सुपंथ च्या निमित्ताने...

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

सुपंथ ह्या नवीन सहायता गटा बद्दल वाचले. अन त्या अनुषंगाने गेली दोन वर्ष मी स्वतं अश्या ज्या गटात काम करतो आहे त्याबद्दल लिहावेसे वाटले.
२००६ साली भारतात परत जाउन संघ लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी श्री अविनाश धर्माधिकारी ह्यांचे मार्गदर्शनाखाली सुरु केली. काही काळाने, पुतण्याला कॅन्सर झाल्याने परिक्षेच्या तयरीतुन बाजुला फेकलो गेलो. परंतु तेथे डॉ. भुषण केळकर, जे की १० वर्षे इंग्लंड अन अमेरिकेत राहुन आलेले अन सध्या पुण्यात स्थायीक झालेले आहेत, त्यांचेशी संपर्क आला. त्यांच्या कल्पनेतुन, ग्रंथाली प्रकाशन च्या श्री दिनकर गांगल ह्यांच्या सहकार्याने, परदेशातुन भारतात परत आलेले २५ लोकांच्या अनुभवा चे एक पुस्तक स्व..देश हे प्रकाशित केले गेले. (प्रकाशकः ग्रंथाली, किंमत रु. १६५/-, ग्रंथाली च्या ग्रंथ प्रदर्शनात हे रु. १००/- ला उपलब्ध आहे.) ह्या पुस्तकात उल्लेख केलेले बहुतेक लोक हे परदेशात काही काळ शिक्षण अन कामा निमित्त राहिलेले होते. परंतु स्वदेश अन समाज ह्यासाठी काम करण्या साठी म्हणुन हे लोक पुन्हा मायदेशी स्थायीक झाले होते. अनेकांना मनात इच्छा असुनही फक्त मुठभरआंना च जे शक्य होते, त्यांतील प्रातीनीधिक २५ उदाहरणे ह्या पुस्तकात दिलि आहेत. परदेश सोडुन देशात परत आलो म्हंजे काही ग्रेट वगैरे केले असा कुठलाही अविर्भाव मनात न बाळगता ही लोक देशात आपाअपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करीत आहेत. संगणक, आरोग्य, उद्योग, शिक्षण, सेवा, इ. क्षेत्रातील ही मंडळी आहेत. पर्सिस्टंट सिस्टेम चे श्री. आनंद देशपांडे तसेच पुण्यातील तरुण उद्योजक श्री केदार टुमणे, मंगेशकर रुग्णालयातील डो. सुबोध शिवदे ह्यांचे अनुभव ही ह्या पुस्तकात आहेत.

जानेवारी २००७ ला जैन ग्रुप चे अध्यक्ष पद्मश्री श्री भंवरलाल जैन ह्यांचे अध्यक्षतेखाली स्वदेश टीम ची एक बैठक जळगाव ला झाली. त्यात अशा समविचारी लोकांना एकत्र आणण्या च्या उद्देशाने एक सज्जन शक्ती नावाचा फोरम स्थापन करण्या चे ठरले. ह्या बैठकीला श्री भंवरलाल जैन, श्री दिनकर गांगल, डॉ. केळकर अन डॉ. सुरेश खोपडे (अतिरिक्त पोलीस आयुक्त, मुंबई) ह्यांनी मार्गदर्शन केले. सध्या श्री गांगल सर व डॉ. केळकर ह्यावर अधिक काम करित आहेत.

श्री भंवरलाल जैन ह्यांनी अशा समविचारी लोकांच्या शक्तीला सज्जन शक्ती हे नाव दिले आहे. शेती क्षेत्रात अफलातुन अन अफाट कार्य केलेल्या श्री जैन ह्यांना प्रत्यक्ष भेटता आले, तो दिवस माझ्या अन चंपी च्या आयुष्यातील एक सर्वोत्तम दिवस होता. १२ अन १३ जानेवारी २००८! शेती हे माझे पहिले प्रेम असल्या कारणाने असेल पण जैन हिल्स चा परिसर पाहताना मी अक्षरशः स्वतः ला विसरुन गेलो होतो. स्वतःची स्वप्ने साकार करताना इतरांना ही त्यात सामावुन घेणे अन सर्वांनी मिळुन नव निर्मीतीचा आनंद घेणे म्हणजे काय हे जळगावचे जैन हिल्स पाहील्यानंतर च लक्षात येईल. जळगावच्या भकास पर्वत रांगांवर, पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करित हिरवीगार सृष्टी निर्माण करणार्‍या श्री जैन ह्यांना पृथ्वीवर गंगा आणणार्‍या भगीरथा ची उपमा देणे योग्य होइल! दुर्दम्य इछाशक्तीच्या जोरावर माणुस काय घडवु शकतो, ह्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हंजे जैन हिल्स!

सुपंथ च्या निमित्ताने ह्या ठिकणी मला विषेश उल्लेख करावा वाटतो तो श्री सदनंद भागवत अन त्याम्च्या सहचारीनी चा! अमेरिकेत काही काळ राहुन आलेले हे दांपत्य, कोकणातील देवरुख ह्या गावचे. लहान असल्यापासुन समाजसेवेची आवड असलेले श्री सदानंद देशमुख ह्यांनी देवरुख ला एक अनोखे विद्यामंदीर सुरु केले आहे. अनाथ, पददलीत अन शहीद जवानांच्या अनाथ मुलांच्या संपुर्ण सगोपनाची हमी हे दांपत्य घेते. ह्या मुलांना पुढे त्यांचा इच्छे प्रमाणे करीअर घडवण्या साठी मार्गदर्शन केले जाते. त्यानी
http://www.nextgenfoundation.org/ngf/index.htm हे फांउंडेशन स्थापन केले आहे, अन त्यात त्यांचे अनेक सहकारी यथा शक्ती मदत करीत आहेत. वरील वेब साईट ला भेट देउन आपण त्याबद्दल अधिक माहीती घेउ शकता. अन शक्य असेल तर त्यांना मदतीचा हात ही देउ शकता.
स्वतः चे व्यावसायीक ध्येय प्राप्त झाल्यानंतर समाजासाठी काही कार्य करावे ह्या हेतुन एकत्र आलेले हे लोक आहेत. एकमेका सहाया करु अवघे धरु सुपंथ ह्या उक्तीप्रमाणे सर्व सज्जन लोकांनी एकत्र येउन राष्ट्र उभारणीत आप आपला वाटा उचलावा ही च अपेक्षा!

....... पुन्हा कधीतरी सविस्तर लिहिल च! (अपुर्ण...!!!)

विषय: 
प्रकार: 

झकास! बरेच दिवसानी उगवलास अन तेही एका सत्कार्याची माहिती घेवून...

चंपक, धन्यवाद!
उपयुक्त आणि माहितीपूर्ण लेख.

चंपक मस्तच. त्या साइटवर जाउन आलो. जबरी काम करत आहेत ही लोकं.

ह्या उपक्रमाचि ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद चंपक.