स्वरगंगा

Submitted by skmrunal on 29 October, 2010 - 00:10

स्वरगंगा - स्वरांची शिवस्थाने

सा सांगतो
ओंकारात मी, एकरुप ठसा
श्वासासंगे माझा वसा
रे रेखितो
रेशमात मी, म्रुदू भास रे
करुणेचे काटे देती अंगारे
ग गातो
गंमतीत मी, दंग गुंग
भक्तीभावाचा रुजे चंग
म माळतो
मनातले मस्तकात सम
उग्र पण शितल मध्यम
प पाळतो
अचलता, अस्थिर मिलाप
उंच विहार शिखरासमीप
ध धरीतो
आध्यात्माचा पवित्र बंध
कोमलतेचा चंचल सुगंध
नी निश्चितो
निरव शांततेची रजनी
सुखद विश्रांती नयनी.

२३/१२/२००३ = मृणाल कानडे

गुलमोहर: 
शब्दखुणा: