आली माझ्या कार्यालयात दिवाळी..
इथे सिंगापुरात पेशवाई नावाचे एक मराठी दुकान आहे. त्यांच्याकडचे फराळ इतर दुकानात मिळणार्या फराळाच्या तुलनेने खूपच छान असते. खरे तर दिवाळीचा फराळ आणि नेहमीचे गोड्धोड यात किती फरक असतो हे मराठी लोकांना सांगणे न लगे.
दरवर्षी दिवाळी संपली की पेशवाई मधे कैकदा उरलेले फराळाचे डबे मला दिसत आणि जरा खंतच वाटायची कारण नंतर ते डबे विकले जायचे की नाही कुणास ठावूक. यावर उपाय म्हणून मी मागिल वर्षी ऑफीसमधील काही जणांना पेशवाई सुचवून पाहिले. त्यांना ते दुकान फारचं आवडले. त्यांच्या उत्तम प्रतिक्रिया ऐकून मग आम्ही सर्वांना आमच्या कार्यालयातीन मलय, चिनी, फ्रेन्च, ईटालियन आणि खास म्हणजे भारतीय लोकांसाठी मराठी फराळ मागविला. काल दुपारी मी आपण असे करू का विचारले आणि संध्याकाळ पर्यंत मग बेत पक्का झाला. सर्व तयारी मीच केली. सर्वांना आपला मराठी फराळ फारचं आवडला त्यावेळेसचे काही प्रकाशचित्र खास तुमच्यासाठी
अभिनंदन... एकदम मस्त..
अभिनंदन... एकदम मस्त..
लय भारी
लय भारी
Pages