आली माझ्या कार्यालयात दिवाळी..
इथे सिंगापुरात पेशवाई नावाचे एक मराठी दुकान आहे. त्यांच्याकडचे फराळ इतर दुकानात मिळणार्या फराळाच्या तुलनेने खूपच छान असते. खरे तर दिवाळीचा फराळ आणि नेहमीचे गोड्धोड यात किती फरक असतो हे मराठी लोकांना सांगणे न लगे.
दरवर्षी दिवाळी संपली की पेशवाई मधे कैकदा उरलेले फराळाचे डबे मला दिसत आणि जरा खंतच वाटायची कारण नंतर ते डबे विकले जायचे की नाही कुणास ठावूक. यावर उपाय म्हणून मी मागिल वर्षी ऑफीसमधील काही जणांना पेशवाई सुचवून पाहिले. त्यांना ते दुकान फारचं आवडले. त्यांच्या उत्तम प्रतिक्रिया ऐकून मग आम्ही सर्वांना आमच्या कार्यालयातीन मलय, चिनी, फ्रेन्च, ईटालियन आणि खास म्हणजे भारतीय लोकांसाठी मराठी फराळ मागविला. काल दुपारी मी आपण असे करू का विचारले आणि संध्याकाळ पर्यंत मग बेत पक्का झाला. सर्व तयारी मीच केली. सर्वांना आपला मराठी फराळ फारचं आवडला त्यावेळेसचे काही प्रकाशचित्र खास तुमच्यासाठी
बी, मस्त उपक्रम. टेबल तर
बी, मस्त उपक्रम.
टेबल तर झकास सजवले आहेस.
मराठी फराळाची ओळख सिंगापुरी लोकांना करून द्यायची तुझी कल्पना छान वाटली.
बी , दिपावली च्या हार्दिक
बी , दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा .
मराठी / भारतीय फराळाच्या प्रचार आणि प्रसाराबद्दल अभिनंदन .
छानच. खादाड सगळे.
छानच.
खादाड सगळे.
ही आयडीया भारी, फराळ
ही आयडीया भारी, फराळ सगळ्यांसाठी मागवल्यामुळे एकदम दिवाळीचे वातावरण तयार झाले असेल ना ऑफीसमध्ये.
हो ना.. सकाळची १० ची वेळ
हो ना.. सकाळची १० ची वेळ होती. पँट्रीच्या खिडकीतून कोवळे ऊन आत शिरत होते. मी फराळाचा टेबल लावत होतो. मी आधी एक अगरबत्ती लावली आणि मग दिवे लावले. एकदम प्रसन्न वाटले. असे वाटले आकाशकंदील पण लावायचा असता. सर्व जण तयारी पाहून आणि मेनू चाखून अगदी थक्क झाले. काहीच नाही उरले.
बी, हे एकदम मस्त केलेस. आपली
बी, हे एकदम मस्त केलेस. आपली संस्कृतीची ओळख करून देतोस ते.


माझ्या ऑफीसमध्ये सुद्धा सगळ्यांना दिवाळी माहीतीय्(म्हणजे फ्रेंच्,इटालियन, अमेरीकन वगैरे वगैरे नॉनदेसीजना). माझा बॉस सुद्धा म्हणाला,पाहिजे तर लवकर घरी जा आज. सोमवारी कूकीज,काजूकतली घेवून ये.
कॉस्कोच्या कृपेने बॉसने फुकटात बरेच नानकचे काजू रोल्स,काजूकतली वगैरे रवीवारी शॉपिंगला गेलो असताना खाल्ले सांगत होता.
बी, शुभ दिपावली! >>मराठी /
बी, शुभ दिपावली!
>>मराठी / भारतीय फराळाच्या प्रचार आणि प्रसाराबद्दल अभिनंदन .
अगदी हेच म्हणते!
आज National Boss Day मला
आज National Boss Day
मला पोळ्याची आठवण आली
छान उपक्रम बी. आमच्या
छान उपक्रम बी. आमच्या कार्यालयात आज दिवाळी करता स्पेशल भारतीय डिजर्ट ठेवलय आणि बाहेर टेबलावर पणत्या वगैरे लावुन दिवाळी बद्दल माहिती मोठ्या फलकावर लावली आहे.
अरे वा मस्तच
अरे वा मस्तच
सहीच् मस्त साजरी केलीत
सहीच् मस्त साजरी केलीत दिवाळी!!...आम्ही इथे ईटालियन केक आणुन साजरी केली. असाच फराळ इथे पण मिळो.
सही रे बी! 'महाराष्ट्रधर्म
सही रे बी! 'महाराष्ट्रधर्म वाढवावा!'.
पेशवाईतल्या चकल्या, कडबोळी जबरी आहेत! त्यांनी बनवलेला सर्व माल फन्ना झाल्यास नवल वाटणार नाही.
मस्तच काम केलंस एकदम.
मस्तच काम केलंस एकदम. सगळ्यांनी मजा केलेली दिसतेय.
बी, एकदम छान उपक्रम. फोटो
बी, एकदम छान उपक्रम.

फोटो आणि त्याखालचे विवेचन ही आवडले.
धन्यवाद! एक गम्मत म्हणजे काही
धन्यवाद!
एक गम्मत म्हणजे काही अभारतीय लोकांनी मला कोक वगैरे विचारले आहे का... मी कल्पनाही केली नव्हती की कुणी कोक वगैरेची अपेक्षा ठेवेल. त्यावर मग मी उत्तर दिले पुर्वी कोक वगैरे प्रकार नव्हते त्यामुळे मी परंपरेचा मान ठेवून कोक नाही ठेवले
बी, इथल्या लोकांना सहसा
बी, इथल्या लोकांना सहसा कोरड्या पदार्थांबरोबर अथवा नेहमीच्या जेवणाबरोबरही काही पेय पिण्याची सवय दिसून येते. फूडकोर्टांमध्ये जेवतानादेखील लोक चहा/कॉफी, कोक वा तत्सम पेयांचा कॅन आणि बर्फाचा ग्लास घेऊन जेवायला बसलेले तू बघितले असशीलच.
वर दिसणारा मराठी पद्धतीचा फराळ बर्यापैकी कोरडा असल्याने कदाचित लोकांनी कोक वगैरे पेयाची विचारणा केली असावी.
छान उपक्रम बी! माझा मुलगाही
छान उपक्रम बी! माझा मुलगाही शनिवारी ऑफिसला फराळाचे घेऊन गेला होता. बेसनाच्या लाडवास़कट सगळ्याचा फडशा पडला. इंडियन फूड म्हणजे पंजाबी स्टाईलचे असाच समज असतो. आपले पदार्थ लोकांना माहीतच नसतात.
छानच रे बी !
छानच रे बी !
मस्तच रे बी.
मस्तच रे बी.
गुड वन बी !
गुड वन बी !
छान रे बी!
छान रे बी!
अगदी अटकेपार झेंडे लागल्येत.
अगदी अटकेपार झेंडे लागल्येत. खूप बरं वाटलं हे वाचून.
बी खुप छान उपक्रम ! फ़ोटो
बी खुप छान उपक्रम !
फ़ोटो मस्तच, विवेचन त्याहुनही छान !
बी खुप छान उपक्रम ! मराठी /
बी खुप छान उपक्रम !
मराठी / भारतीय फराळाच्या प्रचार आणि प्रसाराबद्दल अभिनंदन .:स्मित:
बी, सहीच रे.. चकल्या खावून
बी, सहीच रे..
चकल्या खावून गोर्यांनी हाय हाय केले की नाही.
मी अमेरिकेत माझ्या एका कलीगला दिली होती चकली खायला. दोन तुकड्यांत डोळ्यांत पाणी आणून
नाचायाला लागली हाय हुय करत.
बी चान्गली साजरी केलीस
बी चान्गली साजरी केलीस दिवाळी
अन फोटो काढून इथे शेअर करुन अधीक मजा आणलिस
नेक्स्ट टाईम किमान "लिम्बूसरबत" तरी ठेव जमल तर!
छानच आयडिया आहे!!!!!!!!
छानच आयडिया आहे!!!!!!!!
मस्त उपक्रम!!
मस्त उपक्रम!!
मस्तं आयडिआ आणि फराळाचं टेबल
मस्तं आयडिआ आणि फराळाचं टेबल छान सजवलय एकदम !
लोकांनी तिखट पदार्थ खाल्ले का ?
मस्त उपक्रम! फोटोही छान
मस्त उपक्रम! फोटोही छान आहेत.
(पेय म्हणून 'पन्ह 'ठेवता येईल.)
Pages