवीस पेपरमधे तीच बातमी. तोच गोंडस मुलगा जो आपल्या आजूबाजूला खेळत असतो. फ़क्त त्याच्या फोटोला हार घातला होता. टप्कन डोळ्यात एक आश्रू आला. काल रित्विकला मी समजावलं होतं. आता मीच स्वत्:ला समजावत होते.
हे घडतच असतं हे असं घडतच असतं.
नंदे, तू लिहिलेलं हे
नंदे, तू लिहिलेलं हे पूर्वीइतकंच आजही अस्वस्थ करुन गेलं.
(No subject)
थेट पोहोचलं.
थेट पोहोचलं.